NOTE (ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थल, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!)
असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>>भाग=>1पासून पुढे़...
.
.
.
.भाग=>2
............................................................"हि तर एक सुरवात...".....................................................
"मला माफ कर क्षितिज माझ्यामुळे तुला खुप त्रास झाला नं?"
त्याच्या हातावर हात ठेवत, केवीलवाणा चेहरा करत ती त्याला म्हणाली. पण काही क्षणातच पुन्हा नॉर्मल होत-
"पण मला माहीत आहे; तु माझ्यावर कधी $ च रागवणार नाहीस, आफ्टर ऑल गर्लफ्रेंन्ड जो हूँ यार $ $....!!" डोळे विस्फारत, त्याच्या पाठीवर एक जोराची थाप मारत ती म्हणाली.
'काय मुलगी आहे रे ही.. स्वत:च माफी मागतेय आणि वर स्वतःच दुसर्यांचा निर्णय पण सांगुन मोकळी होतेय..!!!'- त्याने मनातच विचार केला.
तो काही बोलला नाही पण दुसर्याच क्षणी त्याला तिचे हसू आले.
"ए क्षितु, खरं सांग, तुला खुप वाईट वाटल होतं ना तु सांगुनही मी आल्ये नव्हते म्हणुन..?" ती पुन्हा गंभिर झाली.
"नाही ग, तसं काही नाही, तु ऊगाचच जास्त विचार करतेयसं .... (पुन्हा एक वेळ दीर्घ श्वास घेत.)
.......हा पण तुझी कमतरता मात्र जाणवली होती त्यावेळी; ती आज भरुन निघाली." भिजलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे हसून पाहत तो म्हणाला.
एकवार त्याच्या नजरेला नजर मिळवत तीने वरवरचे हास्य तोंडावर आणले. आणि दुसर्याच वेळी तिने आपली नजर फिरवून घेतली; तिचे डोळेही आता पाण्याने डबडबले होते.....
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
आपल्या केबिनमध्ये, पवार डोळे मिटून, आपले कपाळ चिमटीत पकडून टेंन्शनमध्ये बसले होते. ते कमालीचे अस्वस्थ दिसत होते.
त्यांच्या समोरच त्यांचे असि. पो. ईन्स्पेक्टर भोसलेही बसले होते. ते काहीतरी कागद चाळण्यात गुंतले होते.
इकडे, पवारांच्या डोक्यात मात्र असंख्य विचारांचं काहुर माजल होतं......
'बारा...... एक न दोन...- बारा विद्यार्थी बेपत्ता झाले होते आणि अद्याप त्यांचा काहीएक मागमुस लागला नव्हता.'
आज बरोबर तिन दिवस झाले होते;... सर्व प्रकारे प्रयत्न करुनही शेवटी आपल्या हाती आलं होतं ते फक्त आणि फक्त अपयशच..!!' आणि जिवनात त्यांना याच गोष्टीची जास्त चिढ़ होती... "अपयश".....!!!!!!
"...भोसले..., तुंम्हाला काय वाटतं?"- केबिनमधली शांतता भंग करत पवारांनी भोसलेंना प्रश्न विचारला.
"सर, मला तर ही केस सरळ-सरळ सिरिअल किलींगचीच वाटतेय. तो जो कोणी आहे, तो फक्त एक माथेफिरुच असू शकतो." भोसलेनीं आपला अंदाज व्यक्त केला.
"नाही भोसले..., मला तर ही केस दिसते तेवढी सोप्पी वाटत नाही" एक उसासा टाकत पवार म्हणाले.
"मे बी, पण सर आत्तापर्यंत बेपत्ता झालेले सर्व विद्यार्थी हे एकाच प्रकारे गायब करण्यात आलेले आहेत, म्हणजे त्याची ती टेक्निक एकच आहे."
"टेक्निक...?? कसली टेक्निक?"
"सांगतो सर, हे पहा......." असे म्हणत भोसले आपल्या खुर्ची वरुन जरा पुढे झुकत हातातील कागद पवारांच्या दिशेने समोर सरकवत, बोलु लागले...
