हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्

हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.

स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.

"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.

हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"

आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.

स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.

"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.

आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.

आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?

ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे

आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....

"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही

'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -

हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत

हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......

कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.

हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.

संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे

त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.

आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....

"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.

राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...

माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे

वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!

त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!

जय हिंद !

विशाल कुलकर्णी

संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

<<पुण्य पाप हे तर तुम्ही ठरवणार. डायरेक्ट अक्षय जोगांना त्या विधात्याने पावर दिली आहे बहुतेक पुण्य कशास म्हणावे याची. होली लँड म्हणजे पुण्यभू कि जिथे पुण्यकर्म करतात ती पुण्यभू? मग तुमची पुण्यभू महाराष्ट्र सोडून काशीला, की ती सिंधू संस्कृती की हिंदू संस्कृती उदयाला आली त्या पाकिस्तानात?>>

अरेरे न वाचता बोलल्याचे परिणाम.....
this Sindhusthan as his Holyland (Punyabhu), as the land of his prophets and seers, of his godmen and gurus, the land of piety and pilgrimage. (प.४४)
पुण्यभू म्हणजे पाप्-पुण्यातील पुण्य नाही.

<<वरतून हे कोटेशनः
"who had originally been forcibly converted to a non-Hindu religion and who consequently have inherited along with Hindus, a common Fatherland and a greater part of the wealth of a common culture are not and cannot be recognized as Hindus."

भारतात जन्मला, तो भारतीय. अमेरिकेत जन्मला तो अमेरिकन. सिंपल. शेजारचा मुसलमान भारतात जन्माला आला. आता घटनेने त्याला जन्मसिद्ध नागरिकत्व दिले, तर त्यात "are not and cannot be recognized as Hindus."
जर हिंदू हीच देशप्रेमाची/या देशाच्या नागरिकत्वाची व्याख्या करित आहात, तर तुमचे विचार फॅसिस्ट अन देशद्रोही नाहीत तर कसे आहेत?>>

आहो हि 'हिंदू' ची व्याख्या आहे, ह्या देशाच्या नागरिकत्वाची नाही.

<<'जबरदस्तीने' जरी धर्मांतर करविले, तरी तो देशद्रोही. आय मिन हिंदू नाही. कारण त्याची पुण्यभूमी तिकडे गेली. अन म्हणे ५० हिंदू 'शुद्ध' केले. काय झाली हो टक्केवारी?>>

हिंदू नाही इतकच म्हटल आहे, देशद्रोही असे म्हटलेले नाही. आहो अंदमानात शुद्धी,हिंदूचे महत्व समजावून सांगितले म्हणून आज तिथे हिंदू बहुसंख्य आहेत तिथे जरे अल्पसंख्य असते तर पाकनिर्मितीच्यावेळी संख्याबळावर अंदमानसुद्धा मागितले असते...आता मोजा टक्केवारी..........

<<घटनेच्या प्रस्तावने नंतर, पहिल्या १-२ पानांत या देशाचे नाव 'डिफाईन' केलेले आहे. उद्या फोटो टाकतो. मग कलम तुम्हीच समजावून सांगा मला. तिथे 'हिंदूस्थान' हा शब्द नाहिये बरं का.>>

अच्छा म्हणजे आम्ही हिंदुस्थान म्हटले की जे प्राचीन-अर्वाचीन नाव आहे व तेही भारत शब्दाला विरोध न करता पण संविधानात नाही म्हणून आम्ही संविधानविरोधी व एका धार्मिक संघटनेच्या सभेत ग्रुहमंत्र्याच्या उपस्थितीत तसेच महानगरपालिकेत एक राजकारणी वंदे मातरम की ज्याला संविधानात राष्ट्रगानाचा मान आहे त्याला विरोध करतात ते संविधानाविरोधी नाही???
वा खरच किती निपक्षपाती न्याय आहे.

इब्लिस आणि जागोमोहनप्यारे अशी नावे घेणार्‍यांनी "सत्यशोधक" नावावर आक्षेप घ्यावा आणि नविन आयडी उत्पन्न कसा झाला हे विचारावे या सारखा विनोद नाही. जे मांडलय त्यासंबंधी अभ्यासायचे नाही, मूळ संकल्पना समजाऊन घ्यायची नाही आणि असल काहितरी लिहून विषयांतर करायचे हे सगळ उबगवाणे आहे. माझी ओळख इथे देण्याची गरज मला वाटत नाही. मला ओळखणारे लोक येथे आहेत. मायबोली वर मी नविन असलो तरी फेसबुक व ऑर्कुट वर मी पूर्वीपासूनच आहे.
काही विशिष्ट लोकांबाबत जो अनुभव सर्वत्र येतो तोच इथे येत आहे. "हिंदू" कोण ची व्याख्या व "हिंदूधर्माची" संकल्पना एकत्र करुन लोक गोंधळ घालतात. हिंदूत्व या ग्रंथात सावरकरांनी इसम आणि त्व किंवा हिंदुपणा हिंदुनेस हे फरक स्पष्ट केले आहेत. हिंदूधर्म हा शब्दच वगळून वैदिक हिंदू ,जैन हिंदू, बौद्ध हिंदू असे शब्द वापरावेत अशी त्यांची सूचना आहे. पण व्यवहारात हिदूधर्मच रुढ राहिल्याने सर्व गोंधळ होत आहेत. हिंदू हा शब्द समाज वाचक ,लोकवाचक असा आहे. जरा मूळ संकल्पन समजाऊन घ्या व पटल्या नाहीत तर त्यावर आक्षेप घ्या. नविन काही मुद्दे स्पष्टीकरणासाठी उपलब्ध झाले तर सावकाशीने लिहेनच.

