Submitted by संपादक on 25 October, 2011 - 20:16
मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०११ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
***********************************************
हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).
***********************************************
-संपादक मंडळ
Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution
विषय:
Groups audience:
शेअर करा
पूनमची इश रीश्ते ....,
पूनमची इश रीश्ते ...., संघमित्राचे अधून मधून, रारचे टाके तिन्ही आवडले. मस्तच.
मानसकन्या, एक नाते हिरवे गर्द ठीक ठीक.
चिलॅक्स मॉम आणि ऋयामची अतीत या कथा एकदम फील गुड प्रकारातल्या आहेत. छान.
शाम यांची "सण वाढा सण" आवडली,
शाम यांची "सण वाढा सण" आवडली, अगदी टोचणारी.
राजकाशाना यांची "एलेमेंटरी, माय डिअर.." सई ची "वजन उतरो देवा!" हे हलकेफुलके वाचायला मजा आली.
ऋयामची "अतीत" छान.
रैना ची "आकाशपाळण्याची गोष्ट!" आवडली.
पूनमची "इसे रिश्ते का कोई नाम न दो" आवडली.
रार ची "टाके" आवडली. फक्त गुलजारच्या कवितांच्या ओळींच्या खाली गुलजारचे नाव लिहायला हवे होते असे वाटले.
सुवर्णमयी ची "व्हीलचेअर" कथा चांगली आहे. वेगळ्याच प्रकारचे वातावरण..
----
स्वाती ची "वर्तुळ", मानुषीची "वळचणीचे पक्षी" आवडली
बालकथांमधे काढलेली चित्रे बालकलाकारांनी काढली आहेत का? स्वातीच्या पोस्ट वरुन असे वाटले. असे असेल तर कृपया त्याचा वेगळा उल्लेख करणार का? चित्र छानच आहेत
बाकी अजुन वाचेन तशा प्रतिक्रिया देईन.
राजकाशाना, ॠयाम, अकु यांच्या
राजकाशाना, ॠयाम, अकु यांच्या आवडल्या. सई केसकर, अर्निका यांच्या ठिकठिक वाटल्या
अंक सुंदर झाला आहे. वाचायला
अंक सुंदर झाला आहे. वाचायला भरपूर साहित्य आहे. सगळंच साहित्य एकापेक्षा एक दर्जेदार आहे. सविस्तर प्रतिसाद वाचनानंतर देईनच. तूर्त, १] विरंगुळा मधलं काव्य अप्रतिम! २] हा छंद जिवाला लावी पिसे खासच.
कथाकथी मस्त.
एक खुलासा करायचा होता माझ्या 'तझी आठवण' या रचनेबद्द्ल. ही रचना गझल नसून कविता आहे. तिला चुकून गझलचं लेबल लागलेलं दिसतंय.
खूप खूप मेहनत घेऊन अगदी सुंदर रुपात सजविलेल्या अंकाबद्दल संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचं हार्दिक अभिनंदन.
'नाते' मधला मला aschig चा
'नाते' मधला मला aschig चा लेख, सत्यजितची कविता आणि देवी चा लेख आवडला.
बाकी वाचत आहे..
नभा सावर सावर आवडला. लेख,
नभा सावर सावर आवडला. लेख, फोटो की फोटोचे कॅप्शन यात वरचढ काय आहे ते ठरवण अवघड आहे. सगळचं भावलं. लेखनातून प्रतिमा उभी करणं हे लेखक करतो तसं प्रत्येक चित्र, फोटो समोर एक कथा/ कविता घेऊन येतो यावर माझा विश्वास आहे. त्याचा प्रत्यय नभा सावर सावर मधे आला.
राजकाशाना, शाम, वैभव जोशी,
राजकाशाना, शाम, वैभव जोशी, देवी, रार ह्यांचे लिखाण खूपच आवडले.
सावली, मंजिरी, आश्चिग यांचेही लेख आवडले.
श्यामलीची ऑडियो कविता उत्तम
श्यामलीची ऑडियो कविता उत्तम .रैनाचा आकाशपाळणा प्रचंड आवडला.अखिलेश ला भेटावेसे वाटते.
पौर्णिमाची कथा नेहमीप्रमाणेच सुंदर.RAR चे टाके आणि अश्विनी मामी ची ब्रीफकेस हेलावून गेली.
