हितगुज दिवाळी अंक २०११ - अभिप्राय

Submitted by संपादक on 25 October, 2011 - 20:16

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०११ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
***********************************************
हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).
***********************************************
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

मस्त दिसतोय अंक. संपादक मंडळ , आणि सर्व सहभागी मायबोलीकरांना खुप खुप धन्यवाद .
शाम ची कहाणी वाचुन मन सुन्न झालं. स्वातीचं वर्तुळ ही छान आहे. वाचीन हळुहळु.

अंकासाठी संपादकमंडळाचे अभिनंदन आणि आभार. छानच दिसतोय !

-अश्विनीमामींनी लिहीलेले 'ब्रीफकेस' वाचले. गलबलुन आले. सुरेख लिहीले आहे असे म्हणते कारण इतर काही म्हणण्याची कुवत नाही हे आपण जाणताच अश्विनीमामी.
-नीरजाचा 'ऐका' आवडला.
-वैभवजोशींचे विरंगुळा वाचले. त्यांच्याबद्द्ल खूप ऐकले होते, त्यामुळे अजून अपेक्षा होत्या.
त्यातले बोधचित्र अगदी समर्पक.
- स्वप्नाली- प्रकाशचित्र जबरी आहेत.
-देवी यांनी लिहीलेल्या लहानशा गोष्टी मस्त.
- नीलाताईंचे लेखन, त्यांचा दृष्टीकोन समजला, पोचला. पटला असे नाही. पण त्यातली तळमळ जाणवली. लिहीत रहा.
-आशिषचे चंद्रतार्‍यांचे नाते अतिशय आवडले. सहज आणि सोपे. (!!) Wink एकदम interesting.
-जयश्रीचे राजाबाई छान. अल्पना- रेखाटनं मस्तय.
- पूनमची कथा ओघवती, सहज वाटली.
-शाम यांचे 'सण वाढा सण' हृद्य. शाम, आपण हे लिहीलेत त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आपल्या वडलांनी ही मागण्याची प्रथाच बंद केली हे फार मोलाचे.
-मंजिरीचा 'गांबारे निप्पोन' ही हृद्य आणि अतिशय जवळचा.
-आऊडोअर्सचे 'साद देती हिमशिखरे' वर्णन आणि सर्वच फोटो लई भारी.

अंक छान झाला आहे कारण आतमधे खूप काही वाचायला दिसत आहे. नक्कीचं हे सर्व लेखन आनंद देणारं आहे. तुम्हा सर्व कलावंताचं सर्वार्थानं अभिनंदन!

सर्व प्रथम सर्वांगसुंदर अंकासाठी संपादक मंडळाचं आणि सर्वांचं अभिनंदन!
पण माझ्या "वळचणीचे पक्षी" या कथेत "श्रुती"(हेही इथे वेगळंच टाइप होतंय आणि तिथे वेगळ्याच पद्धतीने म्हणजे समृद्धीतला "मृ" कसा लिहितो तसं दिसतंय) हे नाव आणि शत्रू हा शब्द चुकीचे दिसताहेत. आणि आत्ताही हे शब्द बिनचूक टाईप होतच नाहीयेत. काही प्रॉब्लेम आहे का?

दिवाळी अंक देखणा आणि वाचनिय होण्यासाठी श्रम घेतलेल्यांचे आणि लेखकांचे अभिनंदन आणि कौतुक !!
खुप काही वाचायला /ऐकायला आहे.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !

वळचणीचे पक्षी, आकाशपाळणा आणि साद देती हे वाचले.
साद देती मधले फोटोही सुरेख आहेत. आकाशपाळणा वाचून थक्क झाले आहे...
कथाही आवडली.
पुढे वाचते.

बाप -लेकीचे नाते - कविता खूप आवडली.
नभा सावर, सावर - लेख सुरेख. त्या लेखातले फोटो मग घरुन पाहीन.
कथाकथी विभागातल्या सगळ्या कथा आवडल्या.

गांबारोऽ निप्पोन वाचून खरेच अंतर्मुख व्हायला झाले.
स्मृतिगंधमधील सुनी हर महफिल हा लेख अतिशय आवडला.

सण वाढा सण - तोंडात मारल्यासारखे! शाम, काय सुरेख लिहिले आहेत, गलबलून आले वाचताना. ह्या प्रथा लोक कसे जगले असतील..

