स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.
..............................................................................................................................................
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्यांना समावेशिणार्या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!
हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.
स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल
हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !
हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.
"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..
इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"
आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.
स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.
"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.
आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.
आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?
ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.
हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे
आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....
"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही
'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -
हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत
हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......
कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्या समाजाशी असणार्या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.
हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.
संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे
त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत
वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.
आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....
"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.
राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...
माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे
वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.
मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !
या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.
माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!
त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!
जय हिंद !
विशाल कुलकर्णी
संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org
ही घ्या हिंदुत्वाची आणि
ही घ्या हिंदुत्वाची आणि त्यांच्या शौर्याची व्याख्या!
(गर्बेवाले : तेच ते मोदींचे
(गर्बेवाले : तेच ते मोदींचे पूर्वज - जे सोरटी सोमनाथावर मोहम्मद चालून आला तेंव्हा शिव्या शाप देत होते ढिगार्यावर उभे राहून. सैन्य होतं कुठे? गरबे नाचायला गेलं असेल.. - अन त्यांचेच भाउबंद, जे तुम्हाला त्यांच्या 'सोसायटीत' येऊ देत नाहीत. अन घरात वाळवी लागली तर पेस्ट कंट्रोल वाल्यांना हाकलतात, पण 'त्यांना' कापून टाकायला पुढे असतात..)
-------- सोरटी सोमनाथावर मोहम्मद चालून आला होता? अरे असे काही तरी धक्कादायक काय लिहीत आहात. तो तर सोमनाथाचे दर्शन घेण्यासाठी आला होता :स्मित:.
या गर्बेवाल्यांच्याच वंशजात आपले महात्मा जन्मले होते, ज्यांची जयंती २ ऑक्टोबरला सर्वत्र साजरी केली... त्यांचेच भाऊबंद.
जे तुम्हाला त्यांच्या 'सोसायटीत' येऊ देत नाहीत.
------- सोसायटी त्यांची आहे, नियम ते बनवतात. अशा 'सोसायटीत' कुणाला येऊ द्यायचे अथवा नाही हा अधिकार घटनेने त्यांना दिलेला आहे.
वज्र३०० | 15 October, 2011 -
वज्र३०० | 15 October, 2011 - 22:27
मी हिंदु ब्राह्मण आहे.. मला जमेल तसा माझा धर्म पाळतो.
आणि मी भारतीय आहे.
------- जागोमोजी तुम्ही भारतीय आहात म्हणजे नक्की काय आहात? तुमची भारतीय असण्याची व्याख्या काय आहे? कायद्यानुसार भारताचा पासपोर्ट मिळ्वता आला म्हणजे त्याला भारतीय समजायचे का?
<<
वज्रा,
जन्माने जसा हिंदू धर्म मिळालाय ना, तसंच भारतिय नागरिकत्व ही मिळालं आहे. तुम्हाला, अन मलाही. आता ही आपली जबाबदारी. ज्या प्रमाणे मी हिंदू म्हणजे काय हे शोधून, समनून घेउन तसं वागायचा प्रयत्न करतो, तसेच, तितकीच किंबहुना मोठी जबाबदारी माझी आहे, की मी भारतीय असणे म्हणजे काय हे समजून घेऊन तसे वागण्याचा प्रयत्न करावा.
कृपा करून मी काय म्हणतो आहे ते समजून घ्या.
आपण हिंदुत्व नावाची आपल्याच धर्माची अतिरंजित व्याख्या 'इन्डिया शायनिंग' सारख्या पब्लिसिटी ला बळी पडुन आपल्याच गळी मारली आहे. खरंच आपला धर्म असा आहे का? मुसलमानांसारखा इतरांचा द्वेष करणारा? किंवा ख्रिश्चनांसारखा धर्मांतरे करणारा?
अन हिंदू असण्याची थोडी तरी व्याख्या शिकण्याचा प्रयत्न आपण केला, या देशाचे नागरिक असण्याचा काय प्रयत्न केला मी? बाहेर देशी त्या लोकांचे कौतुक करतांना त्यांच्यातली राष्ट्रभावना पहातो आपण. आपण देशाला जास्त महत्व कधी देणार?
