स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.
..............................................................................................................................................
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्यांना समावेशिणार्या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!
हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.
स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल
हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !
हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.
"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..
इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"
आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.
स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.
"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.
आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.
आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?
ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.
हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे
आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....
"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही
'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -
हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत
हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......
कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्या समाजाशी असणार्या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.
हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.
संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे
त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत
वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.
आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....
"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.
राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...
माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे
वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.
मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !
या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.
माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!
त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!
जय हिंद !
विशाल कुलकर्णी
संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org
स्वातंत्र्यवीर एका आंतरिक
स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही
गीता आस्तिक, बुद्ध नास्तिक... यांची मेळ सावरकरानी कसा घातला ते त्यानाच माहीत. !
हिंदुस्थान' हा तर प्राचीन उल्लेख आहे, त्याला पुरावे आहेत. हिंदूची तशी श्रद्धा आहे व ह्यामुळे कोणाला काही अपाय तर पोचत नाही ना?
कुणी सांगितलं? कुठल्या प्राचीन ग्रंथात हिंदु हिंदुस्थान ही नावे आढळतात?
'अहिंसा परम धर्म:' ही ज्या
'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे
अक्षय जोग साहेब >>>
अक्षय जोग साहेब
>>> <<हिंदुस्थान असे लिहून / बोलूनही 'भारतीय' लोक तुम्हाला कधी काही करत नाहीत, हा 'भारताचा' मोठेपणा नव्हे काय? उगा पाकिस्तानात जाऊन रहा, अरबस्तानात जाउन रहा कशाला बोलावे?>>
आहो हिंदुस्थान लिहिण्या/बोलण्यात वावग/घटनाविरोधी काही नाही व हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून.
आहो इथे शाहबानो सारख्या प्रकरणात घटना बदलणारे लोक आहेत पाकिस्तानात हिंदूसाठी घटना बदलली असती??
<<<
तुमचं कुठे जळतं / दुखतं आहे ते समजलं. मुद्दा कुणी काय केले असते याचा नाहीये. तो प्रश्न मी तुम्हा सर्व 'हिंदुत्व' वाद्यांना पुन्हा विचारतो : देशाचे नांव चुकीचे कसे लिहू शकता? तुमचे नागरिकत्व कोणत्या देशाचे आहे? भारत कि हिंदूस्थान? या प्रश्नाचे उत्तर द्याच. चुकिचे दिले तर परिणाम काय होतात त्याचाही विचार करा.
जेंव्हा 'हिंदुत्वाविरुद्ध बोललेले खपवून घेतो हा हिंदूंचा मोठेपणा, मुसलमान तसे नाहीत, ते ठेचून मारतील' हे अन असल्या प्रकारचे वाक्य तुम्ही लोक लिहिता, त्याचा अर्थ काय होतो?
त्याच प्रकारे मी समजवून सांगितले, की साहेब, भारताविरुद्ध बोललेले भारतिय खपवून घेतात तो त्यांचा मोठे पणा. पण अद्याप उजेड पडलेला दिसत नाही.
मूळ मुद्दा हा आहे, की तुम्हा "हिंदुत्ववाद्यां"स हा देश 'स्वतंत्र भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक' आहे, हेच मान्य नाहिये.
इथे 'धर्माधिष्ठीत' राज आणायचे व ते तालिबान किंवा खोमेनीने आणले त्या पद्धतीचे आणायचे हीच तुमची आंतरिक ऊर्मी. यालाच लोक 'हिडन अजेंडा' म्हणतात.
कोणत्याही महत्वाच्या फॉर्म वर, उदा. तुमचे पारपत्र. किंवा तत्सम. देशाचे नांव 'हिंदूस्थान' लिहीले आहेत का तुम्ही?
अन बादवे,
समजा, शाहबानो प्रकरणी काँग्रेसने खाल्ले शेण. तर वाजपेयीजींनी भाजपाच्या कारकिर्दीत का त्या तमाम घटनादुरुस्त्या केल्या नाहीत हो? ज्या नेहेमी डांगोरा पिटून सांगितल्या जातात - विशेषतः काश्मिर बाबत? हात बांधून ठेवले होते का?
या सगळ्यांची टाईम काँटेक्स्ट
या सगळ्यांची टाईम काँटेक्स्ट हे तरूण विसरताहेत. ठीक आहे.
स्वातंत्र्यवीर बोलले, वागले तेंव्हा ही मातृभूमी 'आंग्लभूमीभयभीता' होती. ब्रिटिशांनी पेरलेले विष उगवत होते, मुस्लिम लीग च्या रूपाने. त्या वेळी त्यांनी सांगितले, 'हिंदू'नो जागे व्हा. आज नक्कीच ते बोलले असते, 'भारतियांनो' जागे व्हा.
>>
एकदम बरोबर इब्लिस.
