Submitted by संपादक on 25 October, 2011 - 20:16
मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०११ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
***********************************************
हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).
***********************************************
-संपादक मंडळ
Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution
विषय:
Groups audience:
शेअर करा
टेंप्लेट बाळबोध आहे ह्याकरता
टेंप्लेट बाळबोध आहे ह्याकरता अनुमोदन. मला मुखपृष्ठही आवडले नाही. फार जुनाट वाटलं. पण हाताळायला सोप्पा वाटतोय.
अंक बघीतला. फारच सुंदर. थिम
अंक बघीतला. फारच सुंदर.
थिम आवडली.
दोन पक्षी आपसात "हितगुज" करीत आहेत, हे विशेष भावले.
विविध विषयाची हाताळणी आणि वेगवेगळे साहित्यप्रकार समाविष्ठ असल्याने परिपूर्ण दिवाळी अंक वाटत आहे.
श्रेयनामावली मधील सर्वांचेच अभिनंदन.
मात्र प्रत्येक साहित्यकृतीखाली स्वतंत्र प्रतिसाद लिहायची सोय असती तर बरे झाले असते, असे वाटते.
संपादकीय वाचले. बाकी अंक वाचल्यावर यथावकाश स्पष्ट प्रतिसाद लिहिनच.
“प्रत्येक साहित्यकृतीखाली
“प्रत्येक साहित्यकृतीखाली स्वतंत्र प्रतिसाद लिहायची सोय असती तर बरे झाले असते” >>>>
गंगाधरजी मुटे यांच्या या मताशी सहमत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
मी कविता विभाग वाचला. प्रतिसाद खालील प्रमाणे :------
एक क्षण ---- नचिकेत जोशी
कवितेतला प्रत्येक ’एक....’ आवडला.
या ओळी अधिक आवडल्या.
“एक शब्द ओळीमधला
चुकून जगण्यामध्ये आला
एक क्षण जगण्यामधला
फुटून ओळीमध्ये गेला”
--------------------------------------
अतर्क्य ---- गिरीश कुलकर्णी
बर्याचदा मुक्तछंदात लिहिणारे गिरीशजी,
छंदबद्ध कवितेत देखील तितकेच फुललले पाहून आनंद झाला.
कवितेतील या ओळी अधिक आवडल्या.
“आयुष्याच्या गर्तेत कुणी आळसावतो..कुणी मस्तीत आहे
कुणी आठवांच्या...कुणी आसवांच्या दहशतीत जगतो आहे”
---------------------------------------
तुझी आठवण ---- क्रांति
शेवटच्या ओळींमध्ये कवितेने एक वेगळीच उंची गाठणं
ही क्रांतींची शैली या कवितेत देखील जाणवली.
कवितेतील या ओळी अधिक आवडल्या.
“तुझ्याचसाठी कातरवेळी
अजुन बरसतो नयनी श्रावण”
----------------------------------
सल ---- बागेश्री
थोडक्यात मोठा आशय देण्याची ’बागेश्री स्टाइल’
या कवितेत देखील दिसली.
शेवटच्या २ ओळी खूप काही सांगणार्या.
------------------------
दोनुली ---- विनीता देशपांडे
’दोनुली’ या काव्यप्रकाराबद्दल मला आजच समजलं.
(माझं वाचन खूपच तोकडं असल्यामुळे असेल कदाचित)
पण या कवितांमधून उलगडलेला आशय,
हळूहळू ’दोनुली’ ची संकल्पना स्पष्ट करत गेला.
------------------------
काजळ ---- उमेश कोठीकर
काळ्या काजळाच्या विविध रंगछटा
खुपच खुलून आल्यात.
कवितेतील या ओळी अधिक आवडल्या.
“डोळ्यांमधल्या वाटेवरूनी, कुठे साजणा? पुसते काजळ
विरहामध्ये वाट पाहता, अबोध वेडे; रूसते काजळ”
------------------------------
तू सामोरी ---- जयन्ता५२
अगदी सहज आणि प्रवाही अशी कविता.
कवितेतील या ओळी अधिक आवडल्या.
“संयमाने वागते काळीज माझे एरव्ही, पण
या क्षणी त्या संयमाचा वाटतो अडसर कशाला?”
"ही अचानक भेट पण कां वाटते ठरवून झाली?"
ह्या जगाच्या चौकशांना द्यायचे उत्तर कशाला?”
-----------------------------
कोरभर चंद्रासाठी ---- zaad
कवितेतील या ओळी अधिक आवडल्या.
“पाण्याने तहानच वाढावी तसा पडून राहिलो होतो नुसता”
“तुझे पुन्हा हवे आहे जुने हसू ओठभर
कोरभर चंद्रासाठी तुझे होणे सैरभैर”
-----------------------------
चार भिंतींना ... ---- सुप्रिया जाधव
गझलेतील या द्वीपदी अधिक आवडल्या.
