निशा काळे

Submitted by pradyumnasantu on 21 October, 2011 - 18:04

तू माझी निशा
अंगात एकशेदोन ताप होता
तरीही उन्हात भटकणारा
तो एक बाप होता
बायकोनं सोडलेलं.....
घर असं मोडलेलं
पदरात शाळा शिकत्यालं पोर
आनि वय वाढत्याली प्वार
पन काळीज आनि हिम्मत डोंगरावाणी
आत्ता समोर होती त्याची लाडकी काळू राणी
तिला लाडानं म्हणायचा तो काली माया
तिची तुकतुकीत काळीशार काया
खुणाऊन करू लागली इशारा
तवा उंचावून भुवया म्हणाला म्हातारा
आता वाजले की बारा
मला जाऊदे गं घरा
ह्यो धंदा न्हाई बरा
त्यो बग अग्निपतच्या पोस्टरवर नारळगाडीवाला मिथुन
निघालाय नीलमकडं नटून
आन माज्या नशिबी तू निशा काळे
भर उन्हात करतेस चाळे
कसलं गं ते तुझ्या चेह-यावरचं जंजाळ
हात लावावं तर करतंय रक्तबंबाळ
बोटाबोटाला लागलाय तुझा काटा
कुठून नशिबाला आलाय ह्यो पापाचा वाटा
आन आता ह्यो सूर्व्या तुला तापिवतोय
म्या फुकाच रगत आटीवतोय
आता करू तरी काय, देवाची करणी
तू तरी बये एका म्हयन्याची पावणी
फुडच्या म्हयन्यात मी नक्कीच आननार गोरी राणी
बगितलास का त्यो सरबतगाडीवाला कसा बगतोय रोखून
शारोख-कान बी जातोय म्हणं तिथं कोकम झोकून
तू जा बाई जा आता लवकर
दे बाई मिळवून निदान आज सांजची भाकर.....

समदी खट्पट पोरांसाठी
शिक्शाण आणि शादीपाठी
पै पैसा जोडताना मोडुन गेलाय बिचारा
उन्हातान्हात कष्ट करून
लवकर झाला्य म्हातारा
विचार करता करता पोटात कळ आली
आपोआप खिशातून बाटली बाहेर निघाली
एका घोटात पुन्हा वाढले बळ
आणि तो ओरडला
जूनचा म्हैना
खायाला फैना
योकच म्हैना
जांभळ.........
तुमचं आमचं मुळीच न्हाई वांदं
खावा माजी सुरमाट करवांदं...

गुलमोहर: 
शब्दखुणा: