आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वर्षा
वर्षा
२६ तारखेला ज्या व्यक्तीने
२६ तारखेला ज्या व्यक्तीने ०५.१६ मिनिटांनी चातकाला "स्पर्श" केला त्या व्यक्तीला ०१.२६ मिनिटांनी मोक्ष मिळाला बहुतेक......
२६ तारखेला ज्या व्यक्तीने
२६ तारखेला ज्या व्यक्तीने ०५.१६ मिनिटांनी चातकाला "स्पर्श" केला त्या व्यक्तीला ०१.२६ मिनिटांनी मोक्ष मिळाला बहुतेक...
भुंग्या - साष्टांग नमस्कार तुला
वर्षुताई ..... भुंगा
वर्षुताई .....
भुंगा ........
भुत्या तुला समजलेलं दिसतंय
भुत्या तुला समजलेलं दिसतंय प्रकरण.....
भुंग्या
भुंग्या
ताजा अनुभव.... कालची दिवाळी
ताजा अनुभव....
कालची दिवाळी नेरे, पनवेल येथे केली. नेरे गाव पनवेलपासुन पाच किमी आत जुन्या माथेरान रोडवर आहे. जाताना पनवेलची हद्द सोडली की मध्येच गाढेश्वरी नदी लागते, नदीला लागुनच एक गाव आहे. त्यानंतर जवळ जवळ १-२ किमीचा रस्ता ओसाडच आहे. रस्त्यावर लाईटस ही नाहीत. अजुन विकासकामे (?) चालुच आहेत.
भाऊबीजेच्या दिवशी खारघरला गेलो होतो बायकोच्या माहेरी. बायको तिथेच राहीली, मी एकटाच घर रात्री बंद ठेवायचे नाही म्हणून परत निघालो. तिथुन परत यायला ११.३० वाजले होते. येताना गाढेश्वरी ओलांडली, त्यानंतरचं गाव सोडलं.
रस्ता इथुन-तिथुन निर्मनुष्य होता. मी बाईकवर. मध्येच एक म्हातारा उभा असलेला दिसला, हात करत होता लिफ्टसाठी. काहीतरी विचित्र वाटले म्हणून मी गाडी थांबवली नाही. त्याला क्रॉस करुन तसेच पुढे गेलो. क्रॉस केल्यावर १० व्याच सेकंदाला सहज मागे वळून बघितलं. रस्ता आणि आजुबाजुचा परिसर पुर्णपणे निर्मनुष्य होता. आजुबाजुला कुठे वाहन नाही, घर नाही, लपायला जागा नाही. म्हातारा गेला कुठे?
जाम टरकलो होतो.
जाम टरकलो होतो.>>>>>>>>>>>
जाम टरकलो होतो.>>>>>>>>>>> ज्याम घाबरट आहेस तु .... तुझ्याजागी जर मी असतो तर घाबरलो नसतो.......बेशुद्ध पडलो असतो
विशल्या दहाव्या सेकंदाला तो
विशल्या दहाव्या सेकंदाला तो झाडामागे गेला असेल किंवा त्याला कुणीतरी भूतबाईक मिळाली असेल लिफ्ट म्हणून
विशाल - गाडीचा स्पीड काय
विशाल - गाडीचा स्पीड काय होता....दहा सेकंदात इतके अंतर पार केलेस की माणूस पार दिसेनासा झाला...?
वैभव..
वैभव..
हो रे विशाल, तिथे भरपूर जणानी
हो रे विशाल, तिथे भरपूर जणानी जिव दिले आहेत. आत्मा भटकत असतात तिथे.....
वैभव, भुंग्या
वैभव, भुंग्या
बाप रे
बाप रे
आशु अरे समोर माणूस दिसला
आशु अरे समोर माणूस दिसला म्हणून मी स्पीड बर्यापैकी कमी केला होता, तसेही नदीवर वळण आहे त्यामुले स्पीड कमी करावाच लागतो तिथे.
वैभ्या
तिथे भरपूर जणानी जिव दिले
तिथे भरपूर जणानी जिव दिले आहेत.>> आत्मा भटकत असतात तिथे.....>> आक्षेप...!!
माझ्या अलिकडल्या नविन संशोधना नुसार २००९ पर्यंत जगातला अदृश्य असा उपद्रवि-निरुपद्रवि "आत्मा" या नावाचा घटक नामषेश झाला आहे.
आणि...
२०१० नंतर चा काळ हा 'आत्मा' विरहित झाला आहे.
<<<माझ्या अलिकडल्या नविन
<<<माझ्या अलिकडल्या नविन संशोधना नुसार २००९ पर्यंत जगातला अदृश्य असा उपद्रवि-निरुपद्रवि "आत्मा" या नावाचा घटक नामषेश झाला आहे.>>>
आयला आधी तरी सांगायचे नाहीस का? त्या म्हातार्याला पकडून ठेवला असताना मी ! एक दुर्मिळ प्रजाती शोधली म्हणून नाव तरी झाले असते
विशाल अशावेळि देवाचे नाव
विशाल अशावेळि देवाचे नाव घेण्याएवजी चातका चे नाव घ्यायचे.... म्हणजे सर्व गायब
मित्रानो, एक खराखुरा अनुभव
मित्रानो, एक खराखुरा अनुभव माझाही.....
