हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्

हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.

स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.

"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.

हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"

आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.

स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.

"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.

आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.

आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?

ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे

आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....

"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही

'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -

हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत

हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......

कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.

हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.

संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे

त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.

आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....

"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.

राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...

माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे

वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!

त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!

जय हिंद !

विशाल कुलकर्णी

संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

>>> बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी... अजून स्वातंत्र्य मिळालेलेदेखील नव्हते आणि त्याच्याअधीच १९३९ सालीच इतर धर्मियाना नागरिकत्वाचेही अधिकार द्यायचे नाहीत , म्हणून यांचा कांगावाही चालू झालेला होता !

तुम्ही हे पुस्तक पूर्णपणे वाचले आहे का? पूर्ण पुस्तक न वाचता अधलीमधली २-४, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, वाक्ये देऊन टीका आणि कांगावा करणे, ह्यालाच म्हणतात, "बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी" Light 1

गोबेल्स नीति, गोबेल्स नीति म्हणतात ती हीच ! Sad

आधी स्वतः पूर्ण पुस्तक वाचा आणि मग बोला. उगाच एन राम, सीताराम येचुरी, मणि शंकर अय्यर यांच्यासारखे निधर्मांध जे तारे तोडतात, त्याची री ओढू नका व त्यावरून स्वत:ची मते ठरवू नका.

सावरकरांनी अंदमानला तुरूंगात असताना शिवाजी महाराजांच्या चरित्रातून स्फूर्ती घेऊन ब्रिटिशांना एक पत्र लिहिले होते. तुरूंगात खितपत पडण्यापेक्षा, तुरूंगातून काही तरी कारणाने स्वत:ची सुटका करून घेऊन देशातून परांगदा होऊन इतर देशात जाऊन सशस्त्र स्वातंत्र्यलढा लढावा, अशी त्यांची मनिषा होती. शहाजी महाराजांना आदिलशहाने तुरूंगात टाकल्यावर त्याच्यावर दबाव आणण्यासाठी, आपण तुमची चाकरी करण्यास तयार आहोत, असे एक पत्र शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिले होते. ते खरे तर नाटकच होते. त्या पत्रामुळे भारावून जाऊन औरंगजेबाने आदिलशहाला दमदाटी करून शहाजी महाराजांना सोडायला लावले. त्यांच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला धुडकावून लावले. हा संपूर्ण संदर्भ सावरकरांच्या पत्रामागे होता व हेतू तोच होता.

परंतु हा येचुरी व मण्या अय्यर या पत्राचा उल्लेख करून व त्यामागचा संदर्भ न देता सावरकर हे ब्रिटिशांचे हस्तक होते, असा खोटा प्रचार करत असतात. या पत्रामागचे संपूर्ण संदर्भ लक्षात न घेता त्यांचा हा कांगावा सुरू असतो. वास्तविक सावरकर हे ब्रिटिशांचे हस्तक असते तर त्यांनी हे पत्र वाचून १९११ मध्येच त्यांना तुरूंगातून सोडले असते. पण सावरकरांची सुटका १९२४ मध्ये झाली. ब्रिटिश त्यांच्या पत्राने फसले नाहीत. ते औरंगजेबासारखे मठ्ठ नव्हते. त्यांनी सावरकरांची योजना वेळीच ओळखली होती.

तसेच, गोळवलकर गुरूजींच्या या २-४ वाक्यांच्या मागचे-पुढचे संदर्भ लक्षात न घेता स्वत:ची मते बनवू नका. स्वत:ची सारासारविवेकबुध्दि वापरा. Light 1

ब्रिटिश त्यांच्या पत्राने फसले नाहीत. ते औरंगजेबासारखे मठ्ठ नव्हते.
----- ब्रिटिश पत्राने फसले जरुर नाही. पण स्वार्थी राजकारणी लोकं तो संदर्भ जाणते पणी दिशाभुल करण्यासाठी वापरतात. सावरकरांना ब्रिटिशांनी अंदमानला पाठवले होते. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती. भारतातल्याच कुठल्या तुरुंगात आरामात अ दर्जा मिळालेला नव्हता. ह्यातच त्यांच्या कार्याची पोच पावती मिळते.

