हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्

हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.

स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.

"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.

हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"

आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.

स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.

"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.

आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.

आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?

ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे

आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....

"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही

'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -

हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत

हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......

कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.

हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.

संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे

त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.

आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....

"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.

राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...

माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे

वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!

त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!

जय हिंद !

विशाल कुलकर्णी

संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

<<हिंदुस्तान या शब्दासाठी कुणीतरी भविष्यपुराणाचा इथे संदर्भ दिला, तेंव्हा मीही हेच सांगितले होते.. तर हे श्लोक कुणी घुसडले याचा माझ्याकडेच पुरावा मागितला.. म्हणून मी हा संदर्भ दिला..

भविस्श्यपुराण हे १८ मुख्य पुराणांपैकी एक मानले जाते. त्याची ही विश्वासार्हता.. मग जी पुराणे या १८ मूळ पुराणांपैकी नाहीत, उदा, बृहन्नारदी पुराण.. त्यांची विश्वासार्हता किती?
पण संस्कृत भाषेत काहीही सापडलं की हिंदुत्ववाल्याना लगेच ते कुठल्या तरी पुराणात लिहिल्याचा आणि अतीपवित्र असल्याचा साक्षात्कार होतो! थ्री इडियटमधला पादण्यावरचा संस्कृत श्लोकही उद्या कुठल्या पुराणात मिळाला तरी आश्चर्य वाटणार नाही . संस्कृत श्लोक म्हंजे हिंदुत्ववाल्यांचा जीव की प्राण ! >>>

प्राचीन म्हटल की त्यात विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण केलाच जातो....तुम्ही प्राचीनतेचा पुरावा मागितला मी तो दिला, वर एकाने सांगितले की त्यातील काही भाग प्रक्षिप्त आहेत, हो आहेत पण त्यांनी ते वाक्य तुम्ही पाठवलेल्या दुव्याविषयी लिहिले होते(पुराव्यासकट), मी दिलेल्या पुराव्याविषयी नाही....तुम्ही मी दिलेला श्लोक घुसडला आहे हे सिद्ध करा.
पुराण ही पुराण असतात व त्यात काही प्रमाणात त्याकाळातील समाजाचे-चालीरितीचे प्रतिबिंब पडलेले असत व त्यानुसार त्यात हिंदुस्थान हा शब्द आलेला आहे..इथे कोणीही पुराण आचरणात आणा असे म्हणत नाहीये. त्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न गौण ठरतो.

<<हा देश आता भारतीयांचा आहे आणि त्यांचाच राहील.. ! >>

आता भारतीयांचा म्हणजे आधी हिंदूंचा होता असा अर्थ घ्यायचा का? तसेच हिंदूंना भारतीय शब्दाचे वावडे नाहीये व तसेच भारत हा शब्दही हिंदूसंस्क्रुतीमधूनच निघाला आहे. त्यामुळे भारतीय काय हिंदू काय दोन्ही समानच. परंपरा-संस्क्रुती शेवटी हिंदूच आहे.

आता भारतीयांचा म्हणजे आधी हिंदूंचा होता असा अर्थ घ्यायचा का?

तुम्हाला घ्यायचा आहे तो अर्थ घ्या.. त्याने वर्तमान आणि भविष्य ( म्हणजे भविष्यकाळ, भ पुराण नव्हे.) बदलणार नाही.

देशासाठी प्रत्येक नागरिकाने तिरंग्याखाली येणे चांगले...

देशासाठी प्रत्येक नागरिकाने तिरंग्याखाली येणे चांगले...
>>>>>
त्यात जोपर्यंत भगवा वर आहे तोवर तर आम्ही येऊच! Proud

हिंदु हिंदुत्व भारतीय जैन बौद्ध भगवा संघ सावरकर संस्कृत पुराण विष्णू दशावतार तिरंगा महात्मा गांधी काँग्रेस गोडसे नागरिकत्व हिंदु कायदा मुसलमान ख्रिस्चन अंदमान फाळणी पाकिस्तान श्लोक अरबस्तान घटना आंबेडकर मुघल आर्य ब्राह्मण सिंधु जंबुद्वीप पैगंबर १/३ ................................ झेंडा ...