थॉमस जेफरसनने (फाउंडिंग फादर ऑफ अमेरिका) अफ्रिकन वंशाच्या लोकांच्या समानतेसाठी खुप काम केले पण त्याच्या मॉन्टे सेलो येथिल मॅन्शन मध्ये अनेक गुलाम होतेच.
त्या काळातले पुढारलेले विचार आजच्या काळाच्या चष्म्यातुन पाहुन 'त्यात काय?' असे म्हणणे योग्य नाही
त्याचबरोबर ते तसेच्या तसे आजच्या काळात वापरणेही उचित नाही.
त्यांनी काही धर्मांना वगळले
त्यांनी काही धर्मांना वगळले आहेच पण का वगळले तेही सांगितले आहे, पुण्यभू व पित्रुभू ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात
यालाच म्हणतात शेजारचा मुसलमान हा युक्तिवाद. या देशात जन्मलेले सर्व, या भारत देशाला पितृभूमी म्हणतात. अन हीच त्यांची (पुण्य)कर्म करायची भूमी असते.( हां, मुस्लिमांनी केलेले 'पाक' काम पुण्य नाही, अन ख्रिश्चनांचे पण पुण्य होऊच शकत नाही हे तुमचे कंपॅरिटिव्ह अॅनालिसिस असेल बहुधा.) तुम्ही कोण त्यांना वगळणारे??
साहेब, बौद्धिकांपलिकडे पण जग आहे. तिथे इतरही दृष्टीकोण आहेत. डोळे उघडून वाचून / विचार करून पहा की काय सांगतो आहे समोरचा.
आभार निलिमाजी. तेच मी
आभार निलिमाजी.
तेच मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. हे असे संकलित लेख वाचून नवख्याचे विचार अत्यंत प्रतिगामी, धर्मांध अन फॅसिस्ट बनायला मदत होऊ शकते. वरून जोग साहेबांसारख्या व्यक्ती या विचारास खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात..
म्हणूनच हा लेख परत पाठवल्या बद्दल माबो दिवाळी अंक संपादकांचे अभिनंदन केले मी.
हिंदूत्वाला तुमचा एवढा विरोध
हिंदूत्वाला तुमचा एवढा विरोध का ? खरेतर जेव्हा फाळणी झाली तेव्हा सर्वच्या सर्व मुस्लिम पाकिस्तान/बांग्लादेशमधे जायला हवे होते आणि सर्व हिंदू हिंदूस्थानात यायला हवे होते, मुळात फाळणी या तत्वावरच झाली होती ना ? जरा हिंदूंच्या बाजुने पण विचार करा. आधीच अनेक आघातांनी आपली हाडे खिळखिळी झाली आहेत त्यात आपल्याच लोकांची ही असली मते असतील तर संपलेच.
मी मागे एका धाग्यावर लिहिले होते की जगात प्रत्येक राष्ट्र हे एका विशिष्ट धर्माचे म्हणुन ओळखले जाते, मग भारतात जर हिंदू बहुसंख्येने असतील तर हे हिंदूराष्ट्र असावयास काहीच हरकत नाही. राजकारण्यांचे एकवेळ ठिक आहे मतपेटीच्या राजकारणासाठी सेक्युलर भाषणे ठोकणे, पण तुमचे काय ?
हिंदू धर्माला महत्व आणि मान्यता देणे म्हणजे बाकी धर्मांवर अन्याय असे अजिबात नाही, हे कोणीच का लक्षात घेत नाही ?
खरेतर जेव्हा फाळणी झाली
खरेतर जेव्हा फाळणी झाली तेव्हा सर्वच्या सर्व मुस्लिम पाकिस्तान/बांग्लादेशमधे जायला हवे होते आणि सर्व हिंदू हिंदूस्थानात यायला हवे होते, मुळात फाळणी या तत्वावरच झाली होती ना ?
पाकिस्तान प्रांतात रहाणार्या मुसलमान लोकानी स्वतंत्र देशाची मागणी केली.. याचा अर्थ उरलेल्या भारतातील मुसलमानानीही जायचे हे तुम्ही कोण सांगणारे? बरं, मुसलमानाना पाकिस्तानात घालवले... मग हिंदुस्तानात फक्त हिंदुच ठेवायला ख्रिश्चनाना तुमचे सावरकर आणि गोडसेबुवा कुठे जागा देणार होते?? अंदमानात का? एखाद्या प्रांतातईल बहुसंख्य लोकानी स्वतंत्र राज्य/ राष्ट्र यांची मागणी करणं यातही काही चूक नाही आणि त्यांची इच्छा पुरवली जाणं यातही काही चूक नाही. ते लोकशाहीला धरुनच आहे/होते. उरलेल्या प्रांतातील लोकानी कुठे जायचे, कुठे रहायचे हे सावरकरानी किंवा गोडसेबुवानी ठरवायचे नसते, ते त्या त्या लोकानी ठरवायचे असते.