<<बृहन्नारदी पुराण हे आज प्रथमच ऐकले.. १८ पुराणात हिंदुस्तानचा कुठे उल्लेख नाही.. या एकाच कुठेतरी कोपर्‍यात सापडलेल्या पुराणात मात्र हिंदुस्तान , इंडियन हे शब्द मिळाले ! आश्चर्यच नै!>>

हे घ्या अजून काही पुरावे--

सिंधुस्थानमिति ज्ञेयं राष्ट्र्मार्यस्य चोत्तमम
म्लेंच्छंस्थानं परं सिन्धो: क्रुतं तेन महात्मना
भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व अ.२)

हिमालय समारभ्य यावत इंदुसरोवरम
तं देवं निर्मितम देशं हिंदुस्थानं प्रवक्ष्यते
वायुपुराण ४५.७५
तसेच अग्निपुराणात व ब्रुहस्पतिआगमात ह्याच प्रकारचा म्हणजे 'हिंदुस्थान' शब्द असलेला श्लोक आहे

Hrugveda मधील दहाव्या व तिसर्‍या मंडलातील नदीसूक्तात तसेच अथर्ववेदात सिंधूस्थान चा उल्लेख आहे.

पाणिनीय व्याकरणातील सूत्रांनुसार संस्क्रुत मध्ये 'स' चे 'ह' होते, तसेच आसामातील असिमिया भाषेतही 'स' चे 'ह' होते.
यजुर्वेदातील तैत्तरीय अरण्यकात 'श' चे 'ह' होते, सौराष्ट्रातही 'श' चे 'ह' होते जसे की शक्कर चे हक्कर. हरियाणात सै चे है होते.
तसेच सिंधूस्थानचे नंतर हिंदूस्थान झाले.

या ज्ञानगंगे मधुन प्रेरणा घेऊन प्यारेंजी आता किमान १०० नव्-नवे धागे काढणार असतील तर त्याचा उपयोग सर्वांनाच होणार आहे. सर्वपित्री झाली आता नवरात्र सुरु झाले... (भावना दुखावणार नसतील तर तुम्हा) सर्वांना शुभेच्छा... Happy

या भुमीला फक्त हिंदूच हिंदुस्थान म्हणतात असे नाही

गाझियों मे जबतलक बू रहेगी इमान की, तख्त ए लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थानकी
हा शेर आहे शेवटचा मुघल बादशाह बहादूर शहा जफर याचा,
http://en.wikipedia.org/wiki/Bahadur_Shah_II

तसेच सुप्रसिद्ध गीत जे बर्‍यापैकी उर्दुमधे लिहिले गेले आहे त्याचे बोल आहेत,
सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ताँ हमारा...

तुमचे ते श्लोक नंतर कुणीतरी घुसडलेत हे मी अद्धीही सांगितले आहे... तो एकच श्लोक...

Himalayam Samaarafya Yaavat Hindu Sarovaram

Tham Devanirmmitham desham Hindustanam Prachakshathe

कधी असा आहे..

himalayam samarabhya yavat bindusarovaram

hindusthanamiti qyatam hi antaraksharayogatah

तर कुणी असा सांगतात.... हे आधीही मी साम्गितले आहे.

आणि जुन्या श्लोकात काही का लिहिलेले असेना, कुणी कुठल्या गाण्यात काही का लिहिलेले असेना, आज हा भारत देश म्हणून ओळखला जातो.. आणि यावतच्चंद्त्दिवाकरौ हा देश भारत म्हणूनच ओळखला जाईल..

कुणी हिंदुस्तान म्हणोत, कुणी जंबुद्वीप म्हणोत... म्हणोत बापडे! त्याने या देशाचे नाव भारत आहे ते थोडेच बदलणार आहे! Proud

जामोप्या कृपया पुन्हा पुन्हा तेच तेच लिहू नका आणि सांगायला पण लावू नका.
देशाचे नाव भारत आहेच त्याबद्दल कोणाचाच काही आक्षेप नाहीये, पण त्याच बरोबर बहुसंख्येने हिंदू रहात असल्याने हा देश हिंदुस्थान या नावाने देखील ओळखला जातो. समाप्त.

<<तुमचे ते श्लोक नंतर कुणीतरी घुसडलेत हे मी अद्धीही सांगितले आहे... तो एकच श्लोक...

