Submitted by जागोमोहनप्यारे on 24 November, 2011 - 09:27
साडेसाती
अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे.. धार्मिक विभाग चाळत असताना लक्षात आले की इथे साडेसातीवर माहिती देणारा धागा नाही. म्हणून हा धागा उघडला. इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी.
१. साडेसाती आणि शनी
२. साडेसातीची कारणे
३. या कालात काय होते?
४. साडेसातीवर उपाय व शनी उपासना कशी करावी?
५. इतर काही धर्मिक उपाय
६. आपले काही अनुभव, किस्से
७. सध्या साडेसाती कुठल्या राशीना आहे? अशा समदु:खी लोकानी काय करावे?
८. साडेसातीचे एकंदर जीवनावरील दूरगामी परिणाम.
असे आणि या विषयी असलेले इतर अनेक मुद्दे विचारात घेता येतील.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जामोप्या, एक मुद्दा अजुन
जामोप्या,
एक मुद्दा अजुन जोडाल का?
"साडेसाती फक्त हिंदुंना लागते की इतर धर्मीयांना पण लागते? हिंदु खेरीज इतर धर्मीय काय उपाय करीत असावेत?"
हे अॅड केले की धागा कसा सेक्युलर होईल ना?
हा देखील मुद्दा मला घ्यायचा
हा देखील मुद्दा मला घ्यायचा होताच, पण थोड्या वेगळ्या अँगलने..
मर्फीज रुल नावाचा एक सुप्रसिद्ध आणि तितकाच बदनाम असा रुल आहे.. व्हॉटेवर हॅज टु गो राँग विल गो.... या निअयमाबद्दल असे म्हणतात की हा रुल त्यालाच अनुभवायला येतो ज्याला हा रुल माहीत असतो.. ( मीदेखील ज्या दिवशी कंपनीत नेटवर हा रुल वाचला होता त्या दिवशी नंतर आमच्या डिपार्टमेंटचे कॉम्प्युटर बंद पडले. काही कस्टमर खवळले, भांडणे झाली .. असले विचित्र प्रकार घडले होते.. )
साडेसातीबद्दल माझी हीही शंका आहे, की ज्याना शनी, साडेसाती हे शब्दच माहीत नसतात, त्याना , म्हणजे प्रामुख्याने इतर धर्मातील लोकानाही साडेसाती लागते का?
ज्यावेळी अंक नव्हते,
ज्यावेळी अंक नव्हते, अपूर्णांक नव्हते तेव्हाही साडेसातीचा फेरा असेल काय ?
जुन्या काळी भारतियांना गुरु,
जुन्या काळी भारतियांना गुरु, शनी, युरेनस इत्यादी ग्रह माहीत होते. त्यांचे मानवावर होणारे परिणाम म्हणुन साडेसाती हा प्रकार पुढे आला. शनीला एका राशीत अडीच घरे घालवावी लागतात म्हणुन एक आधीचे व एक नंतरचे धरुत साडेसात वर्षे. पण शनीचाच कोप का? कारण शनीला कडी आहेत हे ही आपल्या पुर्वजांना माहीत होते. त्याचा कोप घालवायला शिख कडी घालतात, आणि हिंदु अंगठ्या.
पण नंतर झालेल्या परकीय आक्रमणांनी पुढील काही शोध या मॉडेल मधे बसवले गेले नाहीत . उदा. गुरु आणि युरेनसला पण कडी आहेत त्यामुळे साडेसाती सारखा प्रभाव जास्त पसरट होतो. आधी हे जाणवायचे नाही कारण हे माहीतच नव्हते. (वर मर्फीबद्दल म्हंटले आहे तसेच कार्टुन कॅरॅक्टर्सचे असते. आपण अधांतरी आहोत हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत त्याण्च्यावर गुरुत्वाकर्षणाचाही प्राभाव पडत नाही). आता या तिहेरी प्रभावामुळे सगळ्यांचीच क्वालिटी ऑफ लाईफ खाराब झाली आहे. खरेतर शनीचा प्रभाव कमी असतो कारण शनीच काय, गुरुच्याही अलिकडे असलेल्या लघुग्रहांचा शोध बराच नंतर लागला. त्यामुळे आपण शिल्ड झालो आहोत. एका ठिकाणी असेही वाचनात आले की ते शिल्ड निर्माण करण्याकरताच कोणत्यातरी अस्त्राने मंगळापलीकडील ग्रह फोडण्यात आला.
