स. प. महाविद्यालय

Submitted by webmaster on 7 April, 2008 - 08:45
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

स.प बोअर असूदे, माझ्या आठवणी बोअर नव्हत्या ना पण! Proud

असो. मी सिन्सिअर क्याटेगरीत होते कायमच, त्यामुळे कॉलेज सांभाळून दंगा केला असेल तो आठवत नाही फार. Happy

मास्तुरे Lol
मी आहे हो संख्याशास्त्राचा मनुष्य ९६ सालातला. सावळे (की साबळे नेहेमी कन्फ्युजन होते), गानू, सहस्त्रबुद्धे या मॅडमा आणि सरांमधे द ग्रेट केळकर, हरिश्चंद्रकर, नाईक
मी लास्ट इयरला येण्याच्या आधीच केळकर सर रिटायर्ड झाले तेव्हा मला फार वाईट वाटले होते.
इकडे मॅथ्सवाले कोणी आहे का ? आता शेठ सर प्राचार्य आहेत.

अरे क्या बात है, एन. एम च्या क्लासला जे लोक होते ते खरेच भाग्यवान.
एक लाख इन्टिग्रेशनचे प्रश्न (उत्तरांसह) माझ्या डोक्यात तयार आहेत असे म्हणायचे.

>>> मी आहे हो संख्याशास्त्राचा मनुष्य ९६ सालातला. सावळे (की साबळे नेहेमी कन्फ्युजन होते), गानू, सहस्त्रबुद्धे या मॅडमा आणि सरांमधे द ग्रेट केळकर, हरिश्चंद्रकर, नाईक
मी लास्ट इयरला येण्याच्या आधीच केळकर सर रिटायर्ड झाले तेव्हा मला फार वाईट वाटले होते.

केळकर सर उत्तम शिकवायचे, पण त्रासदायक होते. इंटर्नलला ४० पैकी १६ ला पासिंग होते. इतर कोणतेही सर १५ मिळाले तर १ जास्त मार्क देऊन पास करायचे. केळकरांनी कधीही १५ चे १६ केले नाहीत. अगदी एखाद्याचे वर्ष वाया जात असले तरी ते मार्क वाढवायचे नाहीत. जोशी आणि आचारी ह्या मॅडम पण संख्याशास्त्राला होत्या. तिथले वातावरण एखाद्या शाळेसारखे होते. बहुतेक सर्व शिक्षक खडूस होते. तिथली टायपिस्ट (बहुतेक करंदीकर नाव होते) पण खडूस होती. हरिश्चंद्रकर सर वरकरणी कठोर पण अंतर्यामी सहृदय होते.

तुम्ही पण होतात की काय स्टॅट्स स्पेशलवाले ? टायपिस्ट रास्ते नावाच्या बाई आठवतात.
वातावरण अगदी शाळेसारखे होते हे बरोब्बर. माझा हरिश्चंद्रकर सरांशी अजुनही संपर्क आहे.
वयाची आणि तब्ब्येतीची तक्रार न करता अजुनही उत्साहाने शिकवतात (स.प.मधे नाही)

>>> तुम्ही पण होतात की काय स्टॅट्स स्पेशलवाले

बरोबर ओळखलंत Happy

हरिश्चंद्रकर सर अजून शिकवतात? कुठे?

saco, हो गं खरंच >>> मनिमाऊ, मी "रे" आहे, "ग" नाही Lol
मनिमाऊ पण खरच मनिमाऊ आहे की बोकोबा ? Light 1
(स्त्री / पुरूष असे लिहिले नसेल आणि नाव जर किरण, शितल, असे काही असेल तर कळत नाही)

सावळे मॅडम, करेक्ट Happy

अलुरकर सर नव्हते का कोणाला? सगळे विज्ञान शाखा म्हणून असेल Happy कॉमर्सला बिझनेस कम्युनिकेशन शिकवायचे. अमेझिंग कमान्ड होती त्यांची भाषेवर. थोरात मॅडमही कमाल इन्ग्लिश शिकवायच्या. बाकी बर्‍याच आठवणी लिहिल्या होत्या, वाहून गेल्या आता, असो Happy

११ वी १२वी मुलींच्या नुमवीला असताना आम्ही स प मधे बॉटनी आणि केमच्या प्रॅक्टिकलसाठी यायचो तेव्हा स प मधली मुलं फारच सिन्सियर वाटायची आम्हाला Wink

