अॅन्ड्रॉईड ही मोबाईल्ससाठी असलेली चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) आहे. ती खास करुन स्मार्टफोन्स आणि टॅब्लेट पीसींसाठी बनवलेली आहे. तिचा विकास ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ने गुगलच्या नेतृत्वाखाली केला. अॅन्ड्रॉईड नावाची मूळ कंपनी गुगलने ५ नोव्हेंबर २००७ ला खरेदी केली आणि नंतर वाढवली. अॅन्ड्रॉईड ही ’ओपन सोर्स सिस्टीम’ आहे. ओपन सोर्स म्हणजे तिचा सोर्स कोड सर्वांना उपलब्ध आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. मायक्रोसॉफ्टची विंडोज जशी आपल्याला विकत घ्यावी लागते आणि आपल्याला तिचा फक्त सेट अप मिळतो तशी अॅन्ड्रॉईड नाही. त्यामुळे अॅन्ड्रॉईड वाढवण्यासाठी कुणीही त्यात भर घालू शकतं.अॅन्ड्रॉईड ही लिनक्स कर्नेल वर चालते. कर्नेल म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरचं हार्डवेअर आणि तुम्ही स्थापित (इंन्स्टॉल) केलेले प्रोग्राम्स यातील दुवा.
आज बाजारात अनेक प्रकारचे अॅन्ड्रॉईड फोन्स उपलब्ध आहेत. ते सर्व मुख्यत: बिझनेस फोन्स किंवा टॅब्लेट पीसी आहेत. त्यावर आपण स्वत: बनवलेले अॅन्ड्रॉईड अॅप्लिकेशन्स टाकू शकतो.
अॅन्ड्रॉईडची वैशिष्ट्ये:
१) हॅन्डसेट लेआऊट्स:
अॅन्ड्रॉईड फोन्सची स्क्रीन साईज ब-यापैकी मोठी असते. त्यावर आपण टू डी, थ्री डी अॅप्लिकेशन्स आरामात वापरु शकतो. (जसे थ्री डी गेम्स.)
२) स्टोरेज:
अॅन्ड्रॉईडमधे स्वत:चा डेटाबेस आहे. त्याला एस्क्युलाईट म्हणतात.
३) कनेक्टिव्हीटी:
अॅन्ड्रॉईड विविध पद्धतींनी कनेक्ट होऊ शकतो जसं GSM/EDGE, IDEN, CDMA, EV-DO, UMTS, Bluetooth, Wi-Fi, LTE, NFC आणि WiMAX
४) भाषा सहाय्य:
अॅन्ड्रॉईड वेगवेगळ्या मानवी भाषांमधे काम करु शकतो.
५) वेब ब्राऊजर:
अॅन्ड्रॉईडकडे चांगला वेब ब्राऊजर आहे.
६) जास्तीचा (अॅडिशनल) हार्डवेअर सपोर्ट
अॅन्ड्रॉईड व्हिडिओ/स्टील कॅमेरा वापरु शकतो तसेच टचस्क्रीन, जीपीएस, अॅक्सिलरोमीटर, गायरोस्कोप,मॅग्नेटोमीटर, डेडिकेटेट गेमिंग कन्सोल, प्रेशर सेन्सर तसेच थर्मोमीटर अशी वैशिष्ट्ये त्यात आहेत.
याव्यतिरिक्त जावा सपोर्ट, सर्व प्रकारचा मिडिया सपोर्ट (एमपीथ्री/फोर फाईल्स आणि इतर), स्ट्रिमिंग मिडिया सपोर्ट, मल्टिटच, ब्ल्युटूथ, व्हिडिओ कॉलिंग, मल्टिटास्किंग, व्हॉईस इनपुट, टिथरिंग,स्क्रीन कॅप्चर अशी अनेक वैशिष्ट्ये अॅन्ड्रॉईडची आहेत.
अॅन्ड्रॉईडवर बाजारात कायकाय उपकरणे उपलब्ध आहेत बघा जरा:
वापर:
अॅन्ड्रॉईडचा वापर प्रामुख्याने स्मार्टफोन्स, नेटबुक, टॅब्लेट कॉम्प्युटर्स, गुगल टीव्ही इत्यादीत होतो. गुगल टीव्ही प्रामुख्याने अॅन्ड्रॉईडची एक्स८६ ही आवृती वापरते.
