आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निलिमा .... हे एकदम्म
निलिमा ....![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
हे एकदम्म अमानविय आहे. भुताचा मृतदेह सापडला हे वाचून काय घाबरले मी!
निलिमा>>>>>>>>>>
निलिमा>>>>>>>>>>
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
पुढे त्या सारस्वत बॅंकेच्या
स्वप्ना, त्यांचं बँकेतलं खातं
स्वप्ना, त्यांचं बँकेतलं खातं बंद झालं असेल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मंदार
मंदार![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अहो स्वप्ना, मंदार, वर्षू,
अहो स्वप्ना, मंदार, वर्षू, ह्या धाग्यावर अस कवटीतल किंवा उलट, सुलट नका हासू,
आमची भीती अजुनच वाढते
साचो.. तुम्हाला कवटीच्या
साचो.. तुम्हाला कवटीच्या डोक्यावरचे (?) इतस्त: उडणारे केस नि भरलेली मांग वै.. दिसते का?
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
उडणारे केस नि भरलेली मांग च
उडणारे केस नि भरलेली मांग च काय कधी कधी कवटीच्या तोंडातुन रक्त पण सांडताना दीसत.
छ्या सगळच भयानक आहे येथे
साको(हाच उच्चारे ना??) थांब
साको(हाच उच्चारे ना??) थांब ,चातकाच्या धडकी भरवणार्या स्मायलीज तू अजून पाहिल्या न्हाईयेस इथं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अमानवीय हा धागा वाचून पुढचा
अमानवीय हा धागा वाचून पुढचा धागा वाचण्यासाठी उघडला..तर...त्यात...
"एनक लगाके कभी पढनां वो चिठीया..
पल्कोन्के पानीमें रखना वो चिठीया,....
तैरती नजर आयेगी जनाब.....
हो..देखी किसिने आती हुई लेहेरों पे जाती हुई लडकी........"
इमॅजीन केलं हे...आणि...योकदमच अमानवीय वाटलं...
काय? वाटतंय का नाय? "आती हुई लेहेरों पे जाती हुई लडकी"..हा हा हा हा
साको(हाच उच्चारे ना??) >>
साको(हाच उच्चारे ना??) >> सचिन
चातकाच्या धडकी भरवणार्या स्मायलीज तू अजून पाहिल्या न्हाईयेस इथं >> ते स्मायलीज पर्यंत ठीक आहे हो, पण मला शंका येते ही वरची मंडळी तरी खरी आहेत ना, कि त्यांनी त्यांचेच फोटो चिटकवलेत
आरे आता पुरे स्वतः
आरे आता पुरे![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
स्वतः अनुभवलेल्या घटनांचे किस्से टाकायला सुरवात करा. बाजारगप नको.
बघा बघा वरची हसरी कवटी आता
बघा बघा वरची हसरी कवटी आता कशी रक्ताळलीये... सगळच अमानवीय
मंदार येऊ देत रे असे किस्से
मंदार येऊ देत रे असे किस्से पण...भावी रामसे बंधुंना नायतर मालमसाला कुठुन मिळायचा...
हे एकदम्म अमानविय आहे. भुताचा
हे एकदम्म अमानविय आहे. भुताचा मृतदेह सापडला हे वाचून काय घाबरले मी!>>>> नाय काय मामे, हे अगदीच अ(द)भुतनीय आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गेल्या २/३ दिवसा पुर्विच हा
गेल्या २/३ दिवसा पुर्विच हा धागा मिळाला. वाचताना मज्जा आली. भीति पण वाटली. एक छोटा किस्सा. अमानविय का अजुन काहि माहित नाही.