शाम यांचे 'सण वाढा सण' , काय बोलणार? अतिशय अस्वथ करून गेले.
आऊडोअर्सचे 'साद देती हिमशिखरे' वर्णन आणि फोटो छान.
जयश्रीचे राजाबाईपण आवडले.देवी यांनी लिहीलेल्या लहानशा गोष्टी सुंदर.
रुणुझुणु चे आई आणि मुलांच्या नात्यातले भावबंध"चिल्लॅ s क्स मॉम !" क्या बात है.
अस्चीग चे नाती खगोलशास्त्रीय सोप्प्या शब्दात मांडल्यामुळे खूपच इंटरेस्टिंग
दिनेशदांची मानसकन्या उत्तम. सावलीचे"नभा सावर सावर" सुरेख. फोटो अफाट.
सगळी रेखाटनं सुप्पर डुप्पर
एकूणच दिवाळी अंक सुंदर ,सुरेख आणि अप्रतिम
दिवाळी अंक टिमचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद! इतका सुंदर दिवाळी अंक दिल्याबद्दल
मला सगळाच अंक आवडला अगदी
मला सगळाच अंक आवडला अगदी मुख्यपृष्ठापासुन
नभा सावर सावर आवडला. लेख, फोटो की फोटोचे कॅप्शन यात वरचढ काय आहे ते ठरवण अवघड आहे. सगळचं भावलं. लेखनातून प्रतिमा उभी करणं हे लेखक करतो तसं प्रत्येक चित्र, फोटो समोर एक कथा/ कविता घेऊन येतो यावर माझा विश्वास आहे. त्याचा प्रत्यय नभा सावर सावर मधे आला.>>>>>>>+१
"त्याच्याविना..त्याच्यासाठी"
"त्याच्याविना..त्याच्यासाठी" - मुलाखत आवडली. प्रसादने काढलेली चित्रंही सुंदर आहेत.
'चैतन्यमूर्ती शम्मी..' लेखही चांगला झालाय.
बाबु च्या लेखाबद्दल मला फचिनसारखेच वाटले. लेख चांगला झालाय. पण तो नाते विभागात का आहे ते कळले नाही.
अंतर्नाद हा सर्वात वाचनीय
अंतर्नाद हा सर्वात वाचनीय विभाग झाला आहे याला अनुमोदन.
'सण वाढा सण'बद्दल नीधपला अनुमोदन. कसलाही अभिनिवेश न घेणं हेच या लेखाचं बलस्थान झालं आहे.
मंजिरीचा लेखही थक्क करणारा आहे.
'जिवर्नीची बाग' खूप आवडला.
आडोची सफर मस्त, त्यातली प्रकाशचित्रंही सुंदर आहेत.
राजकाशानांचा लेख मस्त हलकाफुलका आहे. आवडला.
अकुच्या अष्टलक्ष्मी नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.
आकाशपाळणा तर जिव्हाळ्याचा विषय. मुलाखत फारच मस्त झाली आहे. अनकट व्हर्जनही वाचायला आवडेल.
डॉ. कोतापल्लींचा लेख अजून वाचला नाही.
थांग अथांगमधे विरंगुळा, बोलाचा अर्थ करा (हा अंतर्नादाऐवजी या विभागात का आहे कळलं नाही), टाके, सावली यांचे नभ, देवीची लहानशी गोष्ट आणि आशीषची (हळुवार मृत्यूकडे ढकलणारी! :P) अवकाशातली नाती आवडली.
'विरंगुळा'मधल्या कवितांच्या ओळींचा विशेष उल्लेख करायला हवा. अंकातलं सर्वोत्कृष्ट काव्य या गद्य लेखात आलं आहे. कवितेचं अॅब्स्ट्रॅक्ट चित्रणही आवडलंच.
दिवाळी संवाद विभागातल्या अमृत बंग आणि प्रसादच्या आईबाबांच्या मुलाखती आवडल्या.
स्मृतिगंधात गिरीराजच्या नजरेतून दिसलेला जगजीत आवडला. मंदार जोशींनी शम्मी कपूरबद्दल जिव्हाळ्याने लिहिलं आहे, पण त्यात इतर कलाकारांबद्दल आलेले नकारात्मक उद्गार खटकले. याची आवश्यकता नसते आणि त्याने रसभंगही होतो. खेबुडकरांवरच्या लेखात नुसतीच माहिती आहे म्हणून फारसा आवडला नाही.
कथाकथी विभागात अकुची चक्र आवडली.
बालकथा छान आहेत. त्यातल्या रेखाटनांसाठी बाल-मायबोलीकरांचं विशेष कौतुक.
कथाकथीतील बाकी कथा आणि 'कोई नाम ना दो' यांत सहज निवेदन आणि संवाद आलेत ते आवडलं.
उलट साजिर्याची कथा हृद्य असली तरी त्यातले संवाद सहज वाटले नाहीत या वेळी.
नंदनने केलेलं चेकॉव्हच्या कारकुनाचं भाषांतर आवडलं. कथेची पार्श्वभूमी आणि भूमिकाही छान समजावून सांगितली आहे.
काव्यरंग ठीकठाक.
झाड यांच्या कवितेतल्या काही सुट्या सुट्या कल्पना आवडल्या, पण मला एकसंध अर्थ लागला नाही.
स्वरचित्रांचा आस्वाद सप्ताहांतात घेईन.
----
अंकाविषयी :
अवल यांच्या काही रेखाटनांमध्ये 'दिवाळी अंक २०११' असं लिहिलंय ते चांगलं दिसत नाहीये, तसंच रेखाटनांमध्ये काय मजकूर लिहायचा याचा एक काहीतरी नियम पाळला गेला असता तर बरं झालं असतं.
अंकाची पिवळी बॅकग्राउंड आवडली नाही. सलग अंक वाचतांना डोळ्यांना ताण जाणवला. तसंच न्यूट्रल बॅकग्राउंड असली की रेखाटनंही कृष्णधवल किंवा कुठल्याही रंगसंगतीची चांगली दिसतात.
लेखांतले काही उतारे वर दिलेत त्यांची निवड आवडली नाही. तसे हेडर्स नसते तरी चाललं असतं, पण निदान लेखाबद्दल उत्सुकता वाटेल असे उतारे निवडले जायला हवे होते.
कवितांचं मुद्रितशोधन शक्य असेल तर पुन्हा तपासा कृपया.
'प्रत्यंच्येतून', 'श्रावण्यातल्या' इत्यादींमुळे रसभंग होतो आहे.
('डचमळतो मी मधात आहे' वाचून जरा धक्काच बसला, पण तो मुद्रितशोधनाचा दोष दिसत नाही. काफिया जुळवण्यासाठी मधात बुडी मारलेली दिसते आहे. )
दिवाळी अंकात चक्क दाद ची कथा
दिवाळी अंकात चक्क दाद ची कथा नाही हे पाहुन धक्का बसला, मला प्रामाणिकपणे वाटते की दादच्या कथेशिवाय दिवाळी अंक कुठेतरी अपुर्ण आहे .
अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे
शाम यांची सण वाढा सण अप्रतिम
शाम यांची सण वाढा सण अप्रतिम जमली आहे. स्वरचित्रांमध्ये अवल यांची बांधवगडची सफर मला तरी भावली नाही.
यावेळच्या दिवाळी अंकात पाककृती नाहीत अजिबातच.
सध्या वाचुन झालेल्या भागात
सध्या वाचुन झालेल्या भागात आवडलेल्या काही गोष्टी:
राजकाशानाचा शेरलॉकः कथा एक, स्थळ भलतेच यातून केलेली विनोदनिर्मिती भावली.
रैनाचा आकाशपाळणा: आपला असलेला विषय आणि आपली नसलेली मते यांची प्रामाणीक सांगड.
सावलीचे आकाशः चित्रे अप्रतीम.
माझ्या लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. फचिनने म्हंटल्याप्रमाणे अजुन २-३ प्रकरणे लिहायची होती, पण वेळेअभावी जमले नाही.
>> मंदार जोशींनी शम्मी
>> मंदार जोशींनी शम्मी कपूरबद्दल जिव्हाळ्याने लिहिलं आहे, पण त्यात इतर कलाकारांबद्दल आलेले नकारात्मक उद्गार खटकले. याची आवश्यकता नसते आणि त्याने रसभंगही होतो.
मान्य. अनेक गोष्टी मलाही नंतर खटकल्या, पण तोवर उशीर झाला होता. पुढच्या वेळी लक्षात ठेवेन.