मुळात सावरकरानी ज्या वेळी ही व्याख्या केली त्यावेळी पाकिस्तान आस्तित्वातच नव्हता... मग असे असताना मुसलमान आणि ख्रिस्चन याना वगळून हिंदुत्वाची व्याख्या सावरकरानी का केली? सार्या भारतात रहाणारा तो हिंदु या वाक्याचा गर्भित अर्थ भारतात हिंदुनीच रहावं हाच होता,
आधीच अनेक आघातांनी आपली हाडे खिळखिळी झाली आहेत
ही तुमची खरी पोटदुखी आहे! मुसलमान आणि ख्रिश्चन यांची वाढती संख्या आणि प्राबल्य हा तुमच्यासारख्यांचा खरा पोटदुखीचा प्रश्न आहे.. मुघलांच्या इंग्रजांच्या काळात सक्तीने धर्मपरिवर्तन झालेही असेल, पण आज जे धर्मपरिवर्तन होत आहे, ते हिंदु धर्मातील कंटाळलेल्या व सुखी नसलेल्या जनतेकडून स्वेच्छेने होत आहे.. ही पाळी समाजावर का आली याबाबत सावरकरानी काय किंवा इतर कुणीच काहीही विचार केलेला नाही.... धर्म वाढवण्याचा अधिकार सर्वानाच आहे की! मुसलमान आणि ख्रिस्चन आपले हिंदु बांधव पळवतात म्हणून बोंब मारण्यापेक्षा तुम्ही काही मुसलमान, ख्रिस्चनाना हिंदुधर्मात आणून दाखवा की. तुम्हाला कोण अडवले आहे? आपल्यातील काही लोकांचे धर्मांतर होईल आणि धर्म खिळखिळा होईल ही भीती फक्त हिंदुनाच का बरे वाटते? जैन, पारसी, बौद्ध हेही अल्पसंख्यच आहेत, पण त्यांच्यामधील लोकांचे का बरे धर्मांतर होत नाही? म्हणजे हिंदु धर्म व्यवस्थेतच काहीतरी दोष आहे, उगाच मुसलमानाना ख्रिश्चनाना का नावे ठेवायची?
हिंदू धर्माला महत्व आणि
हिंदू धर्माला महत्व आणि मान्यता देणे म्हणजे बाकी धर्मांवर अन्याय असे अजिबात नाही, हे कोणीच का लक्षात घेत नाही ?
सर्व धर्मातल्या लोकाना भारतीय म्हणून मान्यता देणे म्हणजे हिंदु धर्मावर अन्याय असे अजिबात नाही, हे तुमच्यासारखे हिंदुत्ववादी कधी लक्षात घेणार?
सेक्युलरवाले मतासाठी सेक्युलर मत मांडतात आणि हिंदुत्ववालेही मतासाठीच हिंदुत्वाचे नारे देतात ! दोघेही सारखेच आहेत..
वरचा मेसेज लिहिताना तुम्ही
वरचा मेसेज लिहिताना तुम्ही लिहिलात तो धर्मांतराचा मुद्दा माझ्या मनात पण नव्हता. खरेतर मतपेटीचे राजकारण आणि त्यासाठी अल्पसंख्यांकांचे अतिरिक्त लाड हा खरा कळीचा मुद्दा आहे.
मागे मी एका धाग्यावर लिहिले होते, बौद्ध, जैन आणि शिख हे वेगळे धर्म नसुन हिंदू धर्माचाच भाग आहेत.
जामोप्या, १. >> पाकिस्तान
जामोप्या,
१. >> पाकिस्तान प्रांतात रहाणार्या मुसलमान लोकानी स्वतंत्र देशाची मागणी केली..
त्यावेळच्या मुस्लिमबहुल प्रांतातल्या लोकांनी पाकिस्तानची मागणी केली नव्हती. त्याचं असंय की पाकिस्तानात प्रांत होते पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सीमा प्रांत आणि पूर्व बंगाल.
पंजाबप्रांती खिज्जर हयत तिवानाची युनियनिस्ट पार्टी सत्तेत होती. नावंच मुळी तिचं युनियनिस्ट! कारण उघड आहे. पंजाब प्रांतिक सरकारला फाळणी नामंजूर होती. १९४६ च्या जिनाच्या डायरेक्ट अॅक्शनमुळे ते सरकार कोसळलं.
सिंधमध्ये अश्याच दंगली घडवून आणू म्हणून धमकी देऊन सिंध असेंब्लीकडून पाकिस्तानात सामील व्हायचा ठराव पारित करून घेण्यात आला. त्याकरिता सत्तारूढ पार्टीच्या जी. एम. सईदला पुढाकार घ्यावा लागला होता. मात्र पाकमध्ये सामील झाल्याझाल्या त्याने जिये सिंध नावाची स्वतंत्र सिंधसाठी चळवळ सुरू केली. जणू सिंध्यांची खोड मोडायला की काय म्हणून बिहारी मुस्लिमांना (जे मोहाजिर म्हणजे स्वत:चा देश सोडून इस्लामी देशात स्थलांतर करणारे होते) सिंधमध्ये वसाहती करायला भाग पाडले. पंजाबात एकही मोहाजिर वस्ती नाही, वा असल्यास अत्यंत तुरळक आहे.