माझ्या आई चे वडिल, माझे आजोबा, मी २०-२१ वर्षा ची असताना वारले. त्या नन्तर खुप वर्षानी माझे लग्न झाले आणि मला मुलगी झाली. त्या वेळेस मी आई कडे होते. माझ्या आजोबाचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. मी पहिली नात असल्याने ते खुप लाड करत. ही गोष्ट आहे २००१ नोव्हेम्बर ची. त्या वेळेस नुकतेच ९/११ झाले होते. माझी मुलगी १०-१२ दिवसान्ची होती. एकदा दुपारी आई बाळाला घेवुन झोपली होती. मी पण झोपले होते. २-३ तासान्नि आई दचकुन जागि झालि. नन्तर मी उठल्या वर तिने सान्गितले की,
आजोबा आले होते. बाळाला मान्डित घेतले. म्हणाले " ही तर मीरा ना" तशी आई म्हणाली " नाहि आहो ही मीराची मुलगी. तुम्हि आज कसे आलात?" त्या वर ते म्हणाले, " अग बप्प्या ( म्हणजे मी) ची खुप आठवण झाली म्हणुन आलो." आई म्हणाली, "तुम्हि कसे आहात?" तर म्हणाले " मी बरा आहे. तिकडे सगळे ठिक आहे. अत्ताच ते मेले ना ते सगळे आहेत आमच्या बरोबर. खुप लोक आहेत. गर्दि आहे. पण मजेत आहे."
आई दचकुन उठली.
ह्याला मी आत्मा वगैरे म्हणणार नाही. हा मनाचा खेळ असु शकतो.
दुसरा किस्सा ऐकलेला, माझ्या काकुचा
तिची आई लवकर वारली. त्या ४ बहिणी आहेत. पैकी ३ बहिणीची लग्ने आई ने पाहिली होती. पण धाकटीचे नाही. जेन्व्हा धाकटी चे लग्न झाले, तेन्व्हा एके दिवशी ती घरातच आवरा आवर करत होती. तिला दिसले की तिची आई पुढल्या दाराने आली आणि घरात एक फेरि मारुन पाठच्या दाराने निघुन गेली. हिने "ए आई , ए आई " अशी हाक २-३ वेळा मारली पण काहिही न बोलता आणि कुठेही न पहाता आई निघुन गेली.
हा भास ही असु शकतो. पण झाले खरे.
माझे काका कामानिमित्त
माझे काका कामानिमित्त वैभववाडीला होते. तिथे ते पातकर नावाच्या मित्राकडे राहायचे .बरेचदा रात्री त्यांना त्यांचे पाय कुणीतरी ओढल्याची विचित्र अनुभूती यायची. पातकरांच्यामते तो एक अतृप्त आत्मा होता जो तिथे वास करीत होता .त्या घरात कुणाचाच उत्कर्ष झाला नाही पुढे काकाही व्यसनी बनुन कर्जात बुडाले. आजही काकांना त्रास होतो त्या दिवसांचा विचारकरून.
हा अनुभव भुताचा वैगरे नाही,
हा अनुभव भुताचा वैगरे नाही, पण आपल्यापैकी खुप जण ट्रेक करतात म्हणून आवर्जुन लिहीत आहे..
माझा नवरा अनुप, अगदी हाडाचा ट्रेकर.. शिक्षणासाठी पुण्यात असताना शनिवार रविवार सुट्टीचा कोणताही दिवस त्याने ट्रेक केला नाही असे झाले नाही..
एका शनिवारी रात्री अनुप त्याचे दोन मित्र राहुल लोकरे, मिहीर प्रबळकर(आश्चर्य वाटेल तेव्हा मिहीर फक्त ८वी मधे होता..) हे माहुली ट्रेकसाठी कार ने निघाले, रात्रभर प्रवास करून पहाटे माहुलीच्या पायथ्याशी पोहोचले २ तास आराम करून सकाळी ७ वा. चढायला सुरुवात केली..
अर्ध्या रस्त्यात गेल्यावर काही साध्या वेषातल्या पोलीसांनी त्यांना हटकले, त्यांनी त्यांचे आय कार्ड दाखवून वर जाऊ नका असे सांगितले, कारण वर गडावर ५ खून झाले आहेत, आम्ही प्रेत शोधण्यासाठी आलो आहोत असे सांगितले..
