स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.
..............................................................................................................................................
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्यांना समावेशिणार्या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!
हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.
स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल
हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !
हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.
"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..
इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"
आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.
स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.
"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.
आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.
आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?
ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.
हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे
आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....
"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही
'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -
हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत
हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......
कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्या समाजाशी असणार्या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.
हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.
संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे
त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत
वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.
आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....
"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.
राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...
माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे
वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.
मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !
या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.
माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!
त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!
जय हिंद !
विशाल कुलकर्णी
संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org
( सत्यशोधक राव : आय डी चा
( सत्यशोधक राव : आय डी चा जन्म २ मिनिटापूर्वी.. पहिलाच अस्खलित प्रतिसाद या धाग्यावर.. वा! प्रगती आहे. चालु द्या. )
जो कुणी या भुमीला केवळ आपली
जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का!
विशाल,
तुमचा लेख चांगला आहे पण काही स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटत आहे.
सावरकरांनी ज्याची पितृभू व पुण्यभू तो हिंदु असे सांगितले ते बरोबर आहे. मात्र इथे ज्याला तशी "वाटते" तो हिंदू असे नसून ज्याची हि पितृभू व पुण्यभू "आहे" तो हिंदू असा अर्थ आहे. नुसत्या वाटण्यावर हे अवलंबुन नसून "असण्यावर" भर आहे. पितृभू व पुंयभू हि एक "वस्तुस्थिती" असायला हवी. हि केवळ "मानीव" गोष्ट नाही. प्रत्यक्ष स्वीकारणे गरजेचे. अन्यथा मी पुण्यभू मानतो किंवा पितृभू मी मानतो असे केवळ म्हटल्याने एखादी व्यक्ती हिंदू ठरत नाही तर तिला या दोन्ही अटि पूर्ण कराव्या लागतात.
सर्व सभ्य व असभ्य
सर्व सभ्य व असभ्य टिकाकारांसाठी ,
भारतीय राज्यघटनेने वर्णन केलेले हिंदू व सवरकरांच्या व्याख्येत वर्णन केलेले हिंदू हे एकच आहेत. तेव्हा हिंदू ची व्याख्या आज सर्वमान्य झालि आहे. म्हणून आपले मतभेद किंवा टिका किंवा जळजळ आपणापाशीच ठेवा. त्याचा काहिही उपयोग नाही. शीख ,जैन ,बौद्ध यांना हिंदूच मानून हिंदु वारसा निर्बंध लागू आहे व मुसलमान,ख्रिश्चन ,पारशि व ज्यु यांना यातून वगळले आहे.
तुमच्या पोटदुखीसाठीही इथे ईनो
तुमच्या पोटदुखीसाठीही इथे ईनो तयार आहे.. घ्या..
The Supreme Court of India has made several pronouncement on the question, most recently observing that Jainism is "indisputably is not a part of Hindu Religion".
त्यात आणखी दिले आहे... This cast a doubt on the independent standing of Jain religion. Scholars in the Jain tradition, as well as several groups amongst the Jain community protested, and emphasised that Jain religion stands as a religion in its own right. While Hinduism as a mode of living, and as a culture is to be found across various religions in India because of several common customs, traditions and practices, but as religions Hindu religion and Jain religion are distinct. त्यात ढीगभर कोर्ट केसेसही दिल्या आहेत, बौद्ध धर्म हाही वेगळा आहे, असा उल्लेखही त्यात आहे.
आणखी दिले आहे... On September 3, 1949, while addressing a public meeting at Allahabad, the first Prime Minister of India, Jawaharlal Nehru said[14]:
"No doubt India has a vast majority of Hindus, but they could not forget the fact that there were also minorities - Muslims, Parsis, Christians, Sikhs and Jains. If India was understood as a Hindu Rashtra, it meant that the minorities were not cent percent citizens of this country."
The said speech can be considered as a clarification on Article 25 of the Constitution of India.
त्यामुळे भारताला भारतच म्हणायला हवे, हिंदुराष्ट्र नव्हे!
http://en.wikipedia.org/wiki/Legal_status_of_Jainism_as_a_distinct_relig...
हिंदुत्ववाद्यानी आपल्या धर्मात राजकारण आणलं अणि राजकारणात आपला धर्म आणलाच, पण अहिंसेच्या मार्गावर असणार्या इतर धर्मानाही सोडलं नाही! किती ही फसवणूक !
तुमच्या पोटदुखीसाठीही इथे ईनो
तुमच्या पोटदुखीसाठीही इथे ईनो तयार आहे.. घ्या.. फिदीफिदी
The Supreme Court of India has made several pronouncement on the question, most recently observing that Jainism is "indisputably is not a part of Hindu Religion"
हास्यास्पद ! तुम्हाला केवळ "इनो"च नाही तर "शंखपुष्पीची" गरज आहे.