तीच परिस्थिती बंगालमध्ये होती. सुर्हावर्दीचं सरकार होतं तिथे. असं म्हणतात की त्याच्यात आणि जिनातून विस्तव जात नसे. तोही स्वतंत्र बंगालच्या मागणीवर ठाम होता. त्याला अर्धा कापलेला पाकिस्तानी पूर्व बंगाल साफ नामंजूर होता. पण बंगाल्यांची लोकसंख्या उर्वरित पाकी लोकसंख्येपेक्षा जास्त होती. म्हणून त्याच्यासमोर खुशीची गाजरं धरण्यात आली. त्यातलं सर्वात लुसलुशीत गाजर म्हणजे पाकिस्तानात लोकशाही असेल आणि लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधी निवडले जातील. म्हणून सुर्हावर्दी जिनाबरोबर राहिला. जिनाचं लोकशाहीप्रेम काय आहे ते चांगलं कळतं यातून, नाही?
बलुचिस्तानात अनेक टोळ्या होत्या. त्यांच्या जातीसभा चालत. त्यांना गांधींबद्दल आदर व सहानुभूती होती. त्यांना पंजाबी मुस्लिमांसोबत अजिब्बात रहायचं नव्हतं. साहजिकच त्यांना भारताची फाळणी धडधडीतपणे नामंजूर होती.
तशीच स्थिती आणि भूमिका वायव्य सीमाप्रांतीय पठाणांची होती. त्यांचे नेते खान अब्दुल गफारखान यांनी उघडपणे म्हंटलं की काँग्रेसने आम्हाला (पंजाबी मुस्लिमरूपी) लांडग्यांच्या तोंडी दिलं (ctrl-F करून wolves वर सर्च मारा). त्यांनाही पाकमध्ये जाण्यात फुटक्या कवडीइतकाही रस नव्हता. पुढे गफारखानांना पंजाबी मुस्लिमांनी कैदेत टाकलं.
असो.
जामोप्या, तुमची गृहितकं वस्तुस्थितीशी जुळत नाहीत.
२. >> मुसलमान आणि ख्रिस्चन याना वगळून हिंदुत्वाची व्याख्या सावरकरानी का केली?
याला कारण की मुस्लिमांनी कापाकापी करून आणि ख्रिस्ती मिशनर्यांनी ढोंगबाजी करून हिंदू समाजावर घाव घातलेत. मुस्लिम मक्केकडे तोंड करून उभे आहेत आणि ख्रिस्ती रोमकडे. विवेकानंदांचेही हेच मत आहे. ते तर उघडपणे म्हणंत की एक हिंदू बाटला की भारताचा एक मित्र तर कमी होतोच वर एक शत्रूही वाढतो.
एव्हढी सरळ सोपी गोष्ट चटकन लक्षात यायला हवी!
३. >> मुसलमान आणि ख्रिश्चन यांची वाढती संख्या आणि प्राबल्य हा तुमच्यासारख्यांचा खरा पोटदुखीचा प्रश्न
>> आहे..
प्रश्नंच नाही! जिथे हिंदू कमी झाले ते भाग भारतातून तुटले आहेत किंवा तुटायच्या मार्गावर आहेत. साधी गोष्ट आहे. खोटं वाटंत असेल तर काश्मिरी हिंदूंची बघा काय हालत झालीये ते.
४. >> धर्मपरिवर्तन होत आहे, ते हिंदु धर्मातील कंटाळलेल्या व सुखी नसलेल्या जनतेकडून स्वेच्छेने होत आहे..
जर हिंदू धर्म एव्हढा दु:खदायक आहे तर ज्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे त्यांचं काय झालंय? माहितीये? दलित ख्रिश्चन म्हणजे काय आणि त्यांचं प्रयोजन काय आहे? जर ख्रिस्ती धर्म एव्हढा सोयीसुविधांनी युक्त आहे तर दलित ख्रिश्चन हा प्रकारच अस्तित्वात यायला नको होता.
तीच गोष्ट मुस्लिमांच्या बाबतीतही दिसते! जर मुस्लिम धर्म एव्हढा चांगला आहे तर भारतातले मुस्लिम इतर हिंदूंच्या मानाने एव्हढे मागे का? आणि गुन्हेगारीत एव्हढे पुढे का? आणि पाकिस्तानातले मुस्लिम जर इतके पाक असतील तर पाकिस्तान म्हणजे स्वप्नातला जन्नत व्हायला हवा होता. प्रत्यक्षात काय आहे ते आपण पहाताच आहात. कश्यावरून भारतीय मुस्लिमांचंही पाकी मुस्लिमांप्रमाणे पतन होणार नाही?