झेंडा....

झेंडा...

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती..? Rofl

सगळं वाचून चक्कर आली ! Rofl

>>वर असो न्हाईतर खाली असओ, पण भगवा १/३ आहे, एवढं ध्यानात ठेवा म्हंजे झाल>><<

जागोSSSSSSSमोहम्मदप्यारे....:हहगलो:

देशासाठी प्रत्येक नागरिकाने तिरंग्याखाली येणे चांगले...
----- १९२१ मधे गांधी यांनी काँग्रेसला सुचवलेल्या डिझाईन मधे, भगवा हिंदूसाठी आणि हिरवा मुस्लिमां साठी व मधे चरखा... नंतर त्याच्यांत इतर धर्मियांना सामावणारा पांढरा रंग आला, चरखा गेला आणि अशोकचक्र आले.
http://en.wikipedia.org/wiki/Flag_of_India

तिरंग्याचा जन्मच मुळी "धर्म" डोळ्यांपुढे ठेवुन झालेला आहे. नंतर त्याच्यात जे नव्हते ते दाखवण्याचा आटापिटा चालवला (हिरवा शेती, पांढरा शांतत, केशरी...). जर ध्वज हे लोकांना एकत्र आणण्यासाठी आवष्यक आहे तर त्याचे नव्याने डिझाईन (धर्मनिरपेक्ष सार्वभौम राष्ट्र दाखवणारे) करायला काय हरकत आहे.

विकिपेडियात पुढे असे म्हटले आहे..

Subsequently, to avoid sectarian associations with the colour scheme, saffron, white and green were chosen for the three bands, representing courage and sacrifice, peace and truth, and faith and chivalry respectively

त्यामुळे आज हे रंग कोणत्याही धर्मासाठी ओळखले जात नाहीत..

आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

प्राचीन ध्वज, प्राचीन श्लोक, प्राचीन पुराण, प्राचीन भाषा... हिंदुत्ववाल्याना सगळं प्राचीनच का लागतं कुणास ठाऊक ! Proud

त्यातून कुणाला झेंडा बदलायचा असेल तर संसदेशी संपर्क साधावा..

झेंडा बदलणे.
राष्ट्रगीत बदलणे.
देशाचे नांव बदलणे.
धर्म खासगीतून बाहेर रस्त्यावर आणणे.

... देवा इट्टला, पांडूरंगा..
धाव रे!

या सगळ्या प्रयत्नांना देशद्रोह म्हणतात हो. देशप्रेम नाही. Sad

या सगळ्या प्रयत्नांना देशद्रोह म्हणतात हो. देशप्रेम नाही.

ते कायद्याच्या भाषेत हो.. हिंदुत्वाच्या भाषेत यालाच देशप्रेम म्हणतात.. Proud जुना श्लोक, जुनी भाषा, जुना झेंडा, जुना भुगोल, जुना इतिहास ... सगळं परत आणल्याशिवाय गोडसेबुवाना मुक्ती मिळणार नाही बहुदा!

सगळ्यात पहिली गोष्ट.

संघ व त्याच्या विचारांचे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात योगदान फारसे आहे असे दिसत नाही. (अगदी जेत्यांनी इतिहास लिहीला असे गृहित धरले, तरीही. जास्तीत जास्त इतकेच निष्पन्न होते की संघपरिवार जिंकला नाही) जर ते योगदान असते, अन 'सिग्निफिकंट' असते, तर या देशाची घटना वेगळी लिहीली गेली असती, अन झेंडा फक्त भगवा झाला असता, हिंदुत्व वाद्यांच्या मताने. इतरही अनेक गोष्टी झाल्या असत्या.