Himalayam Samaarafya Yaavat Hindu Sarovaram

Tham Devanirmmitham desham Hindustanam Prachakshathe

कधी असा आहे..

himalayam samarabhya yavat bindusarovaram

hindusthanamiti qyatam hi antaraksharayogatah

तर कुणी असा सांगतात.... हे आधीही मी साम्गितले आहे.>>

बर तुम्ही म्हणता घुसडल तर मग त्याचे पुरावे द्या......कोणी, कधी घुसडल ते. बर तुम्ही वर देताना त्याचा कडव्याचा/सर्ग/प्रतिसर्ग क्रमांक दिला नाहीये.
बर एकाच अर्थाचे दोन श्लोक असू शकत नाहीत का??(एका अर्थाचे २ शब्द वापरून) टिळकांनी एक शब्द एकाच निबंधात ३ वेगवेगळ्याप्रकारे लिहिला हा किस्सा माहित आहे का? नसेल तर शाळेतील पुस्तक वाचा त्यात दिलय.

<<आणि जुन्या श्लोकात काही का लिहिलेले असेना, कुणी कुठल्या गाण्यात काही का लिहिलेले असेना, आज हा भारत देश म्हणून ओळखला जातो.. आणि यावतच्चंद्त्दिवाकरौ हा देश भारत म्हणूनच ओळखला जाईल..>>

वा म्हणजे आधी अर्वाचीन पुरावे मागायचे, ते दिले की प्राचीन मागायचे व तेही दिल की म्हणायच जुन्या श्लोकात काही का लिहिलेले असेना, कुणी कुठल्या गाण्यात काही का लिहिलेले असेना, आज हा भारत देश म्हणून ओळखला जातो काहीजण म्हणतात तस बामणी कावा एकला होता तर मग हा कोणता कावा म्हणायचा?? सेक्युलर कावा का??

>>> वर एच यु एफ बद्दल आलेच आहे. . . . लांगूलचालन की काय ते हेच?

कुलकर्णी,

जरा हे देखील वाचा.

The Hindu Undivided Family can best be defined as a family that consists of a common ancestor and all his lineal male descendants and their wives and unmarried daughters. The Hindu Undivided Family (HUF) cannot be created by acts of any party.

A HUF is a separate entity for taxation under the provisions of S.2 (31) of the Income Tax Act, 1961. This is in addition to an individual as a separate taxable entity.

What is an HUF?
As the name suggests, an HUF is a family of Hindus. However, even Buddhists, Jains and Sikhs are regarded as Hindus, and can, therefore, set up HUFs.

For all legal matters the Government considers Jainism, Sikkhism and Buddhism as dervived from Hindhuism. Therefor HUF exists by law for these relegions also on same conditions as it does for Hinduism. You do not need to create it.

HUF हे फक्त हिंदू धर्मियांनाचा लागू नसून जैन, बौध्द व शीख यांना देखील लागू आहे. मात्र मुस्लिम व ख्रिश्चन यांना हे लागू नाही. त्यांना त्यांच्या धर्माच्या पुस्तकात लिहिलेल्या पध्दती लागू आहेत.

आता ठरवा कोणाचे लांगूलचालन होतंय ते? हिंदूंचे की मुस्लिम्/ख्रिश्चनांचे?

सेक्युलर कावा का??>>>> जोगसाहेब, इकडे पालथा घडा म्हणतात या काव्याला. Proud

>>> वा म्हणजे आधी अर्वाचीन पुरावे मागायचे, ते दिले की प्राचीन मागायचे व तेही दिल की म्हणायच जुन्या श्लोकात काही का लिहिलेले असेना, कुणी कुठल्या गाण्यात काही का लिहिलेले असेना, आज हा भारत देश म्हणून ओळखला जातो काहीजण म्हणतात तस बामणी कावा एकला होता तर मग हा कोणता कावा म्हणायचा?? सेक्युलर कावा का??

Rofl

भारताचे "हिंदूस्थान" हे नाव प्राचीन इतिहासात आढळत नाही असे काही निधर्मांधांचा दावा असतो. पण "इंडिया" हे नाव तरी कुठे आढळते? आढळून आले असल्यास पुरावे द्या. तरीसुध्दा "इंडिया" हे परकीयांनी दिलेले नाव चालते, पण स्वकीयांनी दिलेल्या "हिंदूस्थान" या नावाने मात्र यांना मळमळायला लागते.

आम्ही स्वकीय आहे....... Happy तुम्हाला मास्तुरे ऐवजी विद्यार्थी नाव देतोय......... ऐकुन घ्याच आता....... Happy

@ deshi साहेब,

मी पुनःपुन्हा तेच तेच विचारतो आहे, कि धर्म, अन देश, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अन त्या तश्याच ठेवाव्यात. हे तुम्हाला मान्य आहे की नाही?

मी करतो तो शब्दःछल, अन तुम्ही करतात ते विषयांतर नव्हे काय? या असल्या विषयांतरांना उत्तरादाखल तो कायदा दाखवावा लागतो. अजूनही हिंदूस्थान लिहावा की भारत याचा खुलासा केला नाही आपण?

