अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सवडीने वाचायला आवडतील. मेल करशील?? >> अगं टोचके ते फक्त 'किस्सेच' आहेत.....गावात तसेच शहरात राहणार्‍यांकडून एकलेले.... (डोचक्यात संग्रहीत)पण मी या गोष्टीचा अनुभव प्रत्यक्ष घेतला नाहीय. तो घेण्यासाठी जेव्हा (२-३ वेळा) गावात वास्तव्यास होतो (सोबत माझा घोस्ट राईडर Proud चुलत काका) तेव्हा असं काहीच अनुभवलं नाही न एकलं. अगदी रात्री जगलातुन फेरफटका मारला. 'काळी चौदसची' एक रात्र तर आम्ही जंगलात जागुन काढली. ना चेटकीण, ना डाकीण, ना गिर्‍या, ना समन,एक सुधा भूत नाही की भुताचा 'भास' नाही. एक वेळ तर गावकरी आम्हालाच 'भुताचाबाबा' समजु लागली होती.

पण माझ्यासाठी एक खास अनुभव आलाच. जंगलात रात्री एक वेगळीच दुनिया सुरु होते. ति तुम्हाला हार्टअटॅक येई पर्यंत घाबरवुही शकते आणि 'निखळ' आनंदही देउ शकते. पहायला 'भक्कास' वाटली तरी तशी नसुन त्यातही 'निसर्ग सौंदर्य' आढळते. तिथे रात्र 'शांत' नसते. 'संगीतमय असते'. तिथुन दिसणारे आभाळ 'अतरळांत' आल्याची जाणीव देते. या रात्रिच्या वर्णानाचा एक वेगळा 'उतरा' होईल.....आणि हो जंगलातील प्रत्येक रात्र ही 'वेगळी' असते. Happy

असा काहीसा 'उलट' अनुभव आला... Uhoh

मी माझ्या कुटुबासोबत नारायणपुर येथुन गाडीने परत पुण्याला येत होते..तिथला प्रासाद गेउन आम्हि एका चिचेच्या झाडाखालि (जे नन्तर लक्शात आल)थाबलो होतो....मी आणि भाउ तिथे खेळ्त होतो.....तेथुन निघालो आनि अदाजे २०-२५ फुटावरुन गाडी स्व:ताभोवति २-३ वेळा गोल फिरुन ,समोरुन येनारया एका दुचाकिला धडक देउन एका शेतात थाबलि... बाबा निश्ण्न्त चालक आहेत....का झाल असाव ह्याचा विचार अजुन येतो?कोनि म्हनत रिमझिम पावसामुळे गाडी फिरली... कोनि म्हनत चिचेच्या झाडाखालि थाबल्यामुळे भुताट्की झालि....धडक दिलेल्या माणसाला पैसे द्यावे लागले ते वेगळेच....गाडीत बसेलेलो आम्हि सगळेच घाबरलो होतो....आजी शेवटपर्यन्त शान्त राहिलि होति...घाट सपल्यानतर तिचा मनाचा ताण थोडा कमी झाला .त्यानतर अजुनपर्यन्त आम्हि कधिच नारायणपुरला गेलो नाहि.....
आपल्या जाणिवेपलीकडे काहितरी घडत असत हे नक्की...

२०-२५ फुटावरुन गाडी स्व:ताभोवति २-३ वेळा गोल फिरुन ,समोरुन येनारया एका दुचाकिला धडक देउन एका शेतात थाबलि... >> रस्त्यांच्या दुतर्फा/कडेला असलेले डिवाईडर (चौकोनी दगड जे अर्धे जमीनीत असतात अर्धे वर्.....)अधे मधे काहींवर रस्त्याची माहीती लिहली असते किमी.,ठ्काण वैगेरे.... ते सहसा दिसतात. पण नाही दिसला तर गाडीच्या एकाबाजुला (डाव्या/उजव्या) धडक लागुन गाडी गोल गिरकी घेउ शकते....अर्थात किती गिरक्या घेईल ते वेगावर अवलंबुन आहे.

@->चातक ---- अधे मधे काहींवर रस्त्याची माहीती लिहली असते किमी.,ठ्काण वैगेरे.... ते सहसा दिसतात. पण नाही दिसला तर गाडीच्या एकाबाजुला (डाव्या/उजव्या) धडक लागुन गाडी गोल गिरकी घेउ शकते.>>>>>>.असु शकत......ह्या घटनेला ७-८ वर्ष झालि असेन...त्यामुळे असे डिवाईडर होते कि नाहि हे सागता येनार नाहि..मला आटवत नाहि....
पण २०-२५ फुटावरुन सुरु केलेल्या गाडीचा वेग नक्कीच कमि असणार ना....

अमानवीय म्हणजे केवळ भुत्याखेत्यांशी संबंधित असे नव्हे. दैवी अनुभव पण इथे सांगायला हरकत नसावी असं गृहीत धरून एक किस्सा सांगतो.

गुजरातेतल्या गणदेवी गावात जानकीआई सुळे नावाच्या एक संत रहात असत. सोबत त्याचं आख्खं कुटुंब होतं. त्या, त्यांचे पती, मुलगा, नातवंडे, इत्यादि. दैवी शक्तीमुळे त्या पंचक्रोशीत आणि दूरवर प्रसिद्ध होत्या. त्यांना भक्त लोक देवी मानत असंत.

त्यांच्या घरी मोठे देवघर होते. बाजूच्या देवळात एक पुजारी राहत असे आणि दर अष्टमीला जानकीआईंच्या घरी अष्टमीची पूजा करीत असे. एकदा तो महिनाभर गावाबाहेर गेला होता. परतल्यावर अष्टमीची पूजा नित्यनेमानुसार सुरु झाली. एके दिवशी त्याने जानकीआईंच्या मुलीला विचारले की आज आई का दिसत नाहीत म्हणून. तिचं नाव कुसुम आणि ती तेव्हा माहेरी आलेली होती. कुसुम आश्चर्याने म्हणाली "असं काय विचारताय, अहो, आज आईला जाऊन तीन वर्षे होऊन गेलीत."

हे ऐकून पुजारी जाम चरकला. तो म्हणाला, "दर पूजेच्या दिवशी जानकीआई जवळ येऊन बसायच्या. माझ्या हाताने त्यांना प्रसादही दिलाय".

सगळ्यांचं मत पडलं की तो पुजारी अतिशय भाग्यवान आहे. मात्र त्याने जानकीआईंच्या अनुपस्थितीमुळे परत अष्टमीची पूजा केली नाही.

आ.न.,
-गा.पै.

पण तो पुजारी ३ वर्षांत कधीच त्या शेजारी बसलेल्या जानकीबाईंशी बोलला नाही? तो महिनाभर गावी गेला असताना त्या गेल्या असं गृहित धरलं तरी तो त्यांच्या शेजारीच रहात होता तर एव्हढी प्रसिध्द व्यक्ती गेल्याचं परत आल्यावर त्याला कळलं नाही?

हम्म बाजूच्याच देवळात राहायचा आणि जानकीबाई गेल्याचं कळलं किंवा कोणी कळवलं कसं नाही याच आश्चर्य वाटतंय.

Proud

स्वप्ना_राज, अंजली_१२,

तो पुजारी आपण बरे की आपले काम बरे असा असावा. त्याकाळी (सुमारे इ.स. १९४०) कोणी ब्राह्मणांशी विनाकारण बोलत नसत. जानकीआई जरी प्रसिद्ध व्यक्ती असल्या तरी आजच्यासारख्या वलयांकित (सेलेब्रिटी) नव्हत्या. त्यांच्या देहावसानाची मोठी बातमी करण्याची काही गरज नव्हती. तो जेव्हा परत गावी आला तेव्हा गावाचे सर्व व्यवहार पूर्वीसारखेच चालू होते. जानकीआईंचा फोटोबिटो लावलेला बघितला असेल त्याने कदाचित. पण भक्तमंडळींनी त्यांचे अनेक फोटो काढून नेले होते. त्यातलाच एखादा दृष्टीस पडला असेलशी समजूत झाली असावी.

दुसरी गोष्ट म्हणजे जानकीआई रामनवमीस परलोकवासी झाल्या. त्यामुळे त्यांच्या गमनाचा खास उत्सव वगैरे होत नाही. रामनवमीचा असतो तेव्हढाच उत्सव साजरा केला जातो.

पुजारी जानकीआईंशी वार्तालाप करीत असेलही, पण घरातल्या इतरांना कळले पाहिजे ना.

असो.

जमेल तेव्हढं स्पष्टीकरण केलं आहे. शंका जरूर विचाराव्यात. मात्र त्यामागील हेतू शंकांचं निराकरण करण्याचा असावा.

आ.न.,
-गा.पै.