गांधीचा खून करून त्याला मारून टाकता आले नाही. मग त्यानंतरची ६० वर्षे त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, राहील. मुद्दाम. अगदी पद्धतशीरपणे, २ ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी होते काय? चला, आपल्या नशिबाने त्या दिवशी लालबहादूराम्चे काही आहे. हां, आता हा लाल बहादूर स्वत: त्या महात्म्याचा शिष्य होता किंवा कसे, हे विसरा. just remember, we need to kill Gandhi. अशाने होत नाही. जमत नाही. कारण तो माणूस 'नागडा; होता. physically & figuratively. अन नंगे से खुदा भी डरता है. अशी म्हण आहे. (आता खुदा म्हटलं मग पट्कन माझं नाव इब्लिसखान वगैरे करा, मग इब्लिस शब्दाचा अर्थ सम-झवून सांगतो) he simply was transparent. That's why its so difficult killing him.

राष्ट्रगीत.
वंदे मातरम! च हवं.
अरे हो. पण जेंव्हा ते जनगणमन निवडलं, तेंव्हा आपण किंवा आपले पूर्वज झोपी गेले होते काय? या देशातील बहुसंख्य जनतेने का स्वीकारलंय हे सगळं?

इथे येणार्‍या तरूणाईला प्रॉब्लेम हा आहे, कि सगळे आजचे लोकप्रतिनिधी चोर दिसतात. मग सहजच कंपॅरिझन करून १९४७ मधले ही तसेच असतील असे वाटते. मित्र हो, ते दिवस तसे नव्हते. तुमच्या आजी अजोबांना विचारा. किंवा पुस्तके वाचा. पुस्तक हे विकी/गूगल पेक्षा जास्त महत्वाचे. peer review is very important there.

असो.

हा रिस्पॉन्स मी "हिंदुत्व"वाद्यांसाठी 'लिमिट' करू इच्छीतो.

सभ्य पुरुष हो,

तुम्हाला काहीच/कधीच लाज वाटत / वाटली नाहीये का, की तुम्ही ज्याचा सगळ्यात जास्त तिरस्कार करता - तो मुस्लिम धर्म, त्यातली सगळ्यात जास्त तिरस्करणीय गोष्ट, -इतरांच्या धर्माचा द्वेष,- exactly त्याच गोष्टीचं तुम्हाला अनुकरण करावसं वाटतं?

तुमचा स्वतः चा हिंदू धर्म, जो गेली ५ -१० -१५ हजार वर्षे सगळ्या विचारधारा पचवुन समर्थ उभा आहे, त्याला तुम्ही असं बदनाम करता आहात, याची तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही????

हिंदु असण्या नसण्याचा आणि भारतीय असण्याचा काय संबंध? मी आज हिंदु आहे, उद्या मी जर धर्म बदलला तर मी भारतीय रहाणार नाही का? जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाला धर्म आहे म्हणे... मुस्लिमस्थान, ज्युस्थान, ख्रिस्चन्स्थान... असल्या नावाचे देश मी तरी ऐकले नाहीत बुवा!

तो मुस्लिम धर्म, त्यातली सगळ्यात जास्त तिरस्करणीय गोष्ट, -इतरांच्या धर्माचा द्वेष,- exactly त्याच गोष्टीचं
---- एखादा धर्म (येथे मुस्लिम) द्वेष पसरवतो असे म्हणणे त्या धर्मावर अन्यायकारक ठरेल.

ज्या कुणालाही असे वाटत असेल त्याने महमद रफी यांचे `भगवान... ओ दुनिया के रखवाले... ` हे अमर गाणे एकावे.

<<प्राचीन ध्वज, प्राचीन श्लोक, प्राचीन पुराण, प्राचीन भाषा... हिंदुत्ववाल्याना सगळं प्राचीनच का लागतं कुणास ठाऊक !
त्यातून कुणाला झेंडा बदलायचा असेल तर संसदेशी संपर्क साधावा..>>

आहो इतर धर्माचा अभ्यास करा मग कळेल की सगळ्यांना प्राचीनतेचे आकर्षण असतेच, मानवी स्वभाव.
चांगल्या गोष्टीचा प्राचीन-अर्वाचीन अभिमान बाळगण्यात काय समस्या आहे हेच कळत नाही.
बर प्राचीन आहे ते बदलले पाहिजे, बदला ना, नाही कोण म्हणतय पण कोणाच्या तरी भावना दुखावतात म्हणून नको. सद्यस्थितीत कालबाह्य असेल तर बदला, लांगूलचालनासाठी नको.

