फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध

Submitted by जागोमोहनप्यारे on 5 November, 2011 - 05:14

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. Proud डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.

गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते, तेंव्हा एका धनगराने एक औषध लावायला सांगितले होते. तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगू.

दुसर्‍या दिवशी त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानी औषधाची कृती सांगितली. ती खालीलप्रमाणे..

साहित्य :

२ नारळाचे पाणी
११ गुलाबाची फुले
१०० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम वेलदोडा घेऊन सोलून बिया घेणे.
२ चमचे हळद.
२ मुठी तुळशीचा पाला
सव्वा किलो खोबरेल तेल

प्रथम मिक्सरमधून वेलदोडा आणि बदाम बरीक पूड करावी. मग त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीचा पाला चुरुन घालून पुन्हा बारीक करावे. त्यात २ नारळाचे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवून लगदा करुन घेणे.

नंतर तेलामध्ये हा लगदा आणि हळद घालून ढवळावे. आणि १५ मिनिटे उकळू द्यावे. मिश्रण ढवळत रहावे आणि मोठ्या पातेल्यात कृती करावी. कारण हळद घातली की उतू जाते.

नंतर गार करुन फडक्याने गाळून घ्यावे.

आयुर्वेदिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत.

१. जंगल पपिता तेल ५० मिली
२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम

( शेवटची दोन औषधे प्रचंड महाग आहेत. माझ्या सर्जरीलाही इतका खर्च आला नव्हता ! Proud )

मिश्रण बाटली हलवून ढवळावे. एक दिवस तसेच ठेवावे. त्यानंतर दररोज रात्री फ्रॅक्चर झालेल्या हाताला/ पायाला चोळून लावून मुरवावे. यामुळे ...

हाड जुळायला मदत होते.
स्नायुंची पुष्टी होते.
दुखावलेल्या शिरा पुन्हा कार्यक्षम होतात.

औषध तीन महिने वापरावे.

हे औषध फक्त इजेमुळे झालेल्या (अपघाती) फ्रॅक्चरला वापरावे. फृएक्चर अन्य कारणाने, उदा कॅन्सर, टीबी वगैरे असेल किंवा त्वचेवर ओली जखम असेल तर हे औषध वापरू नये.

औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. पिऊ नये. Proud

( गुगलवर सर्च करणार्‍याला ही लिंक मिळावी, म्हणून औषधांची नावे इंग्रजीत देत आहे.. Jungle Papita Oil, Ratnajot oil, Ratnajyot Oil, Vat chintamani Ras, Yogendra ras, kumar kalyan Ras, Pancharatna Anmol Ras, Suvarna Bhasma, Swarna Bhasma, Heerak Bhasma, Vajra Bhasma. Ayurvedic medicine for fracture, for external use only)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>देव आनंद जसा या उतारवयात सुद्धा जसे उत्साहाने नवेनवे चित्रपट काढत असतो (चित्रपटाच्या दर्जाचा आणि तो किती चालेल याचा जरादेखील विचार न करता), तसेच हे रोज नवीननवीन धागे निर्माण करत असतात.

सिक्सर Rofl Rofl Rofl

चार पाने भरली की.. अजून किती धागा चालायला हवा..? तेही गुढगा मोडलेला असताना.. ?? Proud सगळेच धागे व्य्वस्थीत चाललेत.. एखाद दुसरा अपवाद.. आता आणखी एक धागा काढणार आहे..

उदय Lol

>>> चार पाने भरली की.. अजून किती धागा चालायला हवा..? तेही गुढगा मोडलेला असताना.. ??

गुडघा अधू असल्यानेच ४ पाने भरली. गुडघा नीट असता तर एकसुद्धा प्रतिसाद आला नसता.

>>> चार पाने भरली की.. अजून किती धागा चालायला हवा..? तेही गुढगा मोडलेला असताना.. ??
गुडघा अधू असल्यानेच ४ पाने भरली. गुडघा नीट असता तर एकसुद्धा प्रतिसाद आला नसता.
---- मास्तुरे त्यांनी केवळ १ धागा काढायचीच प्रतिज्ञा घेतलेली आहे... तुमच्या उत्तराने त्यांना प्रोत्साहन मिळेल.... अजुन ३ महिने काढायचे आहेत :अरेरे:.

चला मला शतक पुर्ण करायचं होतं, म्हणुन ही पोस्ट.
हाड मोडल्यास गणपती व कुलदेवतेचा जप करावा >>>>> जामोप्या, तुमचा खरंच या सगळ्यावर विश्वास आहे का उगाच आपलं..... Happy

हे जप स्वत:च करायचे की इतर कोणी केले तरी चालतील का?

जर दुसर्‍याने जप करुन देखिल फरक पडणार असेल तर सर्वांनी जामोप्या साठी जप करायला पाहिजे. त्यांना जो आजार आहे तो बरा झाला तर ते ही सुटतील आणि माबोकर पण Biggrin

आतापुरता तरी एवढेच
गेट वेल सून.. जामोप्या!!! Biggrin

एक महिना होत आला. औस्शध चांगले वाटते.. दुखणे कमी झाले आहे. बराच चाम्गला फरक पडला आहे.

एक महिना होत आला. औस्शध चांगले वाटते.. दुखणे कमी झाले आहे. बराच चाम्गला फरक पडला आहे.
----- दुखणे कमी हे औषधामुळेच झाले हे कसे ठरवले? म्हणजे औषध न घेताही एखादेवेळी ४ आठवड्यांत नैसर्गिक रितीने बरे होण्यात हातभार लागला नाही हे कशावरुन?