औरंगजेब पण मट्ठ नव्हता... तो खुप दुरवर विचार करणारा, चतुर राजकारणी होता. त्याने आदिलशहाला धमकावले नसावे. पण महाराजांच्या पत्रानेच व्हायला हवा तो परिणाम झाला. मोंगलांच्या सरदाराला आदिलशहा अटकेत ठेवते असे चित्र निर्माण झाले असते.

काहो, आता हिंदू धर्माप्रमाणे दिवाळी येणार. मग हे हिंदू धर्माला नावे ठेवणारे लोक फराळाचे पदार्थ हादडणार का? सुट्टी घेऊन घरी बसणार का?
की आपले लोकांप्रमाणे करंजीने भरल्या तोंडाने, नि डाव्या हातात लाडू घेऊन, दिवाळी कशी वाईट असे लिहीणार?
असेच असतात हे लोक. स्वार्थी, ढोंगी. उगाच आपले लिहायला मिळते म्हणून काहीतरी लिहायचे!! खोटे बोलायची लाज नाही.

गोबेल्स नीति, गोबेल्स नीति म्हणतात ती हीच
कुठला गोबेल्स नि कुठली नीति हो!
फार अक्कलवान होता तो! यांना दीडदमडीची अक्कल नाही, संदर्भ काय ते समजत नाही. नीति चा नि यांचा दुरून सुद्धा संबंध नाही! दारुड्याचे बरळणे, नि कुत्र्याचे भुंकणे अश्या गोष्टींशी यांची तुलना करा, गोबेल्सच काय, अदिलशहा, औरंगजेब वगैरे सुद्धा काही ना काही लायकीचे होते. हे लोक तद्दन नालायक, निरुपयोगी!! नुसते भुंकत सुटायचे.

>>> मग हे हिंदू धर्माला नावे ठेवणारे लोक फराळाचे पदार्थ हादडणार का? सुट्टी घेऊन घरी बसणार का? की आपले लोकांप्रमाणे करंजीने भरल्या तोंडाने, नि डाव्या हातात लाडू घेऊन, दिवाळी कशी वाईट असे लिहीणार?

Biggrin

सावरकरांनी अंदमानला तुरूंगात असताना शिवाजी महाराजांच्या चरित्रातून स्फूर्ती घेऊन ब्रिटिशांना एक पत्र लिहिले होते

आता त्या पत्राचा आणि मी जे लिहिले त्याचा काडीमात्र तरी संबंध आहे का? उगाच काहीतरी मुद्दे कशाला मांडताय? हिटलरची जशी ज्युबाबत हीन भावना होती तशीच भावना या हिंदुत्ववादी नेत्यांची मुस्लिम ख्रिस्चनबाबत होती, एवढाच मुद्दा आहे, आणि तो हिंदुत्ववाद्यानी कितीही नाकारला तरी खराच आहे... असं कुणीतरी सोमागोमा कुठली तरी व्याख्या करुन इतर धर्मियाना वगळू शकत नाही, एवढी अक्कल हिंदुत्ववाद्याना आली तरी पुष्कळ झालं.

It is only in case they refused this first loyalty to India that he provided for a second-best option of staying within the country in a kind of Zimmi status, without citizen's rights.

माणूस एक तर देशाचा नागरिक असतो किंवा नसतो.. धर्माच्या आधारावर असे एखाद्याला त्रिशंकू स्टेटस देण्याचा प्रयत्न कुणीही उपटसुंभ करु शकत नाही.. ते कायद्याच्या विरोधात आहे...

special safeguards of the communal character (in recruitment of teachers and students, in the contents of the curriculum) of Christian and Muslims schools all while retaining their subsidies, which are denied to Hindu denominational schools (Art. 30 of the Constitution);

