Submitted by जागोमोहनप्यारे on 24 November, 2011 - 09:27
साडेसाती
अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे.. धार्मिक विभाग चाळत असताना लक्षात आले की इथे साडेसातीवर माहिती देणारा धागा नाही. म्हणून हा धागा उघडला. इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी.
१. साडेसाती आणि शनी
२. साडेसातीची कारणे
३. या कालात काय होते?
४. साडेसातीवर उपाय व शनी उपासना कशी करावी?
५. इतर काही धर्मिक उपाय
६. आपले काही अनुभव, किस्से
७. सध्या साडेसाती कुठल्या राशीना आहे? अशा समदु:खी लोकानी काय करावे?
८. साडेसातीचे एकंदर जीवनावरील दूरगामी परिणाम.
असे आणि या विषयी असलेले इतर अनेक मुद्दे विचारात घेता येतील.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मास्तुरे | 26 November, 2011
मास्तुरे | 26 November, 2011 - 00:25
>>> बादवे, @ महेश, शाम भागवत, मास्तुरे, मुद्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न करा कधी तरी.
हा नियम स्वतःला लावा आधी आणि आपल्या मास्टरांना पण लावा. आणि मग इतरांना सांगा.
<<
नियम कुणाला सांगता आहात महोदय?
डुप्लिकेट आय्ड्या काढून भडकाऊ पोस्ट करायच्या अन त्या नंतर एडिट करून लोकांना असे भासवायचे की तुम्ही फार सभ्य! हे शेपुटघाले धंदे तुम्ही अन तुमचे साथीदार कधी थांबविणार? ते भागवत लागले पोस्ट एडिट करायला. तुमचं काय? जायचं का अॅडमिन कडे भोकाड पसरून? जालावर टाईप केलेल्या प्रत्येक अक्षराची नोंद असते, कितीही एडीट केलंत तरी. अॅडमिन ला सापडेल नक्कीच.
ही तुमच्या फडतूस कंपूने
ही तुमच्या फडतूस कंपूने केलेली दुसरी गम्मत आहे माझ्याकडे स्क्रीनकॅपमधे जमा असलेली.
ज्या दिवशी तिसरी गम्मत केलीत, त्या दिवशी सगळ्या फोटोसकट मायबोलीवर नवा धागा काढीन हे माझे वचन तुम्हा लोकांना!
मग समजेल इब्लिस बरा की शनी ते.
>>> अन मास्तुरे, सुधरा! मी
>>> अन मास्तुरे, सुधरा! मी गेलो म्हटलं की लगेच पोस्टी एडिट करायला सुरुवात कधी सुधरणार तुम्ही? डुआय किति काढणार? पब्लिक मूर्ख वाट्टं का तुम्हाला?
पब्लिकचं माहित नाही, पण तुमच्याबद्दल आणि तुमच्या मास्टरबद्दल मला पूर्ण खात्री आहे. मला तुमच्यासारखी डुआय काढायची अजिबात गरज नाही आणि तशी सवयही नाही मला. तुम्ही स्वत: कोणाचे डूआय आहात आणि तुमच्यासारखे त्या व्यक्तीचे कोणतेकोणते अजून डूआय आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे.
>>> डुप्लिकेट आय्ड्या काढून भडकाऊ पोस्ट करायच्या अन त्या नंतर एडिट करून लोकांना असे भासवायचे की तुम्ही फार सभ्य! हे शेपुटघाले धंदे तुम्ही अन तुमचे साथीदार कधी थांबविणार? ते भागवत लागले पोस्ट एडिट करायला. तुमचं काय? जायचं का अॅडमिन कडे भोकाड पसरून?
डुप्लिकेट आयडी तुम्ही स्वतःच आहात आणि कोणाचे आहात ते देखील माहित आहे. तुम्हाला एक डूआयडी काढून पुरेशी गरळ ओकता येत नाही म्हणून ५-६ वेगवेगळ्या नावांचे डूआय आहेत तुमचे. मुद्देसूद लिहा म्हणालो की लगेच फणकारा आला तुम्हाला! आणि मी कशाला अॅडमिनकडे जाऊ? उलट माझा आयडी रद्द करा म्हणून सावरकरांच्या धाग्यावर जाऊन तुम्हीच स्फुंदुन स्फुंदुन रडत होता. आणि काय हो तुमचे मास्टर कुठे गेले आज? का डू आयडीने बरळून झालं की मास्टरांच्या आयडीने लॉगिन होणार?