२००३ मध्ये मी तळोजा MIDC मध्ये एका कंपनीत कामाला होतो. तिथे पॉवर गेल्यानंतर जनरेटर अशी काही सिस्टीम नव्हती. एकदा माझी रात्रपाळी होती आणि तेव्हा संपूणॅ MIDC मध्ये लाईट गेली आणि ती येण्याची शक्यता नाहीये असे समजल्यामुळे आम्ही सर्वानी झोपुन जायचे असे ठरवले. आम्ही सहसा प्लान्ट मध्ये झोपायचो फ्यन लावून, पण लाईट नसल्यामुळे आम्ही प्लांन्ट च्या बाहेर लोडींग-अनलोडींग व्हायची तिथे झोपायचे ठरवले. मग मस्तपैकी पेपर टाकून एका ओळी मध्ये आम्ही सर्वजण झोपी गेलो. त्यावेळी मला स्वप्न पड्ले की कोणीतरी काळासा, केस नसलेला माणूस माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबतोय्...मी ओरडतोय पण माझा आवाज बहूतेक कोणालाच जात नव्हता... पण त्याचवेळी आमचे एक सिनियर (धांडे साहेब) ते माझ्या बाजूलाच झोपले होते त्यांनी मला हलवून जागे केले आणी त्यावेळी मी शुध्हिवर आलो.....
मग ज्यावेळी त्यांना या स्वप्ना बद्द्ल सांगीतले तेव्हा ते सुद्धा म्हणाले "खरे आहे, असा माणूस कंपनीत आहे आणि तो सर्वाना त्रास देतो...तु़झे नशिब चांगले आहे म्हणुन त्याने तुला जास्त त्रास दिला नाही" बस इतकेच सांगुन ते झोपी गेले पण मी ती रात्र झोपलोच नाही.... दोन दिवसांनंतर समजले की खुप वर्शापूवी त्या जागी एका कामगाराचा म्रुत्यु झाला होता.
त्यानंतर पुन्हा कधी मी त्या जागी झोपलो नाही.... त्यानंतर ७-८ महिन्यात मी तो job सोडला पण दुसरी चांगली नोकरी मिळाली म्हणून...
मुंबईहून कोकणात जाताना
मुंबईहून कोकणात जाताना पेणच्या पुढे वडखळनाका लागतो. वडखळ नाक्याची ही गोष्ट मी ऐकलेली आहे. सारस्वत बँकेतील काही अधिकारी एकदा गाडीने चालले होते. रस्त्यात त्यांना एक बाई गाडी थांबवा (लिफ्ट मागणे) असे सांगू लागली पण ड्रायव्हरला माहित होते त्याने लक्ष दिले नाही.
तेव्हा एकजण त्या ड्रायव्हरशी हुज्जत घालू लागला की 'अरे इतक्या रात्री, निदान विचारायचं तरी तिला काय हवं ते? तिला मदत हवी असेल.'
ड्रायव्हर म्हणाला, "साहेब हे प्रकरण तुम्हाला वाटतं तसं नाहीये. तिला नाही, आपल्यालाच मदतीची गरज आहे. बाहेर बघा."
खिडकीबाहेर बाई गाडीच्या वेगात बाजूने चालत होती.:डोमा:
ड्रायव्हर म्हणाला, "साहेब हे
ड्रायव्हर म्हणाला, "साहेब हे प्रकरण तुम्हाला वाटतं तसं नाहीये. तिला नाही, आपल्यालाच मदतीची गरज आहे. बाहेर बघा."
खिडकीबाहेर बाई गाडीच्या वेगात बाजूने चालत होती.
>>>>>>>>> असले किस्से सांगु नका हो, च्यायला जाम XXXXXXXXXXX
वडखळच्या भुताप्रमाणेच
वडखळच्या भुताप्रमाणेच संगमेश्वरजवळ धामणीच्या घाटातली कथासुद्धा लै फ्येमस हां! रत्नांग्रीच्या दिवट्या परबाची तिथंल्या हडळीन घेतलेली विकेट लै गाजली होती.. अगदी रत्नांग्री टैम्सात बातमी होती! दिवट्या भुताखेतांवर विश्वास न ठेवणारा एक साधासरळ रिक्षाचालक. नुस्ता विश्वास नाही असं नव्हे तर तो भुताखेतांच्या नावानं बोंबा मारी! आपल्या बहिणीकडे सावर्ड्याला गेला होता.