हिंदुत्ववादी हा कोळसा किती वेळा उगाळणार आहेत ते त्यानाच ठाऊक... मुस्लिम आणि ख्रिश्चन धार्मिक शाळेत सर्व मुस्लिम ख्रिश्चनाना सारखा प्रवेश असतो.. पण हिंदुंच्या धर्म -शाळेत फक्त ब्राहमणाना प्रवेश असतो, ज्यांची लोक्संख्या ३ टक्केही नाही... सर्व हिंदुना जातीभेद न बाळगता धर्म शिक्षण देनारी शाळा जर हिंदुत्ववाद्यानी काढली तर सरकार त्याना नक्कीच अनुदान देईल... १०००० वर्षात अशी शाळा स्वतःच्या देशात काढणं हे हिंदुत्ववाद्याना जमलं नाही.. मुस्लिम, ख्रिश्चनानी मात्र दुसर्‍या देशात जाऊन, जातीभेद विरहीत धर्म घडवून तिथे शाळा काढून सर्वाना धर्म शिक्षण देऊन दाखवले..... हिंदुत्ववादी याबाबत या धर्माच्या पासंगालाही पुरणार नाहीत आणि एक दिवस आपल्याच देशात हे अल्पसंख्यांक म्हणून आणि अडगळीच्या स्वरुपात रहातील.

However, from his fairly copious writings, public statements and interview transcripts during his term at the head of the RSS (1940-73), no indication of such Hitlerian sympathies has ever been quoted.

एकदाच हिटलर आणि ज्यु कत्तल बद्दल लिहिले आणि पुस्तकावर बंदीच आली.... लेखक म्हणून दुसर्‍याच्व्हे नाव पुढे करुन स्वतःची कातडी बचावून घेतली... आता एवढे तोंड पोळल्यावर पुन्हा आयुश्य्यत कशाला असलं लिहिआयला जातील? Proud

>>>>> सावरकरांनी अंदमानला तुरूंगात असताना शिवाजी महाराजांच्या चरित्रातून स्फूर्ती घेऊन ब्रिटिशांना एक पत्र लिहिले होते >>> आता त्या पत्राचा आणि मी जे लिहिले त्याचा काडीमात्र तरी संबंध आहे का?

संबंध आहे. मागचे-पुढचे, आजू-बाजूचे संदर्भ व कॉन्टेक्स्ट सोडून फक्त एका ठराविक मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले की विचार व लेखणी कशी भरकटत व चुकीच्या मार्गाने जाते, हे सांगण्यासाठी मी ते उदाहरण दिले. गोळवलकर गुरूजींचे संपूर्ण पुस्तक न वाचता व त्यामागचे कोणतेही संदर्भ लक्षात न घेता (किंवा जाणूनबुजून त्या संदर्भांकडे दुर्लक्ष करून), त्यांची २-३ वाक्ये उचलून तुम्ही विनाकारण त्यांच्यावर गरळ ओकली. त्यामागे हीच चुकीची विचारसरणी व पूर्वग्रह कारणीभूत आहे.

>>> हिटलरची जशी ज्युबाबत हीन भावना होती तशीच भावना या हिंदुत्ववादी नेत्यांची मुस्लिम ख्रिस्चनबाबत होती, एवढाच मुद्दा आहे, आणि तो हिंदुत्ववाद्यानी कितीही नाकारला तरी खराच आहे...

आणि कोणी कितीही पुरावे देऊन अशा खोटारड्या मुद्द्यांचे खंडन केले तरी, तो खराच आहे असेच निधर्मांध आणि हिंदुद्वेष्टे मानणार!

>>> असं कुणीतरी सोमागोमा कुठली तरी व्याख्या करुन इतर धर्मियाना वगळू शकत नाही, एवढी अक्कल हिंदुत्ववाद्याना आली तरी पुष्कळ झालं.

आपण असा कितीही खोटारडा प्रचार गोबेल्स नीतिने केला तरी त्याचा उपयोग होणार नाही, एवढी अक्कल निधर्मांधांना व हिंदुद्वेष्ट्यांना आली तरी पुष्कळ झालं.