@ जोग साहेब,
<<हिंदुंचे काही कायदे इतर धर्मियाना लागू आहेत याचा अर्थ ते धर्म हिंदु धर्माचे घटक आहेत आणि त्याना हिंदुत्वात समाविष्ट करा अशी त्यांची किंवा सरकारची मान्यता आहे, असा होत नाही..>>

मग काय अर्थ होतो ते तरी सांगा --> आपल्या देशातील बौद्ध धर्मिय लोक किंवा जैन धर्मिय लोक असे तुम्ही म्हणता, की जैन जातीय अन बौद्ध जातीय? या विषयावर आधीही इतरत्र चर्चा झालेली आहे. परत परत तेच तेच दळण्याचा कंटाळा आलाय.
उदा. हिंदू धर्मियांचा विवाह जसा देवळात केलेला 'लीगल' होतो तसा नवबौद्धांचा आंबेडकरांच्या फोटोसमोर केलेला लीगल समजतात, हे इथेच तुम्ही आधी वाचले असेलच.

---

चर्चा सुरू झाली ती 'हिंदू राष्ट्र निर्मिती' वरून. प्रस्तावनेतील समारोपाजवळचे वाक्य -->

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

या भारत देशात राहून याच देशाचे काहीतरी वेगळे धर्माधिष्ठीत हिंदूस्थान राज्य तयार करण्याचा प्रयत्न हा खलिस्तान वगैरे धर्म / भाषा इ. वर आधारीत राज्य मागण्याच्या प्रयत्ना सारखा तुम्हाला वाटत नाही काय? याला विघटनवादी राष्ट्रद्रोह म्हणावे काय? काय अर्थ होतो या सगळ्याचा? की तुम्ही वेगळ्या प्रकारचे सुशिक्षित आहात म्हणून वेगळा अर्थ निघतो?

Exactly हाच -विघटनवादी- निष्कर्ष निघतो, म्हणून मग 'हिंदू' च्या व्या़ख्येत ते 'भारतात राहणारे', 'देशावर प्रेम करणारे' वगैरे घुसडावे लागते. हे किती केविलवाणे? सरळ सांगावे, आम्ही हिंदू धर्म पाळणारे आहोत. आम्हाला धर्मावर आधारित राज्य हवे. ताकाला जाऊन भांडे किती दिवस लपविणार?

ते भांडे लपवावे लागते, कारण जर सामान्य जनांना हे बारकावे समजले, तर ते मत देणार नाहीत. आजच्या जिओपोलिटिकल परिस्थितीत सत्ता काबिज करायला निवडूनच यावे लागते. एकदा निवडून आले की हळूच मागल्या दाराने हुकुमशाही लादता येते. (त्याचे ग्राऊंडवर्क पण सुरू असते, ' मिळमिळीत लोकशाही पेक्षा ढळढळीत हुकुमशाही बरी' असली बडबड करून.)

*
सावरकरांच्या त्या लेखाचे कॉन्टेक्स्ट मुस्लिम लीग अन मुस्लिम धर्माधिष्ठीत पाकीस्तानची निर्मीती हे होते. हे का विसरता आहात? आज तसला विचार करून चालेल का?
*
आपल्या देशावर प्रेम करा. आपल्या धर्मावरही करा. या दोहोंचा आदर करा. मी करतो. त्यासाठी दुसर्‍या कुणाला शिव्या देऊ नका अन देणार्‍याला आवरा. कारण त्यांच्या असल्या वागण्याने हा देश तुटेल. मग हाती काय उरेल?

मुघलांच्या काळात या देशातील लोकाना हिंदु असे मुघल संबोधत होते. मग यात हिंदु, जैन, बौद्ध इइ सर्व आले. जे मुसलमान ( आणि ख्रिश्चन) नाहीत असे सर्व एतद्देशीयाना मुघल लोक हिंदुच म्ह्णत होते... हिंदुना त्यानी जे कायदे नियम केले ते हिंदु कायदे म्हणून ओळखले जात.

त्यानंतर ब्रिटिशानीही तीच पद्धत अवलंबली आणि अनेक हिंदु कायदे तयार झाले जे या देशातल्या सर्व एतद्देशीय धर्मियाना लागू होत होते.

त्यानंतर आंबेडकरानीही तीच पद्धत चालू ठेवली. लग्व, घटस्फोट, वारसाहक्क इइ अनेक गोष्टीत एतद्देशीय धर्मियांमध्ये साम्य असल्याने स्वतंत्रपणे कायदे करण्याची क्लिष्टता टाळण्यासाठी हिंदु कायदा असेच नाव ठेवले. अर्थात काही ठिकाणी स्वतंत्रपणे प्रत्येक धर्मासाठी पोटकलमीही ठेवली.. कायदा सुलभ करणे हा यामागचा उद्देश होता. काही आदिवासी एतद्देशीय असले तरी तिथे काही वेगळ्या प्रथा असल्याने ( उदा, बहुपत्न्त्व, मात्रुसत्तक पद्धती) , त्याना वेळोवेळी हिंदु कायद्यातून वगळून स्वतंत्र स्थानही दिलेले आहे. कायद्याची भाषा सोपी ठेवणे हाच यामागचा उद्देश होता.