विचार करा.
तुम्ही विचार करता असे वाटते हे मी पूर्वी पण लिहीले आहे.
मंदार_जोशी | 15 October, 2011
मंदार_जोशी | 15 October, 2011 - 22:37
इब्लीस, :हसून हसून गडबडा लोळण: तुम्हीही त्यातलेच. येडंच्चे!!
<<
मंदार,
शेवटच्या शब्दा चा अर्थ समजतो ना?
मी आजपर्यंत तुमच्या कोणत्या पूर्वजाचा/जन्मदात्याचा उद्धार केला आहे?
अॅडमिन कडे पटकन जाउन अमुक पोस्ट वाईट आहे, अपमानास्पद आहे, ही चुगली सांगण्याची कामं कोण करतं या मायबोली वर? शेवटी औकातीवर आलात जोशी तुम्ही! हिम्मत असेल तर स्वतःची तक्रार करा जाउन अॅडमिनकडे. खरंच लाज वाटली पाहिजे, की विचारांचं खंडन करता येत नाही म्हणून व्यक्तीला 'अमक्याचा' अशी शिवी देतांना
५५ कॉटी आणि विभाजनाला विरोध
५५ कॉटी आणि विभाजनाला विरोध म्हणून गांधीजीना मारले म्हणे. त्याना मारण्याचा पहिला प्रयत्न हरामखोर हिंदुत्ववाल्यानी १९३४ साली केला होता.. तेंव्हा कुठे ५५ कोटी आणि देश विभाजन हे प्रश्न होते?
http://www.hindi.mkgandhi.org/g_hatya.htm#top .. गेली साठ वर्षे गांधीजींवर चिखलफेक आणि गोडश्यासारख्या भेकडाच्या हाडांची राख वारंवार हिंदुत्वाच्या नावाने पेटवणे हा हिंदुत्ववाल्यांचा आवडता छंद आहे.
इब्लिस, मी तुम्हाला येडा
इब्लिस, मी तुम्हाला येडा म्हणालो. वाचताही येऊ नये काय?
येडंच्चे = वेडाच आहे.
यात तुम्हाला पूर्वजांचा उद्धार कुठे वाटला?
चो.चा.म.चां.
हिंदुत्ववाल्यांसाठी सप्रेम
हिंदुत्ववाल्यांसाठी सप्रेम भेट.. http://www.mediafire.com/?ew0jym4y4lowuo7 .. १९३७ की ३९ सालचं पुस्तक. आणि त्यातले अतीमहान विचार...
To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the semitic Races — the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindusthan to learn and profit by.
पुष्कळांना हिंदू धर्माचा
पुष्कळांना हिंदू धर्माचा नुसता कंटाळाच नाही तर चक्क द्वेष निर्माण झाला आहे असे दिसते. त्यांच्यासमोर 'हिंदू' म्हंटले की त्यांचे एकदम टाळकेच सटकते. मग रागाच्या भरात काय वाट्टेल ते लिहीतात. असू दे. होते असे. सर्व गोष्टीत फक्त वाईटच दिसते त्यांना. अगदीच मनोरुग्ण म्हणणार नाही मी त्यांना, पण त्यांच्या विचारांचे संतुलन बिघडल्याने एका बाजूला जास्त झुकताताहेत.
हे फक्त हिंदू धर्माबाबतच नाही तर इतर धर्मियांच्या बाबतीत झालेले मी पाहिले आहे. अगदी वैताग येतो त्यांना स्वतःच्या धर्माचा, स्वतःच्या देशाचा, स्वतःच्या समाजाचा, स्वतःच्या नातेवाईकांचा सुद्धा!
अश्या लोकांच्या बरळण्याने काही फरक पडत नाही, कुठल्याहि धर्मात.