जाऊ दे जामोप्या, तुमच्याकडून असाच प्रतिसाद अपेक्षित होता. गोळवलकर गुरूंजीवर संदर्भ सोडून केलेले तुमचे खोटेनाटे आरोप समूळ व पुराव्यासहीत खोडून काढले, तरी ते कबूल न करता, तुम्ही तुमचे चुकीचे मुद्दे सोडणार नाही, याची मला खात्री होती. गेट वेल सून! Light 1

>>> हिंदुत्ववादी याबाबत या धर्माच्या पासंगालाही पुरणार नाहीत आणि एक दिवस आपल्याच देशात हे अल्पसंख्यांक म्हणून आणि अडगळीच्या स्वरुपात रहातील.

तुम्ही किंवा तुमच्या आगामी अनेक पिढ्यांनी अशी कितीही दु:स्वप्ने पाहिली, तरी असे कधीही होणार नाही. (कावळ्याच्या शापाने . . . ही म्हण ऐकली असेलच!). मुस्लिम, ख्रिश्चन इ. धर्म जन्माला येण्यापूर्वीच्या हजारो वर्षांपासून हा धर्म अस्तित्वात होता व पुढेही राहिल. ज्यांना हा धर्म अडगळ वाटतो त्यांनी इथे राहून, खोटारडे आरोप करून व अडगळीत राहून आत्मवंचना करून घेण्यापेक्षा, आपल्या उन्नतीचा दुसरा चांगला मार्ग शोधावा!

Golwalkar explicitly gave them that option: the Muslims may glorify Hindu culture, and only "otherwise", in case they refuse to identify themselves as Indians rather than as Muslims

भारतातले मुसलमान हे स्वतःला भारतीय म्हणवून घेतातच... त्याना ते हिंदुत्ववाल्यानी सांगायची गरज नाही.

(कावळ्याच्या शापाने . . . ही म्हण ऐकली असेलच!

तुम्ही हिंदु आहात.. कावळ्याचे महत्व मी तुम्हाला शिकवायची गरज नाही ! Proud कावळ्याला हीन लेखू नका नाहीतर दर्भाचा कावळा करावा लागेल ! Proud

>>भारतातले मुसलमान हे स्वतःला भारतीय म्हणवून घेतातच
हे पुर्णपणे खरे असते तर किती छान झाले असते, पण जामोप्या तुम्हीच सांगा हे कितपत खरे आहे ?

valentine-piano.gif

ख्रिश्चन हे भारतीय नाहीत, म्हणून सावरकर म्हणतात.. आणि त्यांचे बंधुराज म्हणतात येशू हा साक्षात कृष्णाचा अवतार होता ! ( क्रांतिरत्न श्री बाबाराव सावरकर यांनी आपल्या ’ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’ या पुस्तकात येशू ख्रिस्त हा हिंदुच होता या विचाराचे जोरदार समर्थन केले आहे. हे पुस्तक 'Jesus the Christ was a Hindu' या नावाने इंग्रजीतही आहे... ) येशू ख्रिस्त हा तमिळी ब्राहमण होता म्हणे! काही पिढ्यांपूर्वी त्याचे पूर्वज भारतातून परदेशात गेले म्हणे ! आणि येशू तमिळी भाषेत बोलत होता म्हणे ! ( पूर्वजानी तर बर्‍याच वर्षापूर्वी भारत सोडलेला, मग येशूला तमिळी भाषा कुठून आली, असे विचारायचे नाही.. बहुदा सावरकरबुवा तमिळी इंग्रजी डिक्शनरी घेऊन त्याला शिकवायला गेले असणार ! Proud )

http://jwalant-hindutw.blogspot.com/2010/03/blog-post_7148.html

http://www.indiadivine.org/audarya/shakti-sadhana/473876-christianiti-ac...

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4...

असलेच गलिच्छ राजकारण करुन बौद्ध धर्म हा हिंदु धर्माचा भाग आहे, बुद्ध म्हणजे विष्नूअचा अवतार, असे बौद्ध धर्माबाबत राजकारण करुन झाले... आणि त्यानंतर ख्रिस्त आणि ख्रिश्चन धर्मालाही हिंदुत्ववाल्यानी सोडले नाही ! धर्मात राजकारण आणि राजकारणात धर्म या गोष्टींपासून हिंदुत्ववादी कधी मुक्ती मिळवणार ते तेच जाणोत ! स्वतःचा धर्म तर बाद केलाच, इतर धर्मानाही सोडले नाही.

