Submitted by आरती on 26 November, 2011 - 12:18
युक्ती सुचवा / सांगा या बाफचा हेतु, आत्ता मला कहितरी युक्ती सांगा किंवा आत्ता मला मदत हवी आहे असा आहे असे समजुन मी हा नविन धागा सुरु करते आहे. पुर्वी असा एक धागा मायबोलीवर होता (असे मला आठवते).
अशा पण काही टिपा (अनेकवचन ) असतात ज्या 'हँडी' सापडल्या पाहिजेत. अगदी छोटीशीच टिप असते पण काम खुप सोप्पे होते त्यामुळे.
उदा. (काजुकतली चा बाफ) काजुची पुड करण्या आधी ते थोडावेळ फ्रिजमधे ठेवावेत.
तर अशा उपयोगी सुचना प्रत्येकाकडेच असतात, त्या सगळ्या एकत्रित असाव्या, त्यासाठी हा धागा.
[त्या सगळ्या वरतीच एकत्र ठेवायचा प्रयत्न मी करेन, देणार्याच्या नावासहित]
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीट लक्ष देऊन गाजर किसा. फक्त
नीट लक्ष देऊन गाजर किसा. फक्त गाजर किसतानाच हात कापतो का?
ho....karan dusare kahi kisat
ho....karan dusare kahi kisat nahi...
मिक्सर/फुड प्रोसेसर वापरता
मिक्सर/फुड प्रोसेसर वापरता येईल गाजर बारीक किसायला.
उदयवन तुम्ही कॅपीटल लेटर्स वापरून इंग्रजीत लिहीता का? वाचायला किती त्रास होतो त्याने.
आरती, गुळाची युक्ती फारच छान
आरती, गुळाची युक्ती फारच छान सांगितलीस. मी करून बघेन.
मानुषी तसं करून पाहिलंय
मानुषी तसं करून पाहिलंय गं
आता साबुदाणा कोणत्या दुकानात चांगला मिळतो, याचीच टिप द्या कोणितरी. >>>>> पुण्यात असाल तर ग्राहकपेठ.
पोळ्यांची कणीक रोज भिजवण्यात
पोळ्यांची कणीक रोज भिजवण्यात वेळ जातो. पण कणीक भिजवलेली असेल तर पोळ्या करायला फार वेळ लागत नाही. आठवड्याची कणीक एकदाच भिजवुन घ्यायची आणि लगेचच त्याचे छोटे छोटे गोळे (६-७ पोळ्या होतील एव्हढे) गोळे क्लींग रॅप करुन फ्रीझरमध्ये टाकयचे. संध्याकाळी पोळ्या करायच्या असतील तर (आठवणीने) सकाळीच चहाच्या वेळी एक गोळा फ्रीजमध्ये काढुन ठेवायचा. संध्याकाळपर्यंत थॉ होतो आणि एकदम ताज्या भिजवलेल्या कणकेसारखा होतो. पोळ्याही मस्त होतात.
एखादेवेळी फ्रीजरमधुन काढुन फ्रीजमधे ठेवायला विसरल्यास, मावे मध्ये ८-१० सेकंद (किंवा कमी जास्त-मावे किती पॉवरचा आहे यावर अवलंबुन) फिरवुन मग बाहेर काढुन ठेवायचा. ईतर स्वयंपाक होईपर्यंत बराच थॉ होतो. वाटल्यास पुन्हा एकदा ५ सेकंद मावे मध्ये फिरवायचा. पण जास्त वेळ मावेमध्ये फिरवल्यास तो शिजल्यासारखा होतो आणि पोळ्या नीट होत नाहीत.
ही युक्ती मी गेली ७-८ वर्षं वापरते आहे. सध्या घरी असल्याने कणीक वेळेवरच भिजवते पण नोकरी करत असताना खुप वेळ वाचतो आणि पोळ्याही पटकन होतात असा अनुभव आहे.
वत्सला,कणिक काळी पडते का
वत्सला,कणिक काळी पडते का फ्रीज केल्याने?
