Submitted by संपादक on 25 October, 2011 - 20:16
मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०११ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
***********************************************
हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).
***********************************************
-संपादक मंडळ
Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution
विषय:
Groups audience:
शेअर करा
मानुषी, श्रुती व्यवस्थित
मानुषी, श्रुती व्यवस्थित दिसतंय : श्+र्+उकार असंच. श्+ऋ असं नाही.
शत्रूही नीट दिसतोय
सुरेख अंक. पुरवून पुरवून
सुरेख अंक. पुरवून पुरवून वाचणार आहे.
वर्तुळ, ब्रीफकेस, तळ्यातली कमळे, मानसकन्या, चिलॅक्स मॉम, खगोलशास्त्रीय नाती आवडेश. अजून बरंच वाचायचं आहे.
देविका, चित्राबद्दल आभार. मस्त काढलंस.
मस्त आहे अंक 'मायबोली'सहीत
मस्त आहे अंक
'मायबोली'सहीत सर्व संपादकांचे आभार सर्व साहित्यिकांचे अभिनंदन 

हळुहळू एकेक वाचत आहेच
आनंदयात्री : मितालींची मुलाखत आवडली

'एक क्षण जगण्यामधला' ही कविता अत्यंत आवडली. खासकरून शेवटची २ कडवी
झाड : 'कोरभर चंद्रासाठी' सुरेख कविता
आवडली 
कथाकथी: मंजिरी सोमणः
कथाकथी:
मंजिरी सोमणः सर्वस्व- आवडली
मानुषी: वळचणीचे पक्षी -मधे थोडी लांबड लागल्यासारखी वाटली पण तरी बरी वाटली,
अनामिक- दृष्टी- ठिक ठिक,
स्मिताके: विसरभोळे- अजिबात आवडली नाही,
स्वप्नाली- तळ्यातील कमळे- आवडली. गोष्टीपेक्षाही उर्विकाचं रेखाटन जास्त भावलं.
रुणुझुणु: चिलॅक्स मॉम- आवडली
थांग अथांगः
दिनेशः मानसकन्या- आवडली. ह्याच संदर्भात जुन्या मायबोलीवर काही वाचल्याचंही आठवलं.
स्वप्नाली- नभा सावर सावर- आवडलं. प्रकाशचित्रंही मस्त.
जयावी: राजाबाई- मस्तच
नीला सहस्त्रबुद्धे: नात्यातला सुसंवाद, विसंवाद- आवडलं.
अंतर्नाद मध्ये आडोचा लेख, फोटो दोन्ही खूप आवडलं.
स्मृतिगंधः
मंदार जोशी यांचा शम्मी कपूरवरचा लेख चांगलाय. वर स्वाती म्हणाली तसं बाकी कलाकारांची तुलना, नावं ठेवणं टाळता आलं असतं.
शम्मी कपूरवर लिहावं तर ते ट्युलिपनेच हे समीकरण डोक्यात घट्ट बसल्याने तिचं लिखाण मिस केलंच आणि नाही म्हटलं तरी तुलना केली गेलीच. माबुदोस.
रेखाटनांमध्येही सीमा, अल्पना, उर्विका यांच्या रेखाटनांसारखीच अगदी छोटी नावं लिहिता आली असती तर जास्त चांगलं दिसलं असतं.
जयावि यांच्या व्यक्तीचित्रणांत
>>> खरं म्हणजे राजाबाई जेव्हा कामासाठी घरी आल्या त्यावेळी मी काही त्यांना बघितलं नव्हतं. जेव्हा सुट्टीसाठी माहेरी आले तेव्हाच त्यांची आणि माझी भेट झाली.त्यांच्याबद्दल आईकडून, वहिनीकडून फोनवर कळत होतं. >>>
>>>आम्ही सुट्टीत जेव्हा आलो तेव्हा राजाबाईंशी ओळख झाली. फोनवरुन त्यांच्याबद्दल सगळं कळत होतंच,>>>
असं दोनदा आलंय. संपादक मंडळात कुणाला जाणवलं नाही का?