>>> ही तुमच्या फडतूस कंपूने केलेली दुसरी गम्मत आहे माझ्याकडे स्क्रीनकॅपमधे जमा असलेली.
अच्चं का? जपून ठेवा बरं. नाहीतर हा अनमोल ठेवा एखाद्या बँकेत फिक्स्ड डिपॉसिट व्हॉल्ट मध्ये ठेवा.
>>> ज्या दिवशी तिसरी गम्मत केलीत, त्या दिवशी सगळ्या फोटोसकट मायबोलीवर नवा धागा काढीन हे माझे वचन तुम्हा लोकांना!
अहो, तुम्ही रोज असंख्य निरर्थक धागे काढत असता. त्यामुळे नवीन धाग्याचं कौतुक नका सांगू आम्हाला.
>>> मग समजेल इब्लिस बरा की शनी ते.
शनीचं माहित नाही, पण तुमच्याबद्दल पूर्ण खात्री आहे.
आणि अजून एक. जरा हलकेच घ्या. फार लवकर संताप येतो तुम्हाला.
या धाग्याला साडेसाती लागली
या धाग्याला साडेसाती लागली म्हणायची !!
हे दोघे असे का भांडत बसलेत?
हे दोघे असे का भांडत बसलेत?
>>>> एखादी व्यक्ती चांगली
>>>> एखादी व्यक्ती चांगली असते, खरे बोलणारी असते. सहसा ती इतरांना दुखवत नाही त्यामुळे इतरांची आवडती असते. उच्च शिक्षण व त्या आधारे मिळणारी चांगली नोकरी व त्यामुळे आलेली सुबत्ता ह्या आणखी जमेच्या बाजू असू शकतात. अशा व्यक्तीचे आपण चांगले आहोत असे मत असते व इतरांचेही तसेच मत असते. या आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी अशी व्यक्ती पुढेही चांगली वागत राहाते. इतपर्यंत सगळे ठीक असते. पण अशी व्यक्ती ह्या आपल्या चांगुलपणाचे सर्व श्रेय स्वतःकडे नकळत घेऊ लागते. ही सर्व प्रक्रिया हळूहळू होत असल्याने त्या व्यक्तिच्या हे लक्षातही येऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर हा चांगुलपणा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे अशी व्यक्ति दोषेकदृष्टीने पाहाते. <<<<
शाम भागवत, तुमची ही पोस्ट अन शेवटची म्हणून लिहीलेली पोस्ट, दोन्हीही अत्युत्तम!
जामोप्या, उशीर झाला रे तुला ते वाक्य बदलायला, त्यामुळे आधीच आलेली धाग्याला लागलेली ही भुतावळ हाकलवायला कन्ची धुरी करू सान्ग तूच. मिरचीची करू की मोहरीची करु? तमाखुची करू की ओव्याची करू? धुपाची करू की उदाची करू? शेण्यान्ची करू की लाकडाकोळशाची करु?
तुम्ही स्वत: कोणाचे डूआय आहात
तुम्ही स्वत: कोणाचे डूआय आहात आणि तुमच्यासारखे त्या व्यक्तीचे कोणतेकोणते अजून डूआय आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे.
मास्तुरे, कोण कुणाचे डु आय डी आहेत एकदा जाहीर करा पाहू. उगीच प्रत्येक धाग्यावर हा त्याचा आणि तो ह्याचा डु आय डी अशी भांडणे नकोत.. एकदा तुम्ही जाहीरच करा.
जामोप्या, उशीर झाला रे तुला
जामोप्या, उशीर झाला रे तुला ते वाक्य बदलायला, त्यामुळे आधीच आलेली धाग्याला लागलेली ही भुतावळ हाकलवायला कन्ची धुरी करू सान्ग तूच.