Happy

साल 1998. मी आणि माझा मित्र रणजीत रोहा तालुक्यात मित्राकडे गेलो होतो. तिथे दोन दिवस राहिल्यानंतर मी श्रीवर्धनला कामानिमित्त बाईकवरुन जात असताना एके ठिकाणी कच्चा रस्त्ता लागला. रात्री 11 वाजले असावेत तिथून जात असताना भिती नाही पण अतिशय भकास आणि भेसूर वाटत होते. सतत एक अस्वस्थता जाणवत होती. पुढे श्रीवर्धनला पोचल्यावर चौधरी नावाच्या एका गृहस्थांना हा अनुभव सांगितला त्यांनी अश्या रोडवर रात्रीचा प्रवास करु नका असा सल्ला दिला व अश्या एकांतात रात्रीचा प्रवास करताना एकवीरा देवीचा जप करण्यास सांगितले. नंतर घरी आल्यावर काही सांगितले नाही पण पुढे दोन आठवड्यांनी आई मला म्हणाली कि तु प्रवासातुन घरी आल्यानंतर दोन दिवस मला तुझ्यावर विचित्र छाया असल्याचा भास होत होता. त्या रस्त्यावर नक्कीच काहीतरी भिषण भकास घडले असणार हे नक्की.

आमच्या हापीसातला किस्सा ,
सायंकाळी ६.३० ते ७ वाजता एक मुलगी (गुज्जु)अचानक व्हीवळु लागली, हात पाय आपटु लागली ,आम्हाला वाटल आकडी असेल, किंवा असच काही, लगेच डॉक्टरला बोलावल, त्यांनी तपासुन सांगितल हा शारीरीक आजार नाही. डॉक्टरच्या बोलण्याने सगळे अचंभीत. एका सिनीयर स्टाफने
(जयेशभाए गुज्जु) तीच्या घरी फोन लावला, तीचे वडील तड्क आले, तो पर्यंत व्हीवळने चालुच सगळ्यांचे टेंशन वाढ्लेले तीचे वडील गुज्जुत काहीतरी बोलले जयेशभाएने खिशातुन शिर्डीची विभुती काढ्ली तीला विभुती लावनार ईतक्यात तिने त्यांच्या हाताला जो जोरदार हिसडा दिला जयेशभाए तीन ताड उडाले. आता तीचे व्हीवळने एवढ्या जोरात चालु झाले की आजुबाजुच्या कार्यालयातली मंडळी जमा.
अच्यानक ती शांत झाली, पाणी वैगरे पिऊन एकदम नॉरमल.
तीला बॉसच्या गाडीतुन घरी पोहचवण्यात आलं ( मेरा नंबर कब आयेगा Uhoh )
जयेशभाए बोलले तीच्या वडीलांनी सांगितल तिला भुतबाधा झालीय उपाय चालु आहेत पण हे एवढ होईल याची त्यांना अपेक्षा नव्हती.
चार दिवसांनी ती पुन्हा कामावर हजर आता सर्व नॉर्मल आहे फक्त गळ्यात एक ताईत वाढला आहे.
झालेल काही तीला आठ्वत नाहीय.
आता एवढ सगळ समोर होउन अविश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडलाय.

काही जागा अतिशय खराब असतात.माझे आजोबा आत्याच्या नवीन घरी गेले होते. नाणिज जवळच्या तिच्या गावी. जेवण झाल्यावर आत्या, आत्याचे मिस्टर व आजोबा पाय मोकळे करायला जवळच्या एका निर्जन ठिकाणी गेले .तिथे आजोबांच्या अंगावर अचानक काटा आला व अस्वस्थ वाटुन घाम फुटला, आजोबांनी आत्याला सांगीतले कि इथे पुन्हा कधी ही एकटी येऊ नकोस ही अत्यंत खराब बाधीत जागा आहे.

>>काही जागा अतिशय खराब असतात

हे खरं असेलही कदाचित. मी परदेशात असताना एकदा आईवडिल रहायला आले होते. मी आणि आई रात्री जेवण झाल्यावर घराजवळच्या एका छोट्या पार्कला बाहेरून फेर्‍या मारायला जात असू. तिथे पोलिसांची गाडी सतत गस्त घालत असल्याने तशी भीती नव्हती. पार्क एव्हढं छोटं की १० मिनिटात एक फेरी मारून व्हायची. पार्कातच एके ठिकाणी ३-४ मोठाले वृक्ष गर्दी करून उभे होते. दिवसाउजेडी काही वाटायचं नाही पण रात्री मात्र जवळच्या दिव्याच्या प्रकाशात त्यांची दाट झाडी भेसूर वाटायची. का कोणास ठाऊक पण त्यांची खूप भीती वाटायची. आम्ही फेर्‍या मारताना तिथून जायचो तेव्हा मी आईला खूप घाई करायचे आणि भरभर चालायला लावायचे. तरी मला अजूनही वाटतं की तिथे काही अमानवी नसणार. अंधाराची एक आदिम भीती माणसाच्या मनात आहे तीच माझ्या अस्वस्थतेचं कारण होती.

