कारल्याची भाजी

Submitted by आरती on 19 October, 2011 - 13:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कारली - २
कांदे - २
खोबर्‍याचा कीस - १/२ वाटी
हिरव्या मिरच्या - ३
तेल - १ डाव
साखर - १ चमचा
हळद, हिंग, मोहरी, मीठ चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

कारली चौकोनी चिरुन घ्यावी. चिरलेले कारले मिठाच्या पाण्यात ठेवावे. कांदा पण चौकोनी चिरावा. मिरच्यांचे बारिक तुकडे करावे. कढईत तेल घेउन मिरचीची फोडणी करावी. कांदा तेलात चांगला परतुन घ्यावा. आता मिठाच्या पाण्यातले कारले पाणी निथळुन घेउन कढईत टाकावे. हाताने घट्ट दाबुन पाणी काढुन टाकावे. साखर,मीठ घालावे. झाकण न घालताच चांगली वाफ येउ द्यावी. कारले बारीक चिरलेले असल्याने, थोडेफार जे पाणी राहिलेले असते त्याच्या वाफेवर चांगले शिजते. कारले शिजले की खोबर्‍याचा किस घालुन भाजी हलवुन घ्यावी आणि पुन्ह एक वाफ येउ द्यावी.

झाली भाजी तयार.
K2.jpg

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी ...
अधिक टिपा: 

नारळ घालुन केलीतरी चालते पण खोबर्‍याने वेगळाच खमंगपणा येतो.

कारल्याचे पाणी काढुन टाकल्याने आणि सुके खोबरे घातल्याने कारल्याच कडवट्पणा अजिबात जाणवत नाही. कारल न आवडणार्‍यांना पण आवडते असा माझा आज पर्यंतचा अनुभव आहे. Happy

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आता मिठाच्या पाण्यातले कारले पाणी निथळुन घेउन कढईत टाकावे. हाताने घट्ट दाबुन पाणी काढुन टाकावे.
आधी कार्ल्यातले पाणी हाताने घट्ट दाबून काढायचे. आणि मग कढईत टाकायचे ना?
करून बघणार नक्की.

माझी आवडती भाजी आहे. दाक्षिणात्य पद्धतिची एकदा (चिंचेच्या कोळातली) खाल्ली होती. तीही टेस्टी होती.

>> कारल्याच कडवट्पणा अजिबात जाणवत नाही
मग काय उपयोग? Proud

मला आवडतात अशा काचर्‍या - पण मी लाल तिखट घालून करते. आता अशीही करून बघेन. Happy

आधी कार्ल्यातले पाणी हाताने घट्ट दाबून काढायचे. आणि मग कढईत टाकायचे ना? >> बरोबर नंद्या.
वाक्यरचना बदलायला हवी आहे का ?

कारल्याची सालं न काढताच? >> सायो, कारल्याची साल काढतात हे मी पहिल्यांदाच ऐकले. Happy
कारली धुवायची आणि चिरायची.

जामोप्या, साखर घालायची चवीपुरती. चिंच गूळ ची पाकृ वेगळी आहे.

Happy
सालं म्हणजे काटे काढतात गं. विशेषत: भरली कार्ली करतांना काढतात असं पाहिलंय.

जामोप्या, आंबटगोड चव आवडत असेल तर साखरेबरोबर थोडं लिंबूही पिळलेलं मस्त लागतं.

कार्ले फॅन क्लब नाहीये का? सिंडीला सांगा काढायला. Proud

अय्या इश्श का फ्या क्ल काढणारच होते. आता आग्रहच आहे तर काढतेच Happy

आम्ही नारळ घालूनच करतो. अशी पण आवडेल ट्राय करायला. Proud

आमच्या कडे पण हि भाजी बनवतात. त्यात कारली पातळ काचर्‍या करुन मग मिठ टाकुन पिळुन घ्यावा. त्या नंतर लो़खंडि तव्यावर तेल घालुन खरपुस भाजुन घेउन त्याच वेळी दुसर्‍या तव्यावर मिरची आणि भरपुर कांदा टाकुन मग ही भाजलेली कारली टाकावीत. शेवटी चविनुसार मिठ आणि खोबर घालुन घ्यावी.

मस्तच गं आरती..........:स्मित:
करुन बघेल अशाप्रकारे

मी डाळिचे पिठ (बेसन) घालते या भाजीत... कांद्याच्या झुणक्यासारखी होते छान भाजी Happy

Back to top