अहो कसली भुतावळ? प्रत्येक विषयला दोन्ही बाजू असतात.. त्यामुळे विविध मते येणारच.
धागे हे राशीसारखे असतात. आय डी म्हणजे ग्रह.. हे ग्रह फिरत फिरत राशीत येतात. तिथे ते काही काळ रहतात.. ते राशीला फल देतात, आणि मग पुढे निघून जातात.. आपण हे चक्र कसे रोखणार?
>>>> धागे हे राशीसारखे असतात.
>>>> धागे हे राशीसारखे असतात. आय डी म्हणजे ग्रह.. हे ग्रह फिरत फिरत राशीत येतात. तिथे ते काही काळ रहतात.. ते राशीला फल देतात, आणि मग पुढे निघून जातात.. आपण हे चक्र कसे रोखणार? <<<<
इत्क्या वर्षात पहिल्यान्दा तू हे लई खास मुद्याच बोल्लास बघ जामोप्या!
आता मी मोकळा झालो प्रत्येक आयडिचा वावर लक्षात घेऊन त्या त्या आयडिला ग्रह/तारे/नक्षत्र/राशी/योग/करण्/तिथी यान्ची उपमा द्यायला.
म्हणजे मी उद्या म्हणल की अमक्या धाग्यावर व्यतिपात आला, किन्वा भद्रा आली, की समजणाराने समजुन घ्याव कोणती आयडीरुपाने कोणत्या धाग्यावर मरिआईचा गाडा फिरु लागलाय!
शनीला उडीद, तेल आणि रुईची
शनीला उडीद, तेल आणि रुईची पाने का अर्पण करतात? यामागचे शास्त्र काय आहे?
भक्ति ह्या धाग्यावरील अश्विनी
भक्ति ह्या धाग्यावरील अश्विनी के यांचे विचार वाचण्यासाठी आज येथे आलो होतो. त्यांच्यात असलेली सहिष्णुता खूपच भावली. अध्यात्म या विषयात होणारी प्रगती नेहमी सहिष्णुता वाढवते. नेमके हेच त्यांच्या प्रतिसादातून जाणवले.
येथे आलोच आहोत तर साडेसातीचा धागापण पहावा असे वाटले. त्यातून हे लिहिण्याची बुध्दी होते आहे.
जागोमोहनप्यारे | 26 November, 2011 - 09:28 लिहितात.
शनीला उडीद, तेल आणि रुईची पाने का अर्पण करतात? यामागचे शास्त्र काय आहे?
शनीला काय अर्पण करायचे हा धर्मशास्त्राचा विषय आहे. माझा धर्मशास्त्राचा अभ्यास नाही. मात्र त्यामागचे अध्यात्म स्पष्ट करता येऊ शकेल असे वाटते.
आपला फुगलेला अहंकार किंवा खोटा अहंकार कमी करणे हे मुख्यत्वे व्हावयास हवे. आपण आपल्यापेक्षा कोणाला तरी मोठे मानणे म्हणजेच आपला फुगलेला अहंकार कमी करणे होय. मात्र कोणाला मोठे मानायचे यात चूक होता कामा नये. जर शनिदेवांऐवजी एखाद्या राजकारणी माणसाला मोठे मानले तर कदाचीत विपरित परिणाम होण्याची शक्यताच जास्त. असो.
काही मिळवायचे असेल तर ते त्यागाशिवाय कधिही मिळू शकत नाही हा आणखी एक अध्यात्मशास्त्रातील सिध्दांत मानला जातो. अगदी अनैतिक अथवा भ्रष्ट मार्गाने पैसा किंवा सत्ता मिळवणारे देखील समाधान, मनःशांती व आनंद (सुख नव्हे) याचा एकाबाजूने त्याग करत असतात.