".......ही आत्तापर्यंत कॉलेजमधील गायब झालेल्या विद्यार्थ्यांच्या फोन कॉल्स्-ची डिटेल्स्...... आणि हा पहा...(कागदावर एका ठिकाणी बोट ठेवत)...हा या विद्यार्थ्यांना आलेला शेवटचा कॉल....
सर,. या शेवटच्या कॉलचा विचार करता- सगळ्यांना आलेला शेवटचा कॉल हा एकाच नंबरावरुन आलेला आहे.!.आणि याच फोन वरुन प्रत्येकाला एका विशिष्ठ ठिकाणी बोलावुन घेऊन तिथेच त्यांच अपहरण करण्यात आलं असाव. असा एक अंदाज आहे.
यावरुन तरी या सर्व विद्यार्थ्यांना गायब करण्यामागे ती कोणीतरी एकच व्यक्ती आहे हे सिद्ध होते.""
"हम्म...... ग्रेट!!....... या नंबरची काय माहीती काढली? कोणाचा आहे हा नंबर?"
"हो सर, हा नंबर संन्वरीची क्लोज फ्रेंन्ड, रिद्धिचा आहे."- भोसले.
"रिद्धीचा..!!??? (पवार काहीसे विचारात पडले)
..........भोसले, लवकरात लवकर हि रिद्धी कुठे राहते ते महित करा आणि ताबडतोब तिला चौकशीसाठी ताब्यात घ्या.
ही या केसमधली एकमेव आणि महत्त्वाची दुवा आहे. हीच आपल्याला त्या 'मुख्य सुत्रधार' पर्यंत पोहोचऊ शकते."
"होय सर, तिची माहिती आम्ही अगोदरच काढली आहे,
हि रिद्धी, अंजली या तिच्या एका क्लासमेटच्या घरी पेईंग-गेस्ट म्हणुन राहत होती. शिक्षणासाठी म्हणुन ती इथे आली होती. बाकी इथं भारतात, तिच आपलं असं कोणीच नातेवाईक नाहीत. आई एक्स्पायर झाली, वडील आहेत पण ते सुद्धा परदेशात असतात.
आपल शिक्षण हे परदेशात न होता आईच्याच जन्मस्थळी- म्हणजे इथ व्हावं अशी तिची ईच्छा होती. आणि म्हणुनच तीने या कॉलेजात अॅडमिशन घेतले होते..."
भोसलेंनी आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार दोन मिनिटांत, भराभरा रिद्धीची पुर्ण बायोग्राफिच पवारांसमोर सादर केली.
"भोसले, रिद्धी कुठे आहे? ती भेटली का तुंम्हाला?
"नाही ..." ओशाळवाणी चेहरा करुन भोसले बोलले.
".... म्हणजे.... मी स्वतः... तिला... ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो पण, ती तिथे नव्हतीच. ज्या रात्री
संन्वरी बेपत्ता झाली त्या दिवशी, संध्याकाळीच ती तिथून निघुन गेलेली होती... तिची ही सर्व माहीती मला अंजलीच्या मावशीकडुनच कळली."
"का..$.$..य??"
"होय सर, आणि मुख्य म्हणजे त्याच दिवशी रिद्धी गेल्यानंतर साधारणत: दोन-एक तासांमध्येच तिथे राहणारी अंजली बेपत्ता झाली. कॉलेजच्या बारा मिसिंग विद्यार्थांमध्ये तिचीच मिसिंग केस सर्वात आधी नोंदवण्यात आली होती.
थोडक्यात, अंजली आणि संन्वरी या एकाच वेळी गायब झालेल्या आहेत, सर"- भोसले.
"....आणि हे तुंम्ही मला आत्ता सांगताय...??? !!!... बरं रिद्धीचा दुसरा कुठला पत्ता मिळाला??"
"नाही, तिचा इथला दुसरा कोणताच पत्ता नाही आहे. मी कॉलेजचे रजिस्टरसुद्धा तपासले पण तिने आपला रेसिडेंट अॅड्रेस म्हणुन अंजलीच्या घरचाच पत्ता दिला आहे."
"आणि तिच्या वडीलांचा काही कॉन्टॅक्ट?"
"नाही, इथे कोणालाच तिच्या वडीलांबद्दल आणि त्यांच्या तिथल्या ठिकाणाबद्दल काहीएक माहीती नाही."
