हितगुज दिवाळी अंक २०११ - अभिप्राय

Submitted by संपादक on 25 October, 2011 - 20:16

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०११ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
***********************************************
हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).
***********************************************
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

जपान बीबीकर्स जोरात आहेत हां अंकात! Happy

मंजिरी, 'निप्पोन...' लेखाबद्दल अनेक आभार. आडोचे 'साद देती' सुंदर झाले आहे, फोटो तर अप्रतिम. सावलीचे फोटो तर काय बोलणार! ओळीही चपखल आहेत. ऋयामची गोष्टही एकदम जमली आहे.

मंजिरी, गांबारो निप्पोन.. खास आहे अगदी. वीजबचतीविषयी वाचून त्यांच्याविषयी खूप आदर वाटला. इतरत्र चंगळवाद बोकाळला असताना, वीज ही रोजची गरज असूनही आपणहून तिची बचत करण्याच्या जाणिवेला सलाम. त्यांच्या भावना, वागणुकीतले बारकावे छान टिपले आहेस.

रार, "टाके" सुरेख.

शाम, सण वाचून खूप वाईट वाटलं. आणखी काही लिहायला शब्द अपुरे आहेत.

"निर्माण घडताना" आणि "त्याच्याविना..त्याच्यासाठी' दोन्ही मुलाखती आवडल्या.

कथाकथी विभाग संपूर्ण वाचून झाला. सगळ्याच कथा चांगल्या आहेत. त्यातही वर्तुळ आणि वळचणीचे पक्षी या कथा विशेष आवडल्या. वर्तुळ कथेवर सीमाने काढलेले चित्रही खूप आवडले. बालकथांबद्दल आधी कोणीतरी म्हटलंय तसंच वाटलं, ह्या दोनच कथा असल्या तरी वेगळ्या दिल्या असत्या तर छान वाटलं असतं.

काही लिखाण आणि कथांवर काढलेली चित्रं खूपच बाळबोध वाटली. चित्रांशिवाय ते कथा-लेख असते तरी चाललं असतं.

मुलाखत वाचल्याबद्दल आणि आवर्जून अभिप्राय नोंदवल्याबद्द्ल अनेक आभार. Happy
रैना, निर्माणच्या अर्जाची आणि मदतीसाठीच्या पेजची लिंक मुलाखतीत समाविष्ट करण्यात आलेली आहे.
( आधी नजरचुकीने संपादकांकडून राहून गेली असेल कदाचित. ती समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद संपादक आणि अ‍ॅडमिन.)

सर्व संपादक मंडळाचे आणि या अंकात आपली कला सादर करणार्‍या सगळ्या कलाकारांचे धन्यवाद.

सजावट साधीच पण सुंदर आहे. सगळ्या प्रमुख ब्राऊसर्सवर पान व्यवस्थीत दिसणे, पान लोड होण्याचा वेग, किचकटपणा टाळणे अशा चाळण्यातून गेल्यावर खूप काही वेगळे करता येत नाही. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे २ पक्षी आणि आकाशकंदिल हे मात्र बाळबोध वाटतय. पण सुटसुटीतपणामुळे टेंप्लेट आवडली.

कथाकथी विभाग वाचून झाला. कथा चांगल्या आहेत पण लक्षात रहाण्यासारख्या नाही वाटल्या. बालकथांसाठी वेगळा विभागच हवा.

कथाकथीने काहिशी निराशा केल्यावर थांग-अथांग विभागाबद्दल थोडी साशंकता होती मनात. पण पहिलीच कथा - इसे रिश्ते का कोई नाम न दो - अप्रतिम. बहुतेक वेळेला नाते काहीसे जुने झाल्यावर जाणवते. नात्यांचे आपल्या जीवनावर होणारे संस्कार, पुढे त्या संस्कारांच्या बनणार्‍या भिंती, पडणार्‍या चाकोर्‍या, नात्यातली तरलता, दडपशाही, आधार, संभ्रम हे सगळे सुंदर उतरलय कथेत. नायिकेचा दृष्टीकोन प्रचंड प्रामाणीक आहे. 'नाती' या विषयाला अत्यंत साजेशी कथा.

बाकी प्रतिसाद वाचून झाल्यावर.

आज दिवाळी संवादातली वाचायची राहिलेली मुलाखत आणि 'अंतर्नाद' वाचून संपले.

अनीशाने करून दिलेली 'निर्माण'ची ओळख एकदम मस्त!
रैनाची 'आकाशपाळण्याची गोष्ट!' आवडली. अतिशय अभिनव कल्पना आहे ही. रैनाचे सगळे डिस्क्लेमर आणि 'आवंढे' Wink पण भारी!

अंतर्नादमधे शाम, मंजिरी यांचे लेख अतिशय आवडले. आडोचा सचित्र लेखही खूप सुंदर झाला आहे.

सई केसकरांचे एकाच वर्तुळातले विविध त्रिज्यांमधे फिरणारे लेख वाचून आता कंटाळा आला to be honest. त्यांचे इतर विषयांवरील लिखाण वाचायला आवडेल.

हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).

धन्यवाद!

अंक खुपच मस्त आहे.
सावकाशीने वाचावा लागेल.
प्रमोद देवांचा जगदिश खेबुडकरांवरचा लेख खुपच आवडला.:)
तसेच मंदार जोशींचा शम्मीकपुरवरील लेख सुद्धा अप्रतिम... दिनेशदांची मानस कन्या पण मनाला खुपच
भावली.
बाप लेकीचे नाते पण खासच Happy Happy
बाकीचे अजुन बरेच वाचायचे आहे.

हा अंक सर्वांग सुंदर आहे! खरं सांगायचं तर हा लेख आवडला, हा नाही आवडला असे करताच येत नाही.
काही लेख वाचून झाले. काही वाचायचेत.
मंदार जोशीचा शम्मी कपूरवरील लेख फार आवडला.
कविता नवरे ने घेतलेली मुलाखत मनाला चटका लावून गेली.
अवलचे बांधवगडवरील व्हीडिओ शूटींग परत परत बघावे असेच.
दिनेशदांचे "मानसकन्या" अप्रतिम.
आडोंच्या "साद देती हिमशिखरे" हा लेख निवडक दहामधे .
बाकीचे लेख वाचणे चालू आहे.

Pages