शनिदेवांना अर्पण करण्याच्या पध्दतीत आपण आपल्या आवडीनिवडी, सवयी बाजूला ठेवतो. शनिमाहात्म्यातील अनेक गोष्टी पटत नसूनही त्याकडे दुर्लक्ष करून ते तसेच नियमीत वाचत राहातो. तसेच अगदी विसरभोळा असलेला माणूसही शनिवार ह्या दिवसाची जाणीवपूर्वक आठवण ठेवतो. टीव्ही वरची आवडती मालिका किंवा तत्सम एखादी आवडती गोष्ट देखील याबाबतीत अडथळा आणू शकत नाही. नीट विचार केला तर ह्या सर्व त्यागाच्या गोष्टी आहेत.
थोडक्यात अध्यात्मातले वरील दोन सिध्दांत कार्य करत असल्याने त्याचा परिणाम फुगलेला अहंकार काही प्रमाणात कमी होण्यात होऊन शनिदेवांचा त्रास कमी झाल्याचा अनुभव येऊ शकतो आणि हा अनुभव त्या व्यक्तीची श्रध्दा वाढवतो. आपोआपच अशा व्यक्तिचा शनिदेवांच्या अर्चनेचा भावनिक दर्जा आणखी उंचावतो व ही सर्व प्रक्रिया गतिमान होते.
इटीवी वर प्रीती बाई खूप गोड
इटीवी वर प्रीती बाई खूप गोड गोड शब्दात दिवसाचे भविष्य सांगतात. त्या सध्या मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये राशीअनुसार पदार्थ दाखवित आहेत. परवा कन्याराशीसाठी होते म्हणून उत्सुकतेने बघायला गेले तर काय केले असावे? ' पचकुट्याची भाजी म्हणे.' बिन मसाल्याचे उकडलेले पचकुटे व त्यात चवीला लोणचे घातलेले. नेहमी उत्साहाने पदार्थ चाखणार्या दाढी धारी होस्ट ने पण चाखला नाही तो पदार्थ.
तस्मात, आपल्या स्वप्नात जरी पनीर माखनी, गुलाबजामुन असले तरी नशिबात पचकुटेच असले तर तेच खावे लागतात. ही साडेसातीची कृपा.
काय कळंना... काही तरी
काय कळंना... काही तरी मिळवायला काही तरी त्यागावे लागते, तर हा त्याग झाला की व्यवहार झाला? देवाला काहीतरी मूठभर दिलं की हा त्याग असतो की आनखी काही तरी मिळवण्यासाथी केलेला व्यवहार? त्यागाची भावना नुसती मनात असून चालत नाही का? असं काहीतरी बाह्यरुप तेही बेगडी असावेच लागते का?
मुळात देवाने जर तो देव असेल तर लोकाना दु:खे द्यावीत्च का?
अश्विनीमामी यांस, स.न. अजून
अश्विनीमामी यांस, स.न.
अजून अडीच वर्षांनी साडेसाती संपल्यावर का होईना, नक्कीच पनीर माखनी, गुलाबजामून खायला मिळणार असा आनंदी विचार पण करता येऊ शकेल, व त्यातून सबुरी वाढवता येऊ शकेल. ज्याच्याकडे सबुरी जास्त त्याला दु:ख कमी असे म्हणतात.
किंवा
पचकुटेच पनीर माखनी अथवा गुलाबजामुन समजून कसे खायचे व जिभेवर ताबा कसा मिळवायचा हे शिकण्याची संधी आपल्याला मिळाली आहे असेही समजता येईल.
शेवटी अर्धा पेला भरलेला म्हणून आनंद मानायचा का अर्धा रिकामा म्हणून दु:ख करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. हे काही शनिदेव ठरवत नाहीत किंवा सांगतही नाहीत.
जे पेरावे ते उगवते हा
जे पेरावे ते उगवते हा सिध्दांत आहे. काहीही न पेरता उगवले पाहिजे असे कसे बरे म्हणता येईल.
जे मनात असेल त्याप्रमाणेच तर कृती होत असते. कृतीशिवाय मनातल्या विचारांना काय बरे अर्थ आहे.
शाम अगदी अगदी, आणि देव
शाम अगदी अगदी, आणि देव जेवायला काही तरी समोर ठेवतो आहे ना. मग तक्रार करायाची नाही असे माझे धोरण आहे. तुमची पोस्टे नीट वाचणार.
