Submitted by pradyumnasantu on 25 November, 2011 - 11:47
भूमिती
लेकीच्या गालावरचा गोल गोड तीळ
तरुण नातवांच्या आकडेबाज मिशांचा पीळ
नातीची उभट मोहक खळी
भुवयांची काळीशार धनुकली
नातवाचे लंबवर्तुळाकार कुरळे केश
पुतण्यांचे विविधाकार वेश
नेत्र टपोरे गोल भाचीचे
चामखीळ चेह-यावर पुतणीचे
या सर्वांची जरीही बनते एक प्रिय भूमिती
खचित परंतु आगळी यांहून अशी एक आकृती
बहिणींच्या चेह-यावरची
एक एक सुरकुती
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भूमितीतसुद्धा भावना ओतता
भूमितीतसुद्धा भावना ओतता येतात त्या अशा. सुरेख!
माणसांमध्येही भुमिती शोधता
माणसांमध्येही भुमिती शोधता येते ती अशी. सुरेख!
आपले निरिक्षण सुक्ष्म आहे.
तरुण नातवांच्या आकडेबाज
तरुण नातवांच्या आकडेबाज मिशांचा पीळ>>>>तरुण आणि मिशी?आणि तिसुद्धा आकडेबाज मग नक्किच अनिरुद्ध बापुंचे भक्त.