त्या तुकड्यांचा काय प्रभाव पडतो हे पहाण्याकरता भारतीयांनी एक संगणक बनवला होता. अनेक लाख तुकडे लक्षात घेऊन ते तितक्या व्हॅरिएबल्सचे सायमलटेनिअस पार्शल डिफरंशीअल ईक्वेशन सोडवुन त्या संगणकाने उत्तर दिले ४२. म्हणजे एक कॉन्स्टंट. म्हणजेच सगळ्यावर सतत सारखाच परिणाम होतो. कॉस्मीक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन प्रमाणेच हे अविचल असते.
एकुण काय तर या गोष्टींबद्दल आता विचार करायची गरज नाही.
शिंव्हाची साडेसाती संपलेली
शिंव्हाची साडेसाती संपलेली है. अन मी शिव्म्हा है. तेव्हा आप्लं नाव घ्याचं नै.
डॉक्टरसाहेब, प्रेझेम्ट
डॉक्टरसाहेब, प्रेझेम्ट हिस्टरीइतकीच पास्ट हिस्टरी महत्वाची असते... तुम्ही साडेसातीला पास्ट हिस्टरीत टाकून त्यातले काही सिग्निफिकंट असेल तर सांगा.
इब्लिसराव, तरीच मला वाटत होतं
इब्लिसराव, तरीच मला वाटत होतं तुम्ही जत्रेत हरवलेले माझे जुळे भाऊ आहात. आत्ता तर खात्रीच पटली.
आमी बी शिंवच सॉरी शिंव्हीन हौत (गुगळ्यांची शिंवीण नाही हो)!
मी सांगू जामोप्या, मागची
मी सांगू जामोप्या, मागची साडेसात वर्ष अतीव सुखाची गेलीत. एमडी,लग्न,बाळ,हॉस्पिटल ,प्रॉपर्टी सगळं काही या साडेसात वर्षात.
माझ्या आयुष्यातला आनंदी काळ.
(पत्रिकेत चूक नाही,३-४ वेगवेगळ्या ज्योतिषांकडून आणि सॉफ्टवेअर वापरून करुन घेतलीय माझ्यासाठी इतरांनी)
मी सांगू जामोप्या, मागची
मी सांगू जामोप्या, मागची साडेसात वर्ष अतीव सुखाची गेलीत. एमडी,लग्न,बाळ,हॉस्पिटल ,प्रॉपर्टी सगळं काही या साडेसात वर्षात.
माझ्या आयुष्यातला आनंदी काळ.>>>>>
कोण म्हणतो की साडेसाती मध्ये चान्गली कामे होत नाहीत? जे असे म्हणतात ते अतिशय चुक आहे. माझ्या नवर्याचा आणि सासर्यांचा पत्रिकेचा थोडा अभ्यास आहे. साडेसाती ही वाईट घटनांची मालीका न्हवे. ज्याच्या पत्रिकेत शनी बिघडलेला आहे त्यान्ना तो काळ कसोटीचा जातो.
आता थोडा स्वानुभव. माझी रास सिंह माझ्या नवर्याची आणि मुलीची पण सिंहच. माझ्या सासुबाई आणि आई ची कर्क आणि सासर्यांची कन्या. त्या मुळे मधला काळ असा होता की आम्हा सगळ्यान्नाच साडेसाती होती.
ह्या काळात एकच वाईट घटना घडली ती म्हणजे माझ्या वडीलांचा अकस्मिक म्रुत्यु. ते वयाच्या ६५ व्या वर्षी तडकाफडकी गेले. ही गोष्ट फार वाईट घडली. आर्थात ते बीचारे सगळ्या साडेसाती वाल्यान्नी घेरलेले होते.