<<झेंडा बदलणे.राष्ट्रगीत बदलणे.देशाचे नांव बदलणे.धर्म खासगीतून बाहेर रस्त्यावर आणणे.या सगळ्या प्रयत्नांना देशद्रोह म्हणतात हो. देशप्रेम नाही.>>

वंदे मातरम (ज्याला संविधान्वये राष्ट्रगानाचा मान आहे) ते म्हणण्यास नकार देणे म्हणजे द्रोह नाही का?? भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये तिरंगा फडकाविण्यास नकार म्हणजे द्रोह नाही का? वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळे निर्बंध असताना धर्मनिरपेक्ष कसे होऊ शकते??
मान्य आहे हिंदुत्ववाद्यांकडून चुका झाल्या असतील पण काहींना केवळ त्यांच्याच चुका दिसतात सेक्युलरवाल्यांच्या नाही. मग हा भेदभाव नाही का?
इथे कोणीही राष्ट्रध्वज, झेंडा, देशाचे नांव बदला असे म्हणत नाहीये, मग कसा काय तो द्रोह होऊ शकतो?? पण वंदे मातरम, भगवा घ्वज, हिंदुस्थान ह्याच्याशी हिंदूंच्या भावना जोडलेल्या आहेत तर त्यावर आक्षेप का? हिंदूंना भावना नाहीत का? त्यांच्या भावना कधीच दुखावल्या जाऊ शकत नाहीत का?

<<ते कायद्याच्या भाषेत हो.. हिंदुत्वाच्या भाषेत यालाच देशप्रेम म्हणतात.. जुना श्लोक, जुनी भाषा, जुना झेंडा, जुना भुगोल, जुना इतिहास>>

हिंदूत्ववाद्यांना नावे ठेवणे, इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे, हिंदूंना झोडपणे म्हणजेच सेक्युलर का??

(आता खुदा म्हटलं मग पट्कन माझं नाव इब्लिसखान वगैरे करा, मग इब्लिस शब्दाचा अर्थ सम-झवून सांगतो>>>

अ‍ॅडमिन, कृपया लक्ष द्याल का? विनाकारण ह्या आयडीने "समजावून" हा शब्द दोन तीनदा असा विकृतपणे लिहिलाय.

इब्लिसराव तुम्ही तर डायरेक धोतरालाच हात घालायला निघाला की !

तुमचा स्वतः चा हिंदू धर्म, जो गेली ५ -१० -१५ हजार वर्षे सगळ्या विचारधारा पचवुन समर्थ उभा आहे >>> त्या विचारधारा अशाच पचवल्या नाहीत. रक्त सांडले आहे पुर्वजांनी आपल्या...ती समर्थ ओळख टीकवण्यासाठी. लाजच बाळगायची असेल तर त्या बलिदानांची बाळगा!

आणि काय आहे माहिती आहे का ? ज्या देवाला दहीसाखरेचा नैवेद्य लागतो त्या देवाला आम्ही तो देतो. आणि ज्या देवाला बोकडाचा बळी द्यावा लागतो त्याला बोकडाचाच देतो. असेच आम्ही हिंदू आहोत.

Diffrent strokes for diffrent folks ! Happy

बाकीचे जे लिहायचे ते संयमाने, समजून उमजून लिहा.... हात नाही धरलेले कुणी तुमचे!