कसल आलय सिन्सिअर, दुरून डोंगर साजरे Happy
मला आर्टसचे एक दोन सर आठवतात, सोमण, तांबे, इ.
तत्वज्ञान विषयाला भागवत (बहुतेक) सर होते काय ?
मॅथ्सचे उडुपीकर, सोलापूरकर,
फिजिक्सचे शाम मनोहर, पंडित, कारखनीस
केमिस्ट्रीचे गाडगीळ, जोगळेकर, शेटे
आणि बर्वे (हे आता कोणाला फारसे माहित नसतील कारण ९१/९२ च्या सुमारास निवृत्त झाले असावेत)
इ. आठवतात

अरे महेश, मी ८५ ला होतो. त्यावेळी जोशी, गानू, सहस्त्रबुद्धे, आचारी, सावळे इ. मॅडम व केळकर, हरिश्चंद्रकर व नाईक सर होते. करंदीकर नावाची एक टायपिस्ट होती.

>>> फिजिक्सचे शाम मनोहर, पंडित, कारखनीस

अरे, पंडित व कारखानीसांना मी विसरलोच. पंडित कोणत्याही प्रॅक्टिकलच्या परिक्षेला एकच प्रश्न विचारायचे - "पोस्ट ऑफिस बॉक्सला पोस्ट ऑफिस बॉक्स हे नाव कसे मिळाले?", कारण या एकाच प्रश्नाचे उत्तर त्यांना माहित होते बहुतेक. सायन्स क्विझला देखील त्यांचा ठरलेला प्रश्न असायचा - "जास्वंदीच्या फुलाला शू फ्लॉवर का म्हणतात?"

>>> केमिस्ट्रीचे गाडगीळ, जोगळेकर, शेटे आणि बर्वे (हे आता कोणाला फारसे माहित नसतील कारण ९१/९२ च्या सुमारास निवृत्त झाले असावेत) इ. आठवतात

गाडगीळ व जोगळेकर आठवत नाहीत. केमिस्ट्रीचे अवचट सर आठवतात. शेटे खवचट होते. बर्वे अत्यंत कुजकट व खवचट होते. धोतर घालून येणारे गुर्जर म्हणून अजून एक सर होते. बर्वे, गुर्जर व परांजपे सर फक्त प्रॅक्टिकल घ्यायचे.

ह्म्म्म्म तुम्ही आम्हाला कैच्याकैच शिनिअर आहात.
मी जेव्हा प्रथम वर्षाला आलो तेव्हा केमिस्ट्रीच्या लॅबमधे
पहिल्याच प्रॅक्टिकलला प्यूनला विचारले "पोटॅशिअम सायनाईड" आहे का ?
थोड्याच वेळात स्वेटर, कानटोपी परिधान केलेल्या बर्वे सरांपुढे जावे लागले (बोलावणे आले म्हणुन)
माझ्याकडे आपादमस्तक पहात म्हणाले "पो.सा." कशाला हवे आहे ?
प्रेमभंग वगैरे झालाय की काय ? Happy

>>> माझ्याकडे आपादमस्तक पहात म्हणाले "पो.सा." कशाला हवे आहे ?

Rofl अगदी चित्पावनी खोचक बोलायचे ते. ते म्हणजे एक नमुना होते.

एकदा एक मुलगा HCL च्या बाटलीला हात लावायला घाबरत होता. आपला हात भाजेल अशी त्याला भीति वाटत होती. प्रयोगशाळेतले HCL concentrated नसते हे त्याला माहित नव्हते. त्याची भीति बघितल्यावर त्यांनी सर्व मुलांना जवळ बोलावले व सांगितले की, "बघा हो बघा. हा म्हणतोय की HCL ने हात भाजतो." असे म्हणून ती आख्खी बाटली हातावर ओतून घेतली.

saco, हो गं खरंच >>> मनिमाऊ, मी "रे" आहे, "ग" नाही. >>>>

ईईईईई, saco, सॉरी. मी प्रोफाइल पाहिलंच नाही. Sad पण पुर्वी पण एका पोस्टमधे तुला तसंच काही तरी संबोधलं होतं, तेव्हाच करेक्ट करायचं ना मला. सॉरी रे ! Happy

तेव्हाच करेक्ट करायचं ना मला>> मला नाही आठवत हे
असो, चल्ता है Happy
शेवटी रे काय किंवा ग काय स्वरसप्तहातलेच स्वर.

सपेम स.प ला कोनि येत का तुमच्यापैकि?

कमाल आहे ...मि टाकलेल पोस्ट का दिसत नाहि.....कस चेच्क करायच कोनि सागेल का?>>> आम्हाला दिसतय की स्मित
मला हि दिसल बर...स्मित