बाकी ह्या साडेसात वर्षात आयुष्याला खुप स्थैर्य आले. मी आधी सी.ए. ची प्रॅक्टीस करत होते. पण मुलगी लहान असल्याने २००४ पासुन नोकरी करायला लागले. मुद्दामुन हा निर्णय घेतला होता. मला लो प्रोफाईल रहायचे होते. पण तसे न होता आपोआप संधी येत गेल्या. भराभर प्रमोशन मिळत गेली. पगार ही वाढत गेला. नवी नवी कामे येत राहीली. साडेसाती चा कोणताच काच आर्थिक, कौटुंबीक, किन्वा सामाजिक बाबतीत जाणवला नाही. ह्याच काळात नव्या जास्त पगाराच्या नोकर्या, नवे फ्लॅट, नव्या गाड्या सगळे सुरळीत झाले. परदेश प्रवास कितीतरी झाले. प्रक्रुती ही चांगली राहीली.
म्हणजेच साडेसाती हा काळ प्रत्येक वेळीच वाईट असतो असे नाही. ते त्या त्या पत्रिकेवर अवलंबुन आहे. शनी नीचीचा असेल, किंवा बिघडलेला असेल तर त्याचा त्रास होतो. तसा तर त्रास गुरु बदलामुळे सुध्धा होतो. गुरु हा प्रगती शी रीलेटेड ग्रह आहे. त्याचा डायरेक्ट त्रास होतो.
साडेसाती मध्ये एक गोष्ट मात्र जाणवली, तुमच्या प्रगती मध्ये अडथळे येतात. गोष्टी मिळतात पण विलंबाने.
एक गोष्ट मात्र नक्की की भविष्य ही आंधळ्याची काठी आहे, डोळे नाहीत. त्या मुळे आपण जर प्रयत्नच जर केले नाहीत, तर काहीही होणार नाही. आणि प्रयत्न केले तर विलंबाने का होईना पण गोष्टी होण्या पासुन कोणी रोखु शकत नाही.
आर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
मि पण सिंहच्...पण नौकरि,
मि पण सिंहच्...पण नौकरि, लग्न,घर्,मुलगा..सगळं याच साडेसात वर्षात...:):)
@ मोहन कि मीरा: उत्तर खूप
@ मोहन कि मीरा: उत्तर खूप आवडलं. माझंही हेच मत आहे.
साडेसाती नक्कीच वाईट अनुभव/फळ देते असं नाही. परंतु वास्तवाची जाणीव करून देते. त्यामुळे जे लोक आत्मप्रौढी मिरवणारे अथवा अहंकारी असतात त्यांना साडेसातीत बराच त्रास होतो. शनीला अहंकाराची वागणूक चालत नाही.
असं म्हणतात कि साडेसाती मध्ये मातृवियोग असतो. आणि माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार मला साडेसाती चालू झाली आणि मी इंजिनियरिंग साठी म्हणून दुसर्या गावी गेले. त्या अर्थाने मला मातृवियोग घडला.
मी कर्क, माझी साडेसाती
मी कर्क, माझी साडेसाती संपली.
पहिली असं म्हणतात की साडेसातीतली पहिली किंवा शेवटची अडिच वर्षं चांगली जातात. माझी पहिली प्रचंड खराब, मधली बरी आणि शेवटची अडिच वर्ष छान गेली.
साडेसाती नक्कीच वाईट अनुभव/फळ
साडेसाती नक्कीच वाईट अनुभव/फळ देते असं नाही. परंतु वास्तवाची जाणीव करून देते. त्यामुळे जे लोक आत्मप्रौढी मिरवणारे अथवा अहंकारी असतात त्यांना साडेसातीत बराच त्रास होतो. शनीला अहंकाराची वागणूक चालत नाही.>>>>>>
खरेतर म्हणुनच म्हणतात की सिंह राशीला साडेसाती चा त्रास होतो. कारण सिंह चा राशी स्वामी रवि आणि शनी ह्यांचे जमत नाही. शनी हा रवि चा पुत्र. (तसे बघायला गेले तर सगळे ग्रह रविचे पुत्र). सिंह राशी ची माणसे थोडी "आपल तेच खर" करणारी असतात. (स्वानुभव)
माझ्या नवर्याला थोडा इगो हर्टींग चा प्रॉब्लेम झाला ह्या काळात. पण असे धक्के खाल्या शिवाय आपण जमीनीवर येत नाही. शनी आपल्याला आपली जागा दाखवतो.