<<संघ व त्याच्या विचारांचे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात योगदान फारसे आहे असे दिसत नाही. (अगदी जेत्यांनी इतिहास लिहीला असे गृहित धरले, तरीही. >>

आहो संघ राजकीय पक्ष नाहीये...पण त्यांचे बहुतांशी स्वयंसेवक आधी कांग्रेस व नंतर हिंदूमहासभेत होते, हिंदूमहासभेचे योगदान जाणून घ्यायचे असेल तर History of HinduMahasabha by Indra kumar & बाळाराव सावरकर लिखित सावरकर चरित्र-चार खंड वाचा. कांग्रेसने हिंदूहिताचा विचार करणे सोडून दिल्यापासून महासभा राजकारणात आली, त्याआधी मालवीय, न चि केळकर, लाला लजपतराय, मुंजेंसारखे कांग्रेसवाले महासभेचे अध्यक्ष होते. म्हणून तर क्रिप्स भेटीवेळी महासभेलाही पाचारण केले होते. त्यामुळे दिसण व असण ह्यात भेद आहे.

<<या देशाची घटना वेगळी लिहीली गेली असती>>

तुम्हाला असे म्हणायचे आहे का की ती घटना कांग्रेस जिंकली म्हणून कांग्रेसची आहे??

<<जास्तीत जास्त इतकेच निष्पन्न होते की संघपरिवार जिंकला नाही) जर ते योगदान असते, अन 'सिग्निफिकंट' असते, तर या देशाची घटना वेगळी लिहीली गेली असती, अन झेंडा फक्त भगवा झाला असता, हिंदुत्व वाद्यांच्या मताने. इतरही अनेक गोष्टी झाल्या असत्या.>>

जिंकला नाही म्हणजे योगदान नाही असा अर्थ होतो का?? बहुमताने वास्तव बदलता येत???

<<संघगांधीचा खून करून त्याला मारून टाकता आले नाही. मग त्यानंतरची ६० वर्षे त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, राहील. मुद्दाम. अगदी पद्धतशीरपणे, २ ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी होते काय? चला, आपल्या नशिबाने त्या दिवशी लालबहादूराम्चे काही आहे. हां, आता हा लाल बहादूर स्वत: त्या महात्म्याचा शिष्य होता किंवा कसे, हे विसरा. just remember, we need to kill Gandhi. अशाने होत नाही. जमत नाही. कारण तो माणूस 'नागडा; होता. physically & figuratively. अन नंगे से खुदा भी डरता है. अशी म्हण आहे. (आता खुदा म्हटलं मग पट्कन माझं नाव इब्लिसखान वगैरे करा, मग इब्लिस शब्दाचा अर्थ सम-झवून सांगतो) he simply was transparent. That's why its so difficult killing him.>>

संघाने गांधींचा खून केला ह्याचे पुरावे द्या. बहुसंख्य हिंदुत्ववादी गांधीहत्येविषयी नथुरामला दोष देतात.त्यांना गांधीहत्या मान्य नाही व समर्थन तर नाहीच नाही.

<<राष्ट्रगीत.
वंदे मातरम! च हवं.
अरे हो. पण जेंव्हा ते जनगणमन निवडलं, तेंव्हा आपण किंवा आपले पूर्वज झोपी गेले होते काय? या देशातील बहुसंख्य जनतेने का स्वीकारलंय हे सगळं?>>

वंदे मातरमचा इतिहास वाचा ('Historical story of Vande Mataram' by Shri. Amarendra Gadgil)..इथे बहुमत घेतल नव्हत त्यामुळे इतरांनी जागे असूनही उपयोग नव्हता व हिंदुत्ववाद्यांकडे सत्ताच नव्हती.............आता समजा पुढच्या पिढीने भ्रष्टाचार बघून असेच म्हणाले तर की का नाही तुम्ही लोकपाल संमत केले??झोपला होतात का? असे विचारले तर??

<<इथे येणार्या तरूणाईला प्रॉब्लेम हा आहे, कि सगळे आजचे लोकप्रतिनिधी चोर दिसतात.>>>

इथल्या सेक्युलरांना वाटत सगळे हिंदुत्ववादी अहिंदूव्दष्टे आहेत.