असो.
तुमचं हेही गृहीतक साफ चुकलंय.
५. >> मुसलमान आणि ख्रिस्चन आपले हिंदु बांधव पळवतात म्हणून बोंब मारण्यापेक्षा तुम्ही काही मुसलमान,
>> ख्रिस्चनाना हिंदुधर्मात आणून दाखवा की. तुम्हाला कोण अडवले आहे? आपल्यातील काही लोकांचे धर्मांतर
>> होईल आणि धर्म खिळखिळा होईल ही भीती फक्त हिंदुनाच का बरे वाटते? फिदीफिदी जैन, पारसी, बौद्ध हेही
>> अल्पसंख्यच आहेत, पण त्यांच्यामधील लोकांचे का बरे धर्मांतर होत नाही? म्हणजे हिंदु धर्म व्यवस्थेतच
>> काहीतरी दोष आहे, उगाच मुसलमानाना ख्रिश्चनाना का नावे ठेवायची?
हे मात्र अगदी बरोबर बोललात. हिंदूंना धर्माभिमान नाही म्हणून त्यांचं धर्मांतर होतं. धर्माभिमानासाठी धर्मशिक्षण मिळणं अत्यावश्यक आहे. जे मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या मुलांना अल्पसंख्य म्हणून शाळांतून मिळतं. तसं हिंदूंना मिळत नाही, कारण हे सरकार निधर्मी आहे ना!
हिंदूंचं खरं दुखणं ओळखल्याबद्दल अभिनंदन!
आपल्यासारखे बुद्धिमान लोक जेव्हा हिंदूंची (विशेषत: हिंदू धर्माची) टिंगल करतात, तेव्हा भारताच्या शत्रूंना आपल्याकडून अजाणतेपणी मदत होत असते.
आपला नम्र,
-गामा पैलवान
इब्लिस, >> इथे 'धर्माधिष्ठीत'
इब्लिस,
>> इथे 'धर्माधिष्ठीत' राज आणायचे व ते तालिबान किंवा खोमेनीने आणले त्या पद्धतीचे आणायचे हीच तुमची आंतरिक ऊर्मी. यालाच लोक 'हिडन अजेंडा' म्हणतात.
तुम्ही साप सोडून भुई धोपटत आहात. तालिबान आणि खोमेनीला हिंसाचार करायचा आहे. हिंदूंना मारामारी करायची गरज वाटत नाही. हिंदू धर्म म्हणजे काय हे तुम्हाला जाणून घ्यायची जराही इच्छा नाहीये. आणि गप्पा मात्र आंतरिक ऊर्मीच्या मारताय! काय म्हणावं याला!
२. >> मूळ मुद्दा हा आहे, की तुम्हा "हिंदुत्ववाद्यां"स हा देश 'स्वतंत्र भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष
>> प्रजासत्ताक' आहे, हेच मान्य नाहिये.
हा आरोप कश्याच्या आधारावर करताय तुम्ही? कोणीही हिंदुत्ववादी घटनाबाह्य प्रकारे सत्तांतर आणू इच्छित नाहीये! सनदशीर मार्गाने काम चालवण्यात रस आहे त्यांना.
रच्याकने, सेक्युलर म्हणजे काय हे घटनेत कुठेही स्पष्ट केलेले नाहीये. तुम्ही जे चित्रं दिलंय ते घटनेच्या प्रास्ताविकाचं आहे. आणि प्रास्ताविक घटनेचा भाग नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे. (मात्र घटनेच्या तरतुदींचा अर्थ लावण्यासाठी प्रास्ताविकाची मदत घेता येऊ शकते.)
असो.
टोक चुकलं माझं तर मग तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते स्पष्ट करून सांगाल का?
आ.न.,
-गा.पै.
<<भारतातले लोकही सिलोनला
<<भारतातले लोकही सिलोनला रावणाची लंका म्हणतात.. म्हणून त्यानीही त्यांच्या देशाचे तेच नाव ठेवायचे का?>>
मी तरी कोणी राजकारणी, खेळाडू वगैरे रावणाची लंका म्हणताना एकले नाही, आपण जेव्हा रावणाची लंका म्हणतो तो उल्लेख रामायणाशी संबंधी बोलतान येतो व जसे विवेकानंदांचा भारत, लिंकनांची अमेरिका तसे रावणाची लंका असा उल्लेख असतो व शेवटी त्यात लंका उल्लेख येतोच व तेथे रावणाचा आदर केला जातो व त्याची मंदिरही तेथे आहेत.
माझा सांगण्याचा उद्देश होता की बाहेरील काहीजण आपला हिंदुस्थान असा उल्लेख करतात. जसे आपण अजूनही म्यानमारला ब्रम्हदेश म्हणतो तसे.