भोसल्यांच्या या उत्तराने पवारांचा चांगलाच हीरमोडा झाला. या घटनांच्या सुत्रधारकापर्यंत पोहोचण्याची ती एकमेव कडी़ होती आणि तिही आता हातातून निसटली होती. हाती लागलेलं मोठ्ठ घबाड़ अचानक स्वप्न तुटल्यामुळे हवेत विरघळुन जाव आणि डोळे उघडल्यावर हातात मात्र काहीच न उरावं अशी त्यांची गत झाली होती. पण अजुनही का कुणास ठाऊक, एक आशा त्यांच्या मनात कायम होती, जर ती इथंच असली तर....? त्यांनी मनातच काहीतरी विचार पक्का केला.
"भोसले तुंम्ही तिच्या रुमची झड़ती घेतली होती?"- पवार.
"हो, पण तिथे आंम्हाला काहीच संशयास्पद असं सापडलं नव्हतं! शिवाय पासपोर्ट आणि व्हिजा सोड़ला तर तिने आपल्याबरोबर काहीच नेलं नव्हतं."
"ह्म्म... तुंम्ही अस करा तिचा फोटो जवळच्या आपल्या सर्व पोलिस स्टेशनला ताबडतोब पाठऊन द्या आणि तिच्याबद्दल काहीही माहीती भेटली तर इकडे कळवायला सांगा."
"मी, ऑलरेडी तिचे फोटो काल सकाळीच सर्व पो. स्टेशनला पाठविलेले आहेत."
"हूं, व्हेरी गुड़!!"
"पण अजुनही तिच्याबद्दल कुठुनही माहीती मिळालेली नाही...यावरुन तरी हे नक्की कि, ती भारत सोडून कधीच......."
मध्येच, पवारांच्या टेबलावरचा फोन घणाणु लागला आणि भोसलेंचे बोलणे अर्ध्यावरच थांबले.
पवारांनी त्यांना हातवारेच शांत राहण्याचा इशारा केला आणि दुसर्या हाताने त्यांनी फोन रिसिव्ह केला.
"हॅलो, सन्स्पेक्टर पवार हीअर,.....हो....."
काही क्षण पवार काहीच न बोलता नुसते ऐकत होते आणि त्यांच्या चेहर्यावरचे भाव मात्र झटपट बदलत होते. काय घडतयं- काय होतयं, काहीच कळेना, पण काहीतरी झालं होतं हे निश्चित! भोसले तर पवारांच्या चेहर्यावरचे बदलणारे भाव पहून बुचकाळ्यातच पड़ले होते.त्यांनाही काही कळेना.शेवटी दोन मिनिटांतच पवारांनी फोन खाली ठेवला.!!
मघापासुन भाव बदलणार्या त्यांच्या चेहर्याने आता उग्र रुप धारण केले होते. डोळे तर जणु आगच ओकत होते. डोके अगदी सुन्न पडले होते. विचार करण्याची शक्तीच गोठली होती. पण मन मात्र एक वेगळीच धोक्याची सुचना देत होतं..."" ही तर फक्त एक सुरवात आहे..............""
"गोडबोले..$.$.$....." टेबलावरच्या बेलवर दोन-चार वेळा जोरात हात मारत त्यांनी हेड कॉन्स्टेबलला हाक मारली आणि टेबलावरची टोपी उचलून ते तडक केबिनच्या बाहेर आले त्यांच्या पाठोपाठ भोसलेसुद्धा गड़बडीत बाहेर आले. तोच, हेड् कॉन्स्टेबल गोडबोले धावतच सॅल्युट मारत त्यांच्या समोर हजर झाला.
"गोडबोले गाडी काढा़, आपल्याला ताबडतोब मरीन-ड्राईव्हला जायचं आहे; आत्ता- लगेच.. क्विक!!"
गोडबोले मानेनेच होकार देत धावत चावी घेऊन गाडीकडे गेले. आणि पवार आता सब. ई. जाधवच्या दिशेने वळले-
"जाधव, आंम्हाला यायला जरा ऊशिर होईल. तोपर्यंत..पोलिस स्टेशनची सर्व जबाबदारी तुमची!