बाकी, एका भावाने ख्रिश्चन धर्म हा या देशातलाच नाही आणि ख्रिस्चनाना नागरिकत्वाचा अधिकार नाही, असे म्हणायचे.. आणि दुसर्‍या भावाने मात्र ख्रिस्त म्हणजे कृष्णाचा अवतार असे सांगायचे ! सगळाच येड्यांचा बाजार !

आणि हो, भविष्यपुराणातही येशूने शालिवाहन राजाला दर्शन दिल्याचा आणि आपले नाव इशामसिह असे सांगितल्याचा उल्लेख आहे म्हणे ! Proud पैगंबर, येशू हे विष्णू-कृष्ण यांचेच अवतार असल्याचे भविष्यपुराणात असूनही स्वातंत्रवीर सावरकर मात्र त्या धर्मियाना वेगळे मानतात ! Proud

जामोप्या, अहो १९३९ नि सावरकर असल्या जुन्या गोष्टी का उगाळत बसला आहात? ज्यांना सावरकरांचे पटते त्यांना तसे म्हणू दे, तुम्हाला नसेल पटत तर तसे म्हणा. आनि हिटलरचे जे मत ज्यू लोकांविरूद्ध होते त्याला कारणे होती पण ती आता कुणि बोलू शकत नाहीत. कारण जसे मुसलमानांच्या विरुद्ध बोलले की ते अतिरेकी कारवाया करतात, अगदी तश्शाच अतिरेकी गोष्टी ज्यू लोक जगाच्या अर्थव्यवस्थेत करतात, म्हणून. अगदी काही शस्त्रात्रेच घेऊन लोकांना मारायला नको, इतर प्रकारांनी त्यांचे तोंड बंद करता येते.

हिंदुत्व वादी नुसतेच बरेच काही काही बोलतात, काही करण्याचे सामर्थ्य नाही त्यांच्यात. एका गोडसेने काही केले तर ब्राह्मणांची अशी कत्तल केली की पुनः त्यांनी वर तोंड काढू नये! त्यालाहि भेकड म्हंटले इथे कुणितरी .

आज तर कसाब नि अफजल गुरु यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली तरी ते केवळ मुसलमान आहेत म्हणून त्यांना फाशी दिली जात नाही. हिंदुत्ववादी, भारतवादी लोक कितीहि ओरडेनात का! ताकद नाही त्यांच्यात.

राजकारणात ब्राह्मण नाहीत, दलितांना आरक्षण असे सगळे चांगलेच होते आहे ना!! खुद्द पंतप्रधानांनी जाहीर केले की या देशाच्या संपत्तीवर मुसलमानांचा हक्क प्रथम पोचतो. मग बाकीचे काय म्हणतात याला काय मह्त्व आहे? निदान भारतात तरी पंतप्रधानांच्या बोलण्याला महत्व आहे ना? साक्षात् सोनिया त्यांच्या मुखाने बोलते, ती ख्रिश्चन नि इटालियन. मग कुठे उरले हिंदुत्ववाद्यांचे महत्व??

आता दिवाळी येते आहे, तुम्ही कितीहि शिव्या दिल्या तरी हे हिंदुत्ववादी तुम्हाला प्रेमाने फराळाचे छान छान पदार्थ खायला देतील. ते यथेच्छ खा, नि पुनः त्यांना नवीन नवीन शिव्या द्यायला या!! त्याच त्याच शिव्या नि तेच तेच ऐकून कंटाळा आला. आता काही नवीन शोध लावा, जसे शून्याचा शोध खरे तर महम्मद पैगंबराने लावला!! तुमच्या अफाट अकलेवर व ज्ञानावर माझा विश्वास आहे, तुम्ही लवकरच असे काही लिहाल अशी अपेक्षा आहे. मग आपण दोघे गंमत बघू, हे हिंदुत्ववादी काय म्हणतात. बोलून चालून तुम्ही नि मी, दोघेहि नुसते धमाल करायला मायबोलीवर येतो, अक्कल कुणालाच नाही!!

