मंडळी
इथं जी सिच्युएशन देण्यात येत आहे ती काल्पनिक आहे हे आधीच स्पष्ट करतो. समजा, जर तुमच्या ऑफीसमधल्या एखाद्या स्त्री सहका-याने (सहकारणीने) ब्युटीक मधून शिवून आणलेला महागामोलाचा ड्रेस तुमच्याकडे दिला ;
थांबा. पूर्ण झालेलं नाही. अर्धविराम आहे.
तर हा ड्रेस तुमच्याकडे तिच्या मैत्रिणीकडे देण्यासाठी दिला कारण तुम्ही त्याच बाजूला राहता आणि तुम्ही विश्वास टाकण्याजोगे आहात अशी तिची समजूत आहे. तुम्ही मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्विकारता आणि ड्रेस तुमच्या ब्रीफकेसमधे व्यवस्थित ठेवून देता.
संध्याकाळी घरी जाताना घरी कुणीतरी तुम्हाला लिफ्ट मागतं. मग गप्पाटप्पा, कुचाळक्यांच्या नादात तुम्ही अर्धा प्रवास पार पाडता. इतक्यात लक्षात येतं कि मुलाचं पुस्तक आणायचं होतं. ते काम पूर्ण करता. एलआयसीचा हप्ता भरता, शेअरब्रोकर कडे जाऊन येता.
रस्त्यावर रहदारी प्रचंडच असते. सगळ्यांना शिव्या घालत घालत कसे बसे घरी पोहोचता आणि आंबलेल्या चेह-याने चहा ऑर्डर करता. पत्नीच्या कामांची यादी सुरू होते इतक्यात तुमच्या लक्षात येतं कि ड्रेस द्यायला जायचं होतं.
बायकोला सांगावं कि नाही याचा विचार करतच तुम्ही तो ड्रेस तुमच्या वॉर्डरोब मधे ठेवून देता. उद्या कामाला जाताना ब्रीफकेस मधे घालावा किंवा जेव्हां केव्हां ड्रेससकट बाहेर सटकता येईल तेव्हा नेऊन द्यावा हा विचार करता..
नंतर काही बाहेर जाणं होत नाही. सकाळी आवरायची घाई, लांबचा प्रवास, आवराआवर यात ड्रेस घ्यायचं राहून जातं आणि.. तेच होतं ज्याची कल्पना तुम्ही ऑफिसात बसून करता.
संध्याकाळी बायको स्वागताला ड्रेस घेऊनच तयार असते... चेह-यावर बदमाष हसू आणून ती म्हणत असते "काय ही सरप्राईझ द्यायची पद्धत ? मला सांगितलं असतं तर मी नाही म्हटलं असतं का ....."
पुढचे शब्द तुम्हाला ऐकू येत नसतात. ड्रेस बरोबर तिच्या मापाचा असतो..
या सिच्युएशन मधे काय करावं ?
आपली उत्तर मोलाची आहेत.
काल्पनिक आहेत ना? मग कशाला
काल्पनिक आहेत ना? मग कशाला आतापासून तयारी?
सपने सपने होते है, उसे असलियत मे बदलने की नाकाम कोशिश क्यों करते हो.. इससे तो सिर्फ दुखः हि मिलेगा.
अरेच्च्या तुला सरप्राईज गिफ्ट
अरेच्च्या तुला सरप्राईज गिफ्ट सापडलं का म्हणायचं आणि बायकोबरोबर बाहेर फिरायला जायचं, व मैत्रिणीला पैसे द्यायचे ( ड्रेसचे :P) .