माझी आई तिच्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना आलेला आणखी एक अनुभव सांगते. अचानक ओढवलेल्या आपत्तीमुळे फॉरेस्ट खात्यात नोकरी धरायला लागायच्या आधी ते काही दिवस मेडिकल कॉलेजात शिकायला होते. तिथे एका खोलीत म्हणे ओल्या बाळंतीणीचा मृत्यू झाला होता. तिचा आत्मा तिथे होता त्यामुळे त्या खोलीत कोणी झोपत नसे. माझ्या आजोबांचा भुताखेतावर कधीच विश्वास नव्हता. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थांनी त्यांना त्या खोलीत झोपायचा आग्रह केला.

आजोबा झोपले. काही वेळाने त्यांना एक पाठीवर केस मोकळे सोडलेली बाई दिसली. ती त्यांना म्हणाली की 'तू जर मला बघून घाबरला असशील तर तुला ताप येईल, नाहीतर काही होणार नाही". आजोबांना जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. ते सत्य होतं का स्वप्न त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही. त्यांनी नेहमीच तो मनाला झालेला भास मानला. त्यांचा अमानवी शक्तींवर विश्वास नसल्याने त्यांना ताप वगैरे काही आला नाही. तिथे काही होतं का नाही ते देव जाणे.

>>सायंकाळी ६.३० ते ७ वाजता एक मुलगी (गुज्जु)अचानक व्हीवळु लागली, हात पाय आपटु लागली ,आम्हाला वाटल आकडी असेल, किंवा असच काही, लगेच डॉक्टरला बोलावल, त्यांनी तपासुन सांगितल हा शारीरीक आजार नाही. <<<

ईनमीन तीन, तो डॉक्टर "जागो मोहन प्यारे" (जामोप्या) तर नव्हताना.?

मुंबई गोवा हायवेवर पोलादपूरच्या पुढे एक फाटा पश्चिमेकडे जातो. तिथे ट्रेकिंगला जाताना एका स्पॉटवर माझ्या एका मित्राला रडण्याचे आवाज येत होते असे त्यानी सांगितलेले आठवत आहे .खरे खोटे त्यालाच माहित.

आमच्या इमारतीतही हल्ली रात्री-बेरात्री रडण्याचे आवाज येत असतात .... कारण आजूबाजूच्या घरांमध्ये दोन बाळं जन्माला आली आहेत. आणि ही पूर्णपणे मानवी करणी आहे. Proud

अंधाराची एक आदिम भिती माणसाच्या मनात आहे असेही काही नाही. काही ठिकाणी दिवसाउजेडी सुद्धा भयाण वाटते. विशेषतः दुपारी .असेच एकदा खेळताना मी आणि मित्र सायकलवर गावापासून लांब गेलो होतो दुपारी वातावरण ढगाळ झाल्यावर त्या एकांताचीपण भीती वाटायला लागली.तिथुन धुम ठोकली ते डायरेक्ट घरीच.

आमच्या इमारतीतही हल्ली रात्री-बेरात्री रडण्याचे आवाज येत असतात .....कारण आजूबाजूच्या घरांमध्ये दोन बाळं जन्माला आली आहेत. आणि ही पूर्णपणे मानवी करणी आहे.
>>>>>>>>>>>>>

मामी नक्की बाळांच्या रडण्याबद्दल बोलतेय की बाळांच्या जन्माबद्दल Light 1

की दोन्हीबद्दल Rofl Lol Proud

आमच्या परीचयचाचे एक गृहस्थ खूप दारु प्यायचे. व्यसन पार टोकाला गेले होते. एक दिवस दारु पिऊन गावाबाहेरच्या माळावर गेले तिथुन रात्री परतल्यावर असंबंध ,विचित्र बडबड करत होते. पुढे पुढे शांत एकटक बघत बसायला लागले. कुणीतरी सांगितले की त्यांना समंधबाधा झाली होती त्यातच त्यांचा अंत झाला.खरच मला आजही अंगावर काटा येतो असे काही ऐकले की.

Pages