मराठीमधली कोडी

Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54

लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिले ३३ स्टेशन तो ३ नारळ देतो
चौतिसाव्या स्टेशनला तो १ नारळ काढुन तिसरे पोते फेकतो आता २ पोती आहेत म्हणुन तो २ नारळ देतो
पुढे ४९ स्टेशन तो २ नारळ देतो. ५० व्या स्टेस्हनात तो २रे पोते फेकुन १ नारळ देतो
म्हणजे ८४ स्टेशने गेली नंतर पंधरा स्टेशन तो १ नारळ देतो.
म्हणजे तो ९९ स्टेशने ओलांडतो आणि १००व्या स्टेशनला उतरतो तेंव्हा त्याच्याकडे ८५ नारळ असतील.
तो ० व्या स्टेशनला चढला असेल (म्हणजे १०० स्टेशने पुढे जाणार असेल) तर ८४ नारळ असतील.

अश्चिग उत्तर बरोबर आहे फक्त विस्ताराने सांगितले असते तर बरे झाले असते. Happy

पहिल्या ३४ स्टेशनांपर्यत प्रत्येक पोत्याला एक यांप्रमाणे १०२ नारळ संपतात,
म्हणजे दुसर्‍या पोत्यात ९८ राहिले.
३४व्या स्टेशनापासून ८३ व्या स्टेशनापर्यंत दुसर्‍या पोत्यातले (दोन पोती शिल्लक आहेत) एक एक याप्रमाणे ९८ नारळ तो टीसीला देतो--
आता राहिले तिसर्‍या पोत्यातले १०० नारळ. ८४ स्टेशनापासून ते १०० व्या स्टेशनावर उतरेस्तोवर तो माणूस एका पोत्यामागे एक याप्रमाणे १७ नारळ टीसीला देतो. म्हणजे त्याच्याकडे राहिले ८३ नारळ.

निलीमा , पहिल्या पोत्यातले ९९ दिल्यावर जो एक राहतो तो नारळ त्याला तीन पोत्याप्रमाणे (म्हणजे दुसर्‍यातले दोन धरुन) द्यावा लागेल. म्हणून शेवटी ८३ नारळ उरतील.

धन्यवाद! Happy

हर्षदा Happy

@निल्या, टीसी पहिल्याच स्टेशनवर हटकतो ना! नायतर १०० व्या स्टेशनावर हटकला असता तर एवढी आकडेमोड कोण कर्तय Happy

सुमित , गाडी प्रत्येक स्टेशनवर थांबते.

एक रुम आहे. त्या रुममध्ये एक बल्ब आहे. बाहेर तीन बटणे आहेत (विजेची).
बल्ब चालू आहे किंवा नाही ते बाहेरुन दिसत नाही.

आतमध्ये एकदाच जायची जर परवानगी असेल तर..
तुम्ही त्या बल्बचे बटण कसे शोधाल?

दोन बटणे ऑन करायची. थोड्या वेळाने एक बटण बंद करायचे. खोलीत जायचे.

बल्ब जळत असेल तर ऑन असलेले बटण त्या बल्बचे.
बल्ब जळत नसेल तर त्याला हात लावून बघा. चटका बसला तर थोडा वेळ ऑन ठेवून बंद केलेले बटण त्या बल्बचे.
चटका नाही बसला तर जे बटण अजिबात ऑन केले नव्हते ते या बल्बचे.

(इथे बुद्धीपेक्षा स्मरणशक्ती उपयोगी पडली.)

MI 3 HI BATAN CHALU KAREN........
LIGHT BILL MALA THODI BHARAYCHE AAHE.. Happy

अगदी बरोबर ! Happy

उत्तरात एक किंचितसा फरक म्हणजे पहिले बटण दाबून १५ मिनीटे थांबणे आणि बंद करणे.
नंतर दुसरे बटण दाबून आत जायचे, दिवा पेटलेला दिसला तर बटण त्याचे, आणि बाकी तुम्ही सांगितल्याप्रमाणे Happy

के अंजली | 5 November, 2011 - 07:16

निलीमा , पहिल्या पोत्यातले ९९ दिल्यावर जो एक राहतो तो नारळ त्याला तीन पोत्याप्रमाणे (म्हणजे दुसर्‍यातले दोन धरुन) द्यावा लागेल. म्हणून शेवटी ८३ नारळ उरतील.

>>

नॉट सो फास्ट.
इथे नारळ प्रत्येक स्टेशनवर पुढे जाण्याचा किंवा शेवटच्या स्टेशन्वर उतरण्याचा रेन्ट आहे.
३४व्या स्टेशन वरुन पुढे फक्त २ पोती जाणार आहेत्.म्हणजेच सांगायचे झाले तर दादर स्टेशनात गाडी शिरायच्या आधिच नारळ्वाला खिडकीतुन पोते फेकुन देइल आणि २ नारळ TC च्या हातात ठेवेल.

आता जर तुम्ही म्हणाल तो हे असे करेल हे अध्यारुत आहे तर नारळ्वाला स्वतःचा फायदाच बघणार.

निलिमा, तो एक स्टेशन आधी पण ५ बाहेर ठेऊन एक स्टेशन आधी पोते फेकुन अजुन एक नारळ वाचवु शकेल.
शेवटी त्याला एक पोते लागणार आहे त्यामुळे तो १०० पण वाचवु शकेल - ५० व्य स्टेशनलाच पहिले पोते फेकुन देऊन.

aschig | 6 November, 2011 - 13:51 नवीन
निलिमा, तो एक स्टेशन आधी पण ५ बाहेर ठेऊन एक स्टेशन आधी पोते फेकुन अजुन एक नारळ वाचवु शकेल.
शेवटी त्याला एक पोते लागणार आहे त्यामुळे तो १०० पण वाचवु शकेल - ५० व्य स्टेशनलाच पहिले पोते फेकुन देऊन.