मला भेटायला, जर कोणी आलंच तर ते कोण आहेत ते बघा आणि त्यांना उद्या बोलवा, खुपच अर्जंट असेल तर संध्याकाळी बोलवा, बाकी या केससंदर्भात जर कोणी आलेच तर त्याची संपुर्ण माहीती विचारा, आणि कसून तपासणी करा, कोणालाही ढीलं सोडु नका.
मी संद्याकाळपर्यंत परत येईनच, मी परत आल्यानंतर या दिवसाचा पुर्ण रिपोर्ट मला हवाय!
आणि हो.... कोणाचा फोन आलाच तर आंम्ही कुठे गेलोत हे सांगु नका, -अगदी कमिश्नरांनासुद्धा!!!"
एवढे बोलुन पवार डाव्या बाजुला ऊभ्या असलेल्या भोसलेंकडे किंचित मान वळवुन त्यांना म्हणाले,-
".....आणि तुंम्ही माझ्याबरोबर चला!"
"काय झालयं सर..?" मघापासुन पवारांच्या रागाच्या भितीने घशात अडकलेला प्रश्न आत्ता भोसलेंनी कसाबसा बाहेर काढ़ला.
"रिद्धीचा पत्ता लागलाय...."डोक्यावर हॅट चढवत, गाडीच्या दिशेने झपाझप पावले टाकीत पवार उद्गरले.
आणि त्याचवेळी भोसलेंच्या तोंडावर एक विजयाचा आनंद पसरला; पण काही क्षणातच पवारांच्या पुढ़च्या शब्दाने तो एकदमच ओसरुन त्यावर भिती आणि चिंतेचे सावट पसरले होते..
"शी इज डे़ड़...........................!!!!!!!!!!!!!!!!!!"
क्रमश:
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>>भाग=>3 पुढे़ वाचा...
आवडलं, रोज नवीन भाग येउदेत
आवडलं, रोज नवीन भाग येउदेत !!!!
मस्तच! पुढचे भाग लवकर लवकर
मस्तच! पुढचे भाग लवकर लवकर येउदेत!
लवकर म्हंजे कधी?
लवकर म्हंजे कधी?
सहीच
सहीच
मस्त पण खुप कमी टाकलय... लवकर
मस्त
पण खुप कमी टाकलय...
लवकर पुढील भाग टाका......................वा
>>मुख्य म्हणजे त्याच दिवशी
>>मुख्य म्हणजे त्याच दिवशी रिद्धी गेल्यानंतत साधारणत: दोन-एक तासांमध्येच तिथे राहणारी अंजली बेपत्ता झाली. कॉलेजच्या बारा मिसिंग विद्यार्थांमध्ये तिचीच मिसिंग केस सर्वात आधी नोंदवण्यात आली होती.
थोडक्यात, रिद्धी आणि संन्वरी या एकाच वेळी गायब झालेल्या आहेत, सर
इथे माझा थोडा गोंधळ झाला.
१. आधी रिध्दी गायब झाली आणि मग त्यानंतर अंजली आणि सन्वरी गायब झाल्या का? तसं असेल तर रिध्दी perpetrator नसून victim असू शकते.
२. बाकीचे दहा (का बारा?) विद्यार्थी ह्यानंतर गायब झाले का?
३. सन्वरीचे बाबा म्हणतात की सन्वरी १० दिवसांपासून गायब आहे. पण भोसलेंच्या मते बाकीचे विद्यार्थी ७ दिवसांपासून गायब आहेत. मग मधले ३ दिवस काहीच झालं नाही का?
४. रिध्दीने व्हिसा घेतला असेल तर कॉन्सुलेटमधुन तिच्या वडिलांचा परदेशातला पत्ता मिळू शकतो.
सॉरी, कथा इंटरेस्टींग वाटतेय म्हणून एव्हढे प्रश्न विचारले. 'बालकी खाल' किंवा चुका काढायचा उद्देश अजिबात नाही. प्लीज रागवू नका.
मस्त... आवडला हा भाग..
मस्त... आवडला हा भाग..
पु.ले.शु. खुप दिवसांनी फार
पु.ले.शु.
खुप दिवसांनी फार मज्जा येतेयय..............