चांगले काय, वाईट काय हे समजण्याची ज्यांना अक्कल आहे ते धर्म वगैरे संकुचित विचार न करता फक्त चांगले नि वाईट एव्हढाच फरक करतात नि मुकाट्याने चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात.
चांगले काय, वाईट काय हे
चांगले काय, वाईट काय हे समजण्याची ज्यांना अक्कल आहे ते धर्म वगैरे संकुचित विचार न करता फक्त चांगले नि वाईट एव्हढाच फरक करतात नि मुकाट्याने चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात.
>>>>> अत्यंतिक सहमती!!!
अगदी कुणीही आपल्या धर्माचा
अगदी कुणीही आपल्या धर्माचा 'अभिमान' बाळगणे यात काहीच गैर नाही.
पण..,
अन्य धर्मांवर बोटे ठेवणे....त्यांना हिन समजणे.... त्यांच्या चुका काढत बसणे...त्यांच्या रितीरिवाजांवर टिका टिप्पणी करुन स्वतःच्याच धर्माला श्रेष्ट आणि महानतम समजणे....
किंवा
अगदी कोणत्याही करणांमुळे स्वतःच्या धर्मा बद्दल 'द्वेष' बाळगणे... आपल्याच धर्माची जगा समोर 'निंदा नालस्ती' करणे....स्वतःच्याच धर्माची 'किव' येणे, 'मनस्ताप' होणे.
या दोन्ही प्रकाराच्या व्यक्तिंना 'धर्मिक व्यक्ति' म्हणता येणार नाही. कोणत्याही धर्माची असो.
अगदी माणूसकी जपणारीही म्हणवता येणार नाही.
...आणि जि व्यक्ति अश्या प्रकारे वागते....तिला आपला स्वतःचाच 'धर्म' समजलेला नाही.
कारण, कोणत्याही धर्मांत अशा प्रकारांना चालना दिली गेल्याचा उल्लेख नाही.....किंवा या अशा बाबींनाना उत्तेजना दिलेली नाही.....उलटपक्षि खंडन केलेले आढळेलही..
या दोन्ही प्रकाराच्या
या दोन्ही प्रकाराच्या व्यक्तिंना 'धर्मिक व्यक्ति' म्हणता येणार नाही. कोणत्याही धर्माची असो.
अगदी माणूसकी जपणारीही म्हणवता येणार नाही.
अरे वा! माहीतच नव्हतं.. म्हणजे आंबेडकरानी आपला धर्म आवडत नाही असे सांगितले म्हणजे त्यांच्याकडेही माणुसकी नसणार नै का? बरे झाले समजले.. नाहीतर आम्ही आंबेडकराना चांगला माणूस मानायची चूक करुन बसलो असतो. !
...आणि जि व्यक्ति अश्या
...आणि जि व्यक्ति अश्या प्रकारे वागते....तिला आपला स्वतःचाच 'धर्म' समजलेला नाही.
------ असहमत...
प्रत्येक धर्मात बरेच चांगले आणि थोडेफार वाईट आहेच... आपापल्या बुद्धीनुसार टिका, निंदा नालस्ती (द्वेष म्हणत नाही आहे - द्वेष आला म्हणजे सगळे विचार संपले) करायला काहीच हरकत नाही आहे. ते करावे, करत रहावे. तसे होत राहिले तरच विचार करायची, सिद्धांत चाचपुन बघायची बुद्धी शाबुत राहिल आणि प्रगतीच्या आशा बाळगता येतील. अन्यथा थांबला तो संपला नको व्हायला...
त्यामुळे जागोजींच्या विचारांना पण आदराने विरोध करा.... (अगदीच काही नाही जमले तर छानसे लिंबू आणि तिखट मिरची बाफ च्या दारावर वर लावावी - म्हणजे त्यांची वक्रदृष्टी या बाजूला पडणार नाही. :स्मित:)
म्हणजे आंबेडकरानी आपला धर्म
म्हणजे आंबेडकरानी आपला धर्म आवडत नाही असे सांगितले >> हो का..., 'आवडत' नाही??? नक्की असेच सांगीतले..??? नक्की 'हेच' कारण होते??
