हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयभाऊ >>>> अनुमोदन
खरंच मलापण हॅरी पॉटर ची मराठी पी.डी.एफ. सिरीज हवीये........
कुणाला मिळाली तर कळवा...

उदयभाऊ माझा आय डी मीसुद्धा तुमच्या विपू मध्ये पोस्टला आहे....तिथे मला मराठी हॅरी पॉटर पी.डी.एफ मेल करा...

ती जादूची पुस्तकं आहेत. प्रत्येकवेळी वाचतांना नवीन माहिती मिळते.
बघा दुसर्‍यांदा वाचून अन मग सांगा.>>>>>>>>>> अगदी Happy

बाकी जामोप्या, प्लीज प्लीज पुस्तकं वाचा आणि त्यानंतरही काही शंका असतील तर नक्कीच विचारा..

बटर बीअर कशी करायची?>>>>>>>> ते ट्रेड सिक्रेट आहे, त्यामुळे त्याची पाकॄ मिळणार नाही.. चव हवी असल्यास नेटवर शोधुन ती कुठे मिळते हे बघा आणि ऑर्डर करा...

पण जर नावावर जायचं म्हटलं तर, बीअर मधे लोणी टाकुन बटरबीअर बनवु शकता.. Happy

मोनिंग मर्टल म्हणजे मायुस मीनाला नेमके कोण मारते? कालदृष्टी म्हणजे बेसिलिक साप की टॉम रिडल... बहुतेक टॉम तिला हॉरक्रक्स करण्यासाठी मारतो ना?

तिला साप मारतो. टॉम नाही. त्याच्या चेंबर मध्ये जायचा/यायचा रस्ता गर्ल्स टॉयलेट मधून असतो. मीना त्याचा (टॉमचा )आवाज ऐकते; तिला वाटत चुकून एखादा मुलगा आत आलाय, त्याला सांगायला ती बाहेर येते, तिला फक्त (बहुदा लाल) डोळे दिसतात सापाचे आणि ती मरते.

टॉमनेच तो साप सोडलेला असतो.. ती मेल्यावर टॉम डायरीचा होरक्रक्स तयार करतो.. प्रत्येक होरक्रक्स साठी एकेक मर्डर आवश्यक असतो. http://harrypotter.wikia.com/wiki/Myrtle

ट्राय विझार्ड टूर्नामेंटच्या वेळी हॅरी आणि इतर स्टुड्म्ट आंघोळ करतात तेंव्हा मर्टल तिथे असते.. पण मर्टल तर लेडीज बाथरुममध्ये असते ना? का बाथरुम लेडीज जेंटना कॉमन असते? Happy ( हॅरी आंघोळ करतानासुद्धा चश्मा घालत असतो.. Proud )

टॉमनेच तो साप सोडलेला असतो.. ती मेल्यावर टॉम डायरीचा होरक्रक्स तयार करतो.. प्रत्येक होरक्रक्स साठी एकेक मर्डर आवश्यक असतो.>>>> डायरी हा पहिला हॉरक्रक्स, म्हणजे मर्टल हा टोमने केलेला पहिला मर्डर>>>>>>> नाही... टॉम तेव्हा हॉरक्रक्स नाही तयार करत.. तो त्या वेळेस पाचव्या वर्षात शिकत असतो.. आणि तिला सापच मारतो, टॉम नाही..

हॅरी आंघोळ करतानासुद्धा चश्मा घालत असतो>>>>> पुस्तकात त्याने चष्मा काढल्याचा उल्लेख आहे...

डेथ इटरना पेट्रोनस ( पितृदेव) मंत्र का येत नसतो? स्नेप एकमेव अपवाद.>>>>>>>>> असं कोणं म्हणतं??? याचा उल्लेख कुठे आहे??? संदर्भ द्या...

आणि जागोमोहनप्यारे पुढचे प्रश्न विचारण्या आधी तुम्ही पुस्तकं वाचली का या प्रश्नाचं उत्तर द्या.... Happy

तिला सापच मारतो, टॉम नाही..

.. Looking at a Basilisk's eyes being a fatal act, Myrtle's body fell to the bathroom floor. Her death was the murder that Tom (Lord Voldemort) used to make his first Horcrux: the Diary.

http://harrypotter.wikia.com/wiki/Myrtle

हॅरी पॉटर विकियावरच पेट्रोनस चार्म बद्दल उल्लेख आहे. त्यात दिले आहे की डेथ इटरना ते येत नसते.. फक्त स्नेप्चा अपवाद..... बहुतेक मला वाटते की डेथ इटर क्रूर असतात... वॉल्डेमॉर्टने तर स्वतःच्याच बापाला मारलेले असते. ते स्वतःच्या पितरानाही क्रूर वागणूक देत असतील, ( किंवा ते त्यांचं श्राद्ध वगैरे करत नसतील Proud ) म्हणून त्याना तो चार्म येत नसणार. पिक्चरमध्ये आणि कादंबरीतही डेथ इटरनी हा चार्म कधी वापरलेला दिसत नाही.