श्री बुटीक मधून हवा तसा शिवून
श्री
बुटीक मधून हवा तसा शिवून घेतलेला स्पेशल ड्रेस असेल ना तो...! अशा पद्धतीने कुणी आपल्या बायकोला आयताच दिला हे तिला (सहकारिणीला) कसं सहन होणार
संगीत संशयकल्लोळ हे नाटक
संगीत संशयकल्लोळ हे नाटक लिहायला घ्या पाहू तुम्ही. त्यात फोटो असतो यात ड्रेस
बाजो संसं - चांगलं नाटक
बाजो
संसं - चांगलं नाटक बघायचं राहून गेलं म्हणायचं .. आमच्या जिवंतपणी (हयातीत) त्याचे प्रयोग झाल्याचं आठवत नाही
अनिल नी जामच खतरनाक
अनिल नी जामच खतरनाक सिच्युएशन मधे टाकल यार!! नुसता विचार करुन ही घाम फुटतोय.
हेहेहे मस्त कल्पना आहे
हेहेहे
मस्त कल्पना आहे
ड्रेस नाही, पण दागिन्याबाबत
ड्रेस नाही, पण दागिन्याबाबत असा प्रसंग नाटक/सिनेमा/मालिकेतून पाहिल्याचे आठवते.
अशा वेळी खरे बोलावे. मूळ ड्रेस जिचा तिला द्यावा.
विसरभोळेपणाचे प्रायश्चित्त म्हणून तसाच किंवा त्याहून छान ड्रेस बायकोला घेऊन द्यावा, म्हणजे पुढे जन्मात कधी काही विसरायला होणार नाही.
भरत +१
भरत +१
खर काय आहे ते सांगून टाकावे.
खर काय आहे ते सांगून टाकावे.
ड्रेस बरोबर तिच्या मापाचा
ड्रेस बरोबर तिच्या मापाचा होता म्हणून वाचलात...
पण दुसर्या दिवशी सकाळी खर सांगुन मोकले व्हा.
याचं उत्तर तुम्ही बायकोचा
याचं उत्तर तुम्ही बायकोचा विश्वास संपादन केला आहे की नाही त्यावर अवलंबुन आहे ......जर विश्वास संपादन केला असेल तर काही भिती नाही ती तुम्हाला विसरभोळा गो़कुळ म्हणेल पण गोकुळातील कान्हा नाही म्हणणार, आणि विश्वास संपादन केला नसेल तर ही सारी हकीकत तुमच्या ऑफिसमधील मैत्रीणीला सांगा, म्हणजे या पुढे असली कामे तुमच्याकडे येणार नाहीत..... दोन्हीकडे फायदा तुमचाच आहे
भरत.. अनिल ..तुला हे पहाटे
भरत..
अनिल ..तुला हे पहाटे पडलेलं स्वप्न नाही नं?? बघ हां खरं होणारे कदाचित!!!!
कुछ भी हो.. ज्याचा तिला परत कर ड्रेस!!!!
मई क्या कहता हूं... पहले
मई क्या कहता हूं... पहले लोकपाल लाओ, फिर आइसे प्रष्ण चुटकीसरशी छूटते है कि नही देखो
किरण हजारे
>>> याचं उत्तर तुम्ही बायकोचा
>>> याचं उत्तर तुम्ही बायकोचा विश्वास संपादन केला आहे की नाही त्यावर अवलंबुन आहे ......<<< आख्ख्या पोस्टला अनुमोदन! परफेक्ट आहे हे वाक्य.
पण आता इम्याजिनच करायचे तर विश्वास सम्पादन केला गेलेला नाहीये हेच कराव, म्हणजे कथा, आयमीन धागा पुढे सरकेल!
जेव्हा विश्वासाचाच प्रश्न येतो (विश्वास गेला पानपतावर), तेव्हा, बायको राहिली लाम्ब तिकडे घरी, मूळात त्या ऑफिसातल्या पोरीने याच्यावर विश्वास टाकलाच कसा म्हणतो मी????
अन याने काय "क्युरियरचा" बिनभान्डवली साईडबिझनेस सुरू केलाय की काय? काय मोबदल्यावर?
असो.
तरीही, इतके गाढवपणे मी केले आहेत असे "इम्याजिन" करून, नन्तर तो ड्रेस घालून बायकोने स्वागत केले अस्ते तर मग काय केल अस्त मी?