हे जे काय लिहिलय ते "हिंदू रिलिजन" शी संबंधित आहे. हिंदू शब्दाशी नाही. हिंदूत्व आणि हिंदुधर्म या दोन संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. विशाल कुलकर्णी यांनी लेखात ते स्पष्ट मांडले आहे.Hinduism आणि हिंदूत्व अत्यंत भिन्न गोष्टी आहेत हे सावरकरांच्या व्या़ख्येत स्पष्ट केलेले आहे. विविध "हिंदू" धर्मांमधील धर्ममते , आचार भिन्न असू शकतात त्याने पुण्यभू व पितृभू च्या वास्तवतेवर कोणताही फरक पडत नाही. आता आधी जागो आणि नंतर भागो मोहनप्यारे खि! खि! खि!
हे जे काय लिहिलय ते "हिंदू
हे जे काय लिहिलय ते "हिंदू रिलिजन" शी संबंधित आहे.
होय, इथे कुणीतरी बौद्ध आणि जैन धर्म हे हिंदु धर्माचेच भाग आहेत, म्हणून लिहिले होते, हे त्याला दिलेले उत्तर आहे.
तुमचे हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र मला शोधायची गरज नाही ! हिंदुत्वाचा शोध म्हणजे अंधार्या खोलीत आंधळ्या माणसाने काळे मांजर शोधणे, तेही मुळात त्या खोलीत ते मांजरच नसताना, असे मी दुसर्या एका हिंदुत्वाच्या बीबीवर म्हटले होते, त्याची आठवण झाली.
Jawaharlal Nehru, in his book Discovery of India, mentioned as under:
"Buddhism and Jainism were certainly not Hinduism or even the Vedic Dharma. Yet they arose in India and were integral parts of Indian life, culture and philosophy. A Buddhist or Jain, in India, is a hundred per cent product of Indian thought and culture, yet neither is a Hindu by faith. It is, therefore, entirely misleading to refer to Indian culture as Hindu culture."
आणि तरीदेखील हिंदुत्ववादी हिंदुराष्ट्राचा आग्रह धरतात , या देशाचे नागरिकत्व म्हण्जे हिंदुत्व असले तारे तोडतात .
आता आधी जागो आणि नंतर भागो
आता आधी जागो आणि नंतर भागो मोहनप्यारे खि! खि! खि!<<<<<<<<<<<<
>>>>>आणि तरीदेखील
>>>>>आणि तरीदेखील हिंदुत्ववादी हिंदुराष्ट्राचा आग्रह धरतात , या देशाचे नागरिकत्व म्हण्जे हिंदुत्व असले तारे तोडतात . ><<<<<<
प्रचंड हास्यास्पद वा़क्य...........:हहगलो:
जामोप्या, १. >> बुद्धाला
जामोप्या,
१.
>> बुद्धाला विष्णूचा अवतार करणं हा कुटील राजनीतीचा भाग होता... भारत वगळता अजून बर्याच देशात बौद्ध
>> धर्म आहे, तिथे कुणीही बुद्धाला विष्णूचा अवतार मानत नाहीत आणि बौद्ध धर्म हा एक स्वतंत्र धर्म मानला
>> जातो. आज भारतातही तसेच आहे. हिंदुना बुद्ध हा विष्णूचा खरोखरच अवतार मानायचा असता तर एकतरी
>> बुद्धाचे देऊळ हिंदुनी बांधायला हवे होते की!
कुटील राजनीति? काही पुरावा आहे का तुमच्याकडे? की आपलं उगीच ठोकून देताय? आणि हिंदू ब्राह्मणांनी बांधलेलं बुद्धाचं देऊळ पाहिजे? हे घ्या!
तुम्हाला शब्दच्छलात अधिक रस दिसतो. सर्वोच्च न्यायालय हिंदू कश्याला म्हणते याच्याशी मला देणंघेणं नाही. या देशावर प्रेम असलेले लोक मला हिंदू म्हणून चालवून घ्यायला काही अडचण नाही. मग ते कोणाला का भजेनात!
साध्यासोप्या गोष्टी उगीच कर्मकठीण करून घ्यायच्या कशाला? हिंदुत्व म्हणजे हिंदुपणा (=Hinduness) आहे. हिंदुवाद (=हिंदुगिरी=Hinduism) नव्हे.
आ.न.,
-गा.पै.
>>> हिंदुत्ववाद्यानी आपल्या
>>> हिंदुत्ववाद्यानी आपल्या धर्मात राजकारण आणलं अणि राजकारणात आपला धर्म आणलाच, पण अहिंसेच्या मार्गावर असणार्या इतर धर्मानाही सोडलं नाही! किती ही फसवणूक !
अगदी बरोबर. इतर धर्मियांनी राजकारण व धर्म एकमेकांपासून वेगळे ठेवले व कोणाचीच फसवणूक केली नाही. या अनोख्या संशोधनाबद्दल आपले त्रिवार अभिनंदन!
