Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो पण स्वाती येत नाहीये ना!
अहो पण स्वाती येत नाहीये ना! जे येतायत त्यांना चालेल की कोलंबी <<<
२ कारणे...
१. कोलंबी झालेली आहे...
२. जे चालत नाही , त्याचा जळवायला काय उपयोग..?
देसाई, चिंबोर्या, बोंबील,
देसाई,
चिंबोर्या, बोंबील, तार्ले, कालवं, तिसर्या यातलं काय जमेल ?
सुके बांगडे, सोडे, सुके बोंबील , सुकट ?
स्कॅलप्स, स्क्विड, ऑक्टोपस, स्कटलफिश , क्रॉफिश हे सुद्धा राहिलेत अजून
शोनू तू येत आहेस ना?
शोनू तू येत आहेस ना?
मेधातैंनी कोळ्याचं जाळंच ओतलं
मेधातैंनी कोळ्याचं जाळंच ओतलं इथे
मला एकदा बोंबिल खाऊन बघायचे
मला एकदा बोंबिल खाऊन बघायचे आहेत. लहान असताना आजोळी नगरला गेलो की जवळच्याच बाजारात बोंबिल विकायला असत. तेव्हा वासामुळे कधी हिंमत नाही झाली खायची पण चांगले लागतात असे ऐकून आहेत. बोंबिल रस्सा करतात की सुका?
बोंबिल हा मासा फार पाणीदार
बोंबिल हा मासा फार पाणीदार असतो... भाजण्यापूर्वी पाणी काढावे लागते. तेव्हा फक्त भाजता येतो
देसाई, तुम्ही यावेळी बुवांना
देसाई, तुम्ही यावेळी बुवांना भाजलेले बोंबिल खाऊ घालाच कसं. स्वाती येणार नसल्याची कारणं देऊ नयेत
लोकहो, मला ह्या गटगला यायला
लोकहो, मला ह्या गटगला यायला जमणार नाही. तुम्ही सगळे मजा करा!
पुढे काय?. बाकीचा मेनु ठरवा
पुढे काय?. बाकीचा मेनु ठरवा ना.
बाकीचा कुठे? आधी मूळ मेन्यु
बाकीचा कुठे? आधी मूळ मेन्यु तर ठरू देत.
आता परत मुळापासुन सुरवात केली
आता परत मुळापासुन सुरवात केली तर कंदमुळ खावी लागतील हं.
बुवांना भाजलेले बोंबिल खाऊ
बुवांना भाजलेले बोंबिल खाऊ घालाच <<< तू घेऊनच ये बोंबील.. मी भाजण्याचं काम करेन
गायनाचा कार्यक्रमः झक्की
गायनाचा कार्यक्रमः झक्की 'मोजा ही मोजा' हे गीत आपल्या शुश्राव्य आवाजात सादर करतील.
मोजा ही मोजा >>> काय देसाई,
मोजा ही मोजा >>>
काय देसाई, कुणाला सांगताय बोंबिल करायला. मी कुठे खाते?
झक्की 'मोजा ही मोजा' हे गीत
झक्की 'मोजा ही मोजा' हे गीत आपल्या शुश्राव्य आवाजात सादर करतील.
शुश्राव्य - शू करायला जातो, तिथे जाउन ऐकण्याजोगे!
ऐकायला चांगले वाटेल असे म्हणायचे असले तर सुश्राव्य असा शब्द पूर्वीच्या, म्हणजे आमच्या वेळी, जेंव्हा तुम्हा सर्वांचे बाबा अर्ध्या चड्डीत होते, तेंव्हा वापरात होता. त्या शब्दावर कोटी केली आहे परदेसाईंनी!
मी कधी कधी मराठी सारेगमप कार्यक्रम बघतो. त्यात सुश्राव्य ऐवजी 'फॅणटास्टिकच' किंवा 'त्वाडा जवाब नही' असे म्हणतात. किती बरे समृद्ध झाली आहे ही मराठी भाषा!!