मुळात देवाने जर तो देव असेल तर लोकाना दु:खे द्यावीत्च का?>> देव दु:खे नाही देत. सहन करायची शक्ती देतो. आपण आपल्याच कर्माने दु:खे निर्माण करतो. थोडी कोर्स करेक्षन करत राहायची रे.
>>>> मुळात देवाने जर तो देव
>>>> मुळात देवाने जर तो देव असेल तर लोकाना दु:खे द्यावीत्च का? <<<<
जामोप्या, देव दु:ख देत नाही, तर तुम्हाला असलेल्या कर्मस्वातन्त्र्यातुन तुम्हीच केलेल्या बर्यावाईट कर्माचे फल देतो. नि वर कुठेतरी मीच म्हणल्याप्रमाणे, शनि वा एकूणच ग्रहमन्डल, कर्मफल देणारे देवाचे आयुध/हस्तक वाटतात्/असतात.
तुम्हीच केलेल्या बर्यावाईट
तुम्हीच केलेल्या बर्यावाईट कर्माचे फल देतो.
कर्माचे फळ आणि तो मिळन्याचा काळ यात काही तथ्य वाटत नही. एखाद्याला ५० रु चोरीचे फळही लगेच दोन दिवसात भोगायला लागेल आणि एखाद्याला करोडो रुपयाचे भ्रष्टाचार करुनही म्हातारपणापर्यंत काही होणार नाही.. ( आणि म्हतारा होऊनही तो सुखातच मेला, तर आता त्याला पुढच्या जन्मात फळ नक्कीच मिळेल हेही तुम्हीच म्हणनार ! )
जागोमोहनप्यारे | 28 November,
जागोमोहनप्यारे | 28 November, 2011 - 00:15 लिहितात
त्यागाची भावना नुसती मनात असून चालत नाही का? असं काहीतरी बाह्यरुप तेही बेगडी असावेच लागते का?
मी हे प्रथमच स्पष्ट केले होते की, आपले अंतर्मन हेच ईश्वरासारखे असते. इश्वर म्हणजे परमेश्वराचा अंश. त्यामुळे शनिदेव हे आपल्या अंतर्मनातच असतात. जर याचा तुम्हाला अनुभव येत असेल, तसे तुम्हाला जाणवत असेल तर मनातल्या मनात तशी भावना करूनही भागू शकेल. किंवा स्वतःच्या अंगावर तेल ओतून अथवा स्वतःच्या गळ्यात रुईच्या माळा घातल्या तरी चालू शकेल. स्वामी रामकृष्ण परमहंस हे कालीमातेच्या पूजेत इतके तल्लीन होऊन जात की ते व कालीमाता यातील भेदच नाहीसा होत असे व ते आपल्याच डोक्यावर फुले टाकत असत.
पण शनिमहाराज माझ्यातच आहेत किंबहुना शनिमहाराज व मी वेगळे वेगळे नाही आहोत हा विचार फक्त मनात येणे म्हणजे मनात फक्त माहिती गोळा झाली एवढेच म्हणता येईल. अथवा त्याला शब्दज्ञान असे म्हणता येईल. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर विचाराच्या पातळीवर आपण व शनिदेव एक आहोत असे वाटणे तर अनुभवाच्या पातळीवर द्वैत भासणे असे जर होत असेल तर मात्र आपले कर्मही द्वैतात असले पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष देण्याची क्रिया घडली पाहिजे. तुम्ही कोणत्या पातळीवर आहात हे तुमचे तुम्हीच जाणून योग्य मार्ग निवडायचा आहे.
जागोमोहनप्यारे | 28 November, 2011 - 00:15 लिहितात
मुळात देवाने जर तो देव असेल तर लोकाना दु:खे द्यावीत्च का?
