निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, ती घुबडाची ती पिल्लं खरचं खुप गोड दिसतायेतं. Happy
आशुतोष, मस्त फोटो.. शांकली : पावडर पफ पण सुरेखच आहे.

शशांक आमच्या किचनच्या खिडकीतही एक कावळा नेमाने येतो.
तोही बरोबर आई किंवा वहिनी चपात्या करत असतील तेव्हाच.
छोटासा तुकडा त्याला द्यावाच लागतो. अजून तयार नाही, थोड्या
वेळाने ये सांगितले तर निमूट जातो आणि खरेच थोड्या वेळाने
परत येतो.

आमच्या कंपनीच्या टाउनशिप मध्ये बरीच पावडरपफची झाडे आहेत.

ऑफिसच्या रोडला शिरिषाच झाड आहे. पण शिरीष आणि शिशिर एकच का ? मागील वर्षीचे फोटो.

शिरीष छान फुलला होता. हा पुर्ण देशी वाण. पुर्वी याची फुले पुरुष कानावर माळत असत. त्याकाळी त्याला मंद सुगंध होता. याच्या सोनेरी शेंगा पण छान दिसतात, वार्‍यावर त्या झुलताना जो आवाज येतो त्याला पायातल्या पैंजणांच्या आवाजाची उपमा दिलेली आहे.

हे खरे बांडगूळ, बिया फारच चिकट असतात याच्या. इतक्या चिकट कि पक्ष्याच्या पोटातून निघतानाही चिकटच राहतात आणि पक्ष्याला तिचा त्याग करण्यासाठी, फांदीला बुड घासावे लागते... आणि तिथेच ती बी रुजते.

गेले ७/८ महिने मला जाणवलेली एक गोष्ट अशी की, मध्यरात्री साधारणत: ३-३.३० च्या सुमारास कावळे ओरडत असतात. इतक्या पहाटे पहाटे सर्वसाधारणपणे पक्षी उठलेले नसतात. मग काही कावळेच का बरं ओरडत असतील? बरं त्यांचं ओरडणं हे कोलाहलासारखं पण नसतं. कुणाला काही सांगितल्यासारखं ते बोलत असावेत असं वाटतं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांची वेळ कधीच चुकलेली नाही.

आजच्या लोकसत्तात ही बातमी वाचून वाईट वाटलं. कुणाला लिंक देता आली तर पहा.....
"जोडीदारणीच्या शोधात जुनोनातील एकमेव सारसाची वणवण"

या बांडगूळाच्या फांद्या फारच चिवट आसतात, यांना झोड्पुन पण तुट्त नाहीत.
लहानपणी या बांडगूळांच मला खुप राग यायचा,( यांच्या मुळे झाडाला आंबे खुप कमी लागतातना :अरेरे:) त्यामुळे झेपेल तेवढा मोठा बांबु घेउन मी त्यांना तोडायचा प्रयत्न करायचो.

शांकली, कधी कधी वटवाघळे आणि त्यांचे वाजते. नाईट ड्यूटी करुन आलेल्या वटवाघळांची जागेवरुन वादावादी होते, पण इथे ते कारण नसावे.

मानुषी, लवकरच त्याला जीवनसाथी मिळो ..

ससा, fox-tail orchid मस्तच. ह्याचा पूर्ण फुललेला झुपका कोल्ह्याच्या शेपटीसारखा दिसतो म्हणून हे नाव. मराठीत त्याला 'सितेची वेणी' म्हणतात.

शांकली रानजाई सुंदरच. लेकीला शाबासकी आणि धन्यवादही इतके छान प्रची इथे दिल्याबद्दल.

जागू शिरीष हा वृक्ष तर शिशीर हा ऋतू आहे.

बातमी बरीच मोठी आहे ...सारसाच्या फोटोसकट. शशांक, शांकली..............पहा ना जरा लोकसत्तातली लिंक इथे देता आली तर.

याच्या पाठी कावळे लागले होते आणि साहेबांनी आमच्या किचनच्या खिडकीचा आधार घेतला.
याला बघुन घरात गड्बड उडाली, खिडक्या दार सर्व बंद ,सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० प्रर्यंत ईथेच बसले होते. ( प्रचि खिड्की बंद करुन काचेतुन घेतलेला आहे.)

समोरच्या ईमारतीतल्या कोनाड्यात याचे घरटे आहे.
गुगलुन कळले हा गव्हाणी प्रजातीतला घुबड आहे.
गव्हाणी घुबड पक्षी हा साधारण ३६ सें. मी. आकाराचा आहे. पाठीकडून सोनेरी-बदामी आणि राखाडी रंगाचा त्यावर काळ्या-पांढर्‍या रंगाचे पट्टे असलेला, पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाचा भाग आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात. याचे डोके गोलसर आकाराचे, काहीसे माकडासारखे असते. चेहर्‍याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात.या पक्ष्यांचा वीणीचा निश्चीत काळ नाही. जुन्या-पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या ढोलीत काड्या वापरून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते. घरट्यांजवळ दिवसा सावली येवू शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते. एकच घरटे वर्षानुवर्षे वापरण्याची सवय या पक्ष्यांना अस्सते. मादी एकावेळी पांढर्‍या रंगाची, गोलसर, ४ ते ७ अंडी देते.

