सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
जागुतै पाहुणा वाघाचा कोट
जागुतै पाहुणा वाघाचा कोट घालुन आलाय वाटत
शशांकजी - झब्बू.....मस्तच - मी जवळजवळ रोजच वसईच्या खाडीवर ( ट्रेन मधुन) चंद्राचे दर्शन घेतो,
कधी डोंगरातुन उगवणारा तर कधी समुद्रात डोकावणारा. कधी तांबुस,मातकट मातीत लोळुन आल्यासारखा (झब्बुत आहे तसा) तर कधी पांढरा शुभ्र एकदम 'टाईड हो तो व्हाईट हो' सारखा.
कधी भाकरी सारखा गोल तर कधी आताच त्या भाकरीचा तुकडा मोडल्या सारखा.
कधी घड्या सारखा ओथंबलेला की आता त्यातील द्रवरुपी चांदी वाहु लागेल की काय असे वाटणारा.
समुद्रात डोकावणारा असेल तर पर्वणीच असते, त्याचा दुधाळ प्रकाशात खाली पाण्यात त्याची प्रभा पाहणे हा एक आनंदच असतो.
किती सुंदर वर्णन चंद्राचे !
किती सुंदर वर्णन चंद्राचे !
इनमिनतीन खरच खुप सुंदर वर्णन
इनमिनतीन खरच खुप सुंदर वर्णन आहे चंद्राच.
व्वाह!!!! नितीन मस्तच वर्णन
व्वाह!!!!
नितीन मस्तच वर्णन
या धाग्यावर फारसा लिहिता
या धाग्यावर फारसा लिहिता झालेला नसलो तरी वाचत असतोच..
सध्या घरी गेले ५ दिवस बागकाम सुरू आहे. शमिका आणि आमचे माळी दादा दोघेही झाडे री-पोटींग, रुट्स कटिंग, ट्रीमिंग, नव्याने खत-माती असे सर्व प्रकार करत आहेत. अजून लिहीनच फोटोसकट..
इनमिनतीन वाह... मस्तं वर्णन
इनमिनतीन वाह... मस्तं वर्णन
जागू चितमपल्लींच्याच एका
जागू चितमपल्लींच्याच एका पुस्तकात (कदाचित चकवाचांदणं मधेच ) एका माश्याचं वर्णन आहे. त्याच्या पोटातील गाभोळीवर २७ वळ्या असतात आणि त्यातील एकच वेगळ्या रंगाची असते. तिच्यावरुन २७ नक्षत्रांतल्या पावसाचा अंदाज बांधता येतो.. असे काहीसे वर्णन आहे ते.
मस्त चांदोबा आणि ईन मीएन तीन,
मस्त चांदोबा आणि ईन मीएन तीन, सुंदर वर्णन. मजा आली.
दिनेशदा अजुन फक्त ८०च पाने
दिनेशदा अजुन फक्त ८०च पाने वाचून झालीत. आता जोर मारायला हवा वाचनासाठी. पण सध्या थोडी गडबड चालू आहे त्यामुळे वेळ कमी मिळतो.
उद्या आमच्या उरणला दत्तजयंतीची जत्रा आहे. या सगळ्यांनी.
शोभा, तुझी फोटोग्राफी त्या
शोभा, तुझी फोटोग्राफी त्या पावडर पफप्रमाणेच बहरत चाललेय वाटते. छान. असेच चालू ठेव.>>>>याचे सारे श्रेय तुलाच आहे. खूप खप आभार.
वैजयंती, मस्त फोटो. ईनमीन
वैजयंती, मस्त फोटो.
ईनमीन तीन मस्त वर्णन केलत चंद्राच. त्याचे फोटो पण द्या ही.
ईन मीन, चंद्राचे वर्णन
ईन मीन, चंद्राचे वर्णन अप्रतिम..............
वैजयंती फोटो मस्त. अजून फोटो टाका ना इथे...
शोभा ते प्रचि काढण्यासाठी
शोभा ते प्रचि काढण्यासाठी ट्रेनमध्ये कॅमेरा घेऊन जावा लागेल, बघतो प्रयत्न करतो.
चला पोहायला तलावाच्या काठावर
चला पोहायला तलावाच्या काठावर कोवळ्या उन्हात बसलेले ( ?) बेडुक मामा.
ज्ञानेश, तुमचा चंद्राचा फोटो,
ज्ञानेश, तुमचा चंद्राचा फोटो, शशांकजींचा झब्बू, आणि इनमीनतीनचे वर्णन . आहाहा ! काय त्रिवेणी संगम झालाय हो अगदि!
<<<<याचे सारे श्रेय तुलाच आहे. खूप खप आभ>>> कसचं कसचं
वा जागू, अभिनंदन! हेडर अतिशय
वा जागू, अभिनंदन! हेडर अतिशय सुरेख आणि माहितीपूर्ण झालं आहे.