शनी हा साडेसातीच्या काळात मेष
शनी हा साडेसातीच्या काळात मेष व सिह राशिला जास्त त्रास देतो असे म्हणतात्,,,हे कितपत खर आहे???आणि तुळेवर कमी प्रभाव असतो हे पण खरे आहे का???
saati | 24 November, 2011 -
saati | 24 November, 2011 - 23:39 नवीन
>>इब्लिसराव, तरीच मला वाटत होतं तुम्ही जत्रेत हरवलेले माझे जुळे भाऊ आहात. आत्ता तर खात्रीच पटली.
>>आमी बी शिंवच सॉरी शिंव्हीन हौत (गुगळ्यांची शिंवीण नाही हो)!
तुझ्या नावात साडे राहिलेत. ते धरून टोटल (साडे)साती होईल हो बहिणा बाई! ;;)
त्यामुळे साडेसातीचा काळ सुखाचा असं म्हणावं लागलं असेल. तो शनी सुटला म्हणायचा बिच्चारा तुझ्या तावडीतून.
मेष म्हणजे "एडका" धडक मारुन,
मेष म्हणजे "एडका" धडक मारुन, स्वबळावर पुढे जाणारी माणसे, तसेच सिंह म्हणजे लिडरशिप चे गुण आणि आत्मविश्वास असणारी माणसे. अशा स्वभावाला कुठे थोडस जरी अपयश आले, तरी ती आपली पीछेहाट वाटते. पण हे असच असणार आहे हा द्रुष्टीकोन ठेवला तर खडतर मार्ग सुकर होतो. भरती जिथे आहे तिथे ओहोटी असणारच.
तुला ही रास तशीही बॅल्न्सड असते. त्यामुळे फार चढ ऊतार त्यान्ना भोगावे लागत नाहीत. तरीही पत्रिकेतील स्थानावर सगळे अवलंबुन आहे.
>>>> १. साडेसाती सत्य की
>>>> १. साडेसाती सत्य की भ्रम?
जामोप्या, प्रथमग्रासे मक्षिकापातः या उक्तिप्रमाणे, तुझ्या या पहिल्याच पर्यायाने या धाग्याला अन्धश्रद्धानिर्मुलनवाल्या बुप्रान्ची साडेसाती लागलीये! ती हटविल्याशिवाय इथे काय लिहीणे शक्य नाही बोवा!
सध्या माझी साडेसाती संपली
सध्या माझी साडेसाती संपली आहे पण तरीही हापिसातून माबोस अॅक्सेस नाही. काय करावे?
जाजु साडेसात वाजता उघडेल
जाजु साडेसात वाजता उघडेल माबो.
<<<<त्यामुळे जे लोक
<<<<त्यामुळे जे लोक आत्मप्रौढी मिरवणारे अथवा अहंकारी असतात त्यांना साडेसातीत बराच त्रास होतो. शनीला अहंकाराची वागणूक चालत नाही.
हो, अगदी.
दुसरं म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांकडून ( ज्यांना आपण मित्र वगैरे म्हणतो ) अपेक्षित मदत / आधार मिळत नाही याकाळात आणि आपल्या अपेक्षांचा बुडबुडा फुटतो. म्हण्जे खरं तर एकादॄष्टीनं ते डिपेंडेबल नसतातच पण ते सगळं छान छान चालू असताना कळत नसतं ते कळतं. त्या वेळी त्रास जरूर होतो पण एकंदरीत शहाणपण येतं. ज्यांच्या अंगात पेशंस असतो त्यांना इतका त्रास होत नसावा कारण साडेसातीच्या काळात सगळ्या गोष्टी हळूहळू होतात.