छान दिसतोय अंक. संपादक मंडळाचे अभिनंदन. Happy

थांग अथांग पासून सुरूवात केली आहे. बागुलबुवा चे 'हा छंद जीवाला लावी पिसे' वाचला. छान लिहिले आहे, पण काही विशिष्ट अपेक्षा धरून वाचायला गेलो आणि किंचित निराशा झाली. माबोवरील त्याच्या इतर लिखाणावरून तो श्वानप्रेमी, प्राणिमित्र आहे हे माहीत होते. त्यामुळे त्याच्या आणि प्राण्यांच्या मधील नाते, काही किस्से वाचायला मिळतील असे वाटले होते. पण तसे न झाल्यामुळे थोडे वाईट वाटले. कधीतरी मायबोलीवर वाचायला मिळतील अशी आशा करतो रे बाबु. Happy

अस्चिगचा चंद्र-तार्‍याचा किस्सा आवडला. मनोरंजक आणि माहितीपूर्ण. पण अशा अजून दोन तीन गोष्ट त्याने लिहायला हव्या होत्या. तो लेख थोडक्यातच आटोपला असे वाटले.

अभिनंदन संपादक मंडळाचे आणि सर्व साहित्यीकांचे. अंक छान झाला आहे. सावकाश वाचुन काढावा लागेल.

अभिनंदन. अंक मस्त दिसतोय.

नाना - देवकाका सही लिहिले आहे, अजून वाढले असते तरी आनंदच. Happy

नागनाथ कोतापल्लेंचा लेख वाचला. आवडला. समयोचित (असे आजही म्हणावे लागेल हे आपल्या समाजाचे दुर्दैव.)

आला आला अंक आला!!
सुरेख दिसतोय अंक, वाचून सविस्तर प्रतिसाद नोंदवेनच.
अंकासाठी काम करणार्‍या सर्व संबंधितांचे अभिनंदन!!

अश्विनीमामींनी लिहिलेले ब्रीफकेस आवडले. लिखाण अगदी नैसर्गिक वाटले. कृत्रिमपणा जाणवला नाही कुठे. त्यामुळे मनाला भिडले.

नीधप, 'ऐका ऐका' चांगले लिहिले आहे. थोडक्यात पण व्यवस्थित मांडले आहे. छान.

आकाशपाळणा वाचले. चांगली आहे मुलाखतवजा बातचीत. अखिलेशचा कष्टाळू आणि धैर्यशील स्वभाव आवडला. सकारात्मक दृष्टीकोनाचा डोस देणारी पुस्तकं वाचलीच पाहिजेत असं काही नाही, आपल्याच आजूबाजूला चांगली उदाहरणं असतात असे वाटले.

उरलेलं उद्या.. Happy

अश्विनीमामींचा ब्रीफकेस वाचून झाला, छान लिहिलंय.
शाम यांचा 'सण वाढा सण' वाचून कसंतरीच झालं खरंतर.
मंजिरीचा 'गांबारो निप्पोन' च्या बाबतीतही तेच.
रैनाचा आकाशपाळण्याची गोष्ट वाचला, इंटरेस्टिंग आहे माहिती.
थांग अथांगमधला पौर्णिमाचा लेख, ऋयामचा 'अतीत', मानुषीचा 'वळचणीचे पक्षी', साजिर्‍याचा 'झाड', रारचा 'टाके', जयावी यांचा 'मनाच्या श्रीमंत-राजाबाई' प्रचंड आवडले.

दिनेशदाचां 'मानसकन्या' चांगलाय. सावलीचा लेखही मस्तच व फोटो नेहमीप्रमाणेच अफाट.

संवाद मधील मिताली जगतापची मुलाखत पटलीच नाही खरंतर.

अंक वरवर चाळलाय, मस्त दिसतोय... खूप मेहनत घेतली आहे ते दिसून येतंय. सर्वांचे आभार Happy

आता चिवडा-चकली खात खात, ह्या साहित्य फराळाचा आस्वाद घेतो. सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Happy

"गांबारोऽ निप्पोन! " फार सुंदर लेख.. खुप आवडला
देव काकांचा लेख देखिल सुंदर, श्यामलीचे कविता वाचन आणि कविता आवडली

Pages