..... the fact that Rowling stated that no Death Eater besides Severus Snape could produce a Patronus. http://harrypotter.wikia.com/wiki/Patronus_Charm वर Behind the scenes मध्ये उल्लेख आहे.

मी पुस्तक पी डी एफ आणि पिक्चर दोन्ही एकदम पहात असतो. Proud

आता गॉब्लेट मधील प्रश्न.... त्रिकोणीय स्पर्धेच्या आधी अलस्टर मुडी आणि हॅरी बोलत असतात... त्यात हॅरी म्हणतो की ड्रॅगन राउंडला उडता झाडू वापरता येत नाही.. पण प्रत्यक्षात मात्र हॅरी झाडू वापरताना दाखवले आहे. हे कसे?

हॅरी वॅड वापरून त्याच्या ब्रुमस्टिकला बोलावतो. त्या राउंडमध्ये फक्त वँड वापरता येणार असतो. हरमॉयनी हॅरी ला त्यासाठी समनींग चार्म शिकवते.

हॅरी पॉटर विकियावरच>>>>>> ओके.. पण ती ऑफिशिअल वेबसाईट नाहिये ना हॅपॉ करता??

मी पुस्तक पी डी एफ आणि पिक्चर दोन्ही एकदम पहात असतो. फिदीफिदी>>>>> आता गॉब्लेट मधील प्रश्न.... त्रिकोणीय स्पर्धेच्या आधी अलस्टर मुडी आणि हॅरी बोलत असतात... त्यात हॅरी म्हणतो की ड्रॅगन राउंडला उडता झाडू वापरता येत नाही.. पण प्रत्यक्षात मात्र हॅरी झाडू वापरताना दाखवले आहे. हे कसे?>>>>>>
जामोपा, एकाच पोस्ट मधे विरोधाभास Wink पुस्तकात सरळ सरळ लिहिलं आहेच की समनिंग बद्दल.. मूव्हीमधेही हॅरी ने तेच केलेलं दाखवलं आहे Happy

मी परवा पहिल्या भागातला शेवटचा फिलॉसॉफर्स स्टोनपर्यंतचा प्रवास आणि तिथली लढाई वाचत होतो. काकूंना मनातल्या मनात कितीदा दंडवत घातला. काय काय युक्त्या प्रसवल्यात बाईंनी. कसली जादुई कल्पकता! रॉनचे बुद्धीबळ, हर्मायनीचं कोडं, आणि शेवटचा सामना! जसे वाचू तसे बारीकातल्या बारीक गोष्टीचा उलगडा होत जातो.. किती निर्भेळ आनंद वाटतो वाचताना.

ते सात बाटल्यांचं कोडं पण कसलं गोंधळात टाकतं. बाईंना दंडवत..

समनिंग वाचले होते. पण कळले नव्हते. Proud आणि अलाउड नाही म्हटल्यावर समनिंग करुन बोलावणे कसे चालते?

जामोप्या, त्या स्पर्धेमधे उतरताना फक्त आपली जादूची छडी घेऊन जायचं. त्यानंतर त्या छडीचा आणि इतर मंत्राचा वापर करून ड्रॅगनपासून सुटका करवून घ्यायची. सुरूवातीलाच ब्रूम स्टिक अलाऊड नसते.

हॅरी हा उत्तम क्विडीच (मराठीत विचित्र वाटतं) प्लेयर असल्याने आपण ब्रूमस्टिकवरून ड्रॅगनला हरवू शकतो हे त्याला माहित असतं. तरीपण इतक्या अंतरावरून ब्रूम्स्टिक समन करणे हेच त्याच्यासाठी अशक्य असते. त्यासाठी हर्मायनी त्याला त्या मंत्राची प्रॅक्टिस करायला मदत करते.

अलाउड नाही म्हटल्यावर समनिंग करुन बोलावणे कसे चालते?>>>>>>>>>>> ब्रूम स्वतःबरोबर घेवुन येणं अलाउड नव्हतं.. तिथे जाताना फक्त वॅन्ड घेवुन जायचा असतो.. नंतर कोणताही स्पेल वापरलेला चालणार असतो.. त्यामुळे हॅरी तिथुन ब्रूम समन करतो...

ते सात बाटल्यांचं कोडं पण कसलं गोंधळात टाकतं. बाईंना दंडवत..>>>>> यु नो हु, तुम्ही बाईंचं कौतुक करताय म्हणुन तुम्हाला __/\__ Happy

इन्सानो मे ठीक वही चीज चुनने की आदत होती है जो उनके लिये सबसे बुरी चीज होती है |

..... डंबल्डोर हॅरीला ... ( हॅरी आणि पारस पत्थर मध्ये सर्वात शेवटी हॉस्पिटलमध्ये )

hp1.JPG

रोलिंग बाईना सलाम... हे वाक्य म्हणजे मर्फीज रूलचे रोलिंगी रुपांतर म्हणायला हरकत नसावी. Proud . ( व्हाटेवर हॅज टू गो राँग विल गो राँग ! ) Proud हे वाक्य मूळ इंग्रजीत कसे आहे?

Pages