आता साबुदाणा कोणत्या दुकानात
आता साबुदाणा कोणत्या दुकानात चांगला मिळतो, याचीच टिप द्या कोणितरी
>>>
(पुलंचे आभार मानून)
चांगला साबुदाणा आहे का हो? या प्रश्नाला तोंडापुढचा 'सकाळ' बाजूला न करता 'वाईट साबुदाणा विकायला सुरुवात नाही केलेली ' असे उत्तर जिथे मिळते तिथे...:फिदी:
साबुदाण्याच्या खिचडीत
साबुदाण्याच्या खिचडीत खड्यांची कचकच कुठून येते? कारण घटक पदार्थात कचकचजन्य पदार्थ दिसत नाहीत
साबुदाण्याच्या खिचडीत
साबुदाण्याच्या खिचडीत खड्यांची कचकच कुठून येते? कारण घटक पदार्थात कचकचजन्य पदार्थ दिसत नाहीत >>> बाजो, कदाचित शेंगदाण्याचा कुट करताना एखादा खडा त्यात आला तर त्याची कचकच येऊ शकते.
शेगदाण्यात कुठे खडे असतात.?
शेगदाण्यात कुठे खडे असतात.? त्यात ते सामवले देखील जानार नाहीत भातासारखे . साबुदाण्यातच पांढरे खडे असू शकतील का?
लोखंडी कढईत विशेषतः खेड्यातल्या केलेल्या साखि ला एक लालसर कालपट रंग येतो.
छे , साबुदाणा खिचडीवर एक प्रशस्त बीबी चालू शकेल
वत्सला, हे कणकेचं आठवडाभराचं
वत्सला, हे कणकेचं आठवडाभराचं भारतात तरी करू नये. जेमतेम २-३ दिवसांपर्यंत ठिके. मग कणकेला थॉ होईतो आंबट वास येऊ लागतो.
पालकची आमटी करताना पालक धुऊन
पालकची आमटी करताना पालक धुऊन , चिरून झाला की मिक्सरमधून काढावा, जाडसर आमटी होते. बेसन किंवा तांदळाचे पीठ लावण्यापेक्षा हे बरे
फिश फ्राय करताना रव्यात घोळवून फ्राय करावे, मसाला छान शिजतो आणि कव्हर क्रीस्पी बनते.
बाजो, शेंगदाण्यात कधी कधी
बाजो, शेंगदाण्यात कधी कधी लालसर खडे येऊ शकतात. आणी शेंगदाणे निवडताना नीट दिसला नाही तर कुट करताना त्याचा पण बारीक चुरा होतो.
हे अर्थात अनुभवाचे बोल आहेत.
साबुदाण्याच्या खिचडीत
साबुदाण्याच्या खिचडीत खड्यांची कचकच कुठून येते? कारण घटक पदार्थात कचकचजन्य पदार्थ दिसत नाहीत >> बाळू जोशी, बर्याचदा साबूदाण्यात भेसळ असते. पांढर्या रंगाचे काहीतरी असते. ते दाताखाली आले की कचकच जाणवते. साबुदाणा नेहमी निवडून घ्यावा.
स्नेहा१, कणीक फ्रीजर मध्ये
स्नेहा१, कणीक फ्रीजर मध्ये ठेवायची आहे. वापरण्याच्या ७-८ तास आधी फ्रीजमध्ये काढुन ठेवायची. काळी पडत नाही.
)
नी, भारतातल्या हवामानामुळे आंबट होत असेल. मी हा प्रयोग ईथे आल्यानंतरच करायला लागले. (स्वयंपाकच ईथे आल्यानंतर करायची वेळ आली......
भारतात फ्रीजचे तापमान/सेटिंग ईथल्यापेक्षा जास्त असते असे मला नेहमी फ्रीज उघडला की वाटते. खरचं असतं का तसं की माझा भ्रम आहे?
पाक करताना मागे एकतारी घेऊन
पाक करताना मागे एकतारी घेऊन बसावे म्हणजे लवकर तार सुटते
चिकन तंदुरी बीना तंदुर किंवा
चिकन तंदुरी बीना तंदुर किंवा ओवन ने घरी बनवु शकतो का>?
क्लींग रॅप म्हणजे नक्की काय?
क्लींग रॅप म्हणजे नक्की काय? भारतात आम्ही नक्की काय करावे? प्लिज सांगा..
क्लिंग रॅप म्हणजे पातळ मऊसर
क्लिंग रॅप म्हणजे पातळ मऊसर प्लॅस्टिक सारखं दिसणारं असतं बघ. तेच. Transperent असतं. सॅन्डविच बांधुन मिळतात तो कागद.
अॅल्युमिनियम फॉइलसारखा याचा पण रोल मिळतो.
अॅल्युमिनियम फॉइल कोणत्या
अॅल्युमिनियम फॉइल कोणत्या दुकानात मिळतो
अॅल्युमिनियम फॉइल कोणत्या
अॅल्युमिनियम फॉइल कोणत्या दुकानात मिळतो >>> कुठल्याही सुपरशॉपात मिळेल हे.
