निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग तिथल्या अशाच वेगवेगळ्या झाडांचे फोटो इथे टाकत जा ना म्हणजे आम्हाला तिथले फोटो इथे बघायला मिळतील.>>>>>नक्कीच. पण मला फक्त त्या झाडावर फुले आल्यावरच थोडेफार ओळखता येतात. Happy खरंतर या बागेची ओळखही अशी सहजच झाली होती. जेवल्यानंतर दुपारी मी आणि माझा मित्र राऊंड मारायला गेलो असता गुलाबी टॅबेबुया मस्त बहरलेला दिसला. त्यावेळी दिनेशदांच्या पोस्टवर पिवळा टॅबेबुया पाहिला होता. नंतर सहजच बागेत गेलो असता पहिल्यांदा अंजनाचे फुल दिसले. नंतर वरूण (वायवर्ण), टेंभूर्णी, पिवळा बहावा, जाम, बकुळ, गुलाबी कंचन, मुचकुंद, कनकचंपा/रामधनचंपा अशी अनेक वेगवेगळी झाडे दिसली. आता महिन्यातुन्/२-३आठवड्यातुन एकदातरी एक चक्कर टाकुन येतो. दरवेळेस काहितरी नविन दिसतं. Happy

मस्त फुलं जिप्सी. आज जमलं तर आण्खी १/२ फोटो मी पण टाकते.
निकिता, आजोबा राजापूर लांजे येथे १९२५ ते १९७० होते.

अरे गप्पांचा पाचवा भाग सुरू होऊन यं दिवस झाले तरी मला पत्ताच नाही!

इथल्या सर्व निसर्गप्रेमींचं अभिनंदन!

vegavegali_phule_reduced.JPG

गौरी फुले सुंदर आहेत.

जिप्सी तो अंजन कधी फुलतो ? मला त्याला प्रत्यक्ष पहायच आहे. जानेवारीत फुलेल का ? मागच्या वर्षी तू टाकलेले ते फोटो अजुन डोळ्यासमोर आहेत.

गौरी - तुझ्या या वरील प्र चि वर क्लिक केल्यावर पिकासावर तू टाकलेले अनेक निसर्गाचे फोटो पहायला मिळाले - फारच सुंदर आहेत ते - ते सर्व इथे प्रकाशचित्रे विभागात कृपया टाकावेत - सर्वांनाच पहाता येईल.
व दुसरे जागू म्हणते ते कोणते फोटो - कृपया लिंक देणे.
जागू - व्यवस्थित हिंडा- फिरायला लागलीयेस ना..... गुड, व्हेरी गुड.

२ दिवस इलेक्शनमध्ये गेले. काल माझी रिलेटीव्ह निवडून आली निवडणूकित त्या खुषीत दांडी मारली काल ऑफिस व मायबोलीलाही.

आमच्याकडे मागच्या आठवड्यात हा भोवर्‍यासारखा एकमेव जांब झाडावर तयार झाला होता. आता सगळी फुलेच फुले व छोटी फळे आहेत. ह्याचा आकार साधारण काजूच्या छोट्या फळा एवढा होता.

वक्के त्यावर लेख लिहायचा होता पण टाकते आता. जिप्स्या तुही हे तुझ्या ब्लॉगसाठी वापरू शकतोस.

हे फोटो आमच्या दुसर्‍या झाडाचे आहेत. वरील जात वेगळी आहे. मागिल वर्षी काढलेले फोटो आहेत सगळे.

१) जामच्या कळ्या

२) जामची फुले

३) जामची फुले गळल्यावर फळ धरायला होणारी सुरुवात

४) हे छोटे जाम

५) हे तयार झालेले जाम

गौरी... तू आहेस होय... मी ओळखलेच नाही... आता तू बोलू नकोस तू मला ओळखले नाहीस... Happy

जगू... फोटो नेहमीप्रमाणे सुंदर... मला एक मोठा भोवरा मिळेल का? Lol

मस्तच दिसताहेत जामची फुलं!
कोकणात हर्णै मुरूड / आंजर्ल्याजवळच्या केशवराज मंदिराच्या वाटेवर असे गुलाबी जाम दिसले होते.

अगं... मी नाही पण शमी आणि आमचे माळीदादा ६ दिवस काम करत होते. नव्या कोऱ्या Canon 600D ने बरेच फोटो काढले आहेत... Happy वेळ काढून धागाच काढतो इथे.. Lol

धन्स सगळ्यांचे.
गौरी हे तुझ्यासाठी लाल जाम. माझ्या माहेरचे. काकांचे झाड आहे.

वा वा वा वा फारच सुंदर प्र चि - रसरशीत जाम, बहरलेली फुले, हिरवीगार पाने...... लाल जामही छानच.
Syzygium samarangense ( Eugenia javanica), Family- Myrtaceae, Wax Apple

सेनापती - तुमच्याकडील सुद्धा प्र चि पहायला आवडतीलच - येऊं द्या बिगी बिगी.......

जागू, कसला टेम्पटिंग दिसतोय तो दुसर्‍या फोटोतला जाम ... मी तिथे असते, तर फोटो काढायच्या आधीच पोटात गेला असता असं वाटतंय Happy

जागु, जाम ची फुले पण खुपच सुंदर आहेत. ते लहान , लहान फळे पण गोडं दिसतायेत.
ते लाल जाम पण मस्त. एकदम खावेसे वाटणारे. Happy
लवकर च उरण ला भेट द्यावी लागणार बहुतेक. Happy

लाल जाम....अरे... माहीतच नव्ह्तं लाल पण असतात... चव कशी असते..? पांढर्‍या जाम सारखीच का?
मस्तं दिसतायत...

लाल जाम....अरे... माहीतच नव्ह्तं लाल पण असतात... चव कशी असते..? पांढर्‍या जाम सारखीच का?
मस्तं दिसतायत...>>
आम्ही हे लाल जांम मॉरिशीयस ला खाल्लेले. ते चक्क आंबट होते. लाल तिखट मसाला लावुन विकत होते.

अजुन एक गंमत. इथे फ्रेन्च ब्रिज, ऑपेरा हाउस, मुंबइ ला एक फळवाला बसतो. त्याच्याकडे जांम पाहिले. म्हटल विचारु तरी केवढ्याला आहेत ते. म्हणे १२० रु. ला डझन?!!!!! चक्कर यायची बाकी होती.

बर्‍याच फळांचे फोटो टाकायचे राहीलेहोते मागीलवर्षी काही अपुर्‍या फोटोंमुळे तर वेळ न मिळाल्याने.

हा मागील वर्षी मी जाम चा टाकलेला धागा.
http://www.maayboli.com/node/26264

Pages