कारली - २
कांदे - २
खोबर्याचा कीस - १/२ वाटी
हिरव्या मिरच्या - ३
तेल - १ डाव
साखर - १ चमचा
हळद, हिंग, मोहरी, मीठ चवीप्रमाणे.
कारली चौकोनी चिरुन घ्यावी. चिरलेले कारले मिठाच्या पाण्यात ठेवावे. कांदा पण चौकोनी चिरावा. मिरच्यांचे बारिक तुकडे करावे. कढईत तेल घेउन मिरचीची फोडणी करावी. कांदा तेलात चांगला परतुन घ्यावा. आता मिठाच्या पाण्यातले कारले पाणी निथळुन घेउन कढईत टाकावे. हाताने घट्ट दाबुन पाणी काढुन टाकावे. साखर,मीठ घालावे. झाकण न घालताच चांगली वाफ येउ द्यावी. कारले बारीक चिरलेले असल्याने, थोडेफार जे पाणी राहिलेले असते त्याच्या वाफेवर चांगले शिजते. कारले शिजले की खोबर्याचा किस घालुन भाजी हलवुन घ्यावी आणि पुन्ह एक वाफ येउ द्यावी.
झाली भाजी तयार.
नारळ घालुन केलीतरी चालते पण खोबर्याने वेगळाच खमंगपणा येतो.
कारल्याचे पाणी काढुन टाकल्याने आणि सुके खोबरे घातल्याने कारल्याच कडवट्पणा अजिबात जाणवत नाही. कारल न आवडणार्यांना पण आवडते असा माझा आज पर्यंतचा अनुभव आहे.
>>आता मिठाच्या पाण्यातले
>>आता मिठाच्या पाण्यातले कारले पाणी निथळुन घेउन कढईत टाकावे. हाताने घट्ट दाबुन पाणी काढुन टाकावे.
आधी कार्ल्यातले पाणी हाताने घट्ट दाबून काढायचे. आणि मग कढईत टाकायचे ना?
करून बघणार नक्की.
माझी आवडती भाजी आहे.
माझी आवडती भाजी आहे. दाक्षिणात्य पद्धतिची एकदा (चिंचेच्या कोळातली) खाल्ली होती. तीही टेस्टी होती.
नंद्या, बरोबर. कारल्याची सालं
नंद्या, बरोबर. कारल्याची सालं न काढताच?
चिंच गूळ घालायचा नाही का?
चिंच गूळ घालायचा नाही का?
>> कारल्याच कडवट्पणा अजिबात
>> कारल्याच कडवट्पणा अजिबात जाणवत नाही
मग काय उपयोग?
मला आवडतात अशा काचर्या - पण मी लाल तिखट घालून करते. आता अशीही करून बघेन.
आधी कार्ल्यातले पाणी हाताने
आधी कार्ल्यातले पाणी हाताने घट्ट दाबून काढायचे. आणि मग कढईत टाकायचे ना? >> बरोबर नंद्या.
वाक्यरचना बदलायला हवी आहे का ?
कारल्याची सालं न काढताच? >> सायो, कारल्याची साल काढतात हे मी पहिल्यांदाच ऐकले.
कारली धुवायची आणि चिरायची.
जामोप्या, साखर घालायची चवीपुरती. चिंच गूळ ची पाकृ वेगळी आहे.
मग काय उपयोग? >> जास्तीचा
मग काय उपयोग? >> जास्तीचा कडवट्पणा असे म्हणुया का
सालं म्हणजे काटे काढतात गं.
सालं म्हणजे काटे काढतात गं. विशेषत: भरली कार्ली करतांना काढतात असं पाहिलंय.
जामोप्या, आंबटगोड चव आवडत असेल तर साखरेबरोबर थोडं लिंबूही पिळलेलं मस्त लागतं.
कार्ले फॅन क्लब नाहीये का? सिंडीला सांगा काढायला.
सालं म्हणजे तेच पाठ खरवडून
सालं म्हणजे तेच पाठ खरवडून काढायची.
कारल्याची भाजी, लोणच काहीही
कारल्याची भाजी, लोणच काहीही आवडत. मी काचर्या आणी भरलेली कारली करते आता ही पण करुन बघेन.
अय्या इश्श का फ्या क्ल
अय्या इश्श का फ्या क्ल काढणारच होते. आता आग्रहच आहे तर काढतेच
आम्ही नारळ घालूनच करतो. अशी पण आवडेल ट्राय करायला.
आमच्या कडे पण हि भाजी बनवतात.
आमच्या कडे पण हि भाजी बनवतात. त्यात कारली पातळ काचर्या करुन मग मिठ टाकुन पिळुन घ्यावा. त्या नंतर लो़खंडि तव्यावर तेल घालुन खरपुस भाजुन घेउन त्याच वेळी दुसर्या तव्यावर मिरची आणि भरपुर कांदा टाकुन मग ही भाजलेली कारली टाकावीत. शेवटी चविनुसार मिठ आणि खोबर घालुन घ्यावी.
रिमा तुम्ही सांगितल्याप्रमाणे
रिमा तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी सेम भाजी मी पण करते. माझ्या घरातही एकदम आवडीची भाजी
मस्तच गं आरती.......... करुन
मस्तच गं आरती..........:स्मित:
करुन बघेल अशाप्रकारे
मी डाळिचे पिठ (बेसन) घालते या भाजीत... कांद्याच्या झुणक्यासारखी होते छान भाजी
धन्यवाद सगळ्यांना. रिमा, मस्त
धन्यवाद सगळ्यांना.
रिमा, मस्त आहे तुझी पद्धत. नक्की करुन बघणार. स्मितू ची पण ट्राय करायला हवी.