<<मग सहजच कंपॅरिझन करून १९४७ मधले ही तसेच असतील असे वाटते. मित्र हो, ते दिवस तसे नव्हते. तुमच्या आजी अजोबांना विचारा. किंवा पुस्तके वाचा. पुस्तक हे विकी/गूगल पेक्षा जास्त महत्वाचे. peer review is very important there.>>

अगदी बरोबर..पुस्तके वाचा मग कळेल हिंदुत्व म्हणजे काय व देशाचा खरा इतिहास काय.

<<हिंदु असण्या नसण्याचा आणि भारतीय असण्याचा काय संबंध? मी आज हिंदु आहे, उद्या मी जर धर्म बदलला तर मी भारतीय रहाणार नाही का? जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाला धर्म आहे म्हणे... मुस्लिमस्थान, ज्युस्थान, ख्रिस्चन्स्थान... असल्या नावाचे देश मी तरी ऐकले नाहीत बुवा!>>

सावरकरांचा 'धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर' हा लेख वाचा तसेच काश्मीर व ईशान्येकडील राज्यांना का वेगळी कलमे लागू आहेत हे जाणून घ्या मग कळेल.
इंग्लंडचा राजा प्रोटेस्टंट्च असावा लागतो, अमेरिकेत किती कॅथलिक व प्रोटेस्टंट् अध्यक्ष झालेत ओबामा व केनेडी वगळता ते पहा...सौदीतील भारतीय राजदूत कोण-कोण होते ते बघा...मध्यपूर्वेतील हुकूमशाही देशात त्यांचे धर्म काय होते ते पहा मग कळेल देशाला धर्म असतो का नाही ते. पाकला धर्म नाही?? दक्षिण व उत्तर सुदानला धर्म नाही?? अफगणीस्तानला धर्म नाही??

अक्षय झेंड्याच्या पोस्टनंतर डोकावणे जमले नव्हते, तुम्ही येथे होत असलेल्या हल्ल्यांना फार धैर्याने आणि संयमाने परतवून लावत आहात त्याबद्दल तुमचे खुप कौतुक.
काय आहे की झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.

<<<बाकी चालुद्या. तुम्च्या निमित्ते मला अक्षय/मास्तुरे इत्यादिक लोकान्च्या अभ्यासपूर्ण पोस्ट्स तरी वाचायला मिळताहेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवादच द्यायला हवेत! >>>>>

लिंबुदा, सहर्ष अनुमोदन ! Happy

<<<बाकी चालुद्या. तुम्च्या निमित्ते मला अक्षय/मास्तुरे इत्यादिक लोकान्च्या अभ्यासपूर्ण पोस्ट्स तरी वाचायला मिळताहेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवादच द्यायला हवेत! >>>>>

अगदी अगदी Happy

आहो इतर धर्माचा अभ्यास करा मग कळेल की सगळ्यांना प्राचीनतेचे आकर्षण असतेच

आँ ????? हा धर्म शब्द कुठून काढलात बुवा? तुम्हा हिंदुत्ववाल्यांचं काही समजत नाही बुवा.. कधी हिंदु हा धर्म म्हणताय, कधी हिंदु हा नागरिकत्वाला कॉमन शब्द आहे, हिंदुत्व हा काही धर्म नाही असेही म्हणताय... स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदु धर्माचं घोडं दामटावायचं आणि अंगलट आलं की आम्ही धर्माबद्दल बोलत नव्हतोच मुळी , हिंदुत्व म्हणजे जीवनशैली असे म्हणून पळ काढायचा... !

भारतीय लोक या नाटकाना कंताळले आहेत.... त्यामुळेच हिंदुत्व हा शब्द आम्हाला नको आहे.. सामाजिक संदर्भासाठी आम्ही भारतीय आहोत आणि धार्मिक संदर्भासाठी आम्ही हिंदु आहोत.. कायद्याने ही गोष्ट इतकी स्पष्ट केली आहे... आम्हाला त्याबद्दल आदर आहे.. भारत देशाने हिंदु धर्माची कुठेही गळचेपी केलेली नाही.. आम्ही आमचा धर्म पाळायला स्वतंत्र आहोत.

