तू अन् मी

Submitted by भानुप्रिया on 30 November, 2011 - 09:59

माझी ही कविता आज अचानक आठवली..आपल्या देशातली सध्याची एकंदर स्थिती लक्षात घेता किती स्त्रीया हे असं जीणं जगत असतील देव जाणे! काही जणांच्या मते ही अतिशय उद्धट कविता असू शकेल, पण मी प्रामाणिक प्रयत्न केलाय, स्त्रैय मनःस्थिती मांडण्याचा!

भानुप्रिया
---

दर रात्रीचा संभोग
तुझा नी माझा
छे,
तुझाच फक्त
इच्छा तुझी,
वेळ तुझी,
सुरुवात काय
अन् मध्य काय,
ह्या साऱ्या नाट्यात
‘सम’ ही तुझीच!
माझं आहेच काय?
ना इच्छा,
ना आसक्ती,
तुझ्या उष्ण श्वासांखाली
मी थिजलेली,
मला ना सुरुवात न मध्य
माझ्या प्राक्तनी
संभोगातला
भोग फक्त.

गुलमोहर: 

@ डॉ. कैलास: आभार! शुद्धलेखन तपासलं!
आणि मला कुजालेलीच म्हणायचं होतं..त्यामुळे तो शब्द वापरलाय!

@अनिल: Happy संकल्पना तशी जुनीच..नाही का? हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न! खरं तर आपोआप उतरलं हे सगळंच! ठरवून नाही लिहिलं! आणि हो, धन्नो!

@प्रमोद: धन्यवाद! विरोधाभासच आहे न तसा तुमच्या प्रतिक्रियेत?

>>>>>>>> घुसमट 'चांगली' व्यक्त झालीय!<<<<<<<<
Lol

@राम: Happy आभार!

@ विभाग्रज: एकाच साच्यातून सगळ्या कविता बाहेर नाही पडत ना! म्हणून! Lol
पण साधारण मनाची जी अवस्था असेल, ति शब्दरुपाने बाहेर पडते..नाही का? अर्थात त्यासाठी हे सगळं प्रत्यक्ष घडलेलं असावंच लागतं असंही नाही! Happy काय वाटतं?

विषय खाजगी नाहीच आहे!
universal म्हणतात ना, तसा आहे!
आणि खडबडीत, कारण अनेक स्त्रिया खरं तर असंच जगतात!

Happy

मी देखील टीका म्हणून प्रत्युत्तर नाही दिले!
मला वाटलं थोडीशी वैचारिक देवाण-घेवाण होईल!
म्हणून तो reply होता! तुम्हाला दुखावण्याचा उद्देश नव्हता!

भानुप्रिया, माझ्या प्रतिसादावरील खुलाशासाठी आभारी आहे. नाझ्या दृष्टीने खाजगी विषयावर मी वैचारिक देवाणघेवाण करू इच्छिणार नाही हे साहजिक आहे. पण तुमची क्षमता 'चांदो' कवितेतून सिध्द आहे. तुमच्या अशा एखाद्या आर्टवर्कवर जरूर विचारांची लढाई करेन. मी दुखावला गेलेलो नाही.उत्तम साहित्य-साधनेसाठी आशिर्वाद!

“माझ्या प्राक्तनी
संभोगातला
भोग फक्त.”
अगतिकता व्यक्त होतेय.

आपल्या देशातली सध्याची एकंदर स्थिती लक्षात घेता किती स्त्रीया हे असं जीणं जगत असतील देव जाणे! ?? >> सध्याची? तुमच्या कवितेतला "बलात्कार" आणि सध्याच्या परिस्थितीत जे झालं आहे त्यात फार फरक आहे. तुमच्या कवितेतला विषय फार वेगळा आहे. इंट्रो नसता तर जास्त बर होतं.

कविता छान आहे.