जागू, ५ व्या भागाबद्दल
जागू,
५ व्या भागाबद्दल अभिनंदन!!
इथे योगदान देत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासुन आभार.
(:हाहा: काही मोजक्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणुन यंदा नगरसेवकपदाच तिकीट मिळो हिच इच्छा !)
दिनेशदा, एअर प्लाट बद्दल छान
दिनेशदा,
एअर प्लाट बद्दल छान माहिती मिळाली.
विकिपिडीया वर एफीफाईट चे काही फोटो दिसले
ईन मीन
ईन मीन तीन..........बेडुकदादा.., त्यांची पोझ,... आणि तुझे वर्णन सगळं मस्त!!
दिनेशदा, त्या माशाचं वर्णन
दिनेशदा, त्या माशाचं वर्णन रानवाटा या पुस्तकात आहे. 'दिवारू' नावाचं जे प्रकरण आहे त्यात हा दिवारू (म्हणजे दल्लू गोंड) श्री.चितमपल्लींना सांगतो - त्या माशाबद्द्ल. त्यात त्या माशाचं नाव 'सवळा' असं दिलंय. जागू नक्की सांगू शकेल त्याचं नाव कारण सवळा हे बहुधा गोंड भाषेतलं नाव असावं. सो- रेफर टू जागू.......
अनिल माझ्याकडे पण आहेत काही
अनिल माझ्याकडे पण आहेत काही खास फोटो, टाकतो लवकरच.
नितीन आणि वैजयंतीच्या रुपाने आपल्याला नवे फोटोग्राफर्स मिळाले.
शांकली, तो बहुतेक गोड्या पाण्यातला मासा आहे ना ?
प्रज्ञा १२३ ला अनुमोदन.
प्रज्ञा १२३ ला अनुमोदन. चंद्राचा फोटो, शशांकजींचा झब्बु आणि ईनमीन तीन चे वर्णन. मस्त च..:)
शांकली , तुमचे हि कौतुक तेवढे कमीच आहे. शशांक जी आणि तुम्ही पण खुप खुप सुंदर माहीती देत असता.
मी एकदम नि.ग. मधे बालवाडीतील विद्याथी आहे असे वाटते.
आज मी ऑफिसमधुन जरा लवकर
आज मी ऑफिसमधुन जरा लवकर निघाले. जाताना मध्ये रेल्वेफाटक लागतो. तो लागलेला दिसला म्हणून मी आधीच एका झाडाच्या सावलीत अगदी रस्त्याच्या कडेलाच गाडी थांबवून बाजूला रानफुले दिसतात का न्याहाळत होते. तेवढ्यात एक क्रेन आली आणि माझ्या गाडीला धडक देऊन पुढे गेली. मी गाडीसकट खाली पडले. हेलमेट होते (नवर्याची कृपा तशी अटच आहे त्याची जर हेलमेट असेल तरच गाडी घेउन जायच नाहीतर नाही असे स्पष्ट बजावले आहे पहिल्यापासूनच) त्यामुळे डोक्याला लागले नाही. पायाला थोडा मुका मार लागला थोडी सुज आली आहे. बाकी एकदम ठिकठाक आहे काळजी नसावी. गाडिच्या पुढच्या बॉडीला क्रॅक गेला. तो क्रेनचा ड्रायव्हर लगेच आला पाठी माझी गाडी उचलली. मी त्याला दम दिला चांगला. बाजूला दोन मोठ्या गाड्या जातील एवढा रस्ता असताना त्याने मला धडक दिली. हळू हळू ऑफिसच्या दिशेने येणारे लोकही जमले. त्या लोकांनीही त्याची चांगली शाळा घेतली. त्याच्या मालकाला बोलावले तर मालकाने सुपरवायझरला पाठवले तो लांब असल्याने. त्याने नुकसान भरपाई देण्याचे कबुल केले. सगळे हेच म्हणत होते जर तिला काय झाल असत तर काय ? पण सगळी इश्वराची कृपा आणि निसर्गाचा आशिर्वाद म्हणून त्या क्रेनची डायरेक्ट मला धडक न लागता गाडीला लागली. अगदी पाच मिनीटांवरच पोलिस स्टेशन आहे. तिथे कोणीतरी खबर दिली होती त्यामुळे पोलीस बाहेरच वाट पाहत होते. त्यांनी मला व त्या ड्रायव्हरला थांबवून मला गुन्हा नोंदवण्यास सांगितला. पण आम्ही तो भरपाई देतोय व जास्त लागल वगैरे नाही म्हणुन आम्ही कंप्लेट नोंदवत नाही अस सांगितल. तो सुपरवाझर आमच्या बरोबर शोरुम मध्ये येत होता. नेमकी त्या पोलिसांनी त्याला आडवून घेतले. मी माझ्या मिस्टरांना फोन करुन आधीच शोरुम मध्ये यायला सांगितले होते. ते धडक तिथेच येणार होते पण मीच नको सांगितल. मी शोरुमध्ये पोहोचले पण तो आला नाही म्हणून मिस्टरांनी पोलिस स्टेशनला फोन केला. पोलिसांनी त्याला धरुन ठेवले आहे व साहेब तुम्ही इथे या आम्ही त्याची चांगली झडती घेऊ व तुम्हाला सगळा खर्च भरुन देऊ असे सांगितले. आम्ही परत तिथुन पोलिस स्टेशनला गेलो. माझे मिस्टर त्या ड्रायव्हर व सुपरवायझरवर भडकले. जर तिला लागल असत, जास्त काय झाल असत तर काय ? पोलिसांनि त्याच्या कुठल्यातरी कॉन्ट्रॅक्टरला बोलावून घेतले. तो नेमका आमच्या एरीयातला व माहीतीतला होता. त्याने शोरुमचा सगळा खर्च देण्याचे कबुल केले. मिस्टरांनीही सांगितले की तु आहेस आणि तिला जास्त लागले नाही म्हणून सोडतो. मग आम्ही तिथुन आलो आणि डॉ. कडे गेलो एक्सरे काढला. नॉर्मल आहे. थोडी पायाला सुज आहे. त्याच्यावर औषधे दिली आहेत. हा घडलेला किस्सा तुम्हा सर्वांशी शेअर करावासा वाटला म्हणून इथे लिहत आहे.
मामी किती दिवसांनी आलीस ग ?
साधना ये ग लवकर मिस करतोय तुला.
जागू, खरच निसर्गाची कृपा
जागू, खरच निसर्गाची कृपा !
काळजी घे.
जागू काळजी घे ग. लवकर बरी
जागू
काळजी घे ग. लवकर बरी हो.
एक जुना फोटो.. गावाला जाताना
एक जुना फोटो.. गावाला जाताना पुळ्याजवळ काढलेला. आमच गाव पावसजवळ आहे.
हा आम्ही दिवाळीत काझीरंगा
हा आम्ही दिवाळीत काझीरंगा अभयारण्य पहायला गेले होतो तिथे भेटलेला एक मित्र. खूप जवळून पहायला मिळाला. त्याच भलमोठ्ठ बाळ पण होत तिथेच, पण माणसं पाहून घाईने आत पळालं.
बरं, अजून काही टाकू का? seriously विचारतेय.
जागूतै - आता आराम करा जरा,
जागूतै - आता आराम करा जरा, वाचन करा मनसोक्त......... आणि जवळपासचेच फोटो काढा (शक्य झालं तरंच....) पक्ष्या-फुलांचे....... फार मोठा अपघात झाला नाही हे सुदैवच......
वैजयंती - सर्व फोटो अप्रतिम - कॅमेर्यामागचा सुजाण डोळा लक्षणीय......
आणि कुठलं गाव म्हणायचे हे..... (पांवसजवळचे.....)
आमचं गाव खानवली, बेणी जवळचं
आमचं गाव खानवली, बेणी जवळचं .. पावसकडून लांज्याला जाताना सापूचं तळं लागत, तिथेच जवळ आहे. तो भाग सड्यावरचा आहे. तिकडून खाली उतरून गेलं की नदीच्या कुशीत आमचं घर
माझं माहेरचं मूळ गाव पण राजापूरहून जवळ आहे. माझे आजोबा राजापूर हायस्कूलमधे १९६० पर्यंत मुख्याध्यापक होते. दिनेशदांचे राजापूर व धोपेश्वर घाटीचे उल्लेख मला नेहेमीच माहेरी घेउन जातात.
एकदम nostolgic केलं तुमच्या एका प्रश्नाने शशांक
जागू, बाई गं देवाची कृपा
जागू, बाई गं देवाची कृपा म्हणून वाचलीस बाई! खरंच जरा काही दिवस विश्रांती घे. आणि मुका मार लागलाय तर गरम पाण्याने शेक जरा. म्हणजे बरे वाटेल. अगं मी पण परवा म्हणजे गुरुवारी पुण्यातल्या आबासाहेब गरवारे कॉलेज मधे साष्टांग नमस्कार घातला! मलापण मुका मार लागलाय. उंडीचा पुण्यातला एकमेव वृक्ष तिथे आहे तो बघायला म्हणून गेले होते. एस्.पी कॉलेज आणि गरवारे कॉलेजचे पटत नाही आणि ही खूप पुरातन परंपरा आहे. मी एस.पी ची विद्यार्थिनी आणि हे गरवारेचे........... आता तुमच्या सर्व लोकांच्या लक्षात आले असेलच!बहुधा कुठलं तरी उट्टं काढलेलं दिसतंय..............
होय दिनेशदा, तो गोड्या पाण्यातला मासा आहे.
वैजयंती, आम्हाला तुमच्या सर्वच फोटोंची खूप उत्सुकता आहे (सीरियसली!!)
गेंड्याच्या बाळाचे फोटो द्या ना इथे.
Pages