गोड दिसतेय गव्हाणी घुबड.
परत लिहावेसे वाटतेय कि घुबड, तेसुद्धा शहरात माझ्या लहानपणी क्वचितच दिसत असे. एक निश्चित असा ट्रेंड सुरु झाल्यासारखा वाटतोय.
आता शहरात सहज दिसणारे पोपट, बुलबुल, कोकिळा, घुबड, बी ईटर, मुनिया माझ्या लहानपणी शहरात अजिबात दिसायचे नाहीत.

वाह ! इन मीन तीन, थँक्स ! मी घुबडाचं इतकं सुस्पष्ट चित्र सुदधा पाहिलं नव्हतं. जेव्हा जेव्हा फोटो काढायची संधी मिळाली तेव्हा त्याने नीट पोज दिली नाही. तुम्ही लकी आहात, इतक्या जवळुन इतकी छान पोज देवुन ते बसुन राहिलं होतं.

वा, ईन मीन तीन - साहेबांची नीट खातीरदारी केली का नाही ?
खूप छान संधी मिळाली की फोटो काढायची.... सुंदर फोटो, रुबाबदार साहेब.......

बंगल्यावरुन आठवले, सध्या पौड रोड्वर एका बंगल्याच्या दारात एक झाड पूर्ण गुलाबी फुलांनी भरुन गेलय. एकही हिरवे पान नाही. खुप छान दिसतेय ते पण झाड. त्याचाही फोटो काढायलाच हवा.
पण प्रॉब्लेम असा आहे की, मी फोटो काढला तरी तो तितका छान येयिल असे नाही आणि आला तरी ईथे अपलोड करता येईल असेही नाही. पण कोणाला जमले तर नक्की काढा>>>कोठे आहे? मी जमल्यास काढेन. नक्की ठिकाण सांगणार का? Happy

साहेबांची नीट खातीरदारी केली का नाही ? >>>> शशांकजी Happy घरात उंदीर नव्हता याला खायला काय देणार Lol , मी त्या कावळ्यांना पळवुन लावायच काम केलं त्या नंतरच हा शांत बसला नाहीतर सारखा पंख फडफडवत होता मला भीती होती की याच्या पंखाना ईजा होईल आणि घरात मंडळीना भीती होती हे साहेब नाहीतर कावळे घरात घुसतील Proud

नाव जाणकार सांगतीलच.>>>>>>>दिनेशदा, धावा. Happy
शांकली, तुम्ही सांगितलेल, चाफ्याच झाड मी दुसर्‍या दिवशीच पाहिल. (आणि आज सांगतेय.)त्याची पाने लांबट आकाराची आहेत. आता मला एक सांगा, कर्वे रोडवरच जे बी.एस्.एन्.एल. च ग्राहक सेवा केंद्र आहे, त्याच्या मागे एका झाडावर लाल फुले फुलली आहेत. ती कशाची आहेत? Happy

जागू, खरच छान दिसत घुबड. आम्ही लहानपणी रात्री पाहिलेत. पण घरची माणसं बघून द्यायची नाहीत. Uhoh
दिनेशदा म्हणाले, त्याप्रमाणे अनेक समजूती होत्या. Happy
आत्ताच माझ्या ऑफिसमध्ये एक फुलपाखरू उडत आलेय. पण ते ट्यूबवर बसलेय. (लपून) मी एक फोटो काढला. पण तो नीट नाही आला. Sad

या दिवसात लाल गुलाबी फुले म्हणजे कॅशिया असणार किंवा स्पॅथोडीया.
नितीन, घुबडाचे उड्डाण खुप वेगळे असते. त्याच्या पंखाची अजिबात फडफड न करता तो भक्ष्यावर झेप घेतो.
त्याचा आणखी एक विशेष म्हणजे उंदीर वगैरे तो अख्खेच गिळतो आणि त्याच्या केसांचा एक गोळा करुन फेकून देतो. झाडाखाली असे गोळे असले तर झाडावरच्या ढोलीत त्याचे वास्तव्य असते असे समजतात.

चेहर्‍याच्या समोर डोळे असणारा हा एकमेव पक्षी असेल का ?

धन्स दिनेशदा फारच मोलाची माहीती Happy
चेहर्‍याच्या समोर डोळे असणारा हा एकमेव पक्षी असेल का ? >> कदाचित होय,
याचा विचारच कधी केला नव्हता.

माझी मुलगी पुस्तक बघत खिडकीत बसली होती तर धाकटी सोफ्यावर सहज लोळत होती, तर अचानक ४/५ कावळ्यांनी आमचा घरात घाव घेतली. लेकीतर जामच घाबरल्या , हाकलले तरी जाईनात .
अगदि खिडकीत उड्या मारत होते, मी भराभर दोन्ही लेकींना कडेवर उचलले. एक कावळा तर घर भर फिरून अवलोकन करीत होता (आता पर्यंत मीपण घाबरले होते) मग बाकीचे कावळे गेले व घरभर फिरणारा कावळा कॉम्पुटर वर बसुन मग खिडतुन उडाला.
मोठी लेक तर तेव्हापासुन कावळ्याल जाम घाबरते.
लेक सारखी विचारते , कावळे आपल्या घरात का आले होते? ( पण मलापण हा नविनच अनुभव होता)

Pages