>>> एखाद्या शाळेने योगासने शिकविणे, गीता शिकविणे किंवा सरस्वती वंदना शिकविण्याची नुसती घोषणा केली की निधर्मांध लगेच "घटनेला पायदळी तुडविले", "सर्वधर्मसमभावाचा अपमान", अशी कोल्हेकुई करून ती घोषणा हाणून पाडतात. >> होयच, त्यात काय चुकीचे आहे? मुस्लीम आणि ख्रिश्चन आपापले धर्म शिक्षण स्वतंत्र शाळेत देतात, जिथे सर्वासाठी इतर व्यावहारिक शिक्षण खुले आहे, अशा शाळेत देत नाहीत.
मुस्लिम व ख्रिश्चन आपापले धर्मशिक्षण देतात त्या शाळा सरकारी मदतीवर चालतात. या शाळांतून घेतलेल्या शिक्षणाला सरकारी मान्यता आहे. सरकारी मदतीवर चालणार्या शाळांनी फक्त एका विशिष्ट धर्माचेच शिक्षण देणे अयोग्य आहे. याउलट हिंदू धर्मशिक्षण देणार्या शाळा अत्यल्प आहेत व त्यांना बोर्डाची/विद्यापीठाची मान्यता नाही. तसेच त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळत नाही. सरकारी मदत घेणार्या सर्वसाधारण शाळेत गीता शिकविणे जर घटनाविरोधी व सर्वधर्मसमभावविरोधी असेल तर सरकारी मदत घेणार्या मुस्लिम व ख्रिश्चन शाळांमधून फक्त त्यांच्याच धर्माचेच शिक्षण देणे हे देखील घटनाविरोधी व सर्वधर्मसमभावविरोधी आहे.
>>> हिंदुंचे काही कायदे इतर धर्मियाना लागू आहेत याचा अर्थ ते धर्म हिंदु धर्माचे घटक आहेत आणि त्याना हिंदुत्वात समाविष्ट करा अशी त्यांची किंवा सरकारची मान्यता आहे, असा होत नाही..
असे कोणते कायदे आहेत जे फक्त हिंदूंसाठीच बनविले आहेत? असा एकतरी कायदा आहे का?
अरररररर्र जरा थोडं
अरररररर्र
जरा थोडं पोटापाण्याचं बघायला लागलो तर जामोप्या एकटं पडलं की!
असो.
गा.पै, जोग साहेब, मस्तुरे महराज, लिंबू अप्पा, अन अजुन कोण राहिलं ब्वा? हां ते म. फुल्यांचे सत्यशोधक.
साहेब लोक हो. मुद्दाम नावानिशी विचारतो आहे,
मी गरीबाने एक प्रश्न मांडला.
तुमचा देश कोणता?
भारत, कि हिंदूस्थान?
तोंड वर करून द्यायला उत्तर नाही का तुमच्या कडे? मला वाटलं की माझी चामडि लोळणार आता, या धर्म मार्तंडांना असला पर्श्न विचारल्यावर! ६४ नवीन पोस्स्टी झाल्या.
१ नवीण आय्डी पण 'झाली'
सगळे मिळून काथ्याकूट काय करताहात? तिसराच.
चालु द्या. प्रत्येकास उत्तर अन प्रश्न आहेत मजकडे.
सुरुवात.
मा. चातक.
तुमची मते वाचली.
धर्मांतराबद्दल.
आधी प्रश्नः मी नवबौद्ध आहे. मला हिंदू बनायचे आहे. माझी शुद्धी कोण करणार अन माझ्या पोराला फक्त शुक्ल यजुर्वेदिय मुलिशीच लग्न करायचे आहे, तेंव्हा त्याच ज्ञातीचा हिंदू बनायची इच्छा आहे. कोण अन कसे करून देणार? मा. सावरकरांनी ५० हिंदूंची शुद्धी केली असे ऐकले आहे. या प्रश्नी मला कोण मदत करील काय?
आदिवासींचे धर्मांतर रोखणे. हा एक महान अजेंडा 'आपला' आहे. छान आहे. बरेच सर्व वेळ सेवक कामात व्यग्र आहेत. बरीच सुंदर कामे ही आहेत. या सर्व आदीवासींचा मूळ धर्म हिंदू आहे का हो?
हा हिंदू धर्म असला का आहे, कि फक्त जन्माने घेता येतो?
---
मास्तुरे काका,
माफ करा,
तुमचा नामोल्लेख केला.
<<हे असे संकलित लेख वाचून नवख्याचे विचार अत्यंत प्रतिगामी, धर्मांध अन फॅसिस्ट बनायला मदत होऊ शकते. वरून जोग साहेबांसारख्या व्यक्ती या विचारास खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात..
हे असले लेख न वाचून सुध्दा किंवा वाचून व त्याला पूर्ण विरोध करूनसुध्दा अनेक नवख्यांचे व अनुभवींचे विचार अत्यंत प्रतिगामी, धर्मांध अन फॅसिस्ट आहेत, त्याचं काय? <<
हे तुमचंच ना?
त्याचं काये महितेय का? त्यासाठी 'बौद्धीक' असतं. आता हे बौद्धीक काय अस्तं? फक्त शाखेत होतं की कुठे? हे डीट्टेल साम्गू का? उग्ग चार चौघांत बोलाय्ला लावू नका.
----
मा. जोग साहेबांना प्रश्न नंतर विचारतो. एकेक पोस्ट वाचून मग टाईपतो.