सुख व दु:ख ह्या दोन्हीला कारण भगवंत असतो असे म्हणतात. पण त्याचा अर्थ नीट समजावून घेणे आवश्यक आहे. गोंदवलेकर महाराजांनी ते छान सांगितले आहे
उजेड अथवा अंधार या दोन्हीला कारण सूर्य आहे. सूर्य आहे म्हणून उजेड आहे तर सूर्य नसतो म्हणून अंधार असतो. म्हणजेच सूर्याच्या असण्या नसण्यावर हे दोन्ही अवलंबून आहे. प्रत्यक्ष सूर्य काहीच करत नाही. तसेच दु:खाचे कारण भगवंताबाबत नास्तिकबुध्दी तर सुखाचे कारण भगवंताबाबत आस्तिक बुध्दी होय. प्रत्यक्ष भगवंत काहीच करत नाही. आपण भगवंताशी संबंध आस्तिकबुध्दीतून जोडतो का नास्तिकबुध्दीतून जोडतो त्याप्रमाणे आपल्याला सुख दु:खाचा अनुभव येतो. प्रत्यक्षात भगवंताच्या दृष्टिकोनातून सुख व दु:ख अशा दोन वेगवेगळ्या गोष्टीच नाहीत. जसे सूर्याला उजेड व अंधार या दोन्ही संकल्पनांची माहिती नाही.
दु:खाचे कारण भगवंताबाबत
दु:खाचे कारण भगवंताबाबत नास्तिकबुध्दी तर सुखाचे कारण भगवंताबाबत आस्तिक बुध्दी होय
ही पुरोहितांची प्रचारकी भाषा वाटते.. तू प्रभूवर विश्वास ठेवलास तर सुखी होशील अन्यथा नाही वगैरे... आयुष्य म्हणजे कर्मफल हेच खरे असेल तर देवाला देवत्व द्यायची किंवा त्याला मानायचीही गरज नाही...
एखाद्याने एखाद्याला त्रास दिला.. नंतर त्याने रामनामाचा जप केला. तरी त्रास दिलेल्याचे पाप त्याला भोगावे लागेलच ना.. की तो देवाचा भक्त आहे, म्हनून त्याला सूट मिळेल.. हे म्हणजे जेलरला लाच देऊन शिक्षा सौम्य करणे असे नाही का?
>>ज्या दिवशी तिसरी गम्मत
>>ज्या दिवशी तिसरी गम्मत केलीत, त्या दिवशी सगळ्या फोटोसकट मायबोलीवर नवा धागा काढीन हे माझे वचन तुम्हा लोकांना!
बरं मग? ठेवा सेव्ह करुन. Or else shove it up where the sun doesn't shine!! Who cares? Who gives a damn?
यात लाच देण्यासारखे काहीही
यात लाच देण्यासारखे काहीही नाही. फक्त साद व प्रतिसाद किंवा क्रिया व प्रतिक्रिया किंव आ Action Reaction बाबतचे निसर्गनियम माहित असले की झाले.
जोशीबुवानी शेक्सपीअरला
जोशीबुवानी शेक्सपीअरला साडेसाती लावली.. विंग्रजीत बडबडत बसलेत..
Action Reaction बाबतचे
Action Reaction बाबतचे निसर्गनियम माहित असले की झाले.
तेच तर मी विचारले आहे.. अॅक्शन रिअॅक्शन यात काही ताळमेळ दिसत नाही.. एखाद्याला ५० रु ची चोरी केल्यास दोन दिवसात रिअॅक्शन येईल.. एखाद्याला करोडो रुपये खाऊनही कदाचित या जन्मी रिअॅक्शन येनार नाही.. असला कसला हा देवाचा न्याय ?
प्रचारकी थाटाचे वाटणे अगदी
प्रचारकी थाटाचे वाटणे अगदी साहजिकच आहे. त्यात मला तरी काही गैर वाटत नाही. पूर्वी कधितरी मला सुध्दा तसेच वाटत असे.
इथे मुद्दा साडेसातीचा आहे..
इथे मुद्दा साडेसातीचा आहे.. साडेसाती हेही कर्मफलच का?
कर्मफल म्हणजे अॅक्शन रिअॅक्शन.. मग देव, शनी म्हणजे कोण.. ? न्युटन का?
न्युटन असला नसला तरी अॅक्शन रिअॅक्शन चालूच रहाते... मग कर्मफलासाठी विशिष्ट देवाची गरज काय?
>>मग देव, शनी म्हणजे कोण.. ?