वज्र, प्रत्येक धर्मात बरेच
वज्र,
प्रत्येक धर्मात बरेच चांगले आणि थोडेफार वाईट आहेच... >> इतके नाहीत की त्यांचा विरोध करावा....
तुमचा स्वतःचाच 'धर्म' कोणत्या वाईट गोष्टी शिकवतो तुम्हाला सांगा.. ?
एक तरी.....
कुणा व्यक्तिने दुसर्यावर केलेले अत्याचार मांडु नका कृपया.
जे वाईट करायला तुमच्या 'धर्मांतर्गत' सांगीतले आहे तेच सांगा.......
व्यक्ति वाईट असु शकते.....व्यक्ति पक्की मा.चो. (माणुसकी चोर) असु शकते....
'धर्म' नाही.
त्यामुळे जागोजींच्या
त्यामुळे जागोजींच्या विचारांना पण आदराने विरोध करा.... >>>> त्यांचे विचार वाईट गोष्टीं विरोधी आहेत. 'धर्म' विरोधी नाहीत. असेच जाणवते.
माझा तरी विरोध नाही....
वाल्या कोळी - तो फोटो कधिचा
वाल्या कोळी - तो फोटो कधिचा आहे ? मी आताच पाहिला.... १९४८ सालचा आहे असे वाटणे अवघड आहे. १९४८ च्या काळचे उपलब्द तंत्र आणि सर्व मंडळी फोटो देण्यासाठी पोज मधे अगदी सुसज्ज (अगदी सर्वांना आधी सांगितले होते स्तब्द रहायला). १९४८ साली व्हिडीओ रेकॉर्डिंग पण नव्हते. असो.
खरी माहिती शोधण्यासाठी थोडा आटापिटा...
तो फोटो खोटाच आहे बहुतेक..
तो फोटो खोटाच आहे बहुतेक.. मागील पानावर मिसळपाववरल्या लेखाची लिंक आहे. त्यातून तो घेतला आहे.. http://www.misalpav.com/node/5041
इथे नथुराम आणि सावरक्रांचे खरे फोटो आहेत.. http://en.wikipedia.org/wiki/Nathuram_Godse
मला वाटते मूळ लेखात फक्त कै.
मला वाटते मूळ लेखात फक्त कै. सावरकरांची हिंदू धर्माबद्दलची मते मांडली आहेत. त्यात असे कुठेहि म्हंटले नाही की जन्मावरून जात ठरवून तसे वागा, किंवा बायका नाचवा, किंवा इतर काही जे वाईट आहे ते हिंदुत्वाच्या नावाखाली करा. तेंव्हा ज्यांनी वाईट गोष्टी केल्या, त्या स्वतःच्या जबाबदारीवर केल्या, धर्माचे नाव केवळ फसवणुकीसाठी वापरले. त्यामुळे धर्म वाईट होत नाही, त्या माणसांच्या हातून वाईट कृत्य होते याला ते जबाबदार आहेत, त्यांनी धर्म समजून घेतला नसेल. त्याबद्दल धर्मच वाईट असे कसे म्हणता येईल.
आता 'जणतेच्या कल्याणासाठी' 'फुडारी' निवडून येतात, मंत्रि बनतात, नि मग भ्रष्टाचार करणे जनतेवर अन्याय, असे करतात. तर 'जणतेचे कल्याण' करणे हेच वाईट म्हणाल का? राजकारणात जगातले बव्हंशी लोक भ्रष्ट, असतात, म्हणजे राजकारणच वाईट का? नाही. कारण काही अत्यल्प राजकारण्यांनी देशाची सेवा, जनतेचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे.
इथे मी अनेकदा लिहीले आहे की माणसे स्वतःला वाट्टेल तसे वागतात, काही वाईट, काही चांगले. कुणि लोकोपयोगी कामे करतात, कुणि समाजवोरोधी. त्यांच्या मनात तसे धर्म, संस्कृति असे काही नसते. ही लेबले लोक मागून त्यांच्या मागे लावतात. भारतीय संगिताची महति सांगणारा एक लेख याच मायबोलीवर आहे. त्यातूनहि हेच कळते की जे लोक संगिताची आराधना करतात ते फक्त संगित जाणतात. त्यांना हिंदू, मुसलमान ही लेबले लोक लावतात.