सध्या घटने बद्दलः
ते जे पान आहे, (@गा.पै.) ती प्रस्तावना आहे.
घटनेच्या पहिल्या पानावर, भारत अन इन्डिया अशी दोनच नावे आहेत.
फोटो छापू का इथे? त्या दुसर्या धाग्यावर दिलिये लिंक. nic.in वरही मिळेल. किंवा गूगलून पहा.
या देशात राहून, या देशाच्या घटनेविरुद्ध, पहिल्या शब्दापासून वागून, वर तोंड करून कसे काय बोलता हो? मग ते खलिस्तान वादी अन इतर फुटीरवादी तुमच्या पेक्षा वेगळे कसे? उगाच मग अमूक कलम, समान नागरी कायदा काढायचं. कुणाला वेड्यात काढायचा हा प्रयत्न?
असे कोणते कायदे आहेत जे फक्त
असे कोणते कायदे आहेत जे फक्त हिंदूंसाठीच बनविले आहेत? असा एकतरी कायदा आहे का?
काका,
भारतात राहता का?
एच यू एफ ऐक्लंच नै का कधी?? (हिंदू अनडिव्हाईडेड फॅमिली)
तेव्ढं एकच उदाहरण येतं ब्वा सध्या तरी.
ता.क.
धर्म गृहित धरून जे कायदे आहेत ते सिव्हिल कोड मधे. पीनल कोड मधे धर्म येत नाही. पीनल कोड मधे 'सर्व धर्म समभाव' आहे. सिव्हिल कोड मधे, तुमच्या अन त्यांच्या सर्वांच्या चालीरीतींची कदर केली गेली आहे. अर्धवट बोलून फक्त लोकांचा बुद्धीभेद करता येतो.
मुस्लिम व ख्रिश्चन आपापले
मुस्लिम व ख्रिश्चन आपापले धर्मशिक्षण देतात त्या शाळा सरकारी मदतीवर चालतात. या शाळांतून घेतलेल्या शिक्षणाला सरकारी मान्यता आहे
म्हणजे मद्रसेतून कोणती डिग्री मिळते? त्यावर कुठे व कोणती नोकरी मिळते? जरा प्लीज सांगा.
आणि हिंदू ब्राह्मणांनी
आणि हिंदू ब्राह्मणांनी बांधलेलं बुद्धाचं देऊळ पाहिजे? हे घ्या!
खी:
तितकं च हसू आलं. जास्त नाही येत.
बादवे,
हिंदू ब्रह्मणांनी फक्त अस्पृश्यांसाठी बांधलेलं देऊळ कोणतं हो?... अहो ते आप्लं,.. ते.... ते काही तरी छ्या! अजिबात आठवेना गड्या!
इब्लिस, १. >> या देशात राहून,
इब्लिस,
१.
>> या देशात राहून, या देशाच्या घटनेविरुद्ध, पहिल्या शब्दापासून वागून, वर तोंड करून कसे काय बोलता हो?
कुठल्या कलमाविरुद्ध हिंदुत्ववादी वागतात ते कळेल काय? घटनेचे प्रास्ताविक घटनेचा भाग नाही. हिंदूंना सेक्युलर आणि सोशालिस्ट या दोन शब्दांबद्दल आक्षेप आहे कारण त्यांची व्याख्या कुठेही केलेली नाही. जी गोष्ट सुस्पष्ट नाही तिच्या विरोधात किंवा बाजूने कसं हो बोलायचं?
२.
>> मी गरीबाने एक प्रश्न मांडला.
>> तुमचा देश कोणता?
>> भारत, कि हिंदूस्थान?
दोन्ही. माझ्यासाठी दोन्ही एकच आहेत. पण काही लोकांना हिंदुस्थान या शब्दाची अॅलर्जी आहे. त्यांच्या समाधानासाठी हा सारा पोष्टापोष्टीचा खटाटोप चाललाय (असं माझं प्रामाणिक मत आहे).
३.
>> आदिवासींचे धर्मांतर रोखणे. हा एक महान अजेंडा 'आपला' आहे. छान आहे. बरेच सर्व वेळ सेवक कामात
>> व्यग्र आहेत. बरीच सुंदर कामे ही आहेत.
आहेतंच मुळी सुंदर कामं! भारतातल्या ज्या प्रांतातून हिंदूंची (यात बौद्ध, जैन, शीख सगळे आले) लोकसंख्या कमी झाली ते भाग भारतापासून तुटले आहेत.
४.
>> या सर्व आदीवासींचा मूळ धर्म हिंदू आहे का हो?
तुम्हाला वनवासी म्हणायचं आहे का? आम्हीही या देशाचे आदिवासी आहोत. आमचे बापजादे कुठल्या बाहेरील प्रांतातून आलेले नाहीयेत. हा देश धर्मशाळा नव्हे.