साबुदणा भिजवताना , नेहमीसारखा
साबुदणा भिजवताना , नेहमीसारखा भिजवुन , नंतर ते भांडं अप् साईड डाउन करुन ठेवावे. ( साधरण एका तासानंतर ) साबुदाणा मस्त भिजतो आणि खिचडीही छान होते.
भाजी पातळ झाली असेल तर बटाटा
भाजी पातळ झाली असेल तर बटाटा / टमाटा किसून घालावा.
मी tuperware मध्ये ठेवते,
मी tuperware मध्ये ठेवते, लीम्बु ,कोथिम्बीर्,आल.छान राहतो
पावभाजी करताना मी सगळ्या
पावभाजी करताना मी सगळ्या भाज्या (बटटा,ट्माटा ,वाटाणा,कोबी, सिमला मिर्ची सोडून) फोड्णीस देते व छान (पाणी घालून)शिजवून स्मश करते पेल्याने. मगलोणी,कोथिम्बीर्,मसाला घालते.
कणिक मळताना आदल्या दिवशीच्या
कणिक मळताना आदल्या दिवशीच्या दुधाची साय काढून झाल्यावर उरलेले दुध वेगळ्या भांड्यात काढून ठेवावे आणि मग थोडे पाणी आधीच्या भांड्यात घालून उकळून घ्यावे. यामुळे भांड्याच्या कडेला असलेली अथवा खालची सायीची खरपुड सुटते. हे पाणी कणिक मळताना वापरल्यास दुध पाण्याचा अंश असल्याने कणिक एकदम मउसुत होते आणि भांडे घासायला पण कमी त्रास.
पोहे किंवा भाजीसाठी कांदा मऊ
पोहे किंवा भाजीसाठी कांदा मऊ करून घ्यायचा असल्यास तापलेल्या भांड्यात फोडणी करून त्यात कांदा घालून वर झाकणात पाणी ठेवावे आणि थोडेसे मीठ आणि कांदा फोडणीत ढवळून विस्तव बंद करावा. आपली बाकीची बारीक-सारीक कामे उरकून घ्यावी. दहापंधरा मिनिटांनंतर झाकण काढावे. कांदा मऊ झालेला असतो. ना परतायची भानगड ना करपायची धास्ती.
स्वयंपाकासाठी भांडे/कुकर विस्तवावर ठेवताना तो बाहेरूनही कोरडा करून घ्यावा. (फोडणीसाठी आपण आतून कोरडा करून घेतोच.) यामुळे भांड्याला चिकटलेले पाणी सुकण्यासाठी लागणारी उष्णता आणि अर्थात भांडे तापावयास लागणारा वेळ वाचतो.
कधीही साखर अथवा गुळाचा पाक करायचा झाल्यास गूळ अथवा साखर आधी दीडेक तास थोडयाश्या पाण्यात भिजत घालावी. मधून मधून ढवळावी. नंतर भांडे विस्तवावर ठेवावे. कधीकधी साखर पूर्णपणे विरघळण्याआधीच कडेने साखरेचे स्फटिक दिसू लागतात ते टळते. पाक लवकर होतो.
मोठ्या प्रमाणावर चहा/कॉफी करायची झाल्यास पाणी उकळू लागल्यावर साखर घालावी. आधीच साखर घातल्यास पाणी उकळण्यास अधिक वेळ लागतो.
सौजन्य : पाककलेविषयीची अनेक पुस्तके, अनेक आया आज्ज्या, मावश्या, आत्त्या, थोडेसे प्राथमिक विज्ञान, थोडे निरीक्षण.
>> सगळ्या भाज्या (बटटा,ट्माटा
>> सगळ्या भाज्या (बटटा,ट्माटा ,वाटाणा,कोबी, सिमला मिर्ची सोडून)
म्हणजे कोणत्या?
भाज्या - विशेषतः पालेभाज्या -
भाज्या - विशेषतः पालेभाज्या - सुरीने चिरतांना ज्या हातात भाजी धरतो त्याची बोटं आत वळवून धरावीत. (सुरी बोटाच्या शेंड्याजवळून न फिरता पेराच्या मागच्या बाजूजवळून फिरायला हवी.) बोट कापलं जात नाही.
फोडणीसाठी तेल तापवलं की गॅस बंद करून त्यात आधी एक चिमुकली चिमूट साखर घालावी, फोडणी करपत नाही आणि रंगही छान येतो.
Pages