कै. आंबेडकर अर्थातच विचारवंत, बुद्धिमान होते. पण त्यांना ही हिंदूधर्मातली जातपातीची कीड असह्य झाली, त्यामुळे होणारे लोकांचे हाल त्यांना बघवेनात. म्हणून त्यांच्या मते त्यांनी तोडगा काढला की धर्मच सोडा. आता आज त्यामुळे खरोखरी काही फरक पडला आहे का, याचा विचार व्हावा. पण त्यावरून आंबेडकर स्वतः बुद्धिमान, विचारवंत नव्हते असा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल. त्यांना अभ्यास करून असे समजले की धर्मात असे काही सांगितले नाहीये, हे लोकांनी धर्म विकृत केला आहे, जोपर्यंत हे लोक खरा धर्म जाणून त्याप्रमाणे आचरण करत नाहीत नि आम्हालाहि करू देत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या नियमांनुसार आम्हाला त्या धर्मात रहाणे मान्य नाही!!
आत्ता कुठे हिंदूंना जरा अक्कल यायला लागली आहे की असे लोकांना धर्मातून जाऊ दिले तर आपले राजकारण, समाज यांच्यावर गैर परिणाम होतील म्हणून पुनरुत्थान वगैरे!!
झक्कीकाका १००% अनुमोदन !
झक्कीकाका १००% अनुमोदन !
लोकहो, कारगिल युद्धाच्या वेळी
लोकहो,
कारगिल युद्धाच्या वेळी भारतास बलुचिस्तानात हस्तक्षेप करायची संधी चालून आली होती असं कोणीतरी लिहिलं होतं (या धाग्यावर किंवा इतरत्र). त्याचा दुवा मिळेल काय? सर्च मारूनही तो संदेश सापडला नाही.
कुणाला माहितीये? आगाऊ धन्यवाद!
आपला नम्र,
-गामा पैलवान
इब्लीस माझ्यावर शिवी दिल्याचा
इब्लीस माझ्यावर शिवी दिल्याचा आरोप करुन आणि मग स्वतःचेच दात घशात गेल्याचे ल्क्शात आल्यावर कुठे पळाले?
आत्ता कुठे हिंदूंना जरा अक्कल
आत्ता कुठे हिंदूंना जरा अक्कल यायला लागली आहे की असे लोकांना धर्मातून जाऊ दिले तर आपले राजकारण, समाज यांच्यावर गैर परिणाम होतील म्हणून पुनरुत्थान वगैरे!!
तेच तर.. पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, म्हणून पुनरुत्थान वगैरे.. पण पुनरुत्थान करुन तर काय.. चतुर्वण्या मया सऋश्टी... आणि पुरुषसूक्तातले नंतर घुसडलेले श्लोक दाखवून आम्ही सर्वश्रेष्ठ, असा धिंडोरा पिटण्याचे बंद थोडेच होणार आहे!
सर्च मारूनही तो संदेश सापडला
सर्च मारूनही तो संदेश सापडला नाही.
मला तरी असे काही आठवत नाही.. आणि सर्च मारुनही मिळत नसेल तर कशाला त्याची काळजी करताय?
कुणा व्यक्तिने दुसर्यावर
कुणा व्यक्तिने दुसर्यावर केलेले अत्याचार मांडु नका कृपया.
जे वाईट करायला तुमच्या 'धर्मांतर्गत' सांगीतले आहे तेच सांगा.......
म्हणून तर कायदा सर्व धर्मिआयाना भारतीय नागरिकच मानतो. अमूक धर्म इथला, अमूक बाहेरचा.. अशी वर्गवारी कायदा करत नाही..