वनवासींचा मूळ धर्म काहीही असला तरी तो भारतविरोधी नक्कीच नव्हता. त्यांना जर धर्माद्वारे मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं तर काय बिघडलं? ईशान्य भारतात वन्य जमातींत आसामातल्या विष्णुभक्त अहोम राज्यकर्त्यांनी हिंदू धर्माप्रमाणे भक्ती रुजवली. त्यातून भारताचं भलंच झालंय. पोपच्या अवलादीने त्यांना ख्रिस्ती बनवल्यानंतर काय परिस्थिती झालीये त्यांची ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे.
असो.
इब्लिस, मला वाटतं की आपण शब्दार्थ, व्याख्या इत्यादिंच्या बाहेर जाऊन हिंदू मानस म्हणजे काय आहे ते जाणून घ्यावे.
आ.न.,
-गा.पै.
गापै, तुमच्या प्रतिसादाला
गापै,
तुमच्या प्रतिसादाला अनुमोदन! एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त तोतया आयडी वापरून प्रतिसाद देत आहे, हे तुमच्या लक्षात आलं नाही वाटतं.
अक्षय जोग | 28 September,
अक्षय जोग | 28 September, 2011 - 15:45
<<यालाच म्हणतात शेजारचा मुसलमान हा युक्तिवाद. या देशात जन्मलेले सर्व, या भारत देशाला पितृभूमी म्हणतात. अन हीच त्यांची (पुण्य)कर्म करायची भूमी असते.>>
तो हिंदुत्व प्रबंध नीट वाचा म्हणजे पुण्यभूचा अर्थ कळेल, पुण्यभू म्हणजे कर्मभू नव्हे.
काका,
पितृभूमी चा अर्थ चुकला का हो?
पुण्य पाप हे तर तुम्ही ठरवणार. डायरेक्ट अक्षय जोगांना त्या विधात्याने पावर दिली आहे बहुतेक पुण्य कशास म्हणावे याची. होली लँड म्हणजे पुण्यभू कि जिथे पुण्यकर्म करतात ती पुण्यभू? मग तुमची पुण्यभू महाराष्ट्र सोडून काशीला, की ती सिंधू संस्कृती की हिंदू संस्कृती उदयाला आली त्या पाकिस्तानात?
हसू का रडू आता?
वरतून हे कोटेशनः
"who had originally been forcibly converted to a non-Hindu religion and who consequently have inherited along with Hindus, a common Fatherland and a greater part of the wealth of a common culture are not and cannot be recognized as Hindus."
भारतात जन्मला, तो भारतीय. अमेरिकेत जन्मला तो अमेरिकन. सिंपल. शेजारचा मुसलमान भारतात जन्माला आला. आता घटनेने त्याला जन्मसिद्ध नागरिकत्व दिले, तर त्यात "are not and cannot be recognized as Hindus."
जर हिंदू हीच देशप्रेमाची/या देशाच्या नागरिकत्वाची व्याख्या करित आहात, तर तुमचे विचार फॅसिस्ट अन देशद्रोही नाहीत तर कसे आहेत?
'जबरदस्तीने' जरी धर्मांतर करविले, तरी तो देशद्रोही. आय मिन हिंदू नाही. कारण त्याची पुण्यभूमी तिकडे गेली. अन म्हणे ५० हिंदू 'शुद्ध' केले. काय झाली हो टक्केवारी?
>>> सत्यशोधक राव : आय डी चा
>>> सत्यशोधक राव : आय डी चा जन्म २ मिनिटापूर्वी.. पहिलाच अस्खलित प्रतिसाद या धाग्यावर.. वा! प्रगती आहे. चालु द्या.
असाच अजून एक तोतया आहे. बाल हनुमंताने ज्याप्रमाणे जन्म झाल्यानंतर काही क्षणातच अंतराळात उड्डाण केले होते, त्याचप्रमाणे, या तोतयाने जन्मानंतर काही मिनिटातच अस्खलित मराठी टायपायला सुरवात करून व इतर अनेक मायबोलीकरांचे संदर्भ देऊन आपल्या तोतयेगिरीची चुणुक दाखविली होती.
स्वत:चीच विधाने नीट एकत्रित
स्वत:चीच विधाने नीट एकत्रित करून वाचा. आपण आपलाच बुद्धीभेद करीत आहात हे दिसेल.
आसिंधूसिंधू तो हिंदूस्थान. त्यावर श्रद्धा ठेवेल तो हिंदू.
हे ओरडून सांगायचे. कधी अझरुद्दीन हा खरा हिंदू असे ही छापून येते. सर्टिफिकेट सह. तोपर्यंत पितृभू.
मग एकदा हे जमले, सगळे 'हिंदू' एकत्र जमले, की हळूच पुण्यभू काढायची बाहेर.
मग हळूच त्यातून मुस्लीम हाकला.
मग ख्रिश्चन हाकला.
यापुढे जे होणारे ते हे असे- त्यांनी कुराणाला कायदा म्हटले, आपण पुराणांना म्हणू. मग सगळे कसे आनंदवनभुवनी!
अरे हो. ते जाती अन भाषावार तुकडे राहिलेतच.
वर ते शैव/वैष्णव वगैरे... गेला बाजार देशस्थ मोठे की कोंकणस्थ? इथपर्यंत तुकडे करायला कमी करणार नाही आम्ही!
