हितगुज दिवाळी अंक २०११ - अभिप्राय

Submitted by संपादक on 25 October, 2011 - 20:16

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०११ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
***********************************************
हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).
***********************************************
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

मस्तच दिसतोय अंक..... आता एकेक वाचतेय आणि मग सविस्तर अभिप्राय देते.

सर्व संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.

अंका करिता मेहनत घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन. वाचायला भरपूर आहे.
"त्याच्याविना..." वाचून प्रतिसाद दिलेल्यांचे आभार. संपादकांचेही आभार त्यानिमित्ताने मला बरच काही शिकायला मिळालं, चांगले स्नेही मिळाले. Happy

------------
इस रिश्ते को..., मानसकन्या, ब्रिफकेस बद्दल मंजूडी +१
रैनाची "आकाशपाळण्याची गोष्ट" ... आवडली, अकृत्रिम सहज वाटली मुलाखत
कथाकथील्या कथा एक दोन अपवाद वगळता आवडल्या
मिताली जगतापची मुलाखत चांगली झालेय पण टिपीकल झालेय. वेगळे प्रश्न वाचायला अजून आवडलं असतं. पण तसही आपल्यावर त्या व्यक्तीचं झालेलं गारुड बाजूला सारुन त्याकडे बघणं तसं सोपं नाही हे मला स्वतःला लिहिताना जाणवलं आहेच. आणि ओळख फारशी नसताना मनातले ऑफबीट ठरु शकतील असे प्रश्न विचारायला जीभ रेटावी लागते/अडखळते ह्याचाही अनुभव घेतलाय त्यामुळे असेल कदाचित काहींना सोप्प वाटणारं/ सहज जमणार असेलही हे, पण मला स्वतःला थोडं कठीण वाटलं. अनुभव नसल्यानेही असेल बहुदा. तसच काहीसं ह्या मितालीच्या मुलाखतीत झालं असावं असं वाटलं.

बाकी वाचेन तसं लिहीनच

थांग-अथांग निव्वळ अप्रतिम! एकापेक्षा एक! नीरजाचा 'लर्न टू लिसन' हा मंत्र जपायला सुरुवात केलीय. Happy जयूच्या राजाबाई पण आवडल्या. विरंगुळा काव्यमय! इस रिश्ते.............. भारंभार आवडला. एकूण हा भागच अतिशय दर्जेदार झाला आहे.

बाकीचे भाग वाचून अभिप्राय देतेच.

अंतर्नाद विभाग अतिशय आवडला.

सण वाढा सण
गांबारोऽ निप्पोन!
एलेमेंटरी, माय डिअर..
मनातील अष्टलक्ष्मी
हे विशेषच आवडले.

थांग अथांग मधील
एक नाते, हिरवे गर्द
ब्रीफकेस
ऐका ऐका हो शंकरा, बोलाचा अर्थ करा ||
नात्यातला सुसंवाद व विसंवाद
नाती, खगोलशास्त्रीय
खूप खूप आवडले.
मानसकन्या पण भावली,
इसे रिश्ते का कोई नाम न दो नाही आवडली. खूप क्लीशे वाटली.

जगजीत वरील सूनी हर महफ़िल बद्दल काय बोलणार. हा लेख लिहायची वेळच नसती आली तर... वाटून गेलं.

बाकीचं पुरवून पूरवून वाचत आहे.

'टाके' वाचल्याबद्दल आणि त्यावरच्या प्रतिक्रीयांबद्दल मनापासून धन्यवाद.
गेली पाच वर्ष हा विषय मनात घोळत होता. या दिवाळी अंकाचा मुहुर्त होता बहुतेक व्यक्त होण्यासाठी !!

अंकासाठी काम करणा-या सर्वांचे आभार आणि अभिनंदन Happy

सुंदर अंक... संपादकांचे अभिनंदन! Happy

आकाशपाळण्याची गोष्ट, गांबारो.., थांग, सल, तू समोरी, एक अर्धमुर्ध नातं या कविता, त्याच्याविना..ची मुलाखत, हिरवे गर्द नाते खूप आवडले...
बाकी सवडीने वाचतो आहे..

सण वाढा सण
गांबारोऽ निप्पोन!
मनातील अष्टलक्ष्मी हे विशेषच आवडले.

नचिकेत, क्रांति, ह्यांच्या कविता आवडल्या. बाकीच्या अजून वाचून व्हायच्या आहेत.

रारची टाके अप्रतिम

नीचा लेख उत्तम. मंत्र शिकायला हवाय हे नक्की

अनिशाने घेतलेली मुलाखत अतिषय भावली

बाकी वाचेन तसे लिहीन

संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन!
पूर्ण वाचला नाहीये पण आतापर्यंत वाचलेल्यमधे सण वाढा सण, गांबारोऽ निप्पोन, आकाशपाळण्याची गोष्ट आवडलं.

अंक छान झालाय. मला आवडला. अजून वाचतेच आहे.

कविता, पुढच्या वेळेला "मुलाखतीसाठी टिप्स" हव्या असतील तर माझ्याकडून घेऊन जा. Happy

दिवाळी अंक ''नवीन लेखन'' च्या डोक्यावर लिंक सहज दिसेल व क्लिकता येईल अशा तर्‍हेने ठेवता येईल का? नाहीतर मुख्यपृष्ठावर जावे लागते / मागे गेलेला अभिप्रायाचा बाफ शोधून काढून त्यावरून लिंक पहावी लागते.
मुख्यपृष्ठावर देखील दि. अं ची लिंक खालच्या बाजूस सरली आहे. अजून १-२ आठवडे तरी कृपया ती लिंक वरच ठेवावी ही विनंती.

गिरीराज, 'सूनी हर...' सुंदर झाला आहे.

नचिकेत, क्रांति, जयंता, हेमांगी यांच्या कविता आवडल्या.

अकु+१ . सध्या बाजूला अंक विक्रीची जाहिरात आहे त्याच्या वर-खाली कुठेतरी इमेज-लिन्क दिली तरी चालेल.
मुख्य पानावरही अजून काही दिवस अंक वरच ठेवावा.

अंक वर आला की. योग्य ठिकाणी, योग्यवेळी, योग्य शब्दात भावना व्यक्त करुन योग्य अ‍ॅक्शन घेण्याची विनंती केल्याबद्द्ल अरुंधती चे आभार Happy

अंतर्नाद हे सदरही सुरेख!

सण वाढा सण केवळ सुन्न करणारा अनुभव अतिशय संयत शब्दांत मांडला आहे.

गांबारो निप्पोन पुढे नतमस्तक!!!!!!!

हिमशिखरांनी वेड लावलं.

अष्टलक्ष्मीची ओळख खूप छान.

कोत्तापल्ले सरांचा लेख आवडला.

बाकी वाचन सुरूच आहे.

संपादक मंडळानं खूप मस्त फराळ दिला आहे अगदी ताट भरून. आता पोट भरेपर्यंत वाचतच रहायचं. Happy

नवीन लेखनावर दिवाळी अंकाची लिंक दिल्याबद्दल आभार. मी मुखपृष्ठावर रोज जात नाही त्यामुळे अभिप्रायांच्या पानावर येऊन दिवाळी अंक वाचणं गैरसोयीचं होत होतं.

२ दिवसांपूर्वी, २-३ पानांपूर्वी हीच विनंती केली होती त्याकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष.
अकु, बाई तू भाग्यवान तुझ्या विनंतीकडे अ‍ॅडमिनचे लक्ष गेले. Happy

रारची टाके जबरदस्त. पूनमची 'इसे रिश्ते..दो' आणि सुवर्णमयींची व्हिलचेअरही आवडली. नीधपचा नात्यांवरचा लेखही आवडला.जिवर्नीची बाग, आणि कोत्तापल्ले ह्यांचे लेख मला त्या विषयांत गती नसल्याने कंटाळवाणे वाटले.

ज्यांनी व्हीलचेअर ही कथा वाचली त्या सर्वांचे आभार. या कथेचा उल्लेख प्रतिसादात ज्यांनी केला त्या सर्व वाचकांमुळे माझा उत्साह दुणावला आहे. संपादक मंडळाने या कथेची निवड केली त्याबद्दल त्यांचेही आभार. लेखन तुमच्या पसंतीस उतरले, त्यामुळे ही संधी मिळाली याची मला जाणीव आहे. धन्यवाद.
सोनाली

'एक नाते हिरवे गर्द' वाचून कळवल्याबद्दल अनेक आभार Happy

अंक खूप वैविध्यपूर्ण आहे, पुरवून पुरवून वाचायला मजा येत्ये!
आणि सगळ्यांचे अभिप्राय वाचतानाही. त्या त्या लेखाखाली प्रतिक्रिया देण्याची सोय आवडली असती पण अत्ताच्या पद्धतीमुळे आपल्याला सगळ्याच लेखांवरच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतात आणि पर्यायाने आपण चुकून ओलांडून पुढे गेलेले लेखही वाचायला मिळतात ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटलं.

कथाकथी विभाग वाचून झाला. सर्वच कथा कमीजास्त आवडल्या. पण चिलॅक्स मॉम आणि व्हीलचेअरवरचा माणूस सर्वात जास्त आवडल्या.
सावलीची कथा आणि डॉ. विसरभोळे- ह्या बालकथा मध्येच आल्या Happy त्या शेवटी किंवा सुरूवातीलाच घेतल्या असत्या तर एकदम कन्फ्यूजन नसतं झालं Proud
चक्रमध्ये थोडं गोंधळायला झालं. कथा सुरू होते तो डायलॉग आणि त्यांचं भिकारी असणं त्याचा संपूर्ण कथेशी काय संबंध होता ते समजले नाही.

देखणा अंक दिलाय संपादक मंडळ.. Happy सर्वांचं खूप खूप अभिनंदन...

कथा-
चक्र- अरुंधती कुलकर्णी
सर्वस्व - मंजिरी सोमण
वळचणीचे पक्षी - मानुषी
उत्तम कथा...
वर्तुळ - स्वाती आंबोळे
व्हीलचेअर - सुवर्णमयी
आपल्या दोघींना __/\__
व्हीलचेअर तर अशक्य अशक्य कथा आहे. भारी स्टाईल.. एकदम प्रोफेशनल...
अनुवादीत कथा पण मस्त..

इस रिश्ते का नाम ना दो - पूनम छत्रे
मानसकन्या - दिनेशदा
टाके - आरती रानडे
अधून मधून - संघमित्रा
लहानशा गोष्टी - देवी
ऐका ऐका हो शंकरा, बोलाचा अर्थ करा - नीधप
नाती खगोलशास्त्रीय - aschig
खूप आवडलं..
संघमित्रा... __/\__

सण वाढा सण - - शाम. भावस्पर्शी..
गांबारोऽ निप्पोन! - मंजिरी - या व्रूत्तीतलं १ % जरी आपल्याकडे आलं तर किती बरं होईल असं वाटल्यावाचून राहिलं नाही.
एलेमेंटरी, माय डिअर.. - राजकाशाना.. खूप खूप आवडलं... अजून वाचायला आणखी आवडलं असतं.. Happy
जिवर्नीची बाग - जयंत गुणे - लई भारी..
वजन उतरो देवा! - सई केसकर - खुसखुशीत...
आकाशपाळण्याची गोष्ट! - रैना- खूप आवडलं.

संवाद, काव्यरंग, स्मृतिगंध विभाग सगळे आवडले..

एकूणच.. मस्त अंक.. यात सहभागी असलेल्या सर्वांचे आभार व अभिनंदन.. Happy

माझ्या प्रवासवर्णनाचा दिवाळी अंकात समावेश केल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार तसेच लेख वाचून आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल वाचकांचेही आभार.

सर्व वाचकांचे आभार.ज्यांनी "वळचणीचे पक्षी" ही माझी कथा वाचून आवर्जून प्रतिसाद दिले त्यांचे!
आणि संपादकांचेही!

सर्वप्रथम संपादक मंडळाचे अभिनंदन की त्यांनी इतका विविधरंगी दिवाळी अंक समोर ठेवला.

सर्वस्व कथा आवर्जून वाचून अभिप्राय दिलेल्या सर्वांचे आभार.... आणि मुसं आणि सं मंडळाचे विशेष आभार.. त्यांनी ही कथा दिवाळी अंकासाठी निवडली Happy

इतर कथांमधे, विशेष उल्लेखनीय 'वर्तुळ' कथा, आणि 'दृष्टी' ही वेगळेपणामुळे आवडली.
थांग-अथांग मधे 'टाके', 'थांग' (मी_मुक्ता ची शैली आवडते), आणि 'ऐका ऐका हो शंकरा, बोलाचा अर्थ करा' हा नीरजा चा लेख विचार करायला लावणारा ... लर्न टू लिसन हा मंत्र खरंच प्रत्येकाने आत्मसात केला तर....!

बाकीचं वाचन हळूहळू चालू आहे.

Pages