सावरकरांचे हे विचार गोळवलकरांच्या वुई ... या ग्रंथातही जसेच्या तसे आहेत.. ( मागे वुई .. ची लिंक दिली आहे... हिंदु म्हणजे राष्ट्र आणि इतर धर्म म्हणजे लहान जाती... असे विश्लेषण त्यातही आहे... जर्मनानी जसे ज्युंचे खच्चीकरण करुन आपले शुद्ध स्वरुप राखले, तसे हिंदुनीही करावे असेही त्यात आहे.. म्हणजे नेमके काय करायचे???? )
हे वुई.. पुस्तक आले तेंव्हाच वादग्रस्त ठरले होते... त्यावर लगेच्च बंदी आली होती.. तर बंदीच्या काळात कसले किटाळ येऊ नये म्हणून गुरुजीनी त्यावरचे लेखक म्हणून आपले नाव खोडूण दुसर्याचे म्हणजे बाबाराव सावरकरांचे नाव लावले होते म्हणे... ! नंतर १९४८ साली पुन्हा त्यावर बंदी आली होती म्हणे..
स्वतःचे दात घशात चालले की सगळेच पळ काढतात !
सावरकरांचे हे विचार
सावरकरांचे हे विचार गोळवलकरांच्या वुई ... या ग्रंथातही जसेच्या तसे आहेत
असहमत. सावरकरांचे सामाजिक आणी जातिविषयक विचार त्याकाळाच्याही पुढे होते. चातुर्वर्ण्य, मनुस्मृती वगैरे विषयांवर तर त्यांचे विचार आंबेडकरांच्या जवळ होते.
विजयजी, इथे सगळंच पालथ्या
विजयजी, इथे सगळंच पालथ्या घड्यावर पाणी आहे हो.... सोडून द्या
त्यांना स्वातंत्र्यवीरांकडून जे घ्यायचे ते घेवु द्यात, आपल्याला जे हवे आहे, ज्यावर आपला विश्वास आहे ते आपण घेवू !
मंदार जोशी, मी इथेच आहे, अन
मंदार जोशी,
मी इथेच आहे, अन तुम्ही जाणीवपूर्वक शिवीच दिली होती. शब्दच्छल करणे समजते मला. डुकरांशी कुस्ती हा वाक्प्रचार ठाउक असणार तुम्हाला. म्हणून इथे लिहिणे बंद केले मी. मला कुस्ती खेळण्यात रस नाही.
(No subject)
असहमत. सावरकरांचे सामाजिक आणी
असहमत. सावरकरांचे सामाजिक आणी जातिविषयक विचार त्याकाळाच्याही पुढे होते.
त्याबाबत काही म्हटलेले नाही.. नागरिकत्वात मुस्लिम, ख्रिश्चन याना समाविष्ट न करण्यचा मुद्दा त्या पुस्तकातही आहे आणि सावरकरांच्या लिखाणातही आहे..... प्युअर ब्लड, हाफ ब्लड, मड ब्लड असल्या वॉल्डेमॉर्टी संकप्ल्नांच्या जवळपासच याही संकल्पना आहेत..
( वॉल्डेमॉर्टच पात्र रोलिंग बाईने हिटलरवरच बेतले आहे... आणि हिंदुत्ववादी, सावरकर, गोळवलकर यानाही हिटलर प्रिय आहे! म्हणून तर बाकी धर्माना मगल्स मानून त्यांचे ज्युंप्रमाणे खच्चीकरण करण्याचा हे उदोउदो करतात आणि ते याना पुण्यकार्य आणि राष्ट्रकार्य वाटते.. आणखी एक योगायोग म्हणजे वॉल्डी आणि हिटलर दोघेही स्वतः हाफ ब्लडच होते ! ) )
"From this standpoint, sanctioned by the experience of shrewd old nations, the foreign races in Hindusthan must either adopt the Hindu culture and language, must learn to respect and hold in reverence Hindu religion, must entertain no idea but those of the glorification of the Hindu race and culture, i.e. of the Hindu nation, and must lose their separate existence to merge in the Hindu race; or may stay in the country, wholly subordinated to the Hindu Nation, claiming nothing, deserving no privileges, far less any preferential treatment -- not even citizen's rights." (We, p.47-48/p.55-56)
बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी... अजून स्वातंत्र्य मिळालेलेदेखील नव्हते आणि त्याच्याअधीच १९३९ सालीच इतर धर्मियाना नागरिकत्वाचेही अधिकार द्यायचे नाहीत , म्हणून यांचा कांगावाही चालू झालेला होता !
