हितगुज दिवाळी अंक २०११ - अभिप्राय

Submitted by संपादक on 25 October, 2011 - 20:16

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०११ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
***********************************************
हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).
***********************************************
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

ओय बेफिकिर.................... स्टॉप स्टॉप. प्लीज. विनंती.

आपण प्रत्येक साहित्यकृतीसाठी एक असा प्रतिसाद देणार आहात काय? फार त्रास होणार नसल्यास कृपया एका पोस्टीत देणार का?

नको आता नका करु संपादित. इथुन पुढे...
दोन पानं तुमच्याच अभिप्रायाची होतील नाहीतर.
नियम नाहीये हा.. just विनंती.
धन्यवाद हो.

मुट्यांना जोरदार अनुमोदन. प्रत्येक लेखाला वेगळा प्रतिसाद द्यायची सोय करा बॉ.

कथा वाचायला सुरवात केलीये..

स्वाती ची वर्तुळ आवडली.. लगेचच पुढे काही वाचावसं वाटतही नाहीये.. थोड्या ब्रेकनंतर पुढे वाचणार.

अंक छान आहे. पण रंगसंगती थोssडी ड्ल वाटतेय..

> स्वसंपादीत
अनुमोदन! Proud :काहिही:

ओ बेफिकीर , परत लिहा कि काय लिहीलं होतंत ते Happy
एका पोस्टीत Happy

बरा आहेस ना रे ऋयामा Proud

अ‍ॅडमिन, मुख्यपृष्ठाबरोबरच नवीन लेखनाच्या पानावर आणि/ किंवा उजव्या बाजूला दिवाळी अंकाची लिंक असूदेत प्लीज.

वाचतोय..

स्वसंपादीत चा अर्थबोधच होईना लवकर...

आधी वाटले हा अंक कुणी संपादित केला त्याच्या श्रेयावरून इथं काही पेटलंय कि काय ... पण नंतर शेवटचे प्रतिसाद पुन्हा वाचले आणि शंका फिटल्या Proud

थांग-अथांग - बराचसा विभाग संपवला...
सगळेच चांगले आहे.
नात्यातील सुसंवाद आणि विसंवाद अजिबात आवडले नाही. एकांगी वाटले.

टाके, विरंगुळा, ब्रीफकेस, राजाबाई हे विशेष आवडले.
पण सगळ्यात जास्त आवडले ते नाती खगोलशास्त्रातील. अखेर आश्चिगने आम्हा सामान्यांना समजेल असे आणि तसूभरही इंटरेस्ट कमी होणार नाही असे लिहायचे जमवलेच. इस मेहरबानी के लिये आपका बहोत बहोत शुक्रिया जनाब! Happy पण खरंच हा लेख फार म्हणजे फारच छान आहे.

अंतर्नाद विभाग हा सगळ्यात उत्तम आहे माझ्यामते. अगदी निवडक निवडक बेस्टेस्ट लिखाण.. Happy
सण वाढा सण आणि गांबारो निप्पोन हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या अर्थाने खाडकन चपराक ओढणारे.
सण वाढा सण मधे कुठल्याही जहरी द्वेषपूर्ण भाषेशिवाय सहजपणे केलेले वर्णन फार जास्त परिणामकारक ठरते आणि डोळ्यात अंजनच.
एलेमेंटरी माय डियर.. हे शीर्षक इतके भन्नाट (होम्सप्रेमींसाठी) की मी या विभागात पहिले तेच वाचले. राजकाशाना तुस्सी धम्माल हो. मज्जा आली.
जिवर्नीची बाग, वजन उतरो देवा, अष्टलक्ष्मींचा लेख आवडले.
सई, >>आपण लहान असताना आई-बाबा काय करतील ते सांगता येत नाही. आपण बोलायला लागेपर्यंत आपला त्यांच्यावर काहीच कंट्रोल नसतो. << हे भारी आहे. Lol
साद देती हिमशिखरे... डोळ्यांचे पारणे फिटले. हिमालय, गंगा मैय्या फारच बोलावू लागलीये Happy
नागनाथ कोतापल्ल्यांचा लेख आपल्या दिवाळी अंकात आल्याबद्दल मायबोली दिवाळी अंकाचे अभिनंदन. उत्कृष्ट लेख.
आकाशपाळण्याची गोष्ट... मस्त मस्त मस्त. अखिलेशको मिलना पडेगा Happy

अजून वाचन सुरु आहेच. "ब्रीफकेस" आवडली! मस्त लिहीलीये मामी. आकाशपाळणा पण खुप आवडली. जरा हटके वाटली. Happy

दर्जेदार अंक दिल्याबद्दल संपादक मंडळ आणि संबंधितांचे अभिनंदन !!
वर्तुळ - मस्त ! स्वातीच्या लेखाचे नेहमीचे वैशिष्ट्य - सूक्ष्म बारकाव्यानिशी उभी केलेली व्यक्तिचित्रे - कथा अगदी जिवंत समोर उभी राहिली.
चक्र- सगळीच ग्रे- डार्क कॅरॅक्टर्स पण कथा अगदी खरी वाटली, पाहिलेले असतात असले नमुने!
टाके - अप्रतिम! खर तर टाके, वीण, धागे ही अगदी "क्लीशे" मेटॅफर्स असली तरी इथे अगदी चपखल बसलीयत की बस्स! फार मस्त जमलाय लेख!
सण वाढा सण - थेट भिडणारं लिखाण, वर नी म्हणतेय त्याप्रमाणे कसल्याही निगेटिविटीशिवाय लिहिलेले असले तरी ते वास्तव तेवढेच परिणामकारक ठरलेय.
राजकाशानाचा 'एलिमेन्टरी..' पण खूप आवडला. हलका फुलका लेख, बाकीच्या गंभीर लिखणावर पर्फेक्ट उतारा!!
उरलेली प्रतिक्रिया बाकीचे वाचून झाल्यावर ... Happy

Pages