ज्या राशींचा स्वामी शनी आहे
ज्या राशींचा स्वामी शनी आहे म्हणजे उदा. 'मकर' त्यांना साडेसाती फारशी त्रास देत नाही असे ऐकले आहे. आधिक माहिती मिळावी ही अपेक्षा.
सर्वांना नमस्कार माझा
सर्वांना नमस्कार
माझा ज्योतिषाचा अभ्यास असा नाही. पण आत्तापर्यंत जे वाचले त्या आधारावर लिहितोय.
१४ नोव्हेंबर २०११ पर्यंत सिंह, कन्या व तूळ या राशिंना साडेसाती होती. म्हणजे बारा राशीतील क्रमांक ५,६ व ७ नंबरच्या राशींना साडेसाती होती.
१५ नोव्हेंबर २०११ पासून सिंह राशीची साडेसाती संपून वृष्चिक राशीची साडेसाती सुरू झाली. म्हणजे राशी क्रमांक ६, ७ व ८ यांना सद्या साडेसाती आहे.
साडेसातीचा संबंध शनि या ग्रहाशी असल्याचे समजले जाते. मानवाचा फुगलेला अहंकार कमी करण्याचे काम शनिकडे असते असे समजले जाते.
फुगलेला अहंकार म्हणजे फाजील अहंकार किंवा दुराभिमान किंवा फाजील आत्मविश्वास. जरा वेगळ्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक माणूस मी असा आहे, तसा आहे अशी स्वतःची एक प्रतिमा बनवत असतो. ह्या प्रतिमेतील अयोग्य भाग काढून टाकण्याचे काम शनि महाराज करतात असे म्हटले जाते. फक्त हे काम नाजूक पध्दतीने अथवा समजावून सांगून वगैरे केले जात नाही. तर छडी लागे छमछम विद्या येई घमघम ही पध्दती वापरली जाते. त्यामुळे साधारणतः बरेच जण शनि महाराजांना घाबरून असतात.
मात्र ज्याचा अहंकार वास्तव आहे त्याला शनि महाराजांचा त्रास होत नाही.
साधारणत: असे मानले जाते की या साडेसात वर्षात एखादे छत्र गमावले जाते. उदा. मातृछत्र, पितृछत्र वगैरे) छत्र म्हणजे आपल्याला ज्याचा आधार वाटतो असे काहीतरी.
तसेच या साडेसात वर्षात स्थान बदल होण्याची शक्यता असते.
.
.
कन्या राशीची साडेसाती सुरु
कन्या राशीची साडेसाती सुरु आहे कि संपली?
.
.
साडेसातीतला माझा अजून अनुभव
साडेसातीतला माझा अजून अनुभव म्हणजे:
मी शिक्षणासाठी बाहेर गावी गेले आणि तसे तिथे आई-वडिलांविना असुरक्षित वाटू लागले. मग मी शनी महात्म्य वाचू लागले. रोज थोड्या ओळी. आणि इतके नेमाने वाचू लागले की परीक्षेच्या दिवशी सुद्धा २-४ ओळी वाचायच्या म्हणजे वाचायच्या. त्याने मला खूपच आधार वाटायचा.
गंमत म्हणजे शनी महाराजांवर इतका विश्वास वाटू लागल की माझ्या एका मैत्रिणीसाठी मी शनी कडे एक नवस सुद्धा बोलला. (माझ्या मैत्रिणीचा दुसर्या वर्षाचा एक पेपर राहिला होता शेवटच्या - चौथ्या वर्षी जाताना. मग तिने पेपर reval साठी दिला आणि provisional admission घेतली. तिची admission regular व्हावी ह्यासाठी मी नवस बोलले होते) आणि खरोखर reval चा रिझल्ट आला आणि तिचा विषय सुटला आणि तिची admission रेगुलर झाली.
मनस्विता ..... अजुन लहान
मनस्विता .....