<<ते 'हिंदू' कोड बिल केवळ हिंदू, शीख, जैन, बौद्ध, लिंगायात, आर्य समाजी ह्यांनाच केवळ लागू आहे,
त्याचे एकत्रित नाव हिंदु बिल असले तरी त्यात विविध पोटकलमे आहेत, ती ज्या त्या धर्माला स्वतंत्रपणे लागू आहेत>>
अगदी बरोबर पण ती पोटकलमे कुठल्या मुख्य कलमाअंतर्गत येतात?? हिंदूच ना. म्हणजे त्यांची नाळ हिंदूशी निगडीत आहेच ना?? तेच तर सावरकर व आंबेडकर सांगत आहेत.
<<लई आशावादे आहात राव तुम्ही
<<लई आशावादे आहात राव तुम्ही ! तुम्हाला शुभेच्छा.. ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी पासपोर्टवर नागरिकत्व म्हणूण हिंदुत्व असे आम्ही आनंदाने लिहून घेऊ..
पण तोपर्यंत तरी आम्ही भारतीयच रहाणार. जगात इंडियन म्हणून ओळखले जाणार.>>
तुम्हाला कळेलेच नाही, आहो भारतीय म्हणण्याला सावरकरांचा, माझा व हिंदुत्ववाद्यांचा विरोध नाहीये, पण हिंदूस्थान म्हणण्यालाही असू नये असे आमचे म्हणणे आहे, म्हणून तर सावरकरांच्या लिखाणात भारत हा उल्लेख येतोच.
<<काही समजले नाही.. म्हणजे
<<काही समजले नाही.. म्हणजे वगळलेल्या धर्मातील लोकांचे पितर या देशाचे नव्हते का? वगळलेल्या धर्मातील लोक कुणी आयात केले नव्हते.. ते एकेकाळचे हिंदुच.. एखाद्दुसरे मुघल परकीय असतील , किंवा काही ख्रिश्चन मूळचे ब्रिटिश असतील.. पण त्या धर्मातील इतर लोक मूळचे इथलेच आणि धर्मांतरीत आहेत...>>
आहो ज्याचे पूर्वज हिंदूच होते अशा जीनानेच फाळणी मागितली ना? ज्याच्या आईकडील पूर्वज हिंदू होते त्या औरंगजेबानेच महाभयंकर अत्याचार केले ना?
<<मुघलाच्या काळात एखाद्याचा धर्म जबरदस्तीने किंवा आपखुशीने बदलला गेला असेल , तर आज त्याच्या खापर पणतूला तु मुस्लीम आहेस, हिंदु नाहीस म्हणजे ही तुझी पिट्रुभूमी नाही, असे साम्गणे, हा मूर्खपणा नाही का? आज १० मुस्लीम किंवा १० ख्रिस्चन घेतले तर त्यातल्यांचे किती जणांचे पूर्वज खरोखरच बाहेरुन आले आणि किती लोक मूळचे इथलेच पण धर्मांतरीत आहेत, हे खुद्द सावरकर तरी साम्गू शकतील का? मग असं असताना त्याना समाजप्रवाहापासून वगळणं हा अधिकार सावरकराना किंवा गोडसेबुवाना कुणी दिला?>>
म्हणून तर सावरकरांनी शुद्धीची दार उघडी केली होती, जे अहिंदू ह्या देशाला आपली पित्रुभूमी म्हणताता त्यांचा आदर सावरकरही करायचेच उदा. मादाम काम, अॅनी बेझंट, अशफउल्लाखान इ.
आजही आम्हाला अब्दुल कलाम, मुज्झफर हुसेन सारख्यांचा अभिमान आहेच.
इस्लाम, ज्यू, ख्रिश्चन ह्या धर्मस्थापनेच्या वेळी हिंदू व इतर धर्म अस्तित्वात होते पण त्यात त्यांचा उल्लेख नाही म्हणून त्यांना घारेवर धरणार का??
सावरकरांनी हिंदू कोण ह्याची व्याख्या केली होती, समाजप्रवाहाची नाही. त्यामुळे समाजप्रवाहापासून वगळले हा आरोप फोल ठरतो, उलट त्यांनी त्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न केले होते व केमाल पाशाचे उदाहरणही दिले होते.
<<आणि समजा, एखाद्याचे पूर्वज या देशातील नाहीत , तरी आज ती व्यक्ती कायद्यानुसार भारतीय आहे म्हटल्यावर तिला इथल्या देशाचा नागरिक म्हणवून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे.>>
आहेच की त्याला सावरकरांनी आक्षेप घेतलाच नाहीये, अॅनी बेझंट व भगिनी निवेदितांचे पूर्वज कुठे भारतीय होते??? तरी त्यांना देशभक्त म्हटलच
<<गीता आस्तिक, बुद्ध
<<गीता आस्तिक, बुद्ध नास्तिक... यांची मेळ सावरकरानी कसा घातला ते त्यानाच माहीत. !>>>
सावरकरांनी त्याचा मेळ घातला नाही जे वास्तव होते तेच शब्दात मांडल इतकच. त्यांचे खालील वाक्य वाचा---
"इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल."