"सण वाढा सण" ही गोष्ट भावली.
"सण वाढा सण" ही गोष्ट भावली. गोष्ट खरी असेल तर भाउना नमस्कार; खरी नसेल तर शाम यांचे अभिनंदन गोष्ट सुंदर रचल्याबद्दल.
आतापर्यत वाचलेल्यात
आतापर्यत वाचलेल्यात 'विरंगुळा', 'ब्रीफकेस' आणि नीधप चा लेख विशेष आवडला. होम्स हलकाफुलका मस्त.
अजुनी वाचतो आहे. सगळेच मस्त
अजुनी वाचतो आहे.
सगळेच मस्त मस्त. गंमत म्हणजे लर्न टु लिसन चा मंत्र सकाळीच प्राचीन बॉसने कानात फुंकला आणि तासाभरातच नी चा लेख वाचत होतो. एखादं ललित या विषयावर पडलं तर रागावू नये..
स्वाती आंबोळे >>> अवल यांच्या
स्वाती आंबोळे >>> अवल यांच्या काही रेखाटनांमध्ये 'दिवाळी अंक २०११' असं लिहिलंय ते चांगलं दिसत नाहीये,<<< मला संपादकांकडुनच तशी सूचना आली होती. प्रथम मी फक्त रेखाचित्रच पाठवली होती, माझे नावही त्यावर घातले नव्हते, पण संपादकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे माझे नाव अन दिवाळी अंक २०११ या दोन्हींचा समावेश केला. खरं तर हे स्पष्टीकरण संपादक देतीलच, पण माझे नाव लिहिल्याने ते मी ही देणे अपेक्षित झाले. असो. धन्यवाद !
मी शम्मी कपूरजींवरील मंदार
मी शम्मी कपूरजींवरील मंदार जोशी याचा लेख वाचला. त्याने माबोवर लिहलेल्या अशोक कुमार आणि विजय आनंद यांच्या लेखांप्रमाणेच हाही सुरेख झालाय.
@ स्वाती आंबोळे...>>>डचमळतो
@ स्वाती आंबोळे...>>>डचमळतो मी मधात आहे' वाचून जरा धक्काच बसला, पण तो मुद्रितशोधनाचा दोष दिसत नाही. काफिया जुळवण्यासाठी मधात बुडी मारलेली दिसते आहे.>>>>
स्वातीताई आपण गंगाधर मुटे यांच्या हात घसरतो आहे या गझलेतील मतल्यात आलेल्या मधात या शब्दाबद्दल जे मत व्यक्त केलेले आहे ते अत्यंत चुकीचे आहे असे म्हणावे लागेल.
'मधात' याचा अर्थ 'आतमध्ये' किंवा 'मधे' असा आहे,हा शब्द कुठल्याही शब्दकोषात नसेल, परंतू मराठवाड्यात आणि काही अंशी विदर्भात बोलीभाषेत सर्रास वापरतात.
'मुटे' हे त्याच मातीतले असल्याने तो शब्द आला आहे, त्यामुळे 'काफियासाठी मधात बुडी' ही शब्दकोटी आपलेच हसे करू शकते.
असे गैरसमज होऊ नये म्हणूनच लेखकांनी प्रमाण मराठीत लिहायला हवे हेच पुन्हा सिद्ध होते.
आणि हो..माझ्या लेखावरील अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!!:)
माझ्या लेखाबद्दल काही.. एक
माझ्या लेखाबद्दल काही..
एक म्हणजे लेखाच्या खाली पाठवताना मी माझे पूर्ण नाव दिले होते. अंकात आयडी आला आहे. शक्य असल्यास आयडीच्या ऐवजी नावच यावे.
आणि दुसरे म्हणजे...
>> "डोन्ट आन्सर राइट अवे बाई, लर्न टू लिसन फर्स्ट. विचार कर मग उत्तर दे." <<
या ठिकाणी विचाssर असं मुद्दामून लिहिलं होतं. मुशो मधे ते काढलं का?
दुबेजींची बोलण्याची पद्धत आहे ती. एखाद्याच्या तोंडचं वाक्य लिहिलं जाताना बोलणार्याचा लहेजा, टोन महत्वाचा असतो. आणि ते तसे लिहिले असेल तर मुशोमधे ते पुस्तकी प्रमाण मराठी प्रमाणे करणे योग्य नाही. लिहिणार्याला तेवढे स्वातंत्र्य असायला हवे. असे मला वाटते.