>>
चांगला प्रतिवाद आहे पण हा विचार पण मी केला होता.
इथे तो पाच नारळ पण हातात धरु शकतो पण त्याला तसे नारळ १ स्टेशन पुढे न्यावे लागतील. हे पाच नारळ पुर्ण १ स्टेशन आणि २ नारळ परत अजुन एक स्टेशन हातात धरुन नेण्याचा सेपरेट रेन्ट (किंवा लाच) तिकीटमास्तर मागु शकतो. १ नारळ स्टेशनात काढुन पोते फेकुन दिले तर त्या पोत्याचा तो रेन्ट मागु शकत नाही.
प्रश्ण खरा असा आहे की नारळवाला रेन्ट नारळ पुढे नेण्याचा देतो की आधि कॅरी करण्याचा देतो.
शेवटच्या स्टेशन्वर उतरण्यासाठीपण तो रेन्ट देणार आहे यामुळे फक्त पुढे कॅरी करायला तो रेन्ट देतो किंवा त्या स्टेशनात गाडी चालु व्हायच्या आधी त्याच्याकडे पोत्यांवर तो रेन्ट देतो असे मानता येइल.

मला असे वाटते की तुम्ही हे कोडे सोडवताना तुम्ही स्वतः लाचखोर TC आहात आणि नारळवाला समोर उभा आहे असा विचार केलात तर माझे उत्तर लगेच पटेल. नारळवाला पोते फेकुन तिथे ढीग घालुन बसला आणि २ पोत्यांचेच लाच देउ लागला तर तुम्ही त्याच्याकडुन ढीग घातल्याबद्दल अजुन लाच मागु शकाल पण त्याने १ नारळ उरला असताना गाडी थाम्बल्यावर पोते फेकुन उरलेल्या २ पोत्यांसाठी २ नारळ दिले तर तुम्हाला काही बोलता येणार नाही.

पोते फेकले तर टीसी नारळ कुठे ठेवेल? शहाणा असेल तर पोत्यासकट १०० नारळ घ्यावेत, व २०० त्याला नेऊ द्यावेत. आजुबाजुला सजग लोक असतील तर त्यांनी पोलीसात तक्रार करावी. आता हे खरेखुरे 'मराठी' कोडे होते आहे Happy

aschig | 8 November, 2011 - 09:32 नवीन
पोते फेकले तर टीसी नारळ कुठे ठेवेल? शहाणा असेल तर पोत्यासकट १०० नारळ घ्यावेत, व २०० त्याला नेऊ द्यावेत. आजुबाजुला सजग लोक असतील तर त्यांनी पोलीसात तक्रार करावी. आता हे खरेखुरे 'मराठी' कोडे होते आहे

>> बरोबर! थोडी भिती वाटत होती की उगीच वाद घालते असा अर्थ होणार नाही ना.
८३ उत्तर चुकीचे नाही मी असाच माझा मुद्दा मांडला की असा पण विचार असु शकतो.
अंजलीने लगेच तीन बटनांचे कोडे घालुन दिवे दिले आहेतच तर इथे आता नारळ घेउन टाकते आणि वाद बंद करते.

गदा आहे ..पण हनुमान नाही......

सुदर्शन आहे पण...कृष्ण नाही.....

घंटा आहे पण .........................................मंदिर नाही,

पैसे मागतो पण .......................................भिकारी नाही.

सोन्याच्या ७ विटा आहेत. प्रत्येक विटेचे वजन १ किलो असायला हवे होते. पण एका विटेचे वजन ९०० ग्रामच आहे. नुसते पाहून कोणती वीट ते ओळखता येत नाही. तुमच्याकडे तराजू आहे. तो फक्त दोनदा वापरून कोणती वीट ९०० ग्राम वजनाची आहे ते कसे ओळखाल?

प्रथम दोन्ही पारड्यात ३ ३ विटा घेऊन वजन करायचे. ही वजने जर दोन्ही कडची सारखी असतील तर उरलेली वीट कमी वजनाची असेल.
आणि जर त्यातील एखादे पारडे हलके असून वर जात असेल तर त्यातली कुठली तरी वीट हलकी असेल..

मग दुसर्‍यांदा वजन करताना या तीन मधल्या दोन वीटा घेऊन त्यांच वजन करायचे. त्या सारख्या असतील तर राहीलेली वीट वजनाला हलकी असेल... आणि कमी जास्त असतील तर हलकी कुठली ते लगेच ओळखता येईल..

बरोबर का भरतजी..? Happy

आणि हे करत असताना ज्यांची वजने करून झालीत त्या वीटा आठवणीने बाजूला ठेवायच्या नाहीतर नक्की हलकी वीट कुठली हे काही केल्या कळणार नाही Proud

बरोबर.
आता ही हलकी वीट ओळखता आली, तर ती बनवणारी फॉल्टी मशीन शोधून काढायची आहेत.
फॅक्टरीत एकूण दहा मशिनी आहेत विटा बनवायच्या. त्यातली एक मशीन ९०० ग्रामच्या विटा बनवतेय. बाकीच्या बरोबर वजनाच्या = १ किलोच्या विटा बनवतायत,
यावेळी तुमच्याकडे तराजू नाही, तर वजनकाटा आहे. आणि तो फक्त एकदाच वापरता येणार आहे.

Pages