>>>
परत एकदा वासंतिक अंकाबद्दल
परत एकदा वासंतिक अंकाबद्दल विचार करुन बघा, पण तो एकाच विषयाला वाहिलेला असावा, फोटोग्राफी पासुन हिंदुत्वापर्यंत सगळ्या विषयातले तज्ञ लोक आहेत आपल्याकडे आता.
मुखपृष्ठ, सजावट वगैरे बाजूला ठेवू. फक्त एका विषयावरचे लेख / चित्रे / फोटो / कविता असे एकत्र करु.
दिवाळी अंकाचे संयोजन / संपादन करायचा सराव पण होईल.
लोकहो, आपण दिलेल्या भरभरुन
लोकहो, आपण दिलेल्या भरभरुन प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार.
अंक प्रसिद्ध करताना आम्ही ,अत्यंत काटेकोरपणे काहीही चुका राहू नयेत यासाठी प्रयत्न केले होते. तरीही अंकात काही चुका राहून गेल्या असतील याची आम्हाला जाणीव आहे.
निदर्शनास आणुन दिलेल्या गोष्टी आम्ही तातडीने सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसदीबद्दल क्षमस्व.
मायबोली संपादक मंडळ २०११
अगदी मस्तच जमलाय
अगदी मस्तच जमलाय अंक...
संपादक मंडळाचे अभिनंदन....
रुणूझूणूचे चिल्लॅऽऽक्स मॉम आणि मंजिरीची सर्वस्व कथा आवडली...
आकाशपाळणा तर फारच मस्त जमलय...अखिलेश अगदी आपल्याशीच बोलतोय असे वाटले...
ब्रिफकेसबद्दल इथे खूप जणांनी कौतुक केलेय पण मला पामराला ती थोडी झेपली नाही..कुठेतरी काहीतरी मिसिंग असल्यासारखे वाटले....
गांबारो निपॉनच्या तर प्रिंटआऊटस काढून सगळ्यांना वाचायला द्यावा...आपण नुसतेच त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तु उचलल्या...बाकी मुंबईत देखील महापूराच्या दिवशी मुंबईकरांनी जे स्पिरीट दाखवले त्याचेही कौतुक..पण आख्खा देश जेव्हा पुढे जाण्यासाठी धडपड करतो म्हणजे नक्की काय करतो याचे अत्यंत आदर्श उदाहरण...
अजून कविताविभागाच्या दिशेने गेलो नाहीये...त्याविषयी पुन्हा टाकेनच
रुणूझुणूची चिलॅक्स मॉम आत्ताच
रुणूझुणूची चिलॅक्स मॉम आत्ताच वाचली आणि न राहवुन प्रतिसादावर आले. खुपच सुंदर लेखन केले आहे. कथाही छान आहे आणि लेखनशैलीही.
बागुलबुवाच हा छंद जीवाला लावी पिसे ही खुप भावल. छान आहे.
सर्वप्रथम अंकासाठी ज्या
सर्वप्रथम अंकासाठी ज्या कुणाचे हातभार लागले त्या सर्वांचं अभिनंदन आणि वाचनीय अंक दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

मुखपॄष्ठावरचं चित्र चांगलं आहे पण देखणं ( रुढ अर्थाने देखणं नव्हे तर काहीतरी खास ज्यामुळे ते परतपरत बघावसं वाटावं ह्या अर्थाने ) वाटलं नाही.
कथाकथीतल्या सगळ्या कथा वाचल्या. अरुंधतीची 'चक्र', स्वातीची 'वर्तुळ', रुणुझुणूची 'चिलॅक्स मॉम', ऋयामची 'अतीत', अनामिक ह्यांची 'दॄष्टी' ह्या कथा आवडल्या. सावलीची 'तळ्यातली कमळे' तिच्या इतर बालकथांप्रमाणेच गोड, सगळ्यांनाच आवडेल अशी. उर्विका, देविका आणि इतरांची रेखाटनंही सुरेख. डॉक्टर विसरभोळे, व्हीलचेअर आणि झाड विशेष नाही आवडल्या. कथा समजून घेण्यात मी कमी पडले असेन. अनुवादित कथेचा अनुवाद चांगला आहे. कथा ठीकठाक आवडली. 'सर्वस्व' आणि 'वळचणीचे पक्षी' चे विषय चांगले आहेत आणि कथालेखनाचा प्रयत्नही चांगलाच आहे पण दोन्ही कथांची मांडणी थोडी विस्कळीत वाटली.
