Submitted by अमोल रमेश पाटिल on 10 October, 2011 - 03:31
मनावर केलेस वार
हृदय माझे तोडलेस,
तुझ्या विचारात बंदिस्त
श्वास माझे कोंडलेत.
अपमानाचे घोट सतत
किती दिवस प्यायचे,
तोडून सारे पाश आज
मला मुक्त व्हायचेय.
घेवून भरारी उंचच उंच
जग आहे मी जिंकणार,
पसरून पंख चोहिकडे
आकाश कवेत घेणार.
दाखवून देणार तुलाही
माझं काय अस्तित्व आहे,
माझ्याशिवाय तू म्हणजे
फक्त एक शून्यच आहेस.
तेव्हाच बहुतेक तुला
माझं खरं महत्व कळेल,
पण माझ्या आयुष्यातून तुला
मी कायमचं दूर केलं असेन.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
http://santoshiworld.blogspot
http://santoshiworld.blogspot.com/2007/05/blog-post_2769.html
श्रीयुत अमोल रमेश पाटील आपण
श्रीयुत अमोल रमेश पाटील
आपण नकळत एक महान काम करून गेला आहात. आजनंतर कित्येक "होतकरू" तरूणांचे दुवे तुम्हाला मिळब्णार आहेत. तुम्ही या कवितेची प्रसिद्धी केल्याने सुयोग्य
वाचकांना एक चांगला ब्लॉग
माहीत झाला आहे.आत्युष्यात असं एकच काम हातून घडावं कि लोक नाव घेत राहतील ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शेळीच्या लेंडकागत कविता टाकत
शेळीच्या लेंडकागत कविता टाकत सुटलायस काहीतरी औषध घे रे बाबा ! निदान बालाजी तांब्याना तरी दाखवून घे !