“सद-विचारांची कितीही मंथने केली तरी...
सूर ना जुळता स्वतःशी गुण-गुणावे लागते!”
“सात फेरे मारल्याने प्रेम का जडते 'प्रिया'?
योग्य साथी लाभण्या 'युग-युग' झुरावे लागते!”
-----------------------------
हात घसरतो आहे ---- गंगाधर मुटे
गझलेतील या द्वीपदी अधिक आवडल्या
“कुटाळकीच्या समोर सज्जन समाज सारा हरून गेला
तसाच मीही क्रमाक्रमाने सदैव खातोच मात आहे”
“खुशाल करती टवाळखोरी बघून कोणास पाठमोरा
समोर येता मुखावरी मुख हसून हॅलो प्रघात आहे”
---------------------------------
अर्घ्य ---- हेमांगी
श्वासांचं अर्घ्य ही संकल्पना वेगळीच वाटली.
कवितेतील या ओळी अधिक आवडल्या.
“इच्छा अनिच्छांची मिठी, वैराग्य नागडे उघडे
कल्लोळात विस्मयाच्या विरक्त एकांत सापडे”
-------------------------------
'गुलमोहर'च्या पानावर दिसते
'गुलमोहर'च्या पानावर दिसते त्याप्रमाणे नविन लेखन या पानावर नेव्हीगेशन देता आले तर सोईस्कर ठरावे...
दिवाळी अंक वरवर चाळला. खूप
दिवाळी अंक वरवर चाळला. खूप मेहनत घेतलेल्यांचे अभिनंदन !
वाचल्यानंतर अभिप्राय देतो.
सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा !!!
ही फक्त पोच. वाचून नंतर
ही फक्त पोच. वाचून नंतर प्रतिसाद. वेळोवेळी देईन.
अवल, व्हिडिओ छान झालाय. जरा
अवल, व्हिडिओ छान झालाय. जरा अमॅच्युअर आहे पण तरी आवडला, थोडा एडिट करता आला असता. कॉमेन्टरी पण मस्त.
'पणती...' आवडले! सगळ्या कडव्यांत 'अंधार..' नसता तर बरे झाले असते. गीत छान झाले आहे.
श्यामली, कविता आणि वाचन आवडले, पण मला ते गीत असेल असे वाटले होते.
मस्त दिसतोय अंक.... भरगच्च
मस्त दिसतोय अंक.... भरगच्च ... वाचून प्रतिक्रिया देईन ...
सर्व सहभागी मायबोलीकरांचे अभिनंदन...
ओ राजकाशाना, मिसेस हडसन
ओ राजकाशाना, मिसेस हडसन नऊवारीत नको हो. केकता कपूरच्या सिरियलसारखी मॉडर्न दाखवा म्हणजे डिझायनर साडी, भरगच्च दागिने, हेवी मेकप वगैरे दाखवायला वाव मिळेल. हवं तर कसम्ह से या मालिकेचे भाग नजरेखालून घाला.
>>हवं तर कसम्ह से या मालिकेचे
>>हवं तर कसम्ह से या मालिकेचे भाग नजरेखालून घाला.>>
हवं तर लेख मागे घेतो पण मालिका बघायला सांगू नका प्लीज!
रैना, अप्रतिम मुलाखत.
रैना, अप्रतिम मुलाखत. मुलाखतीची कल्पना, त्यादरम्यानच्या तू सोडलेल्या मोकळ्या जागा, तुझ्या कमेंट्स, एकूण विषयाचा आवाका जाणवून देणे... सगळेच फार फार सुरेख. मज्जा आली वाचायला.
रैनाचा आकाशपाळणा प्रचंड
रैनाचा आकाशपाळणा प्रचंड आवडला. छोट्याछोट्या प्रश्नातुन काय छान उत्तरे मिळवली आहेत. त्या न पाहिलेल्या (आता पाहिला असेच वाटते आहे) अखिलेशला शुभेच्छा.
बाकी वाचत आहे.
धन्यवाद दिवाळी अंक टीम! अंक
धन्यवाद दिवाळी अंक टीम! अंक नेहमीप्रमाणे झकास असणार याची खात्री आहे. आता सावकाशीने वाचेन चकल्या खात.
कथा विभाग अतिशय आवडला. चक्र,
कथा विभाग अतिशय आवडला. चक्र, झाड , वर्तुळ, वळचणीचे पक्षी विशेष आवडल्या.
सुंदर अंक. आतापर्यंत वाचलेलं
सुंदर अंक. आतापर्यंत वाचलेलं जवळजवळा सगळच आवडलं.
टेंप्लेट चा बाळबोध पणा हा बाकिच्यांनी लिहेपर्यंत मल तर अजिबातच जाणवला नाही (आहेच मी जरा आर्टिस्टिकली/एस्थेटिकली चॅलेन्ज्ड). वरच्या पक्षी आणि कंदिलाकडे तर माझी नजरच गेली नाही.