दिवाळी अंकातल्या कथा मनात रेंगाळाव्या, कथेच्या मूडमधून पटकन बाहेर यावसं वाटू नये असं जे वाटतं ते मात्र वरील एकाही कथेच्या बाबतीत वाटलं नाही. 'थांग-अथांगमध्ये' असलेली पूनमची 'इस रिश्ते का कोई नाम न दो' ही कथा मात्र खूप आवडली. विषयाचं नाविन्य नसून किंवा कुठलंही धक्कातंत्र नसूनही पूनमने नेहेमीप्रमाणेच कथा सुंदर फुलवली आहे. कथा वाचल्यावर समाधान झाले, कुठे काहीतरी अपूर्ण राहतेय अशी भावना आली नाही
थांग-अथांगमधल्या पूनमच्या कथेबद्दल लिहिलेच आहे. दिनेशदांचे 'मानसकन्या' आवडले. अश्विनीमामींचा 'ब्रीफकेस' मधील अनुभव वाचून वाईट वाटले पण लेख विस्कळीत वाटला. नक्की काय मांडायचे आहे ते कळले नाही. सावलीचं 'नभा सावर सावर' अतिशय सुंदर. फोटो आणि वर्णन परतपरत वाचावे असे. रारचे 'टाके' हा लेख वाचला. काय प्रतिक्रिया लिहावी कळत नाही इतका सुरेख उतरलाय लेख. 'थांग-अथांग' ह्या संकल्पनेला अतिशय समर्थपणे न्याय दिलाय ह्या लेखाने. ह्या विभागातले बाकीचे लेख वाचले नाहीयेत. वाचेन तशा प्रतिक्रिया देईनच.
अंतर्नादमधील 'सण वाढा सण', 'गांबारो निप्पोन' अतिशय आवडले. राजकाशाना ह्यांचा लेखही आवडला. सईचा 'वजन उतरो देवा' एकदा वाचायला चांगलं आहे पण तिच्या काही ललितांनी घेतली होती तितकी पकड ह्या वेळी नाही घेतली हे खरे. रैनाने घेतलेली मुलाखत आवडली. त्याला दिलेले 'आकाशपाळण्याची गोष्ट' हे नावही आवडले. बाकीचे लेख वाचायचे आहेत.
दिवाळी संवादमधील 'त्याच्याविना...त्याच्यासाठी' ही मुलाखत आवडली. प्रसादची चित्रं अतिशय आवडली. प्रसादला टीव्हीवर अनेकदा पाहिलं होतं, मुलाखतीत वाचलेलं सगळं आधी वाचलं होतं पण कविताने मुलाखत अगदी मनापासून घेतलीय हे जाणवतंय वाचताना. बाकीचं वाचायचंय.
स्वरचित्रेमध्ये 'संध्येच्या पारावरती' हे गाणं असेल असं वाटलं होतं त्यामुळे थोडी निराशा झाली पण कविता आणि वाचन दोन्ही आवडले.
बांधवगड सफरीची कल्पना आणि निवेदन दोन्ही छान आहे पण कॅमेरा खूप हललाय. तो थोडा स्थिर राहिला असता तर मजा आली असती.
हेमा उपासनी ह्यांचे गाणे आवडले. अर्थाच्या दॄष्टीने काहीच साम्य नाही पण ऐकताना माणिक वर्मांच्या 'जळते मी हा जळे दिवा' आणि वसंतरावांच्या 'दाटून कंठ येतो' ह्या दोन गाण्यांची खूप आठवण येत होती
काव्यरंग आणि स्मॄतीगंध अजून वाचायचंय.