<<कुणी सांगितलं? कुठल्या प्राचीन ग्रंथात हिंदु हिंदुस्थान ही नावे आढळतात?>>
बरेच आहेत हवतर विष्णुपुराण वाचा व संदर्भासाठी 'हिंदुत्व' प्रबंध वाचा. मराठेकालीन पत्र वाचा त्यातही हा उल्लेख मिळेल.
<<तुमचं कुठे जळतं / दुखतं आहे
<<तुमचं कुठे जळतं / दुखतं आहे ते समजलं. मुद्दा कुणी काय केले असते याचा नाहीये. तो प्रश्न मी तुम्हा सर्व 'हिंदुत्व' वाद्यांना पुन्हा विचारतो : देशाचे नांव चुकीचे कसे लिहू शकता? तुमचे नागरिकत्व कोणत्या देशाचे आहे? भारत कि हिंदूस्थान? या प्रश्नाचे उत्तर द्याच. चुकिचे दिले तर परिणाम काय होतात त्याचाही विचार करा.>>
आम्ही कुठे,कधी, केव्हा भारत शब्दाला आक्षेप घेतला?? आमच म्हणण इतकच आहे की हिंदुस्थान हे प्राचीन नाव जसे की जंबुद्वीप, आर्यावर्त तसेच भारत सुद्धा प्राचीन नाव आहे, सगळ्यांना समान न्याय, आदर हवा....उलट तुमचाच हिंदुस्थान शब्दाला आक्षेप आहे.
जसे घटनेत लिहिले आहे की INDIA that is BHARAT त्यानुसार आम्ही भारतीय आहोत, आमचे राष्ट्रीयत्व, नागरिकत्व भारतीयच आहे, पण म्हणून हिंदूस्थान हे घटनाविरोधी होत नाही, ती एक श्रद्धा आहे, त्याला इतिहास आहे, प्राचीनता आहे. बहुमताने सत्य-वास्तव बदलता येत नाही.
<<जेंव्हा 'हिंदुत्वाविरुद्ध बोललेले खपवून घेतो हा हिंदूंचा मोठेपणा, मुसलमान तसे नाहीत, ते ठेचून मारतील' हे अन असल्या प्रकारचे वाक्य तुम्ही लोक लिहिता, त्याचा अर्थ काय होतो?>>
हे वाक्य मी बोललो नाही त्यामुळे ह्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही व त्याचे दायित्वही माझ्याकडे येते नाही.
<<त्याच प्रकारे मी समजवून सांगितले, की साहेब, भारताविरुद्ध बोललेले भारतिय खपवून घेतात तो त्यांचा मोठे पणा. पण अद्याप उजेड पडलेला दिसत नाही. >>
पण हिंदुस्थान म्हटल म्हणजे 'भारत' शब्दाला विरोध असे कोणी सांगितले??
आता जितेंद्र ला सगळे जितेंद्रच म्हणतात पण त्याचे अधिक्रुत नाव आहे रवी कपूर, आता ह्याचा अर्थ 'जितेंद्र' म्हणणे म्हणजे रवी नावाला विरोध असा अर्थ होतो का??
अजूनही काही लोक मुंबईचा उल्लेख bombay करतात त्यांना तुम्ही घटनाविरोधी का नाही म्हणत?
Hindusthan lever, Hindustan Times, Hindusthan Petroleum ह्यांना पण तुम्ही घटनाविरोधी ठरवणार का?
मूळ मुद्दा हा आहे, की तुम्हा "हिंदुत्ववाद्यां"स हा देश 'स्वतंत्र भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक' आहे, हेच मान्य नाहिये.>>
आहो येथे हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून धर्मनिरपेक्ष देश आहे, आमचा कोणाचाही धर्मनिरपेक्षतेला विरोध नाही उलट पाठींबा आहे
धर्माभिमानासाठी धर्मशिक्षण
धर्माभिमानासाठी धर्मशिक्षण मिळणं अत्यावश्यक आहे. जे मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या मुलांना अल्पसंख्य म्हणून शाळांतून मिळतं. तसं हिंदूंना मिळत नाही, कारण हे सरकार निधर्मी आहे ना!
न मिळायला काय झाले? हिंदुसाठी वेद आणिरामरक्षा शिकवणार्या शाळा/ गुरुजी आहेत की.. पण तिथे सगळ्या हिंदुना प्रवेश नसतो. फक्त ब्राह्मणाना असतो.. मग बाकीच्या शूद्र लोकाना कधी धर्म शिक्षण मिळूच शकले नाही, तर ते संधी मिळताच बाहेर गेले, हा त्यांचा दोस्श आहे का? मुळात मुसलमान आणि ख्रिस्चन भारतात येऊन १००० तर वर्षे झाली आहेत.. मग त्यापूर्वीच्या काळात सर्वाना धर्म शिक्षण देऊन समान संधी द्यायला हिंदुत्ववाल्याना कुणी अडवलं होतं का?