@ स्वप्ना_राज, तुमचा स्पष्ट
@ स्वप्ना_राज, तुमचा स्पष्ट वक्तेपणा चांगला आहे, मी त्यांच स्वागत करतो.
तुमच्या सर्व शंका माझ्या ध्यानात आलेल्या आहेत. खरं तर या सर्व बाबी पुढल्या कथेमध्ये घटना आहेत. हो पण मला तिघिंच्या गायब होण्याच्या वेळेचा अगोदरच उल्लेख करायला हवा होता. असं मलाही वाटलं त्याबद्दल क्षमा असावी. पुढल्या भागात या सर्वांच्या गायब होण्याच्या वेळा सविस्तर माहित पडतील.
१. प्रथम रिद्धी घरातुन गेली.
त्यानंतर दोन तासांनंतरच अंजली आणि मग संन्वरी! असा हा क्रम आहे ते कसे गायब झाले ते पुढल्या तपासात कळेल.
२. भोसल्यांच्या मते, संन्वरी सोडुन इतर १२ विद्यार्थी बेपत्ता आहेत.
पण त्यापैकी फक्त १० जणांचीच पोलिस मिसिंग मध्ये नोंद झालेली होती बाकीच्या दोघांची का केली नाही हा प्रश्न पुढील कथेला वेगळे वळण देणारा आणि पवारांना कोड्यात टाकणारा आहे.
३. मी वर सांगितल्याप्रमाणे- प्रथम तिघी गायब होतात, आणि त्यानंतर तीन दिवसांनंतर बाकीच्या बारा विद्यार्थ्यांचे गायब होण्याचे सत्र सुरु होते. या तिन दिवसांतील गुढ़ हे अंतिम कथेमध्ये माहित पडेल.
४. इथे मात्र तुंम्ही कथेच्या एका मर्मावरच बोट ठेवले आहे, मी जास्त काही नाही सांगणार फक्त एवढेच सांगेन की याचा प्रत्येक दृष्टीकोनातून मी विचार केलेला आहे.. बाकी "समझनेवालो को सिर्फ एक इशारा ही काफी होता है!"
छान... नवीन भाग रोजच टाका...
छान... नवीन भाग रोजच टाका... विनंती...
मस्त... आवडला हा भाग....नवीन
मस्त... आवडला हा भाग....नवीन भाग रोज टाका.....
छान इन्ट्रेस्टींग आहे ....
छान इन्ट्रेस्टींग आहे ....
लवकरात लवकर पुढचा भाग येऊदेत म्हणजे वाचायला मजा येते.
अन्नु मस्तच गोष्ट
अन्नु
मस्तच गोष्ट आहे.
बेपत्ता झालेल्या सर्व विद्यार्थी मुलीच आहेत काय?
गोष्ट सुरेखच आहे पण जस्ट मनात हा प्रश्ण आला.
स्वप्ना राज: >>>> "आधी रिध्दी
स्वप्ना राज: >>>> "आधी रिध्दी गायब झाली आणि मग त्यानंतर अंजली आणि सन्वरी गायब झाल्या का? तसं असेल तर रिध्दी perpetrator नसून victim असू शकते."<<<<<
=>कथेतील मुलींच्या गायब होण्याच्या वेळेचे निश्चित स्पष्टीकरण नसल्याने तुमचा झालेला गोंधळ लक्षात घेवुन मी तुर्तास भोसलेंच्या बोलण्यात एक किंचितसा बदल केला आहे; बाकी याचे सविस्तर विवरण पुढे येइलच.
रिद्धीबद्दलचा perpetrator की victim हा प्रश्नच या भागात उपस्थित केला गेला आहे.!
अन्नु, खूप आवडली तुमची शैली.
अन्नु, खूप आवडली तुमची शैली. भयकथा माझ्या खास आवडत्या असल्यामुळे मी त्या प्रकाराच्या कथा आधी वाचते. पुढचा भाग कधी येतोय असे वाट्तेय. येउ देत पुढ्चे भाग लवकरच!