प्रत्येक लेखाखाली स्वतंत्रपणे अभिप्राय द्यायची सोय हवीच. तशी दिली तर दिवाळी-अंकात आणि गुलमोहरात काय फरक असं वर कुणीतरी म्हटलंय ते नाही पटलं. आंतर्जालावर साहित्य प्रकाशित करण्याचा हाच तर सगळ्यात मोठा फायदा आहे ( नाहीतरी पुस्तक हातात घेऊन वाचण्याची मजा आपण इथे गमवत असतो तर तिथे जे गमावतो ते इथे का मिळू नये ? ) लेख वाचल्यावाचल्या उस्फूर्तपणे जे मनात येते ते उतरवणे तर जमत नाहीच पण बरेचदा प्रतिक्रिया लिहिण्याचा कंटाळा येऊन लिहिणे टाळलेच जाऊ शकते. गुलमोहरातल्या भुक्कड लेखालाही जिथे ढीगाने प्रतिक्रिया मिळतात तिथे इथल्या गुणी लेखकांवर अन्याय होतोय ह्यामुळे असे वाटले. प्रतिक्रिया दिली तरी मग नुसतीच आवडली, नाही आवडली अशी गोळाबेरीज केली जाते.संपादकांनी ह्याचा विचार जरुर करावा.
अगो, स्वातीने डोक्यावर हात
अगो, स्वातीने डोक्यावर हात ठेवला का?
स्वातीचा हात आणि रैनाचा धाक
स्वातीचा हात आणि रैनाचा धाक
टाके अतिशय आवडले. नेमके आणि
टाके अतिशय आवडले. नेमके आणि मनाला भिडणारे लेखन,
मुखपृष्ठाबद्दल अगोसारखंच
मुखपृष्ठाबद्दल अगोसारखंच वाटलं. चांगलं आहे, 'wow' नाही आहे. मायबोलीच्या मुख्य पानावर छोटी इमेज जी आहे ती छान दिसते आहे.
३ वर्षांच्या गॅपनंतर मुखपृष्ठावर पुन्हा बाई आली.
ही चांगली गोष्ट आहे.
लेख सावकाशीने वाचतो आहे.
लेख सावकाशीने वाचतो आहे.
गांबारो-निप्पोन - जपानी समाजामध्ये कायझेन (kaizen) - प्रत्येक गोष्टीच्या गुणवत्तेमध्ये सतत सुधारणा करत राहणे - महत्वाचा भाग आहे. याचा प्रत्यय भूकंपानंतर जपानी लोकांनी आलेल्या समस्यांना ज्या धैर्याने तोंड दिले त्यात दिसून येतो.
अमृत बंगची मुलाखत वाचनीय आणि विचारप्रवर्तक आहे. त्याची उत्तरे वाचताना त्यांच्यामागे असलेला सखोल विचार दिसून येतो. बरेचदा वाक्य वाचल्यानंतर थांबून विचार करावा लागतो. मस्ट रीड.
थांग अथांग मधील शंकरा.. - हा अनुभव इतक्या वेळा आला आहे. आपल्या बोलण्याकडे कितीतरी वेळा लोकांचे लक्षच नसते. त्यांचा अजेंडा जास्त महत्वाचा असतो. लेख वाचल्यावर क्लिंट इस्टवूडची एक मुलाखत आठवली. त्याने अगदी हाच मुद्दा मांडला आहे. https://www.youtube.com/watch?v=ckfEyJH7oQo
खगोलशात्रीय नाते रोचक आहे. लेखातील नात्यांच्या अनुषंगाने केलेली गुंफण आवडली. सेगनच्या कॉसमॉसची आठवण झाली.
आकाशपाळण्याची गोष्ट ने अस्वस्थ केले. अशा गुंतागुंतीच्या गोष्टींबद्दल जितका विचार करावा तितका गुंता वाढतो आणि विचार करणे थांबवता येत नाही. अखिलेशची स्वप्ने लवकर सत्यात यावीत यासाठी शुभेच्छा.
बाकी लेख वाचतो आहे.
आत्तापर्यंत वाचलेल्यामधे
आत्तापर्यंत वाचलेल्यामधे सर्वात वाचनीय मंजिरीचे "गांबारो निप्पोन!"
जपान्यांच्या ह्या वृत्तीला सलाम!
वर कोणीतरी लिहील्याप्रमाणे पाश्चात्यांकडून आपण शिकण्यासारख्या गोष्टींमधे सर्वात वर हे असेल असे वाटते.
मंजिरी, फार छान लिहीले आहेत!
------------------------------------------------
अस्चिगचा लेख आवडला
पहिल्यांदाच कळला मलाही.