गा.पै. महोदय, धर्म अन राष्ट्र
गा.पै. महोदय,
धर्म अन राष्ट्र हे दोन वेगळे विषय आहेत हे आपणांस मान्य आहे काय?
आ.न.
इब्लिस.
बर चला तुमच्या समाधानासाठी
बर चला तुमच्या समाधानासाठी असे म्हणूयात,
येथे बहुसंख्येने रहाणार्या अनेक (सर्व नाही) हिंदूंना ते या देशात राहतात म्हणून तो हिंदुस्थान वाटतो (भारत वाटत नाही असे नाही तो तर आहेच)
आणि अहिंदूंना (मग अगदी बौद्ध, जैन, शिख, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन, अजुन कोणी राहिले असतील तर ते पण) हा देश फक्त भारत वाटतो (इंग्रजी मधे विचार करत असतील तर इंडिया)
हुश्श्श्श् आता तरी कोणाला प्रॉब्लेम नसावा. (दोन्ही बाजुंना)
अवांतर निरिक्षण ---
माझ्या शेजारी रहाणार्या जैन व्यक्तीला काही वेळापुर्वी विचारले तर त्याने सांगितले की तो आणि त्याच्या घरातील सर्व लोक कागदोपत्री लिहिताना "हिंदू जैन" असे लिहितात तसेच नवरात्री, दिवाळीतील सर्व दिवस हे हिंदू पद्धतीप्रमाणे साजरे करतात. जामोप्या आणि इब्लिस जर तुम्ही म्हणता जैन हा वेगळा धर्म आहे तर असे कसे काय हो ? त्यांच्या धर्मात लक्ष्मी वगैरे देवी कशा काय ? मी हे कोणत्याही वादासाठी लिहित नसुन खरोखर माहितीकरता म्हणुन विचारत आहे.
गा.पै. महोदय, << कुठल्या
गा.पै. महोदय,
<<
कुठल्या कलमाविरुद्ध हिंदुत्ववादी वागतात ते कळेल काय?
<<
घटनेच्या प्रस्तावने नंतर, पहिल्या १-२ पानांत या देशाचे नाव 'डिफाईन' केलेले आहे. उद्या फोटो टाकतो. मग कलम तुम्हीच समजावून सांगा मला. तिथे 'हिंदूस्थान' हा शब्द नाहिये बरं का.
ता.क.
सापडलं पानः
पहिलंच पान आहे घटनेचं.
महेशजी, कुणी काय धर्म लिहावा,
महेशजी,
कुणी काय धर्म लिहावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असावा. त्याने/तिने तो धर्म आपल्या घरात. (स्व-साम्राज्यात) पाळावा. ते स्वातंत्र्य अन अधिकार या देशात आहेच आहे.
पण
हिंदू धर्म असेल, तरच तो या देशाचा नागरिक राहण्यास लायक.
किंवा आम्ही सांगू तसा पाळला, तरच तुम्ही हिंदू धर्म पाळत आहात, हे सांगण्याचा अधिकार या देशाची घटना देत नाही.
हां, विचार, अन अभिव्यक्ति स्वातंत्र्य नक्कीच आहे. तुम्ही बोलू जरूर शकता, 'डिक्टेट' करू शकत नाही.
लोचा असा आहे, की समाजवाद, धर्मनिरपेक्षता या घटनेत उधृत केलेल्या तत्वांना शिव्यांचे रूप देण्यात हे तथाकथित हिंदूत्ववादी बर्याच अंशी सफल झालेत. अर्थ समजावून न घेता, फक्त शिवी असावी अशी वागणूक. वरतून आव असा, की सगळी कायद्याची अन नीतीमत्तेची चाड अन ठेका यांच्याकडे.
धर्म माझाही हिंदू आहे.
मीही पुरातन वाङ्मय वाचू शकतो. वाचतो, अन यांच्याशी वाद घालू शकतो.
पण
या देशात मी माझा धर्म 'घरी' ठेवतो. अन इतरांनीही ठेवावा अशी इच्छा करतो. मग तो हिंदू असो की मुसलमान. कि अजून कुणी.
>>हिंदू धर्म असेल, तरच तो या
>>हिंदू धर्म असेल, तरच तो या देशाचा नागरिक राहण्यास लायक. किंवा आम्ही सांगू तसा पाळला, तरच तुम्ही हिंदू धर्म पाळत आहात
ह्म्म्म असे नक्कीच कोणी (निदान येथल्या चर्चेत) म्हणाल्याचे मला तरी आठवत नाही.
असो, सर्वांनी मिळून आपली शक्ती वाद घालण्यात खर्च करण्यापेक्षा पुढे काय चांगले करता येईल या वर विचार केला तर ते जास्त देशहिताचे नसेल का ?
भारत अर्थात इंडिया >> इंडिया
भारत अर्थात इंडिया >>
इंडिया काय म्हणून? वर कित्येक लोक म्हणाले की हिंदू हे परकियांनी दिले, मग इंडिया हे स्वकियांनी दिले आहे का?