सारांश, एतद्देशीय धर्मियाना एकच हिंदु कायदा लागू करणे हे मुघल> ब्रिटिश> आंबेडकरांचे आजचे कायदे .. या मार्गाने आलेले आहे.. असे असताना सावरकारांची व्याख्या घटनेने घेतली म्हणून हिंदुत्ववाले का ऊर बडवून घेतात, हे त्यानाच ठाऊक.. : Proud Rofl

कायद्याच्या पुस्तकात या सर्वाना उद्देशून लिगल हिंदु हा शब्द वापरला आहे. पण असे असले तरी हिंदु रिलिजन , आणि बौद्ध, जैन रिलिजन हे वेगळेवेगळेच आहेत हेही कायद्याने स्पष्टपणे लिहिले आहे.. हिंदु कायदे जरी लागू असले तरी हे धर्म वेगळेच रहातील आणि या सर्वांसाठी भारतीय हेच नागरिकत्व राहील.. कायद्याने इतक्या स्पष्ट शब्दात आणि आजच्या प्रचलित भाषेत हे लिहून ठेवलेले आहे. असे असताना कुणाला न समजणार्‍या भाषेतल्या पुराणातल्या बोटभर चोपड्या वाचून हिंदुत्ववाले कशाला शब्दच्छल करतात, ते त्यानाच ठाऊक ! Proud पुराणातली वांगी पुराणात असे स्वतः हिंदुच म्हणतात, ते उगाचच नाही ! Rofl

वा म्हणजे आधी अर्वाचीन पुरावे मागायचे, ते दिले की प्राचीन मागायचे व तेही दिल की म्हणायच जुन्या श्लोकात काही का लिहिलेले असेना, कुणी कुठल्या गाण्यात काही का लिहिलेले असेना, आज हा भारत देश म्हणून ओळखला जातो

पुराणातल्या गोष्टी फक्त इतिहास म्हणून वाचायच्या, आजच्या व्य्वहारासाठी मात्र आजचीच पुस्तके वापरायची असतात... रावण्च्या काळात पुश्पक विमान होते हे पुराणकथा म्हणून ठीक आहे.. पण विमानाचा शोध कोण लावला याच्यासाठी आजच्या इतिहासाच्या पुस्तकातील राइट बंधू हेच उत्तर राईट ठरते.. पुराणातला श्लोक दाखवून रावणाच्या काळात विमान होते असे म्हटले तर ते चूक ठरते.. तसेच आहे हे.. ! Rofl Biggrin याला म्हणतात वांगी कावा.... पुराणातली वांगी पुराणात ! Proud

<<मी पुनःपुन्हा तेच तेच विचारतो आहे, कि धर्म, अन देश, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अन त्या तश्याच ठेवाव्यात. हे तुम्हाला मान्य आहे की नाही?>>

मान्य आहे व आधी मान्य केलही आहे.

<<मी करतो तो शब्दःछल, अन तुम्ही करतात ते विषयांतर नव्हे काय? या असल्या विषयांतरांना उत्तरादाखल तो कायदा दाखवावा लागतो.>>

आहो पण विषय कायद्याचा असेल तर कायदा दाखवा, तो विषय नसताना कायदा दाखवला म्हणजे विषयांतरच.

<<अजूनही हिंदूस्थान लिहावा की भारत याचा खुलासा केला नाही आपण?>>>

जी भारताची घटना आहे त्यानुसार आम्ही भारत असेच लिहणार पण तोंडी हिंदुस्थान म्हटल तरी कोणी आक्षेप घेऊ नये. शिवाय तुम्हीही म्हणा असा आमचा आग्रह नाही.

<<आपल्या देशातील बौद्ध धर्मिय लोक किंवा जैन धर्मिय लोक असे तुम्ही म्हणता, की जैन जातीय अन बौद्ध जातीय? या विषयावर आधीही इतरत्र चर्चा झालेली आहे. परत परत तेच तेच दळण्याचा कंटाळा आलाय.
उदा. हिंदू धर्मियांचा विवाह जसा देवळात केलेला 'लीगल' होतो तसा नवबौद्धांचा आंबेडकरांच्या फोटोसमोर केलेला लीगल समजतात, हे इथेच तुम्ही आधी वाचले असेलच.>>

आहो सावरकरांनी हिंदू कोण?, हिंदूपणाची, Hinduness ची व्याख्या केली आहे. हिंदू धर्माची नाही. वरचा लेख नीट वाचला असता तर असे प्रश्न पडले नसते. आम्हालाही तेच तेच दळण्याचा कंटाळा आलाय.