अमी
छान चालली आहे कथा, पण
छान चालली आहे कथा, पण शुद्धलेखनाच्या चुका कमी करता येतील का? हवं तर मी काढूनही देऊ शकेन, पण वाचताना ते अशुद्ध लेखन खूप खटकत राहते. अर्थात हे सांगण्यामागचा हेतू स्वप्नासारखाच: कथा इंटरेस्टींग वाटतेय म्हणूनच. 'बाल की खाल' किंवा चुका काढायचा उद्देश अजिबात नाही. प्लीज रागवू नका.
अन्नू, स्पष्टीकरणाबद्द्ल खूप
अन्नू, स्पष्टीकरणाबद्द्ल खूप खूप आभार पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
शुभेच्छा!!! भाग लवकर
शुभेच्छा!!!
भाग लवकर टाका.... एकदा लिंक तुटली की बोअर होतं....कंटाळा येतो कामातुन वेळ काढुन पुन्हा वाचत बसायला.
आवडला हा भाग पुढच्या भागाच्या
आवडला हा भाग
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
अन्नूजी, सुरूवात चांगली झाली
अन्नूजी, सुरूवात चांगली झाली आहे. पण
मधेमधे लिंक का बदलता ? त्यामूळे वाचण्याची लिंक तुटते.
कथेमध्ये नेमकं काय घडत आहे काहीच कळत नाही.
Kidnaping आहे की, प्रेमकथा आहे.
क्रूपया प्रेमकथा असेल तर त्यामध्ये Suspence ठेवू नका.
मस्तंच! पुढच्या भागाच्या
मस्तंच!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
तुंम्हा सर्वांची उत्कंठा मी
तुंम्हा सर्वांची उत्कंठा मी समजु शकतो, म्हणूनच मी या कथाचे पुढील भाग तुमच्या कसोटीवर खरे उतरावेत आणि वास्तविक वाटावेत यासाठी प्रयत्न करित आहे. या दोन दिवसांतच मी पुढचा भाग टाकत आहे....
@ निलिमा->> बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींबरोबरच मुलांचाही समावेश आहे, ३र्या -४ थ्या भागांत याचे स्पष्टीकरण होईल.
@ dhaaraa=>> मी शुद्धलेखनाकडे़ नक्कीच लक्ष देईन आणि तुंम्ही सुद्धा त्यातील अधिक चुका काढु शकता, मी त्यांचे स्वागत करीन!
@ चातक->> तुमची लिंक तुटणार नाही, कथा दोन दिवसांत टाकतोय.
@ मी मनी म्यांऊ->> ही सस्पेंन्स प्रेमकथा आहे. मी दाखवत असलेल्या दोन कथांचा काय अर्थ आहे हे गुढ़ मी आत्ताच सांगणार नाही, पण हे उघड झाल्यानंतर नक्कीच तुंम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
नवीन भाग कधी.............
नवीन भाग कधी............. येणार????????
या दोन दिवसांतच मी पुढचा भाग
या दोन दिवसांतच मी पुढचा भाग टाकत आहे..........>>>> दोनावर शुन्य तर नाही ना टाकलं !!
ती भयानक का काही कथा होती
ती भयानक का काही कथा होती तिचे ४ भाग झालेले (अन्नुची नाही).
ती पण अर्धवट राहिली वाटते, धागाही मिळत नाही.
नवीन भाग कधी येणार?
नवीन भाग कधी येणार?
@निलिमा : भयानकचा पाचवा भाग
@निलिमा : भयानकचा पाचवा भाग टाकलाय .... जरा इथे क्लिक करा....
लिंक : http://www.maayboli.com/node/30352
'>>>>>बारा...... ..- बारा
'>>>>>बारा...... ..- बारा विद्यार्थी बेपत्ता झाले होते आणि अद्याप त्यांचा काहीएक मागमुस लागला नव्हता<<<<<
अन्नूजी या १२ मध्ये तुम्हीदेखील आहात काय ?
१९ OCT ते १४ NOV जवळजवळ १ महिना.
लिहायला इतका वेळ लागत असेल तर तुमची लिहायची लायकी नाही.
राग येतोय. . . . .
अरे प्रेमाने सांगितले तर कळत नाही आपल्याला.
मस्त खुपच चान ....पन आधिचा
मस्त खुपच चान ....पन आधिचा भाग वाचावा लागला....लवकर टाका नवीन भाग.
नविन भाग लवकर टाका.
नविन भाग लवकर टाका.
Pages