मंदारचा लेख मलाही आवडला पण इतर लोकांबद्दलचे मत लिहायची गरज नव्हती असे वाटते.
नीधपचा लेख चांगला आहे. आडोचा लेख फार आवडला! आणि फोटो मस्तच!!!!!
सर्वात जास्ती कौतुक ह्या लोकांचे!!!
*माझा लेख वाचल्याबदल आणि तसे इथे आवर्जून लिहील्याबद्दल त्या-त्या लोक्स्चे लयच आभार्स

भरत मयेकरांचे तर अजूनच लय आभार्स!
अंतर्नाद हा भाग सगळ्यात जास्त
अंतर्नाद हा भाग सगळ्यात जास्त आवडला.
) मध्ये जाऊन त्यांच्या मागे गुपचूप चालत असल्यासारखे वाटले. प्रवासवर्णनापेक्षा प्रवासातली रोजनिशी वाटली.
सण वाढा सण, गांबारोऽ निप्पोन! (तोक्योतल्या लोकांनी केलेल्या वीजबचतीबद्दल वाचताना इथे दिवाळीत रात्रभर जळणारी रोषणाई खुपत होती), जिवर्नीची बाग, वजन उतरो देवा (शेवटचं गाण्याचं विडंबन नाही आवडलं) आणि आकाशपाळण्याची गोष्ट (कैसा हैं, ये सब पढा नही ऐसे बोल नहीं सकतें!) हे सगळे लेख अप्रतिम.
साद देती हिमशिखरे वाचताना आउट्डोअर्स यांच्या पेन्सीव्ह (म्हणजे काय असं विचारतील ते मगल्स
काव्यरंगातली खेळ : संघमित्रा ही कविता आवडली.
स्मृतिगंध या सदरात नुकत्याच दिवंगत झालेल्या कलाकारांचा जीवनपट, कार्यसूची यापेक्षा वेगळे काही तरी वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती. ती ‘सूनी हर महफ़िल’ या लेखाने पूर्ण केली.
दिवाळी-संवाद मधील 'त्याच्याविना...त्याच्यासाठी' बद्दल काय लिहिणार? 'निर्माण घडताना' पुन्हा किमान एकदा वाचावे लागेल. दिलखुलास भरपूर दिलखुलास झालेले दिसतेय!
इतका छान दिवाळी अंक पेश
इतका छान दिवाळी अंक पेश केल्याबद्दल संपादक मंडळाचे आणि समस्त लेखक/लेखिकांचे मनःपूर्वक आभार. आता तब्बेतीत वाचून अभिप्राय लिहिते.:स्मित:
प्रिय रसिक जनहो, जरा कविता
प्रिय रसिक जनहो,
जरा कविता सुद्धा वाचा हो.
जर तुम्ही कविता वाचाल तर देव तुमचे कल्याण करेल,
तुमचे व्यवसाय भरभराटीस येईल, धंद्यात बरकत येईल,
नोकरीत बढती मिळेल, पगारात इन्क्रिमेंट मिळेल,
हातपाय सुखाचे राहतील, डोके शाबूत राहील, मेंदूचे आकारमान वाढेल,
आरोग्य लाभेल, शत्रुचा नायनाट होईल, परिवारात व समाजात सन्मान वाढेल,
आणि
सरस्वती प्रसन्न व्हईल, विद्येचे वरदान लाभेल,
तुमच्या मायमराठीला सुद्धा जरासा आनंद व्हईल.......!!
......
.......
........
व्हीलचेअर - जबरदस्त जमलीय
व्हीलचेअर - जबरदस्त जमलीय वातावरणनिर्मिती. अस्वस्थ करणारं कथानक. पात्रं मनात रेंगाळत राहिली वाचून झाल्यावर पण.
गांबारो निप्पॉन - थक्क होणे, भारावून जाणे, टडोपा बरंच काही एकदम वाटलं !
चक्र ....................
चक्र .................... गोष्ट कळाली नाही........... काय आहे नेमकी.....सांगेल का... ?
कथाकथी वाचला आज. -
कथाकथी वाचला आज.