तरीही या तिघांचा विश्वास बसला नाही, आणि पोलीसांची नजर चुकवून हे तिघे दुसर्या वाटेने वर गेले..
उत्सुकता खुपच होती, पोलीसांच्या आधी आपण प्रेतं शोधू असा विचार करून या तिघांनी शोधकार्य सुरू केले..
आणि या तिघांच्या शोध मोहीमेला यश आले, २ प्रतं शोधली..
आता पुढे काय..?
इतक्यात पोलीस तिथे आलेच, ते या तिघांना खुप रागवले, पण त्यांच्याजवळ कॅमेरा नसल्याने त्यांनी अनुपला फोटो काढायला सांगितले, अनुपनेही मुळीच भिती वाटत नसल्यासारखे बिनधास्तपणे फोटो काढले, राहुलने प्रेताचे खिसे तपासले, जे मिळेल ते पोलीसांच्या स्वाधीन केले, अनुपकडे सोनीचा लॅपटॉप होता तो सोबतच घेऊन फिरायचा कॅमेर्यातली मेमरी फुल झाली की फोटो लॅपटॉप मधे सेव्ह करायचा... याचा उपयोग त्याला तिथे झाला, त्या फोटोंची सीडी बनवून त्याने पोलीसांना दिली..
पोलीसांनी ते फोटो यांना डिलीटही करायला लावले.. पण अनुपने कॅमेर्यातले फोटो डिलीट केले नाही..
किल्ला बर्यापैकी बघून झालाच होता, दुपारी हे तिघे खाली उतरले, अन पाहतात तर अनुपच्या गाडीचा काच कोणीतरी मोठा दगड टाकून फोडला होता, गावात विचारले तर कोणालाही या बाबतीत कल्पना नव्हती, कोणीच काच फोडल्याचा आवाजही ऐकला नव्हता..
तिथून पुढे मात्र या तिघांची चांगलीच टरकली, पुढे २ महिने अनुप एकटा राहीलाच नाही, त्याला सतत ते प्रेत जवळच आहे, पलंगाखाली आहे, असे भास होत होते..
आजही ते फोटो अनुपकडे आहेत, मी खुप हौसेने ते पाहीले आणि पुढे १५ दिवस तरी खोलीत एकटी जायला आणि दिवे लावायलाही घाबरत होते...
तेव्हा ट्रेक करताना जरा जपुन करा, कुठल्याही गोष्टीची छेडछाड करू नका... सुरक्षित जा, सुरक्षित या..
मला खरतर विश्वास नाहीये
मला खरतर विश्वास नाहीये अमानवीय शक्तींवर, पण विज्ञानाचा भाग म्हणा किंवा आणखी काही म्हणून जाणून घ्यायला आवड्ते त्याबद्दल. म्हणून इथे ओढली गेले. मला फारसा अनुभव नाहीये याबाबतीत.
पण आजूबाजूला घडलेल्या घटना शेअर करेन. तसेच वडील व आजोबांना आलेले अनुभव सांगेन नक्की.
आमच्या आजोबांचे हॉटेल होते
आमच्या आजोबांचे हॉटेल होते गावात. तेव्हा पाणी भरण्यासाठी पहाटे चार ला उठून हॉटेलात जावे लागत असे. हॉटेलातला गडी आजोबांना ऊठवायला जाई आणि तोही आजोबांच्या सोबत पाणी भरायला जात असे. असेच एकदा पाणी भरायला म्हणून आजोबांना गड्याने उठवले. आजोबा माळ्यावर झोपत म्हणून तो तिथे आला अन आजोबांना म्हणाला '' काका पानी भरायला येताय ना?'' आजोबा झोपेत असल्याने घड्याळ न बघताच हॉटेलाच्या किल्ल्या घेतल्या अन निघाले. पुढे आजोबा अन मागे गडी. नाक्यावर पोचतात न पोचतात तर समोर च्या वळणावर पुन्हा तोच गडी बिडी फुकत येताना त्यांना दिसला. आजोबा चरकले पण घाबरले मात्र नाहीत. गडयाने तेव्हा त्यांना विचारले, ''काय मालक इतक्या रात्रीचं कुटं निगालात?'' आजोबा म्हणाले, '' अरे तुच आणलंस ना मला उठवून , पाणी भरायला चला म्हणून? आणी माझ्या मागे चालत होतास तो अचानक इकडून कुठून आलास रे? '' असे बोलताना त्यांनी मागे वळून पाहिले तर दूरवर कोणीच दिसत नव्हते.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
घरी जावून आजोबांनी घड्याळ पाहिले तर रात्रीचा दीड वाजलेला.