ग तो हिंदू असो की मुसलमान. कि अजून कुणी. >> योग्यच आहे. मला तुमचे हे वाक्य आवडले. पण ह्याचाच जरा तिकडेही प्रसार करा ना जरा.
********************************************************************************************************************
तुमचे नेमके दुखणे काय आहे ते कळत नाही. गा पै ने एक खूपच चांगली पोस्ट लिहिली ती पटली. शब्दच्छल चालू आहे नुसता. जामोप्या आणि तुम्ही दोघेही डॉक्टर आहात असे वाचले. सुशिक्षीत दिसता, मग हा शब्दच्छल का? इथे कोणीही 'तसे' हिंदू नाहीत जे हिंदूस्थान सॉरी सॉरी भारत, इंडियाला दार उल हिंदू आणि दार उल हरब वाले आहेत. मग हा घोळ का?
हिंदूस्थान टाईम्स का नाव पडले? जामोप्या? काही कारण होते की मालकाला वाटले म्हणून?
आता बास करा हे हिंदू, हिंदूत्वाचे बाफ. कंटाळा आला आहे.
>>> सेक्युलर म्हणजे काय हे
>>> सेक्युलर म्हणजे काय हे घटनेत कुठेही स्पष्ट केलेले नाहीये.
----
सेक्युलर हा शब्दाच्या विविध व्याख्या आहेत.
आंतरराष्ट्रिय व्याख्या --- धर्म नसलेला (निधर्मी)
भारतिय व्याख्या - सर्व धर्मां बद्दल समान आदर किंवा कुठल्याच धर्माचा दुस्वास न करणे.
त्या अर्थाने भारतात कुठलाच पक्ष हा सेक्युलर म्हणता येणार नाही.
या देशात मी माझा धर्म 'घरी'
या देशात मी माझा धर्म 'घरी' ठेवतो. अन इतरांनीही ठेवावा अशी इच्छा करतो. मग तो हिंदू असो की मुसलमान. कि अजून कुणी.
---- मी या विचारांशी १०० % सहमत आहे. हे असेच असायला हवे तरच शांत आणि सौहार्द वातावरण राहिल... पण व्यावहारी जगात तसे होत नाही.
आमच्या अनेक अनेक वर्षे २२ ते ३१ डिसेंबर हा काळ क्रिसमस म्हणुन साजरा करायचे. मी भारतात वाढलेलो व आपण लोकं सर्वांच्या सणात तेव्हढ्याच आनंदाने सहभाग होणारे त्यामुळे मला "हॅपी क्रिसमस" अशा शुभेच्छा द्यायला वा घ्यायला आनंद व्हायचा कसलीही अडचण नव्हती. आम्ही भारतिय लोकं सण साजरा करण्यासाठी निव्वळ निमीत्त शोधत असतो असे मी गमतीने येथील मित्रांना म्हणायचो.
२००७ नंतर डेमोग्राफी बदलत चालली आहे.... आता काही कट्टर धार्मिक लोकांनी "हॅपी क्रिस्मस " मधे क्रिस्मस येतो त्यामुळे आमच्या नाजुक भावना दुखावल्या जातात... मग आता त्या १.५ % लोकांना दु:ख व्हायला नको म्हणुन "हॅपी हॉलिडेज`` असे नामकरण झाले.
क्रिस्मस (किंवा दिवाळी) हे आनंद देवाण घेवाणाचे निमीत्त आहेत... ते तसेच चालावे असे मला वाटते... ह्या गोष्टींची धर्माशी सांगड घालता येत नाही. आपण आपल्या धार्मिक भावनांना जेव्हढे जोपासतो तेव्हढेच दुसर्यांना पण भावना आहेत हे का नाही समजत? तुमच्या कृतीने ९८ % लोकांच्या भावना दुखावतात त्याचे काय?
असे कोणते कायदे आहेत जे फक्त
असे कोणते कायदे आहेत जे फक्त हिंदूंसाठीच बनविले आहेत? असा एकतरी कायदा आहे का?
वर एच यु एफ बद्दल आलेच आहे.
१९५४ मध्ये स्पेशल मॅरेज अॅक्ट ( ज्याला नेहरु समान नगरी कायद्याचे पहिले पाऊल म्हणत) आल्यावर आम्हाला समान नागरी कायदा नको म्हणून हिंदूंनीच मागणी केली आणी १९५५ चा हिंदु विवाह कायदा आला. १९५५ मध्ये हिंदू वारसा कायदा, १९५६ मध्ये हिंदु दत्तक कायदा. १८९० चा पालक कायदा बदलून १९५६ मध्ये हिंदू पालक कायदा आला.
एवढेच काय पण १९७६ मध्ये एक नवाच कायदा लोक्सभेने पास केला. त्या नुसार सिव्हिल मॅरेज केलेल्या हिंदूना १९२५ च्या वारसा कायद्यातून वगळण्यात आले. आणी त्यांना हिंदू वारसा कायदा लागू केला. पण मुस्लीम, पारशी किंवा ख्रिस्चनांनी सिव्हिल मॅरेज केले तर मात्र त्यांना १९२५ चा वारसा कायदा सक्तीचा केला गेला. थोडक्यात सिव्हिल मॅरेज करणार्या हिंदूंना १९२५ चा कायदा सक्तीचा नाही पण इतरांना मात्र सक्तीचा. लांगूलचालन की काय ते हेच?