अजुन लहान आहात. कर्मावर विश्वास ठेवा. त्या मैत्रिणीचा पेपर तिच्या मेहेनती मुळे सुटला. मी पण पुर्वी नवस करायचे. पण हळु हळु त्यातिल फोल पणा कळायला लागला. नवस म्हणजे सकारत्मक विचार. हे होणारच. मी ते करणारच. ही विचारधारणा आपल्याला खुप यश देते.
तुम्हाला सल्ला द्यायचा माझा उद्देश नाही. किंवा तुमच्या श्रध्धा स्थानाला मला धक्का लवायचा नाही. पण काही अनुभव शेयर करावेसे वाटतात. खालील उपाय वापरुन पहा.
माझा पोथी किंवा स्तोत्र म्हणायला ना नाही, ज्या कुठल्या श्लोकाने एकाग्रता येते, तो कुठलाही म्हणावा. आपल्याला जे व्हावेसे वाटते, जे आपल्याला पटलेले आहे आणि जे होणार अशी आपली धारणा आहे, ते एका वहीत लिहावे. असे नियमीत करण्याने ती गोष्ट नक्कि साध्य होते. पण मनात जी गोष्ट धरली आहे ती आपल्या अंतरमनाला पटायला हवी. उदा: तुम्ही जर म्हणाल मी देशाचा पंतप्रधान होईन, किंवा मला १० दिवसात १ कोटी मिळतील, तर ते होणार नाही. कारण मुळात ते तुमच्या मनाला ते पटलेले नाही.
ह्यात काहीही चमत्कार नाही. ह्यात काहीही दैवी योग नाही. ह्यात फक्त स्वतः वरचा ध्रुड आत्मविश्वास आहे. ही गोष्ट अनेक डॉक्टरान्नी मान्य केलेली आहे. अनेक पुस्तकातुन ती दिलेली आहे. ह्याचा झालाच तर सकारत्मक मनोव्रुत्ति वाढायला फार उपयोग होतो. मी स्वतः अनुभव घेवुनच सांगते आहे. ब्रम्हविद्येतही हेच सांगीतले आहे.
अश्विनीमामी तुमची पोस्ट आवडली
अश्विनीमामी तुमची पोस्ट आवडली आणि पटली सुद्धा..
साधारणत: असे मानले जाते की या साडेसात वर्षात एखादे छत्र गमावले जाते. उदा. मातृछत्र, पितृछत्र वगैरे) छत्र म्हणजे आपल्याला ज्याचा आधार वाटतो असे काहीतरी.
तसेच या साडेसात वर्षात स्थान बदल होण्याची शक्यता असते. >> हे ही अनुभव आले आहेत मला.. टच वूड आता सर्व काही सुरळित आहे.
१५ नोव्हेंबर २०११ पासून सिंह
१५ नोव्हेंबर २०११ पासून सिंह राशीची साडेसाती संपून वृष्चिक राशीची साडेसाती सुरू झाली. म्हणजे राशी क्रमांक ६, ७ व ८ यांना सद्या साडेसाती आहे.
बाप्रे... मी वृच्शिक आहे.. आता २०१८ पर्यंत साडेसाती रहाणार.
इथे शनिमहात्म्याचा विषय
इथे शनिमहात्म्याचा विषय निघालाच आहे म्हणून विचारावेसे वाटते...
कृपया याचा संबंध इतर कशाशीही जोडण्यात येऊ नये...
मी गेली काही वर्षे नित्यनेमाने शनिमहात्म्य वाचत आहे पण त्यातल्या कितीतरी गोष्टी खटकल्या...
पहिली म्हणजे - शनिदेव जातीचा होय तेली
मग नंतर त्याची उपासना करताना
मग करावे ब्राम्हणभोजन, यथाशक्ती द्यावे दान
ब्राम्हण तृप्त होता पूर्ण, संतोष पावे शनिदेव
हे का म्हणे...जर शनिदेव तेली असतील तर ब्राम्हण तृप्त झाल्याने ते का संतोष पावावेत...??
तेली लोकांना का भोजन देऊ नये...???
तसेच सुरुवातीला
ही गुजरात भाषेची कथा असे का म्हणले आहे...यात गुजराती भाषेचा संबंध कुठून आला?
Pages