http://koenraadelst.bharatvani.org/articles/fascism/golwalkar.html
जामोप्या, आख्ख्या पुस्तकातून
जामोप्या,
आख्ख्या पुस्तकातून पुढचे मागचे संदर्भ न देता काही वाक्ये देऊन टीका करण्याऐवजी संपूर्ण प्रकरण किंवा पुस्तकच इथे द्या ना. उगाच २-४ आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाक्ये लिहू नका.
तुम्ही दिलेल्या संकेतस्थळावरील लेखकाचे सुद्धा हेच म्हणणे आहे.
4. Golwalkar vs. Hitler
But did Golwalkar in 1938 see Nazi Germany as an example to be followed? If we do not just focus on the selected quotation (as we are led to do by those who made the selection in the first place), but read the whole book, we find that Golwalkar is definitely not asking the Hindus to emulate Nazi Germany.
________________________________________
Some parts of the book conclusively refute the thesis that Golwalkar was a Hitler supporter. First of all, one of the countries in his list of models of nation-building to be studied by Hindus is Czechoslovakia, one of Hitler's first victims. And there, his sympathies, unlike Hitler's, are divided between the Sudeten Germans and the Czechs.
Here again, selective quoting has done the job of misleading the readers and creating a different impression. What is sometimes quoted is the following: "Austria for example was merely a province [in] the Germanic Empire. Logically Austria should not be an independent kingdom, but be one with the rest of Germany. So also with those portions, inhabited by Germans, which had been included, after the War, in the new state of Czechoslovakia. (...) This natural and logical aspiration has almost been fulfilled". (We, p.35/p.42-43)
Is this not terrible, Golwalkar openly supporting the Anschluss of Austria and Sudetenland? Actually, no. If Hitler became a synonym for horror and evil, it is not because he fulfilled the wish of the Austrians and Sudeten Germans of joining Germany. After World War 1, the Austrian parliament had voted with the largest possible majority in favour of joining Germany. This democratic choice was overruled by the victorious powers in the unilateral treaty of Versailles. Such are the complexities of history, that the killer of democracy in Germany implemented the democratic will of the Austrian people with his annexation of Austria.
As for Sudetenland, its separation from the Czech region was likewise applauded by the vast majority of the population concerned. It was entirely in keeping with the principle of "self-determination of nations". This principle had been conceded in the case of the Czechs' separation from Austria, but overruled by the victorious powers in the case of Sudetenland because they wanted to create large buffer states around Germany (also in the case of eastern Upper Silesia, annexed by the new state of Poland in spite of a plebiscite showing 60% support for accession to Germany).
_________________________________________
However, Gowalkar's support to the Sudeten Germans' reunification with Germany is counterbalanced by his support to the cause of Czechoslovakia's unity and integrity. Golwalkar argues quite correctly that established nations victorious in the Great War do not concede to their ethnic minorities the "minority rights" devised by the League of Nations as binding on the newly created states. Thus, an American ambassador to the League is quoted articulating the principle of "completely natural assimilation" as the great unifier of the American nation, and asserting that this renders the League principle of minority rights inapplicable. (We, p.46/p.55; emphasis in the original)
This provides a background to Golwalkar's oft-quoted stricture against minority privileges, justified explicitly with reference to the assimilative approach of the major Western powers: "Naturally, there are no foreigners in these old Nations, and no one to tax the generosity of the Nation by demanding privileges as 'Minority communities' in the State. It is this sentiment which prompted the United States of America, England, France and other old nations to refuse to apply the solution of the Minorities problem arrived at by the League of Nations to their states." (We, p.46/p.54)
___________________________________________
It is routinely alleged in press articles and even in scholarly publications that Madhav Sadashiv Golwalkar, second sarsanghchalak ("chief guide of the association") of the Rashtriya Swayamsevak Sangh ("national volunteer association") from 1940 till his death in 1973, and colloquially known as Guruji, was an open admirer and emulator of Adolf Hitler. Thus, according to Sudip Mazumdar (Newsweek, 27-5-1996), Golwalkar was "a supremacist who openly admired some of Hitler's ideas on racial purity".