पण इतरांना मात्र सक्तीचा.
पण इतरांना मात्र सक्तीचा. लांगूलचालन की काय ते हेच? >> तरी म्हणलं कुलकर्णीसाहेब अजून मैदानात का आले नाही? कारण हिंदू चे ढोल ताशे तेंव्हापासून वाजत आहेत.
आणि कुळकर्णी साहेब तपशील चुकला बरंका.
१९५० मध्ये हिंदू, शिख, जैन आणि बौद्ध ह्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी सेक्युलर कायद्याची जरूरी होती. त्यात मग सिव्हिल कोड बिल पास झाले, ते मुसलमानांना मान्य नव्हते कारण शरीया. मग मुसलमान जर एकत्र येऊ शकत नसतील तर घटनेअंतर्गतच धर्माधारित कायद्याचे पालन करायचे ठरले. आर्टिकल १३ आणि ४४ वर नजर घाला, ते परस्पर विरोधी आहेत, म्हणून मग वरील चार धर्मांसाठी हिंदू सिव्हिल कोड पास केले तर मुस्लीमांसाठी शरीयावर आधारीत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड. कृपया ह्यात गल्लत करू नका.
परत एकदा हिंदू म्हणजे हिंदू, जैन, शिख व बौद्ध असे घटना माणते आणि ते कायदे ह्या सर्वांना बंधनकारक आहेत. मुस्लीम कायदे वेगळे. कृपया इथे बुद्धिभेद करू नये. मुस्लीम जनतेला "एका" कायद्याअंतर्गत यायचे नव्हते कारण स्वातंत्रपूर्व काळातच त्यांचे असे म्हणने होते की मुस्लीम कज्जे / खटले हे केवळ मुस्लीम न्यायाधिशांनीच पाहावेत. आता बोला! म्हणून हिंदू सिव्हिल कोड वेगळे अन मुस्लीम वेगळे. हे श्रीमान अब्दुल लतिफ ह्यांनी १९३९ मध्ये लिहून ठेवले आहे. हिंदू सिव्हिल कोड बील १९५० मध्ये पास झाले. म्हणून म्हणलं तपशील चुकले.
लांगुलचालन आहेच. पण ते मुस्लीमांचे हिंदू (इथे परत तुमच्यासाठी हिंदू म्हणजे, हिंदू, बौद्ध, शिख आणि जै) जनतेच नाही! आली का मेख लक्षात?
कुळकर्णी तुम्ही शहाबानो परत नीट वाचा बॉ. मग कळेल की सिव्हिल कोड लावल्यावरही उलथापालथ का झाली.
आत्तापर्यंत ह्या बाफवर अनेक वेळा इब्लिसमहोदयांनी लॉ प्रकरण आणले. आता लक्षात आले असेल की लॉ प्रकरणात पण हे चारही धर्म एकच. आहे की नाही गंमत?
इतरांना प्रचार, गोबेल्स, असे नाव हे वीर देत आहेत, पण घटना ( घटना आणि घटना दोन्ही अर्थ) काही वेगळेच सांगत आहे. कृपया इथे रॅशनल लिहा.
<<<होयच, त्यात काय चुकीचे
<<<होयच, त्यात काय चुकीचे आहे? मुस्लीम आणि ख्रिश्चन आपापले धर्म शिक्षण स्वतंत्र शाळेत देतात, जिथे सर्वासाठी इतर व्यावहारिक शिक्षण खुले आहे, अशा शाळेत देत नाहीत. हिंदुनीही स्वतंत्र धर्म शाळा काढाव्यात की.. हिंदुंच्या धर्म शिक्षण शाळेत फक्त ब्राह्मणानाच पिढीजात शिक्षण दिले जाते/ जात होते. मग सरकार अशा शाळेला कशाला मान्यता आणि अनुदान देईल? हिंदुनी जातीभेद सोडून सर्वाना धर्म शिक्षण खुले केले असते, तर सरकारही अनुदान द्यायला कचरले नसते. हिंदुंच्या ( आणि विशेषतः ब्राह्मणाम्च्या) अधोगतीला फक्त तेच जबाबदार आहेत. >>
आहो पण अशा शाळा काढून शिक्षण द्यायला हिंदूंना परवानगी नाहीये, पण अल्पसंख्यांकांना आहे. परवानगी दिली तर हिंदूपण अशा शाळा काढतील.
<<हिंदुंचे काही कायदे इतर धर्मियाना लागू आहेत याचा अर्थ ते धर्म हिंदु धर्माचे घटक आहेत आणि त्याना हिंदुत्वात समाविष्ट करा अशी त्यांची किंवा सरकारची मान्यता आहे, असा होत नाही..>>
मग काय अर्थ होतो ते तरी सांगा
Pages