चेहर्यावर दचकल्याची एकही सुरकुती न हलवता, कौतुक/प्रेम वगैरे मिश्र सुरकुत्या पाडीत बायकोचे तोन्ड भरुन कौतुक केले अस्ते!
दुसर्यादिवशी हापिसात, रडक्या सुरकुत्या चेहर्यावर पाडीत भोळ्यासाम्ब चेहर्याने त्या मैत्रिणीची माफी मागितली अस्ती की १. तो ड्रेस बायकोने पळविला २. तो ड्रेस लोकलमधुन जाताना दारातुन हातातुन निसटुन हरवला वगैरे. अन मग थोडी कन्जुषी बाजुला ठेवून, त्या मैत्रीणीला भरीस घालून "तिच्या बरोबर" त्याच दुकानात जाऊन तिच्या मैत्रिणीच्या मापाचा नविन ड्रेस घेऊन दिला अस्ता. दुकान (नी अर्थातच मापे देखिल) लक्षात ठेऊन, पुढील वाढदिवसाला बायकोला खुष करायचे नक्क्की केले अस्ते.
'सवत माझी लाडकी' मध्ये नीना
'सवत माझी लाडकी' मध्ये नीना कुलकर्णीला बी अक्षर असलेला नाईटगाऊन सापडतो तो 'बटरफ्लाय' कंपनीचा आहे म्हणून त्यावर B छापलाय असं मोहन जोशी तिला सांगतो. मग काही दिवसांनी नीना कुलकर्णी तिच्या नावाचं आद्याक्षर असलेला 'सटरफ्लाय' कंपनीचा हुबेहूब तस्साच गाऊन विकत आणते.
साधं सरळ 'सत्यवचन' सोडून तुम्हाला द्राविडी प्राणायामी सल्ले हवे आहेत म्हणजे मैत्रिण त्या सिनेमाच्याच कॅटेगरीतली नाही ना ? मोठ्ठा
>>>> 'सत्यवचन' सोडून तुम्हाला
>>>> 'सत्यवचन' सोडून तुम्हाला द्राविडी प्राणायामी सल्ले हवे आहेत <<<<
तेच ना! सरळ खर काय ते सान्गायच सोडुन...... पण तेवढी "टाप" नसेल बायकोसमोर खरखर काय ते बोलायची!
खर काही सांगू नका नाहीतर उगाच
खर काही सांगू नका नाहीतर उगाच संशय येईल बायकोला ते पण तुमच्यात आणि तिच्यात काही नसताना ..... त्यापेक्षा एक युक्ती खेळा . संध्याकाळी बायकोला सांगा तो ड्रेस सकाळी सरप्राईज म्हणून तुलाच द्यायचा होता पण राहून गेला . तो ड्रेस न बघितल्यासारखे करा आणि बायकोला सांगा दुकानदाराने काहीतरी गडबड केली आहे . मी निवडलेला ड्रेस वेगळाच होता आणि तो ह्यापेक्षाही चांगला क्वालीटीचा होता . दुकानदाराने पॅकिंग मध्ये गडबड केली आहे असे सांगा आणि सरळ तो ड्रेस घेऊन बाहेर पडा . जिचा कोणाचा असेल तिला परत करा . हे सर्व झुठ लपवण्यासाठी बायकोला दुसरा चांगला ड्रेस घ्या . माफ करा पण तुम्हाला मनात नसताना एका ड्रेसचा भुर्दंड बसेल पण बायलो खुश होईल .पण सर्व काही ठीक होईल . अशा प्रकारे एका डागतात दोन पक्षी मारा . पण खरे सांगू नका . जर तुम्ही खरे सांगितले तर विनाकारण बायकोच्या मनात संशय येईल कि तुमचे आणि तिचे संबंध इतके वाढले आहेत कि तुम्ही एकमेकांच्या वस्तू शेअर करू लागला आहात .पुढे काय होईल ते संगलाया नकोच .....