झक्की ___/\___

पण हिंदुंच्या धर्म -शाळेत फक्त ब्राहमणाना प्रवेश असतो, ज्यांची लोक्संख्या ३ टक्केही नाही...
----- ब्राह्मणांची लोकसंख्या ३ % तरी आहे का?

सर्व हिंदुना जातीभेद न बाळगता धर्म शिक्षण देनारी शाळा जर हिंदुत्ववाद्यानी काढली तर सरकार त्याना नक्कीच अनुदान देईल... १०००० वर्षात अशी शाळा स्वतःच्या देशात काढणं हे हिंदुत्ववाद्याना जमलं नाही..
----- जामोप्या तुम्ही अशी शाळा काढण्यात पुढाकार का नाही घेत... मी तुमच्या मदतिला येतो. मी अत्यंत गंभीरतेने हे आवाहन करत आहे.

मग तुम्हीच शाळा काढा.. मी येतो नोकरीला ! Happy ( तीन टक्के मी अंदाजे लिहिली आहे..)

भारतातले मुसलमान हे स्वतःला भारतीय म्हणवून घेतातच...
----- यातिलच काही भारतीय लोकं जळगांवी (याच धाग्यावर असा वर उल्लेख आलेला आहे) श्री. मोहम्मद अजमल आमिर इमान ऊर्फ अजमल कसाब यांना आशिर्वाद मिळावा म्हणुन चादर वहाण्यासाठी प्रार्थना करतात.

असेच काही भारतीय लोकं भारत क्रिकेट सामना हरल्यावरच फटाके फोडतांना दिसतांत... आता आनंद व्यक्त करायची आणि भारत हरायची वेळ एकच येते जो निव्वळ योगायोग समजावा.... जामोप्या तुम्ही घटना तज्ञ आहात, आपल्या घटनेत फटाके कधी फोडू नये याबाबत काही नियम आहे का?

असल्या घटना अपवादात्मक असतात.. त्यामुळे संपूर्ण धर्मातील सगळे लोक खराब आहेत, असला निष्कर्स्श काढणे योग्य नव्हे.

ते कधी का फटाके फोडेनात, तुम्ही आता दिवालीला फटाके फोडा.. त्यावर तरी कायद्याने नक्कीच बंदी नाही ! Proud

जामोप्या तुम्ही घटना तज्ञ आहात, आपल्या घटनेत फटाके कधी फोडू नये याबाबत काही नियम आहे का? <<<
Rofl Biggrin Rofl

असल्या घटना अपवादात्मक असतात.. त्यामुळे संपूर्ण धर्मातील सगळे लोक खराब आहेत, असला निष्कर्स्श काढणे योग्य नव्हे.
------ मान्य. मग हाच नियम ३ % लोकांना का नाही लागू होत... ? तेथे (हजारो वर्षांच्या अपयशाचा) दोष देतांना संपुर्ण ३ % समाजालाच दिला जातो. मला सारासार विचार होतो आहे असे नाही वाटत.

जामोप्याजी - चर्चेच्या ओघात माझा अनमोल प्रश्न वाहुन गेला... तुम्ही २०११ साली भारतीय असण्याची व्याख्या कशी कराल? कायद्याने भारताचा पासपोर्ट मिळवता आला म्हणजे भारतीय का निव्वळ भारतांत ज्ञन्म घेतला आहे म्हणुन भारतीय? का अजुन काही क्रांतिकारक व्याख्या (समस्त हिंदूंना वगळुन Happy धर्म निरपेक्ष राष्ट्र) मनात आहे.

हाच नियम ३ % लोकांना का नाही लागू होत... ?

होतो की.. मी कुठे ब्राह्मणाना शिव्या देतोय? पण हिंदुत्वाच्या नावाने इतर धर्मिअयाना नाकारणे आणि कारण नसताना त्या धर्मांच्या नावाने खडी फोडणे, याला माझा विरोध आहे.

Pages