<<या भारत देशात राहून याच देशाचे काहीतरी वेगळे धर्माधिष्ठीत हिंदूस्थान राज्य तयार करण्याचा प्रयत्न हा खलिस्तान वगैरे धर्म / भाषा इ. वर आधारीत राज्य मागण्याच्या प्रयत्ना सारखा तुम्हाला वाटत नाही काय? याला विघटनवादी राष्ट्रद्रोह म्हणावे काय? काय अर्थ होतो या सगळ्याचा? की तुम्ही वेगळ्या प्रकारचे सुशिक्षित आहात म्हणून वेगळा अर्थ निघतो?>>

कालच तुमच्यापैकी कोणी तरी म्हणाल की प्रत्येकाला आपला धर्म वाढवायचा अधिकार आहे मग हिंदू त्यात येत नाहीत का? त्यांना तो अधिकार नाही का?
खलिस्तानवाले फाळणी मागत होते सावरकरांनी कुठे फाळणी मागितली आहे?? उलट ते तर अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते होते. मग कसे ते विघटनवादी??
ते इतेकच म्हणत होते की ह्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत (तेही प्राचीन काळापासून)तर हिंदूराष्ट्र घोषित करा, जे वास्तव आहे तेच घटनेत टाका असे म्हणत होते. वेगळी घटना-प्रदेश मागत नव्हते.

<>

तुम्हाल तो झुरळ व शास्त्रज्ञाचा विनोद माहित असेल. तो शास्त्रज्ञ त्याचे सगळे पाय कापतो व म्हणतो चाल आता व नंतर निष्कर्ष काढतो की सगळे पाय कापल्यावर झुरळ बहिरे होते. तुमचा निष्कर्ष ह्यात बसतो.
आम्ही घुसडले नाही, तुम्हीच मूळ प्रबंध वाचत नाही व म्हणता की घुसडले.

<<ते भांडे लपवावे लागते, कारण जर सामान्य जनांना हे बारकावे समजले, तर ते मत देणार नाहीत. आजच्या जिओपोलिटिकल परिस्थितीत सत्ता काबिज करायला निवडूनच यावे लागते. एकदा निवडून आले की हळूच मागल्या दाराने हुकुमशाही लादता येते. (त्याचे ग्राऊंडवर्क पण सुरू असते, ' मिळमिळीत लोकशाही पेक्षा ढळढळीत हुकुमशाही बरी' असली बडबड करून.)>>

कधी कोण असे म्हणाले?? पुरावे द्या.

प्रत्येकाला आपला धर्म वाढवायचा अधिकार आहे मग हिंदू त्यात येत नाहीत का? त्यांना तो अधिकार नाही का?

वाढवा की, तुम्हाला कोण अडवले आहे का? देवळं बांधा, कीर्तन करा.. शंकराचार्यांसारखे वादविवाद करुन इतर धर्मियाना हिंदु करा... वेदशाळा काढा.. सणासुदीला सुट्टी घ्या.... देवळं पडलेली असली तर नगरसेवक, आमदार खासदार यांना कळवून त्यांच्या फंडातून दुरुस्त्या करा.. शुद्धीकरण करा.. नव्या लोकाना धर्मात घ्या.. ( त्यांच्या मुलामुलींशी किंतु न बाळगता तुमच्या मुलामुलींची लग्न लावून द्या Proud ) ... ब्राह्मण अब्राह्मण असा भेद न बाळगता हिंदु धार्मिक शाळेत सर्वाना प्रवेश द्या, म्हणजे भारत सरकार तुम्हाला अनुदान नक्कीच देईल... Proud Rofl हिंदुत्ववाल्याना हिंदु धर्म वाढवण्यासाठी आम्हा भारतीय लोकांच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy

जो अर्थ विष्णुयश का होता है वही अब्दुल्लाह का। विष्णु यानी अल्लाह और यश यानी बन्दा = अर्थात अल्लाह का बन्दा = अब्दुल्लाह ! >>>> व्वाह. जागो मोहम्मद्प्यारे ! Proud Lol
(मनोरंजक दुव्यासाठी धन्यवाद!)

<<सावरकरांच्या त्या लेखाचे कॉन्टेक्स्ट मुस्लिम लीग अन मुस्लिम धर्माधिष्ठीत पाकीस्तानची निर्मीती हे होते. हे का विसरता आहात? आज तसला विचार करून चालेल का?>>

लीगवाले जे वास्तव नव्हते अशा पाकची मागणी करत होते व धर्माधिष्ठीत होते, पण सावरकर हिंदूराष्ट्र म्हणताना त्यांनी जी हिंदुत्वाची व्याख्या केली आहे ते तसे मागत होते कारण काही जण ते वास्तव होते नाकारत होते म्हणून.

*
<<आपल्या देशावर प्रेम करा. आपल्या धर्मावरही करा. या दोहोंचा आदर करा. मी करतो. त्यासाठी दुसर्‍या कुणाला शिव्या देऊ नका अन देणार्‍याला आवरा. कारण त्यांच्या असल्या वागण्याने हा देश तुटेल. मग हाती काय उरेल?>>

आम्ही कुठे कोणाला शिव्या देतोय, एखाद्या धर्माचे गुण-वैशिष्ठ्ये सांगणे म्हणजे व्देष नव्हे. एखाद्याला हिंदू धर्माचे गुण-वैशिष्ठ्ये एकवत नसेल तर ती गोष्ट वेगळी. तो दोष आमचा नाही.

