निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी... तुमच्या कॅमेरामध्ये बंदीस्त व्हायला पक्षी सहज तयार असतात... Happy अप्रतिम फोटोज... Happy

(त्या लिंकवर क्लीक केलं तर पान हरवले आहे असं येतय... मी नविन लेखन मधून पाहिलं..)

त्या आपट्याच्या पानासारखे पण गुलाबी रंगाचे फुले असलेले झाड परवा ठाणेला हायपरसिटी ला पाहिले. पण ती पाने आपट्याच्या पानापेक्षा दुप्पट / तिप्पट मोठी होती.

रातोंको चोरी चोरी बोले मोरा कंगना
अबके जो बरखा आये, आयेंगे सजना
कैसी अनोखी होंगी वो राते
जबसे पियासे होंगी मनवा कि बाते
दो चाँद चमकेंगे मोरे अटरिया
ईक तो गगनमे होगा, दूजा मोरे अँगना...

मानुषी, हे गाणे आठवले !

त्या आपट्याच्या पानासारखे पण गुलाबी रंगाचे फुले असलेले झाड परवा ठाणेला हायपरसिटी ला पाहिले. पण ती पाने आपट्याच्या पानापेक्षा दुप्पट / तिप्पट मोठी होती.>>>>>>मोनाली, ते कंचन. सध्या बहरलाय मस्त Happy

वैजंयती, कुठल्या साईटची लिंक दिलीय ? पिकासाची असेल तर दिसायला पाहिजे, बाकिच्या साईट्स साठी काही वेगळ्या स्टेप्स आहेत.

जिप्सी, पण ते ४-५ फुटाचेच झाड होते. मोठे झुडुप म्हणावे तसेच. बरोबर का?>>>>येस्स्स Happy

मदत समितीने दिल्याप्रमाणे embed option वापरलाय.>>>>पुन्हा एकदा ती लिंक देण्याचा प्रयत्न करा.

पिकासाचीच दिलीय दिनेशदा. embed image मधली लिन्क कॉपी केली आणि img src tag वापरलाय. टॅग वापरताना काही चुकल असेल का?

वा चंद्र मस्तच आहेत.
आमच्याकडेही तो गुलाबी कंचन बहरलाय. आणि पांढरा कंचन नेहमी फुलतो टाउनशिप एरीयातला. कदाचीत कलमे असल्याने असणार.

टॅगच वापरला... आता दिसतय ना?
मी पण नेहेमी इकडे येते. हे सगळे फोटो पहाताना आणि गप्पा वाचताना वेळ कसा गेला कळत नाही. काही टेन्शन, प्रेशर असेल तर मी आवर्जून इकडॆ येते किंवा पाय मोकळे करून येते. या मित्रांच्यात वावरताना सगळे ताप विसरायला होतं.
मला फ़ोटो चांगले काढता येत नाहीत, पण आजच पहिल पोस्ट टाकलय त्या निमित्तने आत्त दिवाळीत सिक्किमला गेलो होतो त्या वेळी पाहिलेल्या कांचनगंगा रांगांचा हा फोटो. सिल्लेरीला अगदी लहानश्या खोपटवजा हॊटेलात उतरलो होतो. संध्याकाळी पोचलो, तर आजूबाजूला पाहून थोडी निराशा झाली... वाटलं नेट्वरून बुकिंग करून आपण फ़सलो.... सकाळी खिडकी उघडली तर माग्च्या बाजूने येणारे सूर्यकिरण या रांगावर पडले होते आणि हा अद्भूत देखावा नजरेस पडला... हे लिहिताना सुद्धा मला ते सगळं डोळ्यासमोर दिसतय.

वैजयंती फोटो सुंदरच आहे. आणि धाग्याबद्दल इतका आपलेपणा दाखवलास त्याबद्दल धन्यवाद.

माश्यांची नावे असणारी साईट मला हवी आहे. माझ्या कुठल्यातरी धाग्यावर कोणीतरी दिली होती तुम्हाला सहज माहीत असेल तर सांगा नाहीतर मला सगळे धागे उसवावे लागतील आणि शोधावी लागेल.

जागू, Triton नावाची कंपनी भारतात व्यावसायिक तत्वावर मासे पैदास करुन, निर्यात करते. त्यांच्या वेबसाईटवर अशी नावे आहेत. Triton Group of Companies असे सर्च करायचे.

वैजयंती, या शिखरांचे मला नवल वाटते कि लाबूनही ति इतकी जवळ असल्यासारखी भासतात. केनयातला माऊंट केनया पण असाच आहे. खुप दूरवरुन तो दिसतो, पण त्यावर चढाई करायची तर ४/५ दिवस हाताशी हवेत.

माधव तो फिशटँकचा का ? तो नको मला खाणार्‍या माशांची नावे हवी आहेत.

दिनेशदा बघते सर्च करुन.

Pages