या सिच्युएशन मधे काय करावं ?
या सिच्युएशन मधे काय करावं ? >>> खरे तर ब्रिफकेस घेऊन ऑफिसात जाऊ नये. तेच सर्वाच मुळ आहे. (रूट कॉज). उद्यापासून नका नेऊ.
इथं गैरसमज झालेला दिसतोय
इथं गैरसमज झालेला दिसतोय लोकांचा. मैत्रीण हा शब्द सहकारिणीची मैत्रीण या अर्थाने आलेला आहे. समजा हा शब्द वापरण्याचं प्रयोजन आपण ध्यानात घ्यावं असा प्रसंग आलाच तर आधीपासून तयार असावं हाच एक(मेव) हेतू आहे इथं
म्हणतात ना तहान लागल्यावर विहीर खणू नये .. मला मैत्रीण असण्याच्या कल्पनेनेच घाम फुटला.
एकच शंका आहे ड्रेस जर
एकच शंका आहे
ड्रेस जर नव-याच्या वॉर्डरोब मधे असेल तर तो बायकोला कसा काय सापडेल लगेच ? ती कशाला बघेल ना नव-याच्या खाजगी गोष्टी ?
सत्य सांगून टाकावे. घरे
सत्य सांगून टाकावे. घरे गेल्यावर लगेच बायकोला सत्य सांगितले असते तर पुढले प्रश्नच उद्भवले नसते.
>>मला मैत्रीण असण्याच्या कल्पनेनेच घाम फुटला>>
का बरे? यात घाबरण्यासारखे काय? की तुम्हाला मैत्रीण या शब्दाचा काहीतरी 'वेगळा' अर्थ अपेक्षित आहे? कायच्या कै!
मी सरळ सांगेन तूझ्या साठी
मी सरळ सांगेन तूझ्या साठी नाही तो..मैत्रीनी चा आहे...
नेहमी खरे बोलावे. म्हणजे आपण
नेहमी खरे बोलावे. म्हणजे आपण कधी, कुठे, काय बोललो होतो ते लक्षात ठेवावे लागत नाही.
स्वाती २ खर तर मला स्मायली
स्वाती २
खर तर मला स्मायली टाकायला जमत नाही. मग त्यातला नेमका संदेश पोहोचत नाही मैत्रीण चा अर्थ इथं ओ काढला जातोय त्या अर्थाची मैत्रीण.. असं म्हटलं. कथेतला नायक म्हणजे कुणीतरी काल्पनिक व्यक्ती आहे.. मी तसा अविबासित व्यक्ती आहे.
<<मी तसा अविबासित व्यक्ती
<<मी तसा अविबासित व्यक्ती आहे>>
तसा म्हणजे?
सरळ सरळ, घरी आल्यावर लगेचच
सरळ सरळ, घरी आल्यावर लगेचच ड्रेस बायकोला दाखवुन टाकावा आणि त्याचे 'प्रयोजन' ही सांगुन टाकावे. चॅप्टर क्लोज.
भरतजी तसा म्हणजे रूढ अर्थाने
भरतजी
तसा म्हणजे रूढ अर्थाने अविबासित. म्हणजे रस्त्याने जाता येता कधीतरी सुंदर स्त्री दिसली तर लक्ष जातं..
imagine करून answer पण
imagine करून answer पण तुम्हीच शोधा राव....अजुन पण बरेच महत्वाचे प्रश्न आहेत हो जगात....असो !!
मुळात इतका वेळ बायको पासून
मुळात इतका वेळ बायको पासून एखाद्याने लपवलंच नसतं, फोन वर बोलताना किंवा घरी आल्यावर तोंडून निघून गेलं असतं.
नथिंग ट्रुथफुल लाईक प्लेन ट्रुथ.
(दागिन्यांच्या वेळी मी वेगळा सल्ला दिला होता.कारण त्यात संभाव्य विबासं शंका नव्हत्या.फक्त बोलाचा नेकलेस बोलायचे तोडे होते.)
Pages