रैनाची मुलाखत फारच अभिनव.
थांग-अथांग मध्ये पूनम, RAR, जयवी, अश्विनीमामी, संघमित्रा याचे लेख विशेष आवडले.
अजून कथाकथी /अंतर्नाद पूर्ण वाचून नाही झालं.
अंतर्नाद सुंदर आहे. सण वाढा सण - ह्या प्रकारबद्दल अजिबातच महिती नव्हती..अजूनही चलतो का भयाण प्रकार?
जपानबद्दलचा लेख फारच वेगेळ कही शिकवणारा, असा लेख भारताबद्दल लिहिला जाउ शकेल तो सुदिन(म्हणजे त्यासाठी नैसर्गिक आपत्ती याव्या असा याचा अर्थ नाही, प्लीज नोट)
एलिमेंटरी...धमाल आहे.
सई, लेख मस्त पण त्या वजनाच्या चिंतेतून बाहेर या की हो ताई. मला थांग-अथांग मध्ये तुझं कहितरी वाचायला आवडलं असतं.
स्वातीची गोष्ट मी सर्वात प्रथम वाचली होती पण अपेक्षा जास्त होत्या बहुदा माझ्या, मजा नही आया. नाव मात्र चपखल , वर कोणीतरी म्हटलच आहे ते.
मी ही चाळला. संपूर्ण वाचेनच
मी ही चाळला. संपूर्ण वाचेनच नंतर.
मस्तच झालाय अंक!! रैना, सई,
मस्तच झालाय अंक!!
रैना, सई, राजकाशाना, अश्विनीमामी या सर्वांचे लेख खूप आवडले. पौर्णिमाची कथाही आवडली..
नंतर अभिप्राय लिहीन उरलेले वाचून..
फारसा फरक पडत नाही, पण सजावट अजुन चांगली झाली असती..
अंक सुंदर दिसतोय निवांत
अंक सुंदर दिसतोय
निवांत वाचून अभिप्राय देईनच.
संपादक मंडळाचे आभार!! अंक खूप
संपादक मंडळाचे आभार!! अंक खूप सुंदर झालाय. आर्टवर्क छान आहे.

ही कोमेंट न्यू जर्सीतून!!
सर्वांना दिवाळीच्या शुभेछा!
आत्तापर्यंत हे वाचून
आत्तापर्यंत हे वाचून झाले
रैनाचे आकाशपाळणा - अखिलेशशी केलेली बातचित आवडली. त्याने प्रामाणिकपणे दिलेली उत्तरं फार आवडली. तिने मनातले बाकीचे प्रश्नही विचारायला हवे होते. अनकट व्हर्जनही वाचायला आवडेल. अखिलेशचे पायरेटेड पुस्तकाबद्दलचे विचार आणि खूप वाचता येत नाही अत्री लोक पुस्तके विकतात वाचून मला "शोर इन द सिटी" आठवला.
मंजिरी - गांबारो निप्पोन - खर तर हे वाचून एकदम खूप भारावून जायला होते.
राजकाशनाचे एलीमेंटरी माय डीअर - मस्त टाइमपास
स्वातीची वर्तुळ - तिच्या लेखनात मनातील भावभावनांचे चढउतार नेहमी खूप सुरेख दाखवलेले असतात तसे या कथेत जाणवले नाही किंवा कथानकाची तशी गरज नसेल. तिच्या कथेकडून माझ्या जास्त अपेक्षा होत्या.
साजिरा - झाड - छान
सई केसकर - वजन उतरो देवा - लेखन अपेक्षेपेक्षा फारच छोटे निघाले. लेखाची आत्ता कुठे सुरुवात होतेय असे वाटेपर्यंत लेख संपला होता
अंकाचे नेव्हिगेशन सोपे ठेवले आहे ते आवडले.
बाकीचा प्रतिसाद अजून अंक वाचल्यानंतर
@ राज अफलातून लेख.
@ राज
अफलातून लेख.
कथाकथीने निराशा झाली. आता
कथाकथीने निराशा झाली. आता थांग अथांग वाचतो.
@रूनी, आय अग्री! मी हा लेख
@रूनी, आय अग्री!
मी हा लेख घाईत केला.
मायबोली दिवाळी अंक काल
मायबोली दिवाळी अंक काल वाचायला सुरवात केली .पहिल्याच दिवशी कथाकथी मध्ये अरुंधतीची चक्र,स्वातीची वर्तुळ आणि थांग अथांग मध्ये पूनम ची इस रीस्तेको ....... आणि दिनेशदा ची मानसकन्या वाचली.
अंक खूपच छान दिसतोय . दिवाळीच्या निमित्ताने इतका श्रवणीय आणि वाचनीय फराळ दिल्याबद्दल संपादक मंडळ , आणि सर्व सहभागी मायबोलीकरांना खुप खुप धन्यवाद .:)
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
स्वसंपादीत
Pages