- सुवर्णमयीची 'व्हिलचेअर' सुरेख. त्यातल्या काही भावमुद्रा अंगावर येणार्या, ठाव घेणार्या.
( त्यात काही मुशोच्याचुका राहुन गेल्या आहेत. एकदा पाहणार का कृपया?)
- स्वातीची 'वर्तुळ'- परिणामकारक.सीमाचे बोधचित्र छान.
- रुणुझुणुचे 'चिल्लॅक्स मॉम' गोड आहे. थोडे सुलभीकरण झाले आहे, तरीही गोड. त्यातली अवलची चित्रे फार आवडली. काय भाव आहेत त्या व्यक्तींच्या चेहर्यावर. फार गोड.
- ऋयाम च्या 'अतीत' कथेत अगदी ऑबव्हियस शेवट करायचे टाळले आहे ते छान. कथा ठिक. पु.ले.शु.
-'दृष्टी' आवडली.
- साजिर्याची 'झाड' ही आवडली. अवलची चित्रं फार सुरेख. एक जिवंतपणा आहे अवलच्या रेखाटनात.
- अरुंधतीची 'चक्र' आवडली. साधी आणि छान नरेटिव्ह.
- मंजिरीची 'सर्वस्व' आणि मानुषीची कथा खिळवून ठेवणार्या.
- नंदनचा अनुवादही छान. नंदन साहित्यवाचकधर्माशी इमान राखून दर वर्षी कुठल्या ना कुठल्या थोर लेखकाची आठवण काढतो, ते मला फार आवडते.
- उर्विका आणि देविकाचे कौतुक. दोन्ही बालकथा ठिक आहेत, पण अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या.
(बोधचित्रे म्हणले की नीलूची आठवण हटकुन येतेच.नीलू तुझ्या चित्रांची वाट पहात होते.)
स्मृतीगंधची संकल्पना आवडली. त्यातच जॉब्सविषयी, राजाध्यक्षांविषयी कोणीतरी लिहायला हवे होते.
देवकाकांचा खेबुडकरांवरचा लेख छान, पण त्रोटक वाटला थोडासा. शम्मीकपुरवरचा लेख छान. जगजितसिंगाविषयी काहीही वाचायचा अजून मुड होत नाही. वाचलाच नाही.
संवाद मध्ये अनीशा यांचे 'निर्माण घडताना' हे वाचले. उत्कृष्ट आणि विचारप्रवर्तक झाला आहे संवाद. अमृत बंग यांच्या प्रसिद्ध आडनावाशिवाय इतर कसलीही माहिती नव्हती, ती मिळाली. आभारी आहे. त्यांच्या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा. अजून त्यांच्यामागे एक ठोस असे स्वतःचे Body of work नाही, तरीही योग्य दिशेने प्रवास करण्यास शुभेच्छा. तिथे नमुद केलेल्या काही कल्पना फार आवडल्या.
(तिथे निर्माणच्या संकेतस्थळाचा कृपया दुवा देणे.)
मागील वर्षीही अनीशा यांनी कृष्णमेघ कुंट्यांशी साधलेला संवाद अप्रतिम होता.
कविताचा 'त्याच्याविना..त्याच्यासाठी' वाचून भरून आले. अधिक काही म्हणायची माझी पात्रताच नाही. धन्यवाद कविता आणि घाडी कुटुंबिय,
कविता विभागात नचिकेत,क्रांति
कविता विभागात नचिकेत,क्रांति ह्यांच्या कविता आणि गिरीश कुलकर्णी,सुप्रिया जाधव आणि मुटेसाहेब..ह्यांच्या गझला विशेष उल्लेखनीय वाटल्या.
स्वरचित्र.मध्ये.. बांधवगडचे निवेदन उत्कृष्ट आहे..चित्रणात संपादन करण्यास वाव आहे..
संध्येच्या पारावरती...पार्श्वसंगीत मस्त...काव्यवाचनात अजून सुधारणेला वाव आहे.
पणती..ह्या गझलेचं गायन ठाकठीक.
स्मृतिगंधमध्ये..शम्मी कपूर आणि जगजीतसिंग ह्यांच्यावरचे लेख माहितीत भर घालणारे वाटले.