अॅन्ड्रॉईड आवृतींचा इतिहास:
ऑक्टोबर २००३: अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या पाउलो अल्टो येथे अॅन्डी रबिन, रिक मायनर, निक सिअर्स आणि ख्रिस व्हाईट यांनी अॅन्ड्रॉईडची मुहुर्तमेढ रोवली.
ऑगस्ट २००५: गुगलने अॅन्ड्रॉईड कंपनी विकत घेतली.
५ नोव्हेंबर २००७: ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ची स्थापना झाली.
१२ नोव्हेंबर २००७: अॅन्ड्रॉईडची बीटा आवृती बाजारात आली.
२३ सप्टेंबर २००८: पहिला अॅन्ड्रॉईड फोन, एच.टी.सी. ड्रीम अॅन्ड्रॉईडच्या पहिल्या(१.०) आवृतीसह बाजारात आला.यात खालील वैशिष्ट्ये होती.
१) गुगलच्या विविध सेवांबरोबर आदानप्रदान
२) एचटीएमएल, एक्सएचटीएमएल, अनेक एचटीएमएल पेजेसला सहाय्य करणारा वेब ब्राऊजर.
३) अॅन्ड्रॉईड मार्केट वरुन अॅप्लिकेशन्स उतरवून घेणे (डाऊनलोड करणे) आणि अद्ययावत (अपग्रेड) करणे.
४) मल्टीटास्किंग, इन्स्टंट मॅसेजिंग, वाय-फाय आणि ब्लुटूथ सहाय्य.
९ फेब्रुवारी २००९: फक्त टी-मोबाईल जी१ साठी अॅन्ड्रॉईडची आवृती १.१ बाजारात आली.
३० एप्रिल २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती १.५ बाजारात आली, जी कपकेक या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अधिक वेगवान कॅमेरा, आणि वेगवान फोटो कॅप्चर
२) अधिक वेगवान जी.पी.एस. यंत्रणा
३) स्क्रीनवरचा की-बोर्ड
४) यातून व्हिडिओ सरळ तूनळी (यूट्यूब) आणि पिकासावर चढवता (अपलोड करता) येत होते.
१५ सप्टेंबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती १.६ बाजारात आली, जी डोनट या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) वेगवान शोध यंत्रणा, व्हॉईस सर्च
२) एका क्लिकवर व्हिडीओ आणि फोटो मोडमधे चेंज करता येऊ शकणारा कॅमेरा
३) बॅटरी वापर दर्शक
४) CDMA सपोर्ट
५) अनेक भाषांमधील टेक्स्ट टू स्पीच
२६ ऑक्टोबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती २.० बाजारात आली, जी इक्लेअर या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अनेक ईमेल अकांऊंट्स
२) ईमेल अकांऊंट्ससाठी मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंजचं सहाय्य
३) ब्ल्युटूथ २.१ सहाय्य
४) नविन ब्राऊजर जो एच.टी.एम.एल. ५ ला सहाय्य करतो.
५) नविन कॅलेंडर
३ डिसेंबर २००९: अॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.०.१ बाजारात आली.
१२ जानेवारी २०१०: अॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.१ बाजारात आली.
२० मे २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती २.२ बाजारात आली, जी फ्रोयो या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) विजेट्स सहाय्य: विजेट्स म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम्स असतात जे होमस्क्रीनवर डकवता येतात. उदा: आजपासून ख्रिसमसला किती दिवस बाकी आहेत याचा प्रोग्राम, तापमान दर्शक, येण्या-या महिन्यात तुमच्या फोनबुकमधे असलेल्या कुणाचा वाढदिवस आहे हे सांगणारा छोटासा प्रोग्राम इत्यादी.
२) सुधारीत आदानाप्रदान सहाय्य.
३) हॉटस्पॉट सहाय्य.
४) अनेकविध भाषांमधील की-बोर्ड.
५) अॅडोब फ्लॅश आवृत्ती १०.१ सहाय्य.
६ डिसेंबर २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती २.३ बाजारात आली, जी जिंजरब्रेड या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) सुधारित युजर इंटरफेस.