However, from his fairly copious writings, public statements and interview transcripts during his term at the head of the RSS (1940-73), no indication of such Hitlerian sympathies has ever been quoted. The case is based entirely on a few lines in Golwalkar's first book: We. Our Nationhood Defined, published by Bharat Publications,
_______________________________________________
Typically, the speaker announcing the documentary, who spent no more than two sentences on its contents, already said that it would "reveal the connections of the organization behind the BJP with Nazi Germany", this organization being the RSS. In the documentary, an actor dressed and made up to look like Golwalkar in his younger days, read out the two paragraphs. However, no actual connection between the RSS and Nazi Germany was revealed. In fact, the entire 45 minutes did not contain any other information about or quotations from the RSS's ideological classics: not from Golwalkar's later publications, nor from any other Hindutva ideologue. Till today, and even in academic publications, it is very common to see the anti-BJP rhetoric built entirely on these few sentences in Golwalkar's pamphlet of more than sixty years ago.
______________________________________________
Further, it says that the religious minorities must "not claim any privileges", something with which any democrat and secularist would wholeheartedly agree: privileges on the basis of creed are against the equality principle which is fundamental to the law system of a modern state. It is one of the absurdities of Indian "secularism" that it contains a number of communal inequalities in law:
· Separate family law codes for Muslims, Christians and Parsis, epitomized by the Muslim right to polygamy; this constitutes the denial of the very first defining principle of the secular state, viz. legal equality of all citizens regardless of religion;
· exemption of mosques and churches (as opposed to Hindu temples) from intervention in their management and appropriation of their funds by the secular authorities;
· special safeguards of the communal character (in recruitment of teachers and students, in the contents of the curriculum) of Christian and Muslims schools all while retaining their subsidies, which are denied to Hindu denominational schools (Art. 30 of the Constitution);
· a large number of occasional advantages for the minorities in everyday political practice, e.g. subsidies for the Muslims who perform the pilgrimage to Mecca, as contrasted with pilgrimage taxes to be paid by Hindus going to Amarnath and other Hindu places of pilgrimage.
Before independence, the situation was even worse, with separate electorates and highly disproportionate privileges conceded to Anglo-Indians and other Christians and to the Muslim community. It was perfectly legitimate for Golwalkar in 1938 to champion the cause of genuine secularism by denouncing the system of privileges on the basis of religion. Indeed, the remarkable phenomenon is not that Hindus stand up for legal equality and against the Muslim privileges, but that supposedly scholarly and objective India-watchers, almost to a man, decry equality before the law (esp. a Common Civil Code, that long-standing Hindu demand) as "communal" and support minority privileges on the basis of religion as "secular", in blatant disregard for the dictionary meaning of "secularism" and "communalism".
______________________________________________
Golwalkar explicitly gave them that option: the Muslims may glorify Hindu culture, and only "otherwise", in case they refuse to identify themselves as Indians rather than as Muslims, does he explicitate the alternative option of staying within the country without citizen's rights. If giving the Muslims a choice between their country and their religion seems unjustified, it may be noted that the same choice was given to President Kennedy, the first Roman Catholic president of the USA, and for this reason suspected by Protestants of being an agent of the Popish Plot for world domination. He was asked whether his loyalty was primarily with his country or with his Roman Catholic religion, and he replied without hesitation that in case of conflict between the two, "I would choose my country". This is exactly what Golwalkar expected of the Indian Muslims, in which case he would treat them as full citizens. It is only in case they refused this first loyalty to India that he provided for a second-best option of staying within the country in a kind of Zimmi status, without citizen's rights.
Pages