>>मग देव, शनी म्हणजे कोण.. ? न्युटन का?
न्युटन ?? आहो शनी म्हंजी सॅटर्न
> उजेड अथवा अंधार या दोन्हीला
> उजेड अथवा अंधार या दोन्हीला कारण सूर्य आहे. सूर्य आहे म्हणून उजेड आहे तर सूर्य नसतो म्हणून अंधार असतो. म्हणजेच सूर्याच्या असण्या नसण्यावर हे दोन्ही अवलंबून आहे. प्रत्यक्ष सूर्य काहीच करत नाही.
सुर्य काही करत नाही हे कळले नाही. तो हायड्रोजन जाळतो (फ्युजन) म्हणुन तर प्रकाश तयार होतो. त्याने काहीच केले नाही तर तो अजुन काही असेल उदा. श्वेत बटु - मग आस्तिक-नास्तिक सर्वांची पुस्तके भरतील. हं, जेंव्हा सुर्याचा देवावरचा विश्वास उडत असेल (आपल्याकडे कसे लग्न-मुंजीच्या वेळी नेमके सिलेंडर संपले की देवावरचा विश्वास उडुन फक्त त्या नारायणाचा धावा करावा लागतो तसे हे सुर्याचे इंधन संपले की होणार) आणि मग देव त्याला पनीश करणार (हा इंग्रजी शब्द जास्त भारदास्त वाटतो) आणि सुर्याचा मृत्यु होणार (घाबरु नका, त्याचा आत्मा शाबुत असणार व त्याच्यातील अणु रेणु तुमच्या-आमच्या इतर ग्रहांवरील बंधु-भगिनींमधे वास करणार). सुक्याबरोबर ओलेही जळणार व मनुष्यजन्माची आतुरतेने वाट पहात असलेले समग्र प्राणीजन कुडकुडुन मरणार. हो, आणि शनीचापण अस्त होणार - कायमचाच.
ज्यांना साद व प्रतिसाद अथवा
ज्यांना साद व प्रतिसाद अथवा Action/Reaction याबाबत जास्त माहिती पाहिजे असेल ते खालील पुस्तक वाचू शकतात. ह्या पुस्तकाच्या कोट्यावधी प्रती अमेरिका व युरोप मधे खपल्या असून आता तर ते इन्टरनेट वर मोफत उपलब्ध आहे.
The POWER of Your Subconscious Mind
Joseph Murphy
D.R.S., D.D., Ph.D., LL.D.
Fellow of the Andhra Research University of India
तसेच यावर वामनराव पै यांचे सुंदर भाष्यपण उपलब्ध आहे. त्या पुस्तिकेचे नाव आहे
तुमचे भाग्य तुमच्या विचारात
तसेच वाल्याकोळ्याने सात रांजण भरून पापे केली होती, तरीही त्याला ती भोगायला लागली नाहीत व ती सुध्दा कोणालाही लाच न देता.
हे तसेच ह्या दोन्ही पुस्तकात जे सांगितले आहे ते, ज्ञानेश्वर माऊलींनी वेगळ्या शब्दात खालीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.
हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥ हरिपाठ ११.१ ॥
तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपता हरी ॥ हरिपाठ ११.२ ॥
सकारात्मक व विधायक विचार सातत्याने मनात बाळगले तर आपल्याला आपली पापे भोगण्याची वेळ पुढे ढकलता येऊ शकते हा विचार माऊलींनी खालील ओवीत स्पष्ट केला आहे.
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥हरिपाठ १४.१ ॥
रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥ हरिपाठ १४.२ ॥
असो.
साद प्रतिसाद अथवा क्रिया प्रतिक्रिया याबाबतचा विषयाला तसेच साडेसाती या विषयाला माझ्याकडून पूर्णविराम.
सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.
तसेच वाल्याकोळ्याने सात रांजण
तसेच वाल्याकोळ्याने सात रांजण भरून पापे केली होती, तरीही त्याला ती भोगायला लागली नाहीत व ती सुध्दा कोणालाही लाच न देता.
हे काही पटले नाही. नरकवास तर पांडवानादेखील भोगायला लागला म्हणे.
Pages