२) जलदगतीने टाईप करता यावं म्हणून सुधारीत की-बोर्ड.
३) एका क्लिकवर सिलेक्ट करता येण्याजोगं टेक्स्ट आणि कॉपी/पेस्ट.
४) जवळील क्षेत्रातील आदानप्रदान (निअर फिल्ड कम्युनिकेशन).
५) इंटरनेट कॉलिंग.
२२ फेब्रुवारी २०११: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती २.३.३ बाजारात आली, तसेच टॅब्लेट पीसींसाठीची अॅन्ड्रॉईडची आवृती ३.० बाजारात आली, जी हनिकोंब या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) ही आवृत्ती खासकरुन टॅब्लेट पीसींसाठी आणि मोठ्या स्क्रीनच्या फोन्ससाठी बनवली गेली.
२) सुधारीत मल्टीटास्किंग, बदलता येण्याजोगी होमस्क्रीन आणि विजेट्स.
३) ब्लुटूथ टिथरींग
४) चित्रे/व्हिडीओ पाठवण्याची अंतर्गत सोय.
१०-११ मे २०११: गुगलने अॅन्ड्रॉईडच्या ’आईस्क्रीम सॅंडविच’ आवृत्तीची घोषणा केली.
१८ जुलै २०११: अॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती ३.२ बाजारात आली.
असा अॅन्ड्रॉईडचा इथपर्यंत प्रवास झाला. आता आपण अॅन्ड्रॉईडचा बाजारपेठेतला हिस्सा पाहूया.
बाजारपेठेतला हिस्सा:
१२ नोव्हेंबर २००७: अर्धा टक्का.
३ डिसेंबर २००९: ३.९ टक्के.
२० मे २०१०: १७.७ टक्के.
१०-११ मे २०११: २२.२ टक्के.
ही अॅंन्ड्रॉईडची फक्त तोंडओळख आहे.
संदर्भ: http://www.xcubelabs.com/
सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद!
सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद! मलाही बरीच नवनविन माहिती मिळतेय! मी फक्त अॅप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठीच अॅन्ड्रॉईड फोन वापरत होतो, पण आता हेही करुन बघतो!
रुटींग म्हणजे काय हे कृपया
रुटींग म्हणजे काय हे कृपया सांगाल कां?
परवाच वाचलं की फोर्ब्सच्या अहवालानुसार अँड्रॉईडचं आयुर्मान हे केवळ पुढील ५ वर्षेच असेल. त्यानंतर Windows प्रणालीवर आधारीतच फोन असतील. त्यांच्यामते गुगल कंपनी अँड्रॉईड साठीच्या अॅप्स डेव्हलपर्स गृप्स ना सपोर्ट करत नाही. (उद. कायदेशीर बाबी). त्यामुळे अॅप्स डेव्हलपर्सचा रस कमी होईल आणि त्याचा परिणाम अँड्रॉईडच्या खपावर आणि अर्थातच मग वापरावर होईल. अर्थात हे अनुमान सद्यस्थितीच्या पाहणीवरुन काढलेलं आहे.
बाकी फार उपयुक्त माहिती दिली आहे जाणकारांनी, खूप धन्यवाद!
Rooting is a process that
Rooting is a process that allows users of mobile phones and other devices running the Android operating system to attain privileged control (known as "root access") within Android's Linux subsystem with the goal of overcoming limitations that carriers and manufacturers put on some devices. It is analogous to jailbreaking on devices running the Apple iOS operating system.
साभार: http://en.wikipedia.org/wiki/Rooting_%28Android_OS%29
आणि काहीही झाले तरी मी तरी Microsoft वापरणार नाही !
Open Source rocks !!
धन्यवाद, एवढे सगळे संबंधित
धन्यवाद, एवढे सगळे संबंधित दुवे पेरून ही माहिती मराठीत उपलब्ध करून दिल्याबद्दल.
धन्यवाद निळुभाऊ!
धन्यवाद निळुभाऊ!
येथल्या महान अभ्यासु
येथल्या महान अभ्यासु आत्म्यांनो,
सद्ध्या मी नोकिया ई ७१ वापरत आहे, वेगळा फोन घ्यायचा असल्यास, अॅण्ड्रॉईड घ्यावा की विन्डोज ओएस असलेला घ्यावा ? वर कोणीतरी लिहिले आहे की अॅण्ड्रॉईड चे आयुष्य जास्त नाहीये.
दोन्ही प्रकारच्या ओएस साठी कोणती मॉडेल्स चांगली आहेत ?
गार्टनर प्रमाणे अॅण्ड्रॉईड
गार्टनर प्रमाणे अॅण्ड्रॉईड हा iphone ला मागे टाकेल...
http://www.gartner.com/it/page.jsp?id=1622614
http://news.cnet.com/8301-13506_3-20051610-17.html
हे सगळे जर तर वरती असते...
२ वर्षे तरी अॅण्ड्रॉईड ला मरण नाही...
नोकीया ने विन्डोज वरचे फोन आणले की बघायला मजा येईल... जर आताचे विन्डोज वरचे अॅप्स जर तसेच किंवा कमीत कमी श्रमात फोन वर आणता आले तर हिट होईल असे वाटते..
म्हणजे विंडोज बॉटम लाईन आहे
म्हणजे विंडोज बॉटम लाईन आहे तर..... आयफोन आणि अॅण्ड्रॉईडला मरण आहे आणि विंडोजला नाही. (बरोबर आहे .... दगड चिरंजीवच असतात ! )
अॅण्ड्रॉईड नाही तर अजून काही येईल ... ओपन सोर्सच.
विंडोज जर जास्त रिसोर्स खाणार
विंडोज जर जास्त रिसोर्स खाणार नसेल तर खरेच मजा. तरीदेखिल हा एक मुद्दा आहेच
Unlike operating systems for desktop computers, it is usually not possible to upgrade the operating system on a Microsoft based mobile phone via official and legal means, even by a later release of the same basic operating system let alone a different one; hardware replacement is the only way for less popular and older devices.
काळच ठरवेल. तोपर्यंत Androidला शुभेच्छा देऊया.
बिझिनेस फोन मधे कोणते मॉडेल
बिझिनेस फोन मधे कोणते मॉडेल घ्यावे सुचवा ना प्लिज ...
मी सोनी ऐवजी नोकिया समजून ते
मी सोनी ऐवजी नोकिया समजून ते वाक्य लिहिले होते. धन्यवाद नोकियावर नाही येणार.
रुट करणे म्हणजे OS चा रूट (सुपर युझर अॅक्सेस मिळविने) तो सहज करता येतो. रुट केल्यावर तो युनिकोड (मराठी भाषा) देखील दाखवेल.
महेश तुला नक्की कोणत्या सोयी हव्या आहेत. नेक्सस S, गॅलक्झी S, सेन्सेशन XE हे चांगले मॉडेल्स (अगदी नवीन) उपलब्ध आहेत.
विन्डोज बेस्ड फोन मला फारसे कधी आवडले नाहीत. मी अॅपल आयफोन जन्मल्यापासून वापरत आहे. आणि मला वैयक्तीक आयफोन ४ जास्त आवडतो. माझ्याकडे अॅन्ड्रॉईड पण आहे, गुगल नेक्सस १. त्यामुळे नेहमी कंम्पॅरिझन होतच असते.
केदार, अरे मी नोकिया ई ७१
केदार, अरे मी नोकिया ई ७१ घेतला तेव्हा मला सिम्बिअन, अॅण्ड्रॉईड, इ. फरक एवढे माहित नव्हते. त्यामुळे एकतर अॅण्ड्रॉईड किंवा विन्डोज वाला घ्यावा असा विचार आहे. सोयी म्हणशील तर एखाद्या अॅडव्हान्स्ड फोन मधे असतील तशा सर्व. माझा वापर मुख्यतः मेल्स चेक करणे, प्लॅनर्स, रेडिओ, स्टोअर केलेली गाणी ऐकणे इ. साठी असतो. सेकंडरी उपयोग म्हणजे फोटो, विडिओ, मुलांसाठी अॅप्लिकेशन्स आणि लास्ट बट नॉट लिस्ट कंपनीत लोकांचे जे आपले हॅण्डसेट दाखवून भाव खाणे चालते त्यात सहभागी होणे
माझा नविन फोन अँड्रोईड HTC
माझा नविन फोन अँड्रोईड HTC Wildfire S आहे. तो खुप मस्त आहे.
मोबाईलवरून गानी ऐकण्यात काय
मोबाईलवरून गानी ऐकण्यात काय पाइन्ट न्हाय. लै ब्याटरी खातंय बेनं... आधीच वेगवेगळ्या प्रोसेसनी ब्याटरी खायचं काम चालूच ठेवल्यालं आस्तया. त्यात हे आणखी. त्यापरीस आयपॉड ठेवावा .२९ तास ब्याकप . पेन्डसे गुरुजी तेच वापरतात....
तो नविन स्टुडण्ट्स कर्ता २२५०
तो नविन स्टुडण्ट्स कर्ता २२५० रुपड्यात ट्याबलेट पीसी येतोय, तो पण म्हणे अॅन्ड्रॉईड वर आधारित आहे. ओपन मार्केटमधे ३००० रुपड्यात मिळेल डिसेम्बरपासुन, घ्यावा काय?
मला वाटत की बाजो, तू पेन्डसे गुर्जीन्ना गुरुदक्षीणा म्हणून तसला एक घेऊन द्यावास, काय?
नो नो लिम्बू , पेन्डसे गुरुजी
नो नो लिम्बू , पेन्डसे गुरुजी सध्या परमापरम या सुपरकॉम्प्युटरवर काम करीत आहेत त्यामुळे असली भातुकली त्यांच्या काय कामाची?
>>>त्यापरीस आयपॉड ठेवावा .२९
>>>त्यापरीस आयपॉड ठेवावा .२९ तास ब्याकप . पेन्डसे गुरुजी तेच वापरतात.... <<<<
अरे प्रत्यक्ष गायकगायिका दिमतीला ठेवण्या ऐवजी आयपॉडची भातुकली पेंगु वापरतातच ना, म्हणुन मला वाटले की त्यान्ना ट्याबलेट चालु शकेल!
असो.
वरील लेख छापुन लिम्बोटल्याला वाचायला दिला
जोशी, आयपॉड टच हा पण एक
जोशी, आयपॉड टच हा पण एक पर्याय विचाराधीन आहे. खरेतर मला फोन पेक्षा सुद्धा त्याच्या बाकीच्या फिचर्स मधे जास्त इण्टरेस्ट आहे. पण अनेकांचे म्हणणे आहे की दोन दोन गोष्टी सांभाळण्यापेक्षा आयफोन सारखा फोनच घ्यावा.
आयफोन हा सर्वप्रथम फोन आहे हे
आयफोन हा सर्वप्रथम फोन आहे हे बरीक पहिल्यान्दा ध्यानी घ्यावे.अगदी आपफोन असला तरी तो आयपॉडची साऊन्ड क्वालिटी देत नाही ही वस्तुस्थिती आहे. दोन दोन गोष्टी साम्भाळायच्या कटकटी आहेत्.पण खूप अन्तराचे वेळेचे प्रवास असतील तर आय्पॉड वेगळा ठेवणे उचित नाहीतर फोनची ब्याटरी उतरत जाते तसा माणूस घायकुतीला येत जातो...
नष्टो मोहः स्मृतीर्लब्धा
नष्टो मोहः स्मृतीर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत |
स्थितोस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव |
अर्थात सर्व संदेह मिटलेले असुन फोन ऐवजी आयपॉड टच घेणेच योग्य या निष्कर्षाप्रत आलो आहे.
काय हे! अँड्रॉइडच्या धाग्यावर
काय हे! अँड्रॉइडच्या धाग्यावर आयपॉड घेण्याचा निष्कर्ष! अरेरे!!!
स्वतःच घेतलेल्या निष्कर्षाशी
स्वतःच घेतलेल्या निष्कर्षाशी फारकत घेऊन अखेर Samsung S GT I9003 घेतला.
पण आता त्यामधे अॅप्लिकेशन्स हवी आहेत. कोणी खालील प्रश्नांची उत्तरे द्याल का ?
सॅमसंग अॅप्स आणि अॅण्ड्रॉईड अॅप्स यामधे काही फरक असतो का ?