स्वाती येणार नाहीत म्हणून मुद्दाम असे लिहीले. हे ऐकून तरी स्वाती म्हणतील की त्यापेक्षा 'मी जातेच बै, कसेहि असले तरी चालती बोलती माणसं ती, एकेकाळी मी ओळखत होते त्यांना. किती अत्याचार सहन करायचे त्यांनी!'
सायो.. मी करायला नाही आणायला
सायो.. मी करायला नाही आणायला सांगितले.. नाक बंद करायचे/दुकानात जायचे/पिशवीत टाकायचे/आणायचे..
पिशवी जरा मोठी घेवुन जा हो.
पिशवी जरा मोठी घेवुन जा हो. नाहीतर टोपलीच घेवुन जा कशी.
टोपली न्यायची तर आधी नौवारी
टोपली न्यायची तर आधी नौवारी शोधावी लागेल. तर कोळणीचा गेटप उठून दिसेल
काही अनिवार्य कार्यक्रमामुळे
काही अनिवार्य कार्यक्रमामुळे मला नोव्हेंबर १२ जमणार नाहीय.
जर मैत्रेयी तयार असेल तर तिला एवेएठिची सुत्रं हाती घेता येतील.. नाहीतर मग हे ए वे ए ठि पुढे ढकलावं लागणार आहे.
(स्वातीची नजर लागली बहुतेक)
चला बरं झालं. शिंचे रंपा
चला बरं झालं. शिंचे रंपा आणायला नाही म्हणत होते.
चला, येऊंद्या मग बोल्या हॉलच्या जागे करता आणि तारखेकरता सुद्धा.
अरेरे हे बाराएवेएठीच आहे ना.
अरेरे हे बाराएवेएठीच आहे ना. का मी चुकीच्या किनारी आले
चला, पुनः पहिल्यापासून तयारी
चला, पुनः पहिल्यापासून तयारी का? मलाहि जरा वेळ हवाच होता.
कदाचित् तेंव्हा तुमचे बाबा पालथे पडायला लागले नसावेत, त्यावेळी मी ११ वीत होतो. तेंव्हाचे माझे मित्र इकडे आले आहेत. पण त्यांना भेटायला एकहि शनिवार रवीवार रिकामा सापडत नव्हता.
आता १२ तारीख जमेल तर त्यांना भेटण्याचे ठरवतो. नवीन ए. वे. ए. ठि. आता १९ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमधे ठेवा, माश्याखेरीज इतरहि पदार्थ करता येत असतील, त्यांना बोलवा.
कदाचित् तेंव्हा तुमचे बाबा
कदाचित् तेंव्हा तुमचे बाबा पालथे पडायला लागले नसावेत, <<<< हे माझे नसावेत. माझे देवाघरी जाऊन एक तप लोटले
ही फक्त माहीती आहे. सगळ्यांच्या बाबांना, आणि मित्रांना 'वांछिल ते' आयुष्य लाभो..
झक्किंना इथल्या कुणाच्याही
झक्किंना इथल्या कुणाच्याही वयाचा काहीही अंदाज नाही.
झक्की जेव्हा आपण पालथे पडायचा तेव्हा माझे बाबा कॉलेजात जायचे.
नवीन तारीख ठेवायची असल्यास
नवीन तारीख ठेवायची असल्यास जानेवारीत ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त जणं येऊ शकतील. हा बीबी असाच राहू द्यावा. तोवर आपण इथे कुचाळक्या करु.
डायरेक जानेवारी?
डायरेक जानेवारी?
आत्ता डोकी कमी दिसतायत म्हणून
आत्ता डोकी कमी दिसतायत म्हणून जानेवारी.
ह्या जीटीजीचं काही खरं दिसत
ह्या जीटीजीचं काही खरं दिसत नाही मला. काय हे!

बुवा, हताश होऊ नका. ये जीटीजी
बुवा, हताश होऊ नका. ये जीटीजी होके रहेगा.
हो हो जानेवारी बरं पडेल.
हो हो जानेवारी बरं पडेल.
इतक्या लोकांसाठी पुरणाच्या पोळ्या करायच्या म्हणजे तयारीला वेळ मिळेल मला सुद्धा.
Pages