'गावाकडची छायाचित्रं' - प्रकाशचित्र स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 12 October, 2011 - 02:17

'माझे गाव' हे शब्द शहरातल्या जीवनाच्या लढाईत अडकलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे एका क्षणात काही रम्य दृश्यं उभी करतात.. गावातली पहाट, पाखरांचे आवाज, चुलीतून निघालेला धूर, क्वचित रहाटाचे / पंपाचे आवाज, शेतावर, कामावर निघताना एकमेकांना दिलेल्या हाळ्या, गावची शाळा, मास्तर, गावचा पार, चावडी, जत्रा आणि देऊळ! तसंच, गावाचे नमुनेही- काही निरागस, काही बेरकी, तर बरेचसे उद्याच्या चिंतेने ग्रासलेले.

स्मृती जपायला आता मनाबरोबरच कॅमेर्‍याची भक्कम आणि उत्तम साथ आपल्याला मिळालेली आहे. तुमच्या मनात आणि अर्थातच कॅमेर्‍यात बंदिस्त असतील गावतल्या अनेक रम्य आठवणी.. तर अशीच गावाकडची खास निवडक छायाचित्रं इथे सगळ्यांबरोबर पाहूया.. इथे पोस्ट करा, तुम्ही काढलेली गावाच्या आयुष्याची छायाचित्रं.. सगळे मिळून त्या विश्वात काही क्षण डोकावून पाहूया..

स्पर्धेचे नियम -

१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.
२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.
३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.

स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!!!

पहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी
दुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.

तर मग सरसवा आपले कॅमेरे, आणि जिवंत करा गावाकडचे क्षण!!!

विषय: 
Groups audience: 

प्रचि ल दिलेल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार मित्रहो !

सर्वच्या-सर्व फोटो, खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्च सुंदर Happy

वॉव!!!!!!
जबरी फोटु आलेत सगळे. मोहरे बैलगाडी असलेला फोटुची फ्रेम जबरी झालीय.
अजय पहिले दोन्ही फोटो खासच. Happy
फोटोंच कौतुक करणार्‍या सर्वाना धन्यवाद.
लिम्बुभो, हे फोटु मी पिकासावरुन टाकलेत. तुला कसे काय दिसत नाहीत?
नोटच प्लिजचः रेडकू सोडून बाकी सर्व फोटुत लिम्ब्या आहे.??? हाहाहाहाहा.
हे सांगितलस ते बर केलस.
बाय द वे, शेतीच्या मालकीण बाईचा रुबाब चेहर्‍यावर दिसतोय तर तुझ्या चेहर्‍यावर गरीब कातकर्याचे भाव आहेत. Happy

हा एक फोटो शोधुन शोधुन टाकतोय.
From TP" alt="" />

>>>> बाय द वे, शेतीच्या मालकीण बाईचा रुबाब चेहर्‍यावर दिसतोय तर तुझ्या चेहर्‍यावर गरीब कातकर्याचे भाव आहेत. <<< तुला "कोकराचे भाव" असे म्हणायचे होते का? Proud
थाम्ब लेका, तो फोटो आमच्या लग्नानन्तर १२ वर्षान्नि काढलेला हे, तेव्हा तसाच असणार, तुला मात्र येवढी बारा वर्ष लागतात की त्याआधीच.. ते सान्गुन ठेव, येतोच फोटु काढायला तेव्हा! Wink (तसही तू लग्नानन्तर "तोन्डदेखिल' दाखवल नाहीयेस कुणालाच, ते का बर? Lol )
अरे आमच्यात पिकासा/फ्लिकर वगैरे बाहेरच्या स्टोरेज साईट्स ब्यान आहेत Sad सबब तिकडील लिन्क दिलेले फोटो दिसत नाहीत, फक्त मायबोलीवर अपलोड केलेलेच तेवढे दिसतात! थोडे कष्ट घे अन माबो वर अपलोड करुन दाखिव इथे, तर दिसतील मला.

शैलजा पतवा म्हणजे चांदीची पदकं ज्याला तांब्याची border असते. पुजेला लावलेल्या ह्या प्रत्येक पतवा आमच्या घराण्याच्या मुळपुरुषापासुन आधीच्या पीढ्यांतील पुर्वजांच्या नावाने तयार केलेल्या आहेत. ह्या पेक्षा जास्त माहिती हवी असेल तर आईला विचारावे लागेल..

असतील कदाचित नक्की माहित नाही. आमच्या घरी तरी त्यांना पतवाच म्हणतात आता ह्या फक्त आमच्याच देवघरात आहेत की प्रत्येक कोकणस्थांच्या घरी असतात ते देखिल माहित नाही कुणाला या बद्द्ल माहिती असेल तर जरुर लिहा.

आमच्याकडे पण त्याला टाक म्हणतात. पूजा करुन करुन तो झिजतो, मग तो परत घडवून आणावा लागतो.

लिंब्या, मी मुंबैत नाही, आफ्रिकेतल्या नैरोबीत आहे.
बाकी शेती, खेड्यातले घर, बाजार, गाईगुरं, चावडी... सगळीकडे तसंच.. माणसांच्या कातडीचा रंग तेवढा वेगळा. पण भाबडेपणा तोच. अगदी पहिल्याच भेटीत, घरी सगळे कसे आहेत ? असा प्रश्न अगदी हातात हात घेऊन विचारतील.

हर्षदा परब तुम्ही टाकलेला पहिला फोटो खूप आवडला इथुनच मी त्या चुलीची ऊब अनुभवली,चुलीच्या अगदी बाजुला बसून जेवायला खूप आवडते मला पण गेल्या कित्येक वर्षात तो योगच आलेला नाही Sad

हो, चूल आणि वर एका झोपाळ्यात बसलेल्या मुलांचा फोटो आहे- त्यात मागे बुरूडाच्या टोपल्या/ कोठ्या आहेत- एकदम मस्त वाटले ते पाहून.

ह्या आमच्याबी प्रवेशिका - Happy

प्रवेशिका - १

प्रवेशिका - २
(यात आमची इटुकली पिटुकली शाळा हाये बरं!)

प्रवेशिका - ३

गजाभाऊ सुरेखच ! Happy
हर्शदा, त्या चुलीच्या बाजुला मांजराची पिले आहेत कि कुत्र्याची ?
मस्त फोटो आहे तो!

आमच्या कशेळी गावातलं एक घर. हा लांबूनचा नजारा!

DSCN3763.JPG
घराकडे जातानाचा रस्ता आणि बुरूज!
DSCN3761.JPG
हेही तेच घर ...वेगळ्या कोनातून.
DSCN3760.JPG

<<हर्षदा, त्या चुलीच्या बाजुला मांजराची पिले आहेत कि कुत्र्याची >>
मांजराची पिले आहेत ती.:)

Pages