मी सॅमसंग अॅप्स च्या साईटवर अकाऊन्ट क्रिएट केले आहे आणि त्यामधे काही अॅप्सचा शोध घेतला,
पण फेसबुक आणि स्कायपे साठीची अॅप्स सापडत नाहीयेत.
ही अॅप्स कोठे मिळतील, आणि ती फोनमधे कशी अॅड करावीत.
सॅमसंग काईज नावाचा स्टुडिओ मिळाला आहे फोनबरोबर सिडीमधे, तो पिसीवर इन्स्टॉल केला.
पण त्यामधे contacts, music, video, photo हे सिन्क करण्याची सोय आहे.
बाकी अॅप्स वगैरेची सोय नाहीये.
काईजच्य तुलनेत पुर्वी नोकिया सूट चांगला होता असे वाटते. कदाचित अॅण्ड्रॉईड फोनची सवय नाही म्हणुन असे वाटत असेल. जाणकारांनी कॄपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद !
मार्केट म्हणुन असेल तिथे
मार्केट म्हणुन असेल तिथे लोगो....... या प्ले या नावाचा असेल त्यावर क्लिक कर.....आणि सर्च मधे जाउन हवी ति अॅप्लिकेशन डाउन्लोड करुन घ्या
धन्यवाद ! कालच गुगल प्ले पहात
धन्यवाद ! कालच गुगल प्ले पहात होतो लॅपटॉपवर त्यामधे स्कायपे मिळेल असे दिसत होते, पण फेसबुक साठी कोणते अॅप्स चांगले आहे ? तसेच मी जर ही अॅप्स पिसीवर डाऊनलोड केली तर ती फोनमधे ट्रान्स्फर करता येतात का ?
तसेच मी जर ही अॅप्स पिसीवर
तसेच मी जर ही अॅप्स पिसीवर डाऊनलोड केली तर ती फोनमधे ट्रान्स्फर करता येतात का ? >>>> तुम्हाला कशावर हवीत फोने वर कि लॅपटॉप वर ?
अर्थात फोनवर, पण सद्ध्या फोन
अर्थात फोनवर, पण सद्ध्या फोन मधे लिमिटेड इन्टरनेट प्लॅन आहे, त्यामुळे आधी पिसीवर डाऊनलोड करून मग फोन मधे ट्रान्स्फर करावे असा विचार आहे. या आधी नोकिया फोन मधे असे करत होतो (ओएस : सिम्बिअन)
अशी सोय नाही
अशी सोय नाही आहे...........वाय्फाय जोडुन करु शकतात.... पण इंटरनेट फोन वरुनच चालु करुन डाउनलोड करावे लागेल
ओह ओके, धन्यवाद उदयवन !
ओह ओके, धन्यवाद उदयवन ! म्हणजे आता त्यासाठी वायफाय शोधणे/घेणे आले.
महेश, अॅण्ड्रॉईड फोनमध्ये
महेश, अॅण्ड्रॉईड फोनमध्ये सॅमसंग अॅप्स मिळत नाहीत [जरी फोनमध्ये सॅमसंग अॅप्स चा आयकॉन असला तरी ... In fact, 'Samsung Apps' is a 'bloatware' in Android Phones]. तर, तुम्हाला जी अॅप्स हवी आहेत ती अॅण्ड्रॉईड मार्केट [http://market.android.com/] मध्ये मिळतील किंवा फोनवरून डाऊनलोड करता येतील.
तसेच मी जर ही अॅप्स पिसीवर
तसेच मी जर ही अॅप्स पिसीवर डाऊनलोड केली तर ती फोनमधे ट्रान्स्फर करता येतात का ?
>>>> महेश, अॅण्ड्रॉईड मार्केट मध्ये बर्याच अॅप्समध्ये 'Visit Developers Website' अशी लिंक असते. तिथे जाऊन तुम्ही अॅप्स [.apk] डाऊनलोड करू शकता तुमच्या पिसीवर आणि तिथून फोनच्या SD-Card वर USB मधून. नंतर मोबाईल मध्ये 'My Files' वर जाऊन त्या .apk वर टिचकी मारा. [रच्याकने, सर्वच डेवलपर ही सोय देतीलच असे नाही. त्यासाठी ईतर वेबसाईट पण आहेत, गूगल करून पहा :-)]
Pages