अंतर्नादमध्ये आत्तापर्यंत वाचलेले...शाम ह्यांचा सण वाढा सण...खूपच अंतर्मुख करणारा अनुभव आहे.
गांबारोऽ निप्पोन हा मंजिरीचा लेख...त्यावर मनात दोन प्रतिक्रिया उमटल्या...पहिली...जपानी कसले ग्रेट आहेत!
आणि दुसरी....मेलेलं कोंबडं मरणाला भीत नाही तद्वत भुकंपाची इतकी सवय झालेय जपान्यांना(जशी मुंबईकरांना पावसाळ्यात पाणी साठण्याची,बॉंबस्फोटांची,अति पूर्वेकडच्या राज्यांना प्रत्येक पावसाळ्यातल्या ब्रह्मपुत्रा वगैरे सारख्या नदांच्या जलप्रलयासारख्या पुरांची) की आता भूकंप,त्यामुळे होणारी अपरिमित हानी वगैरे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असावा इतके सहजतेने ते बघू शकत असावेत किंवा दैवदशा समजून वागत असावेत असे वाटते.
काव्यरंग - अर्घ्य, एक क्षण
काव्यरंग - अर्घ्य, एक क्षण जगण्यामधला, तुझी आठवण आणि खेळ ह्या कविता खूप आवडल्या.
थांग - अथांग हा सगळा विभागच सुरेख जमला आहे. खास करुन टाके, एक नाते - हिरवे गर्द, सत्यजितची कविता. ह्याव्यतिरिक्तही आवडलेल्या लेखांचा उल्लेख मागच्या प्रतिक्रियेत केलाच आहे.
मुलाखतींपैकी निर्माण वाचून झाली आहे. सुरेख जमली आहे मुलाखत.
बाकीचे अजून वाचत आहे, आणि दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ अजिबातच आवडले नाही, माफ करा.
आत्ता अंतर्नाद वाचून
आत्ता अंतर्नाद वाचून संपवला.
निप्पोन अर्थातच बेस्ट. मोनेची काही पेंटींग्स दिली असती तर अजून मजा आली असती. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील लेखही उत्तम.
मुखपृष्ठ आवडले नाही, क्लिशे तर आहेच पण बाईचा तोंडवळा फारच मॉडर्न आहे, आता हेच दाखवायचे असेल तर...!
दिवाळी अंक सर्वांग सुंदर
दिवाळी अंक सर्वांग सुंदर आहे..प्रत्येक विभाग नेटका,परिपुर्ण आहे..सर्व संपादक मंडळींचे कौतुक ..दर्जेदार अंक प्रस्तुती बद्दल हातभार लागलेल्या सर्वांचे आभार,,
वा
वा
"गांबारोऽ निप्पोन!" फारच
"गांबारोऽ निप्पोन!" फारच सुंदर...
"एलेमेंटरी, माय डिअर.." पण छान...
"साद देती हिमशिखरे" ने पुन्हा हिमालयाची ओढ लावुन दिली... २ वर्ष झाली हिमालयाला शेवटची भेट देऊन... सर्व आठवणी उफाळुन आल्या...
काही कथा फारच बाळबोध आहेत...
'अंतर्नाद' विभाग वाचून झाला.
'अंतर्नाद' विभाग वाचून झाला. सर्व लेख आवडले. रैनाने घेतलेली मुलाखत वेगळी आहे, म्हणून जास्त आवडली. मंजिरी, श्याम, डॉ. कोतापल्ले- मस्त लेख. आडोच्या लेखातले 'नीळकंठ' शिखर पाहून डोळे निवले.
बाकी विभाग हळूहळू वाचते आहे.
थोडं अंकाबद्दल- संपादकीय म्हणजे एकूण अंकाचा फक्त सिनॉप्सिस वाटला. त्यात संपादिकेचे मनोगत, एखाद्या विषयावर टिप्पणी अथवा विचार वगैरे व्हॅल्यू अॅडिशनही हवी होती असे मला वाटते. अंकात श्रद्धांजली विभाग वेगळा ठेवून ते लेख तिथे संकलित केले आहेत, हे उत्तम, पण त्याचा उल्लेख संपादकीयातही हवा होता असे वाटले. संपादकीयात सहसा संपूर्ण वर्षात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा धांडोळा घेतला जातो. आता ऑनलाईन अंकात तो तसा घेणे कितपत उचित ठरेल हा भाग वेगळा. इथे परत 'संपादकीय' म्हणजे नक्की काय अभिप्रेत असते अशी वेगळी चर्चा होऊ शकेल. ('रसग्रहण' म्हणजे काय/ कसे असावे?- ह्यावर झाली होती तशी).