मला होमिओपॅथीच्या डॉ. चे "माझ्या औषधांचा काहींना ३ महिन्यांत फरक पडेल तर काहींना गुण यायला ४ वर्षे लागतील, फरक नक्की पडेल, कधी ते सांगता येत नाही" जो पर्यंत पडत नाही तो पर्यंत माझ्याकडुन औषधे घेत रहा. आता मनुष्य कुठल्या पिडाने हतबल झालेला असेल तर तो सैराभैरा होतो व एकाच वेळेला अनेक उपाय करतो, नक्की या औषधानेच फरक पडला आहे हा निष्कर्ष कसा काढला जातो? सोबत बर्‍याच प्रसंगी नैसर्गिक रितीने बरे होण्याची शक्यता पण असतेच.

तुमचा गुडघा चांगला व्हावा आणि तुम्ही पुन्हा फुटबॉल खेळावे यासाठी सर्वांतर्फे तुम्हास शुभेच्छा. अर्थात वाचकांना काही बाफंना व त्यांत असणार्‍या भन्नाट कल्पनांना मुकावे लागणार :स्मित:.

दीड महिना होत आला. घोट्याजवळच्या स्नायुम्मध्ये ताकत चाम्गली जाणवत आहे. पूर्वी टाचा वर करुन नुसते दोन्ही चवड्यांवर उभे रहाणे जमत नव्हते. दुखायचे आणि स्नायुत तेवढी ताकतही नव्हती.. आता चांगले जमते.

गुढग्याखालचा पाय ( लेग.. म्हणजे तंगडे का? ) अगेस्न्ट ग्रॅविटी वर घेणे जमत नव्हते. आता जमते. पायरी वर चढणे यात मांडीच्या पुढच्या भागातील हे स्नायु खूप महत्वाचे काम करतात . आता जमायला लागले. अगेन्स्ट ग्रॅविटी अ‍ॅक्शनमध्ये मसलने काम करणे हे वैद्यकीय भाषेत चांगले लक्षण मानले जाते. Happy

अजून दीड महिना औषध वापरेन. पण औषध उरणार असे वाटते. एखाद्याने वर दिलेल्याच्या अर्ध्या प्रमाणात करायला हरकत नसावी. तेवढे औषध ३ महिने पुरेल असे वाटते.

जामोप्या अपडेट्स :

जामोप्यांचा पाय कधीच बरा झालेला आहे.

त्यांचा पाय सांधला तरी संसार मोडकाच आहे.

त्यामुळे ते सध्या सकाळी एका हास्पिटलात आणि ( घरी बायको नसल्याने ) रात्री दुसर्‍या हास्पिटलात अशा दोन नोकर्‍या करतात. Happy

नवरा पाय धडका असताना एकच नोकरी करायचा आणि मोडका पाय झाल्यावर आता डब्बल नोकर्‍या करतो, मग आपण घर सोडून काय मिळवलं ? अशा विचारानी फ्रस्ट्रेट होऊन सौ. जामोप्याही ( झक मारत) त्यांच्या संसारात पुन्हा परतण्याच्या मार्गावर आहे.

सगळा आनंदी आनंद आहे.

धनगराला जामोप्यांतर्फे धन्यवाद.

Proud Rofl

सगळा आनंदी आनंद आहे.> अभिनंदन.

जामोप्यांचा पाय कधीच बरा झालेला आहे.
आणि मोडका पाय झाल्यावर आता डब्बल नोकर्‍या करतो > ?
धनगराच्या औषधाने पाय पूर्ण बरा झाला का ?

अहो काउ पण पाय याच औषधाने बरा झाला की दुसर्‍या हे क्लीअर झालेच नाही.:अओ: असो, तरी काळजी घ्या. आन्धळी जखम कधी कधी जास्त त्रास देते. आन्धळी म्हणजे जिथे लागले असेल परत तिथेच दुसर्‍यान्दा लागते. ( तुम्हाला घाबरवण्याचा उद्देश नाहीये)

काल दारावर कोपरा आपटला, आणी रात्री काहीतरी आणायला गेले तर परत तिथेच त्याच जागी दुखापत झाली. हात थोडा दुखतोच आहे, म्हणून तसे लिहीले.

>>>> मास्तुरे | 6 November, 2011 - 18:00
जामोप्या, तुमचे गेल्या काही दिवसांतले/महिन्यांतले प्रतिसाद बघता, अ‍ॅलोपथी तसेच धनगराच्या आयुर्वेदिक औषधांनी तुमचा गुडघा बरा झालेला नाही, असे स्पष्ट दिसून येत आहे. <<<<<<

अहो, ते ठीक आहे, वर लक्ष्मीबैंनीही लिहिलय की जामोप्या बरे झालेत.
पण ते तेल तयार करुन लावल्यावर त्याचा साईड इफेक्ट "आयडी"वरही पडतो की काय? Uhoh भारिच जालिम औषध दिसतय ते....

मागे जामोप्यांनी लिहिलंय की औषधाचा रंग हिरवा आहे पण बाटलीतला रंग तर पिवळट वाटतोय, आमटीच्या रंगाचा.
हिरवा रंग वाचून मला तर वाटलेलं की जामोप्यांना आवडता रंग बघूनच पायात सुधारणा वाटू लागली असणार, न लावताही.

पिवळट पोपटी रंग आहे. त्या रूममध्ये नैसर्गिक सूरयप्रकाश येत नव्हता... ट्युबलाइटच्या उजेडात पाहिले होते.

Pages