बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो पण स्वाती येत नाहीये ना! जे येतायत त्यांना चालेल की कोलंबी <<<

२ कारणे...
१. कोलंबी झालेली आहे...
२. जे चालत नाही , त्याचा जळवायला काय उपयोग..? Wink

देसाई,
चिंबोर्‍या, बोंबील, तार्ले, कालवं, तिसर्‍या यातलं काय जमेल ?

सुके बांगडे, सोडे, सुके बोंबील , सुकट ?

स्कॅलप्स, स्क्विड, ऑक्टोपस, स्कटलफिश , क्रॉफिश हे सुद्धा राहिलेत अजून Happy

मला एकदा बोंबिल खाऊन बघायचे आहेत. लहान असताना आजोळी नगरला गेलो की जवळच्याच बाजारात बोंबिल विकायला असत. तेव्हा वासामुळे कधी हिंमत नाही झाली खायची पण चांगले लागतात असे ऐकून आहेत. बोंबिल रस्सा करतात की सुका?

झक्की 'मोजा ही मोजा' हे गीत आपल्या शुश्राव्य आवाजात सादर करतील.
शुश्राव्य - शू करायला जातो, तिथे जाउन ऐकण्याजोगे!
ऐकायला चांगले वाटेल असे म्हणायचे असले तर सुश्राव्य असा शब्द पूर्वीच्या, म्हणजे आमच्या वेळी, जेंव्हा तुम्हा सर्वांचे बाबा अर्ध्या चड्डीत होते, तेंव्हा वापरात होता. त्या शब्दावर कोटी केली आहे परदेसाईंनी!

मी कधी कधी मराठी सारेगमप कार्यक्रम बघतो. त्यात सुश्राव्य ऐवजी 'फॅणटास्टिकच' किंवा 'त्वाडा जवाब नही' असे म्हणतात. किती बरे समृद्ध झाली आहे ही मराठी भाषा!!

स्वाती येणार नाहीत म्हणून मुद्दाम असे लिहीले. हे ऐकून तरी स्वाती म्हणतील की त्यापेक्षा 'मी जातेच बै, कसेहि असले तरी चालती बोलती माणसं ती, एकेकाळी मी ओळखत होते त्यांना. किती अत्याचार सहन करायचे त्यांनी!' Happy

काही अनिवार्य कार्यक्रमामुळे मला नोव्हेंबर १२ जमणार नाहीय. Sad

जर मैत्रेयी तयार असेल तर तिला एवेएठिची सुत्रं हाती घेता येतील.. नाहीतर मग हे ए वे ए ठि पुढे ढकलावं लागणार आहे.

(स्वातीची नजर लागली बहुतेक)

चला बरं झालं. शिंचे रंपा आणायला नाही म्हणत होते. Proud
चला, येऊंद्या मग बोल्या हॉलच्या जागे करता आणि तारखेकरता सुद्धा.

चला, पुनः पहिल्यापासून तयारी का? मलाहि जरा वेळ हवाच होता.
कदाचित् तेंव्हा तुमचे बाबा पालथे पडायला लागले नसावेत, त्यावेळी मी ११ वीत होतो. तेंव्हाचे माझे मित्र इकडे आले आहेत. पण त्यांना भेटायला एकहि शनिवार रवीवार रिकामा सापडत नव्हता.

आता १२ तारीख जमेल तर त्यांना भेटण्याचे ठरवतो. नवीन ए. वे. ए. ठि. आता १९ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमधे ठेवा, माश्याखेरीज इतरहि पदार्थ करता येत असतील, त्यांना बोलवा.

कदाचित् तेंव्हा तुमचे बाबा पालथे पडायला लागले नसावेत, <<<< हे माझे नसावेत. माझे देवाघरी जाऊन एक तप लोटले Sad

ही फक्त माहीती आहे. सगळ्यांच्या बाबांना, आणि मित्रांना 'वांछिल ते' आयुष्य लाभो.. Happy

झक्किंना इथल्या कुणाच्याही वयाचा काहीही अंदाज नाही. Proud

झक्की जेव्हा आपण पालथे पडायचा तेव्हा माझे बाबा कॉलेजात जायचे. Proud

नवीन तारीख ठेवायची असल्यास जानेवारीत ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त जणं येऊ शकतील. हा बीबी असाच राहू द्यावा. तोवर आपण इथे कुचाळक्या करु.

हो हो जानेवारी बरं पडेल.

इतक्या लोकांसाठी पुरणाच्या पोळ्या करायच्या म्हणजे तयारीला वेळ मिळेल मला सुद्धा.

Pages