बाप रे टोके
बाप रे टोके![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
टोचके तो चकवा असावा. पण तो
टोचके तो चकवा असावा.
पण तो गडी इतक्या रात्री गावात बिड्याफुंकत का फिरत असावा?
तो बिडी फुकायला रात्री नेहमी
तो बिडी फुकायला रात्री नेहमी बाहेर जायचा चातक्या, अन हे आजोबांना माहीत होते कारण तो गडी आमच्याकडेच रहायला होता अन घराच्या ओसरीतच झोपायचा.
म्ह्हं...या घटने नंतर तो
म्ह्हं...या घटने नंतर तो पुन्हा रात्रीचा बाहेर पडला नसावा बहुतेक...
तसं गावकर्यांना या चकव्या सारख्या गोष्टी सवयीच्याच असतात....त्यांना काही फरक पडत नाही.
रच्याक, माझ्याकडे असे पुष्कळ 'किस्से' आहेत, संशोधना दरम्यान मिळालेले. 'गिर्या' आणि चेटकीणीचे स्पेशअल. गावात 'समन'(जागेवाला)चे किस्से सुध्द्दा सुपरहीट आहेत.
सध्या शहरातील 'भुतांवर' माझे संशोधन सुरु आहे.
माझे वडील बीएमसी मध्ये काम
माझे वडील बीएमसी मध्ये काम करतात. एकदा रात्री उशीरा घरी परत येताना वडपा खिंडीत त्यांना पुढील अनुभव आला.:
मुंबई नाशिक हाय वे वर वडपा खिंड म्हणून एक जागा याबाबतीत कुप्रसिद्ध आहे. बाबा बाइकने घरी येताना त्यांना एका बाईने हाताने गाडी थांबवायचा इशारा केला. बाबांना त्या जागेची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी बाईक न थांबवता उलट स्पीड आणखीनच वाढवला. थोड्याच वेळात ते आमच्या गावच्या वेशीजवळ पोचले. तिथे स्मशानभुमी आहे. तेव्हा वळण घेताना बाबांना खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. म्हणून बाबांनी गाडी स्लो करून मागे वळून पाहिले, तर तीच बाई बाइकवरून खाली उतरत होती अन विक्षिप्त हसत होती.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बाबा तिथे जराही न थांबता निघून गेले.
चातक्या संग्रहित आहेत का ते
चातक्या संग्रहित आहेत का ते किस्से??
मला सवडीने वाचायला आवडतील. मेल करशील??
<<तर तीच बाई बाइकवरून खाली
<<तर तीच बाई बाइकवरून खाली उतरत होती अन विक्षिप्त हसत होती<<<![13%5B1%5D.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4652/13%255B1%255D.gif)
टोके.. भयानक आहे हा तुझ्या बाबांचा किस्सा!
टोके बाप रे, भागो
टोके बाप रे,![paloonjanarismily.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u2405/paloonjanarismily.gif)
भागो
दक्षु, आर्या असे बरेच किस्से
दक्षु, आर्या असे बरेच किस्से आहेत माझ्याकडे.
टोकु, बापरे.. दक्षिणा, तुझी
टोकु, बापरे..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दक्षिणा, तुझी स्माईली पण भयानकच आहे
Pages