या लेखासंदर्भाने हा मुद्दा छोटासा आहे मान्य परंतू एकुणात मुशो आणि संपादन यात फरक आहे हे इथे विसरल्यासारखं वाटलं त्यामुळे लिहिण्याची गरज वाटली.
(विपुमधे पर्वाच लिहिलेय हे दोन्ही पण उत्तर नव्हते म्हणून इथे लिहिले)
सगळा अंक वाचून झाला.
सगळा अंक वाचून झाला. प्रत्येकाने मेहनतीने लेखन केलेय हे जाणवलेच.
सगळाच अंक एखाद्या विषयाला धरुन करता आला असता... वासंतिक अंक पण काढता येईल आता आपल्याला.
अंतर्नाद बद्दल स्वातीला
अंतर्नाद बद्दल स्वातीला अनुमोदन. फार सुरेख झाला आहे हा भाग.
-जिवर्नीची बाग- जयंत गुण्यांना माझा मुजरा. फार म्हणजे फार आवडला. आपले मनःपूर्वक धन्यवाद. एक दोन चित्र हवी होती हो मोने ची (बारकेसे तीट). कोणताही कलाकार कितीही मोठा असो. आपल्याला तो यात्रेसारखा घडावा लागतो असे नेहमी वाटते. आणि हीच तर यात्रा महत्वाची. किती सहजगत्या आपल्या अंतर्यात्रेत सामिल करुन घेतलेत !!
-राजकाशानाचा- एलिमेंटरी भन्नाट आहे. लई आवडला.
-सईचाही छान,प्रसन्नं
-अरुंधतीचे अष्टलक्ष्मी छानच. मला स्तोत्रही माहित नव्हते.
- डॉ कोतापल्ल्यांच्या लेखाबद्दल काय म्हणणार. जबरी. फार छान वाटले त्यांचा लेख अंकात आहे ते पाहुन. दोनदा वाचला.
घंटा डाव्या बाजूला वाजवायची की उजव्या बाजुला, गंधाचा टिळा कपाळावर लावायचा की आणखी कुठे लावायचा, दीप दोनदा ओवाळायचा की चारदा ओवाळायचा असल्या निरर्थक प्रश्नांचा विचार करण्याची ज्यांच्या डोक्याला सवय जडलेली आहे त्या लोकांना करंटे हे एकच नाव शोभून दिसते >>>> !!! जय हो !!!
- नीरजाचा लेख खरंच याच भागात यायला हवा होता.
- आडोच्या लेखाबद्दल आधीच प्रतिक्रिया दिली आहे. मस्तय अगदी.
- गांबारो निप्पोनबद्दलही आधीच प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा पुन्हा वाचावा असा झाला आहे.
आकाशपाळण्यावरील प्रतिक्रियांसाठी अनेकानेक आभार. श्रेय अर्थातच अखिलेशचे आहे. सांगेन त्याला नक्की. धन्यवाद
मुखपृष्ठ नाही आवडले. माफ करा.
कोणताही कलाकार कितीही मोठा
कोणताही कलाकार कितीही मोठा असो. आपल्याला तो यात्रेसारखा घडावा लागतो असे नेहमी वाटते. <<< क्या बात है रैना. यासाठी मोदकांची हजारो ताटं तुला
शाम यांनी सांगितलेली "सण वाढा
शाम यांनी सांगितलेली "सण वाढा सण" ही आठवण मन अस्वस्थ करणारी आहे.
मुक्ता यांची "थांग" अप्रतिम..! शेवटच्या ओळी तर खास..!
सई केसकरांचा "वजन उतरो देवा" ही मस्त आहे. विषेशतः त्यातील विडंबन झक्कास.
स्वप्नाली मठकरांची "तळ्यातली कमळे" ही काल्पनिक कथा सुंदर
स्मिताके चं "डॉक्टर विसरभोळे"
स्मिताके चं "डॉक्टर विसरभोळे" अगदी रटाळ आहे.
अंकाचे अंतरंग नेत्रसुखद.
अंकाचे अंतरंग नेत्रसुखद. हातात घेता आला नाही तरी झुळझुळीत वाटतोय!
