अण्णा सुखात्म्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांची पत्नी, लग्न झालेली मुलगी वर्षा आणि राघव व इंद्र ही दोन मुलं. अण्णा हजार्यांच्या आंदोलनानं देश ढवळून निघाला, आणि नेमकं तेव्हाच अण्णा सुखात्म्यांच्या कुटुंबातही एक वादळ निर्माण झालं. राजकीय पक्षांशी बांधिलकी असणार्या, नसणार्या, तरुण, वृद्ध स्त्रीपुरुषांना अण्णा हजार्यांच्या आंदोलनानं विचारात पाडलं, नेमकं तेव्हाच अण्णा सुखात्म्यांच्या कुटुंबासमोर एक मोठाच पेच निर्माण झाला.
अण्णा सुखात्म्यांना मग त्यांच्या पणजोबांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. फार फार पूर्वी या पणजोबांच्या गावी त्यांच्या अंगणात एक भलामोठा पिंपळवृक्ष होता. सुखदु:खाच्या गोष्टी करायला दिवसभराची काम उरकून या झाडाखाली गावकरी येऊन बसत. अनेक पिढ्यांशी, त्यांच्या आयुष्यांशी नातं ठेवून असलेला तो महाकाय वृक्ष मग अचानक एके दिवशी वठायला सुरुवात झाली. सारे चिंतेत पडले. अनेकानेक वर्षांपासून उभा असलेला तो वृक्ष अचानकच कसा वठू लागला? पणजोबा तर हादरलेच. आपण नक्की काय पाप केलं, हे राहूनराहून आठवू लागले. आपलं नक्की चुकलं काय, हा विचार इतर गावकर्यांच्या मनातही आलाच. आणि काय आश्चर्य! त्या पिंपळाला पुन्हा पालवी फुटली!
अण्णा हजार्यांच्या आंदोलनामुळं आपल्या मनातल्या पिंपळवृक्षाला पालवी फुटेल का?
भ्रष्टाचार म्हणजे काय, आणि गांधीटोपी घालून, मेणबत्त्या पेटवून, फेसबुकावर 'लाइक'चं बटन दाबून तो कमी होतो का, या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांचा अण्णा हजार्यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेला 'हा भारत माझा' हा नवा चित्रपट. गोव्यात भरणार्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'हा भारत माझा' प्रदर्शित होतो आहे. २८ नोव्हेंबर, २०११ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित केला आहे.
चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे सुमित्रा भावे यांनी. विक्रम गोखले, उत्तरा बावकर, दीपा लागू, किशोर कदम, जितेंद्र जोशी, अश्विनी गिरी, देविका दफ्तरदार, रेणुका दफ्तरदार, ओंकार गोवर्धन आणि आलोक राजवाडे या कलावंतांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.
अभिनंदन आणि खूप
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
चित्रपटाची कथा दमदार होतेय, पुण्यात आला की नक्की पाहणार.
जबरी दिसते आहे कथा! योग्य
जबरी दिसते आहे कथा! योग्य वेळेस रिलीज होतोय चित्रपट.
माबो टीमचेही अभिनंदन आणि शुभेच्छा!
चित्रपटाची कथा दमदार होतेय>>
चित्रपटाची कथा दमदार होतेय>> अनुमोदन
फारेण्डहो +१ इथे नेटफ्लिक्सवर
फारेण्डहो +१
इथे नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल अशी काहितरी सोय बघायला हवी.
भारी वाटतेय कथा. मनापासुन
भारी वाटतेय कथा.
मनापासुन शुभेच्छा.
मायबोली वरुन मराठी चित्रपटांचे पेड लाईव्ह स्ट्रिमिंग ठेवायला हवे
अगदी ताजा, आणि जिव्हाळ्याचा
अगदी ताजा, आणि जिव्हाळ्याचा विषय. सर्वच कलाकार उत्तम. चित्रपट उत्तमच असणार.
ह्या द्वयींचे जिंदगी झिंदबाद,
ह्या द्वयींचे जिंदगी झिंदबाद, बाधा आणि एक कप चा ह्या DVD\ VCD कुठे मिळू शकतील. तसेच मला वाटत मुक्तांगणवर पण त्याने एक डॉक्युमेंट्री काढली होती. पुर्वी Late Night सिनेमा दाखवायचे त्यात पाहिलेली आठवते. तीही मिळू शकेल का? मला ह्यांचे चित्रपट जमवायचे आहेत. त्यामुळे ही चौकशी जरी ईथे योग्य नसली तरीही लिहीतो आहे; कारण खुप शोधले पण DVD\ VCD कुठेच मिळाले नाही.
प्लीज हा सिनेमा नेटफ्लिक्स वर
प्लीज हा सिनेमा नेटफ्लिक्स वर बघायला उपलब्ध करून द्या किंवा युट्यूबवर वर्गणी भरून बघायला मिळाला तरी चालेल.
सातवा आशियाई चित्रपट महोत्सव
सातवा आशियाई चित्रपट महोत्सव उद्यापासून पुणे, मुंबई आणि कोल्हापूर इथे सुरू होतो आहे. या महोत्सवात 'हा भारत माझा' प्रदर्शित होणार आहे.
२३ डिसेंबर - इचलकरंजी
२४ डिसेंबर - कोल्हापूर
२९ डिसेंबर - पुणे (राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय)
शक्य असल्यास या महोत्सवात हा चित्रपट अवश्य पाहा.