>>> तुमच्या भविष्यपुराणाचाच संदर्भ यात आहे.

:गंभीर मोड ऑन:
भविष्यपुराणातले बहुसंख्य भाग प्रक्षिप्त आहेत. कोणताही संशोधक भविष्यपुराणावर विश्वास ठेवत नाही किंवा भविष्यपुराणाचा संदर्भ देत नाही.
:गंभीर मोड ऑफ:

>>>> भविष्य पुराण के अनुसार, शालिवाहन (सात वाहन) वंशी राजा भोज दिग्विजय करता हुआ समुद्र पार (अरब) पहुंचेगा। इसी दौरान (उच्च कोटि के) आचार्य शिष्यों से घिरे हुए महामद (मुहम्मद सल्ल.) नाम से विख्यात आचार्य को देखेगा। (प्रतिसर्ग पर्व 3, अध्याय 3, खंड 3, कलियुगीतिहास समुच्चय)

महंमदचा जन्म ६ व्या शतकाच्या अखेरीस झाला. भोज राजाचा कालखंड व महंमदाचा कालखंड पूर्ण वेगळा आहे. भोज राजा साम्राज्यविस्ताराकरता कधीही समुद्र ओलांडून गेलेला नाही. मग तो अरबस्थानात म्हणजे आताच्या सौदी अरेबियात कसा जाईल?

>>> इन श्लोकों का भावार्थ इस प्रकार है-‘हमार लोगों का ख़तना होगा, वे शिखाहीन होंगे, वे दाढ़ी रखेंगे, ऊंचे स्वर में आलाप करेंगे यानी अज़ान देंगे। शाकाहारी मांसाहारी (दोनों) होंगे, किन्तु उनके लिए बिना कौल यान मंत्र से पवित्र किए बिना कोई पशु भक्ष्य (खाने) योग्य नहीं होगा (वे हलाल मांस खाएंगे)। इसक प्रकार हमारे मत के अनुसार हमारे अनुयायियों का मुस्लिम संस्कार होगा। उन्हीं से मुसलवन्त यानी निष्ठावानों का धर्म फैलेगा और ऐसा मेरे कहने से पैशाच धर्म का अंत होगा।’ अर्थात उनके सर पर “बालों की छोटी/चुटिया” नहीं होगी,अर्थात वे सनातन हिन्दू धर्म की मान्यताओं से अलग…….शिखाहीन होंगे,

इथे "हमार लोग" म्हणजे कोणते लोक? हे जर खरं मानायचं तर ६ व्या शतकात सौदी अरेबियात हिंदूंचे वास्तव्य होते व महंमदाने त्यांना मुसलमान केले असे मानावे लागेल.

>>> और ऐसा मेरे कहने से पैशाच धर्म का अंत होगा।’

"पैशाच (पिशाच्च?) धर्म " म्हणजे हिंदू धर्म की काय? पण हिंदू काय इतर कोणत्याही धर्माचा अंत महंमदानंतर १४०० वर्षांनी सुध्दा झालेला दिसत नाही. उलट महंमदानंतर शीख, दीन्-ए-इलाही, शिवधर्म असे अनेक नवीन धर्म जन्माला आलेले आहेत. पण जुने धर्मही टिकून आहेत.

>>> पुराण में स्पष्ट तौर पर कहा गया है कि ‘एक दूसरे देश में एक आचार्य अपने मित्रों के साथ आएंगे। उनका नाम महामद होगा। वे रेगिस्तानी क्षेत्र में आएंगे।

रेगिस्तानी क्षेत्र में आएंगे? महंमद तर जन्मापासून शेवटपर्यंत रेगिस्तानातच होता. मग तो कुठून "आएंगे"?

>>> अर्थात् ‘‘अल्लाह ने सब ऋषि भेजे और चंद्रमा, सूर्य एवं तारों को पैदा किया। उसी ने सारे ऋषि भेजे और आकाश को पैदा किया। अल्लाह ने ब्रह्माण्ड (ज़मीन और आकाश) को बनाया। अल्लाह श्रेष्ठ है, उसके सिवा कोई पूज्य नहीं। वह सारे विश्व का पालनहार है। वह तमाम बुराइयों और मुसीबतों को दूर करने वाला है। मुहम्मद अल्लाह के रसूल (संदेष्टा) हैं, जो इस संसार का पालनहार है। अतः घोषणा करो कि अल्लाह एक है और उसके सिवा कोई पूज्य नहीं।’’

हा तर उघडउघड मुस्लिम धर्माचा प्रचार आहे. हे असलं काही "भविष्यपुराणात" आहे? तुम्ही एकदा पुण्यातल्या वाडिया रूग्णालयात जाऊन या. ते मिशनर्‍यांनी चालविलेले आहे. तिथे अनेक ठिकाणी उघड्यावर पत्रके, पुस्तके ठेवलेली असतात. त्यात हेच सर्व वर्णन असते, फक्त अल्ला व महंमदाच्या जागी गॉड व येशूचे नाव असते. बाकी सर्व वाक्ये जशीच्या तशी असतात.

>>> विष्णुयशसः कल्कि के पिता का नाम है, जबकि मुहम्मद साहब के पिता का नाम अब्दुल्लाह था। जो अर्थ विष्णुयश का होता है वही अब्दुल्लाह का। विष्णु यानी अल्लाह और यश यानी बन्दा = अर्थात अल्लाह का बन्दा = अब्दुल्लाह। इसी तरह कल्कि की माता का नाम सुमति (सोमवती) आया है जिसका अर्थ है – शांति एवं मननशील स्वभाववाली। आप (सल्ल.) की माता का नाम भी आमिना था जिसका अर्थ है शांतिवाली।

विष्णू म्हणजे अल्ला? यश म्हणजे "बन्दा"? सुमती म्हणजे शांती? Rofl

म्हणजे कल्कीच्या रूपाने महंमद पुन्हा अवतार घेणार तर! पण सुन्नी मुस्लिमांचा तर असा ठाम विश्वास आहे की महंमद हा त्यांचा शेवटचा प्रेषित आहे. मग तो नवीन अवतार कसा घेणार?

>>> ‘‘ वे जैसे सांसारिक राजसत्ता के प्रमुख थे, वैसे ही दीनी पेशवा भी थे। मानो पोप और क़ेसर दोनों का व्यक्तित्व उन अकेले में एकीभूत हो गया था। वे सीज़र (बादशाह) भी थे पोप (धर्मगुरु) भी। वे पोप थे किन्तु पोप के आडम्बर से मुक्त। और वे ऐसे क़ेसर थे, जिनके पास राजसी ठाट-बाट, आगे-पीछे अंगरक्षक और राजमहल न थे, राजस्व-प्राप्ति की विशिष्ट व्यवस्था। यदि कोई व्यक्ति यह कहने का अधिकारी है कि उसने दैवी अधिकार से राज किया तो वे मुहम्मद ही हो सकते हैं"

ख्रिश्चनांना धर्मांतरित करण्यासाठी वरील विनोदी वाक्ये लिहिली आहेत हे उघडच आहे.

जागोमोहंमदप्यारे - अशा विनोदी लिंक पाठवत चला. तेवढीच आमची करमणूक. Light 1

<<मुघलांच्या काळात या देशातील लोकाना हिंदु असे मुघल संबोधत होते. मग यात हिंदु, जैन, बौद्ध इइ सर्व आले. जे मुसलमान ( आणि ख्रिश्चन) नाहीत असे सर्व एतद्देशीयाना मुघल लोक हिंदुच म्ह्णत होते... हिंदुना त्यानी जे कायदे नियम केले ते हिंदु कायदे म्हणून ओळखले जात.>>

ह्या पोस्टातील सर्व लिखाणास उद्देशून
आहो पण आधी पासूनच जर सगळ्यांसाठी एकच नियम होते म्हणून मुघल/ब्रिटीशा सगळ्यांनी तेच उचलले. मुघलपूर्वकालीन इतिहास माहित नसल्याचे परिणाम.

<<कायद्याच्या पुस्तकात या सर्वाना उद्देशून लिगल हिंदु हा शब्द वापरला आहे. पण असे असले तरी हिंदु रिलिजन , आणि बौद्ध, जैन रिलिजन हे वेगळेवेगळेच आहेत हेही कायद्याने स्पष्टपणे लिहिले आहे.. हिंदु कायदे जरी लागू असले तरी हे धर्म वेगळेच रहातील आणि या सर्वांसाठी भारतीय हेच नागरिकत्व राहील.. कायद्याने इतक्या स्पष्ट शब्दात आणि आजच्या प्रचलित भाषेत हे लिहून ठेवलेले आहे. असे असताना कुणाला न समजणार्‍या भाषेतल्या पुराणातल्या बोटभर चोपड्या वाचून हिंदुत्ववाले कशाला शब्दच्छल करतात, ते त्यानाच ठाऊक ! पुराणातली वांगी पुराणात असे स्वतः हिंदुच म्हणतात, ते उगाचच नाही !>>

पुन्हा तेच, व्याख्या हिंदूत्वाची आहे, हिंदू धर्माची नाही. पुन्हा पुन्हा सांगूनही तुम्हीच तस नाही म्हणून शब्दछल करताय

आधी प्राचीन पुरावे मागायचे व दिल्यावर प्राचीन ग्राह्य मानायच का असे म्हणायचे....सेक्युकर कावा हो सेक्युकर कावा Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin

<<पुराण वाचून सगळं ग्राह्य मानायचं म्हटलं तर हेही ग्राह्य मानणार का? तुमच्या भविष्यपुराणाचाच संदर्भ यात आहे>>
आधी म्हणायच अहिंदूंचा समावेश केला नाही म्हणून फॅसिस्ट व केला तरी पुराण वाचून सगळं ग्राह्य मानायचं म्हटलं तर हेही ग्राह्य मानणार का? किंवा पुना ओक स्कूलचे विद्यार्थी अशी प्रतिक्रिया द्यायची. शेवटी तात्पर्य काय--काहीही होवो हिंदूंना झोडपायच.

Pages