पण मुखपृष्ठ नाही आवडले. मजकुराच्या दरम्यान असलेली रेखाचित्रे चौकटीत असल्याने मजकुराशी फटकून वागताहेत असं वाटलं.
कथांबद्दल : चक्र - अरुंधती कुलकर्णी आणि चिलॅक्स मॉम - रुणुझुणू या दोन्ही कथांचा प्रवास अपेक्षित असाच वाटला, तरीही दोन्ही कथा चांगला खुलवल्या आहेत.
वर्तुळ - स्वाती आंबोळे आवडली.
अतीत या कथेच्या लेखकाचे नाव ऋयाम वाचून धक्का बसला!
वळचणीचे पक्षी - मानुषी : यातले सगळे प्रसंग अगदी जिवंत उतरले आहेत.
व्हीलचेअर - सुवर्णमयी : शेवटपर्यंत धरून ठेवते; कथेतल्या माणसांच्या जगण्यातला संथपणासकट.
थांग अथांग
इस रिश्ते को कोई नाम ना दो : पूनम छत्रे आणि टाके - रार : आवडले.
'टाके' मध्ये गुलजारची कविता आणि त्या अनुषंगाने आलेला परिच्छेद त्या कवितेच्या मोहात पडून लिहिलाय का असे वाटले. हा भाग नसता आला तरी लेख परिपूर्ण झाला असता आणि पूर्णत: ओरिजिनल राहिला असता
हा छंद जीवाला लावी पिसे - अमित देसाई : शालेय निबंध वाचल्यासारखे वाटले. ललितलेखन हे स्वत:शी संवाद केल्यासारखे वाटायला हवे असा माझा समज कदाचित चुकीचा असेल. मुद्दे पटवून देण्याच्या आणि गुण मिळवून देणारी सुंदर वाक्ये टाकण्याच्या नादात लेख पसरट झालाय का?
कुसुमाग्रजांच्या ’कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेतली "अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा; किनारा तुला पामराला!" ही प्रसिद्ध ओळ स्वातंत्र्यवीर सावरकरांना कशी काय चिकटली? कोलंबसही काही कमी छंदिष्ट नव्हता!
नभा सावर सावर- सावर : लेखातल्या प्रकाशचित्रांनी कमाल केली आहे.
लहानशा गोष्टी - देवी : आवडला, पटकन संपला की काय असे वाटण्याइतका.
ब्रीफ़केस - अश्विनीमामी : नि:शब्द
मनाच्या श्रीमंत राजाबाई- जयश्री अंबासकर, ऐका ऐका हो शंकरा - नीधप,
नाती-खगोलशास्त्रीय - अश्चिग हे आवडले.
दिवाळी संवाद मधल्या दोन्ही
दिवाळी संवाद मधल्या दोन्ही मुलाखती आवडल्या. घाडी कुटुंबाबद्दल माहीत नव्हतं.. अजब जिद्दी आणि सकारात्मक लोक! ग्रेट.
अमॄत बंगचं कौतुक वाटलं.. खरंतर समाजसेवेत आपलं ध्येय शोधणारी दुसरी- तिसरी पिढी असणार्या बंग. आमटे कुटुंबाबद्दल बोलण्याची पात्रता नाही, इतकं परत एकदा उमजलं.
पण मिताली जगताप ची मुलाखत तितकी आवडली नाही. माफ करा पण टिपीकल प्र्श्नोत्तरे वाटली.. त्यातुन दोन भागात टाकण्याइतपत कंटेंट आहे असे वाटले नाही... बरे इतक्या सगळ्यात ज्या भुमिकेसाठी तिला पुरस्कार मिळालाय त्याबद्दल, त्या पूर्ण सिनेमाबद्दल फारच कमी प्रश्न.
थांग अथांग मधली ब्रीफकेस, नभा सावर सावर आणि टाके मस्तच..अवकाशातली नाती झक्कास!
अंतर्नाद हा विगात सगळ्यात वाचनीय आहे याला अनुमोदन. आकाशपाळणा, सण वाढा सण.. फार आवडले.
मानुषीची वळचणीचे पक्षी,
मानुषीची वळचणीचे पक्षी, दिनेशदांची मानसकन्या, वैभव जोशींचे लेखन छान झाले आहे. अजुन बाकीचे वाचायचे बाकी आहे.
Pages