वंदे मातरम हे हिंदु लोक जरी देशाचे गीत म्हणत असले तरी ते दुर्गा देवीवर लिहिलेले गीत आहे.. त्यामुळे अहिंदु लोकानी ते गीत गायला विरोध केला तर तो काही गुन्हा ठरू शकत नाही. प्रचलित राष्ट्रगीताचा योग्य तो आदर राखला म्हणजे झालं.

सावरकरांचा 'धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर' हा लेख वाचा

'मी ( मी म्हणजे 'मी' ) जर उद्या हिंदु धर्म सोडला तर मी भारतीय राहत नाही, मी राष्ट्रांतर केले असा असा त्याचा अर्थ होतो.' ... सावरकरांचा हा मुद्दा जुन्या काळात योग्य असेलही, पण आज असे विधान कुणी करेल तर शासन त्याला नक्कीच आनंदाने काळ्या पाण्यावर पाठवेल.!! मी कोणता धर्म पाळायचा हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याच्याशी माझ्या नागरिकत्वाचा संबंध पोहोचत नाही... कायद्याने मला ते स्वातंत्र्य दिलेले आहे.. आणि असा कायदा न मानणे हा घोर अपराध आहे.

इंग्लंडचा राजा हा काही लोक प्रतिनिधी म्हणून निवडला जात नाही... ते राजघराणे आहे, पूर्वापार चालत आलेले आहे.. त्याचा धर्म जर कॅथॉलिक असेल तर प्रत्येक पिढीत तोच धर्म रहाणार ना? का उगाच गंडवताय राव! आणि इंग्लंड जर कॅथॉलिक राजाच निवडते म्हणून भारतातही हिंदु राजाच असावा एवढा पुळका तुम्हाला आला असेल तर भारतातही राजा हे पद निर्माण करुन तिथे संघाचा किंवा महासभेचा एखादा बुढ्ढा तुम्हीही राजा म्हणवून बसवा... तुम्हाला कोण अडवले आहे? आधी त्याप्रमाणे कायद्यात बदल करा म्हणजे झालं ! Proud http://www.historic-uk.com/HistoryUK/England-History/KingsandQueens.htm

१९३७ में इस गीत के बारे में कांग्रेस में बहस हुई और जवाहर लाल नेहरु की अध्यक्षता वाली समिति ने इसके पहले दो पैराग्राफ को ही मान्यता दी। इस समिति में मौलाना अब्दुल कलाम आजाद भी थे। पहले दो पैराग्राफ को मान्याता देने का कारण यही था कि इन दो पैराग्राफ में किसी देवी देवता की स्तुति नहीं थी और यह देश के सम्मान में थे।
यह गीत सबसे पहले १८८२ में प्रकाशित हुआ था और तब से १२५ साल हो गये हैं। इस गीत को पहले पहल ७ सितम्बर १९०५ में कांग्रेस अधिवेशन में राष्ट्रगीत का दर्जा दिया गया। २००५ में इसके सौ साल पूरे होने के उपलक्ष में १ साल के समारोह का आयोजन किया गया। यह ७ सितम्बर को समाप्त हुआ। इस समापन का अभिनन्दन करने के लिये मानव संसाधन मंत्रालय ने इस गीत को ७ सितम्बर २००६ में स्कूलों में गाने की बात की। हालांकि बाद में अर्जुन सिंह ने संसद में कह दिया कि गीत गाना किसी के लिए आवश्यक नहीं किया गया है, जिसे गाना हो गाए, न गाना हो, न गाए।

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदल विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम्॥
श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्
धरणीं भरणीं मातरम्॥

गीत गाना किसी के लिए आवश्यक नहीं किया गया है, जिसे गाना हो गाए, न गाना हो, न गाए एवढे कायद्याने स्पष्ट करुनही हिंदुत्ववाले मुस्लिमाना वंदे मातरम न म्हटल्याबद्दल देशद्रोही का म्हणतात, हे समजत नाही.

http://www.readers-cafe.net/geetgaatachal/2009/01/vande-mataram-national...

Pages