अंक टेक्निकली अजून 'सॅव्ही' असेल अशी माझी अपेक्षा होती. ही किंवा ह्यासारखी टेम्प्लेट आधीच वापरून झालेली आहे. काहीतरी बदल, नावीन्य असेल असे वाटत होते. उदा.- 'प्रत्येक लेखाखाली अभिप्रायाची सोय असावी' अशी सुचवणी झाली आहे. ही सोय ऑलरेडी दिलीच असती तर?- असे वाटले. हे उदाहरण झाले. ह्या टेम्प्लेटीला ते शक्यही नसेल कदाचित. पण असा काहीसा पुढचा अथवा वेगळा विचार अंकाच्या दिसण्याबाबत हवा होता. अंकात पुढच्या अथवा मागच्या लेखात जायची सोय- हे मस्त आहे. नवीन आहे. तसेच अजून काहीतरी हवे होते.
बाकी दिवाळी अंकात भरपूर वाचायला आहे. अजून खूप काही वाचायचेही आहे. दिवाळी अंकात वाचनीय खूप काही असलं की मस्त वाटतं, तसंच अंक पाहून वाटलं
गांबारो निप्पोन!!! अत्यंत
गांबारो निप्पोन!!! अत्यंत सुंदर. डोळ्यांत पाणी आणणारा लेख. धन्यवाद मंजिरी
यंदाच्या अंकात वाचनीय साहित्य
यंदाच्या अंकात वाचनीय साहित्य भरपूर आहे. बर्याच अपरिचीत (त्यांच्या लेखनकलेविषयी) मायबोलीकरांचे लेखन वाचायला मिळणार आहे.
इसे रिश्ते का कोई नाम ना दे - पूनमची कथा नेहमीप्रमाणेच सुंदर आणि परीपक्व. जरा धाडसी शेवट वाचायला आवडला असता
मानसकन्या - ठीकठाक. विशेष उल्लेख करण्यासारखं काही वाटलं नाही.
बाप - लेकीचे नाते आणि आठवते का गं - छान.
टाके - आरतीचं लिखाण बर्याच दिवसांनी वाचायला मिळालं. लेख एकदम छान जमलाय. खूप आवडला.
एक नाते, हिरवे गर्द - मस्त! अल्पनाने काढलेलं चित्रंही आवडलं.
हा छंद जीवाला लावी पिसे - अतिशय सुरेख! मायबोलीवरच्या 'बागुलबुवा' ह्या आयडीशी आणि इमेजशी पूर्णपणे विसंगत असा लेख
नियमित वाचनाबरोबर अधिक नेमाने लिखाण करायला हवं.
लेखावरचं चित्रं लेखाशी विसंगत वाटलं.
ब्रीफकेस - वाचायला ठीक वाटला, पण अगो म्हणाली तसा विस्कळीत वाटला.
त्याच्याविना... त्याच्यासाठी - मुलाखत अतिशय छान आणि हृद्य झाली आहे. ही मुलाखत वाचताना झी मराठीवरच्या 'आता खेळा नाचा' मधे 'कोणास ठाऊक कसा' गात असलेला प्रसाद डोळ्यांसमोर येत होता.
एकूण अंकाबद्दल -
)
अंक झाला आहे सुरेख, पण टेम्प्लेटबद्दल पौर्णिमेला अनुमोदन! संपादक मंडळातील कलाकार मंडळी पाहता अधिक नयनरम्य आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अंकाची अपेक्षा होती. नॅव्हिगेशन आवडले. शुद्धलेखनाच्या बर्याच ढोबळ चुका दिसल्या. (हे लिहिण्याचा मला हक्क नाही खरंतर पण माझं नावही चुकीचं लिहिलं गेलं आहे म्हणून प्रकर्षाने जाणवलं
Pages