तिथून तो परतत असताना धामणीच्या घाटात एका बाईनं त्याच्या रिक्षाला हात दाखवला. अपरात्रीची वेळ, तशात घाटात ती बाई एकटी.. काही आक्रीत नको घडायला म्हणून मदत करण्याच्या हेतून त्यानं त्या बाईला रिक्षात बसवलं. "एवढ्या अपरात्री तुम्ही या निर्मनुष्य ठिकाणी एकट्या कशा?" अशी चौकशी त्यानं केल्यावर "भूक लागली, घराकडे खायला काही नाही, जवळपास काही सोय नाही, पुढे घाट उतरल्या उतरल्या उजवीकडे एक ढाबावजा हॉटेल आहे तिथं काहीतरी खावं म्हणून बाहेर पडले" हे तिनं दिलेलं विक्षिप्त उत्तर त्याला पटलं नाही. त्याला शंका आलीच की काहीतरी गडबड नक्की दिसते म्हणून त्यानं आणखी चौकशी करण्यास सुरूवात केली. तेंव्हा त्याला कळलं की त्या बाईचा नवरा या जगात नसून आणि एकुलता एक मुलगा होता त्याला वेडाचे झटके येत असल्याने ती त्याला घरातच डांबून ठेवते. हे उत्तर ऐकून दिवट्या आणखीच भंजाळला. त्यानं विचारलं "बाई तुमचा नवरा गेला आहे तर तुम्ही हे कुंकू, मंगळसूत्र वगैरे का घातलंय?" तर त्यावर त्याला उत्तर मिळालं. "अरे मी फार नशिबवान रे बाबा, गंगा भागीरथी होण्यापूर्वीच मृत्यू लाभला मला! मघाशी तुझ्या रिक्षेत बसले ना त्या तिथंच घाटमाथ्यावर त्या रिक्षावाल्यानं माझ्यावर बलात्कार करून माझा गळा चिरला होता!" हे ऐकून दिवट्या ताडकन उडालाच. भुताखेतांवर विश्वास नसला असं म्हणत असला तरी लहानपणापासून त्यानं ऐकलेल्या सार्याच्या सार्या भुतांच्या गोष्टींची त्याला एकदम आठवण आली.. मागं वळून पाहण्याचं धाडस होत नव्हतं.. गाडी थांबवायला म्हणून ब्रेकवर पाय देतो तर ब्रेक लागेल तर शप्पथ.. मागून जोरदार हसण्याचा आवाज आला आणि "ब्रेक लागणार नाही!" असे शब्द ऐकू आले! दिवट्याला घाम फुटला.. मागं वळून बघतो तर काय! मघाशी व्यवस्थित दिसणार्या त्या बाईचे केस वार्यावर उडत होते, कुंकू लल्लाटभर पसरलं होतं, तोंडातून रक्त येत होतं आणि गळ्यावर एक मोठीच्या मोठी चीर होती.. आणि ती जोरजोरात हसत होती..
तळेकांटे गावच्या लोकांना सकाळी घाटपायथ्याशी वडावर आपटलेली एक रिक्षा दिसली नि त्यात दोन प्रेतं सापडली. पुरूषाच्या पाकिटात मिळालेल्या लायसन्सवरून त्याचा पत्ता लागला पण त्याच्यासोबत ती विवाहित बाई कोण होती ते आजपर्यंत कुणालाच कळलेलं नाही..! "दिवट्याचं सावर्ड्याला काहीतरी लफडं होतं, उगाच नाही बहिणीच्या घरी सारखा फेर्या मारायचा" अशी वावडी उठली..
अलिकडे धामणीच्या घाटात एक सावळासा उंचपुरा तरूण रात्री बेरात्री एकटाच हिंडत असतो म्हणे..
दिवट्याने ही गोष्ट दुसर्या
दिवट्याने ही गोष्ट दुसर्या रिक्शात मागे बसुन सांगितलेली दिसते!
निलिमा
निलिमा
दिवट्याने ही गोष्ट दुसर्या
दिवट्याने ही गोष्ट दुसर्या रिक्शात मागे बसुन सांगितलेली दिसते! >>
तरीच माबोवर रिक्षा फिरवत
तरीच माबोवर रिक्षा फिरवत असतात लोक्स..
निलिमा नायतर मघाशी
निलिमा
नायतर
मघाशी व्यवस्थित दिसणार्या त्या बाईचे केस वार्यावर उडत होते, कुंकू लल्लाटभर पसरलं होतं, तोंडातून रक्त येत होतं आणि गळ्यावर एक मोठीच्या मोठी चीर होती.. आणि ती जोरजोरात हसत होती..
इतक्या डिटेल्स कळणार कश्या नुसत्या बॉडी बघून...आणि ती जर बाई आधीच मेलेली होती तर पुन्हा तिचे शरीर कसे काय सापडले बुवा
माबोवर रिक्शा फिरवणे म्हणजे
माबोवर रिक्शा फिरवणे म्हणजे काय?
अंजली_१२ | 2 November, 2011 -
अंजली_१२ | 2 November, 2011 - 12:07 नवीन
माबोवर रिक्शा फिरवणे म्हणजे काय?
>>
आत्तच आपण फिरवली आणि मी पण!
असे नविन वाकप्रचार निर्माण होउन भाषा सम्रुद्ध होते.
परिक्षेत असे नविन वाक्प्रचार पण शिकवले पाहिजेत.
निलिमा..
निलिमा..
Pages