बरेच आहेत हवतर विष्णुपुराण
बरेच आहेत हवतर विष्णुपुराण वाचा व संदर्भासाठी 'हिंदुत्व' प्रबंध वाचा. मराठेकालीन पत्र वाचा त्यातही हा उल्लेख मिळेल.
.. हिंदु हा शब्द परकीयानी प्रथम वापरला... विष्णुपुराणातल्या श्लोकाचा प्रत्यक्ष संदर्भ दिला तर जास्त बरे होईल..
मराठीकलीन पत्र हे प्राचीन साहित्यात मोडतं हे मात्र माहीत नव्हते ! माहितीत भर टाकल्याबद्दल आभार.
म्हणून तर सावरकरांनी शुद्धीची
म्हणून तर सावरकरांनी शुद्धीची दार उघडी केली होती
कसली शुद्धीची दारं उघडली? किती लोकाना पुन्हा हिंदु धर्मात घेतले सांगू शकाल काय?
हे घ्या--- Himalayam
हे घ्या---
Himalayam Samaarafya Yaavat Hindu Sarovaram
Tham Devanirmmitham desham Hindustanam Prachakshathe
Himalyam muthal Indian maha samudhram vareyulla
devanirmmithamaya deshaththe Hindustanam ennu parayunnu
Swami and Sanskrit scholar Mangal Nathji, who found an ancient Purana known as Brihannaradi in the Sham village, Hoshiarpur, Punjab. It contained this verse:
himalayam samarabhya yavat bindusarovaram
hindusthanamiti qyatam hi antaraksharayogatah
मी सविस्तर लिहिले नाही म्हणून तुमचा गैरसमज होणे सहाजिक आहे, मला म्हणायचे होते की विष्णुपुराणासारख्या प्राचीन व मराठेकालीन म्हणजे अर्वाचीन ह्यामध्ये तसे उल्लेख आहेत.
<<हिंदु हा शब्द परकीयानी
<<हिंदु हा शब्द परकीयानी प्रथम वापरला>>
पुरावा द्या.
<<कसली शुद्धीची दारं उघडली? किती लोकाना पुन्हा हिंदु धर्मात घेतले सांगू शकाल काय?>>
व्यक्तिशः सावरकरांनी अनुमानानुसार ५० च्या वर शुद्धी केल्या आहेत व त्यांच्या शिकवणीनुसार, उपदेशानुसार, अनुयायांनी लाखाच्यावर अनुमानानुसार कमीत कमी १० लाख शुद्धी केल्या आहेत.
संदर्भासाठी बाळाराव सावरकर लिखित सावरकर खंड १ ते ४ वाचा.
जागा मोहन प्यारे !
जागा मोहन प्यारे !
Himalyam muthal Indian maha
Himalyam muthal Indian maha samudhram vareyulla
devanirmmithamaya deshaththe Hindustanam ennu parayunnu
हे काय संस्कृत आहे का?
बृहन्नारदी पुराण हे आज प्रथमच ऐकले.. १८ पुराणात हिंदुस्तानचा कुठे उल्लेख नाही.. या एकाच कुठेतरी कोपर्यात सापडलेल्या पुराणात मात्र हिंदुस्तान , इंडियन हे शब्द मिळाले ! आश्चर्यच नै!
तुमचा तो श्लोक गुगलला तर हे
तुमचा तो श्लोक गुगलला तर हे मिळाले...
http://www.hindunet.org/srh_home/1996_11/msg00043.html
Considering every Purana contains a Bhuvanakosha or geographical section
it's rather curious that this fanciful etymology isn't mentioned elsewhere.
This verse is likely a modern forgery.
आपला धर्म हा दोन पुठ्ठ्यात बांधलेला नाही ना ! त्याची ही फळं ! स्वतःच्या मर्जीप्रमाणे कुणीही काहीही कुठेही धर्मग्र्म्ठात घुसडत बसतो!
तुमचा तोच श्लोक आणखी वेगळ्या
तुमचा तोच श्लोक आणखी वेगळ्या तर्हेने एका ठिकाणी मिळाला...
http://www.sanghparivar.org/blog/%5Buser%5D/it-is-not-muslim-invaders-wh...
Himalayam Samaarafya Yaavat Hindu Sarovaram
Tham Devanirmmitham desham Hindustanam Prachakshathe
हे खरे?
himalayam samarabhya yavat bindusarovaram
hindusthanamiti qyatam hi antaraksharayogatah
का हे खरे? का दोन्ही खोटे? हे आता हिंदुत्ववादीच जाणोत! Again the exact location of this verse in the Purana is missing, हे तिथे स्पस्श्टपणे दिलेले आहे.. श्लोक कुठल्या पुस्तकात , कुणी कधी लिहिला हे मात्र माहीत नाही, पण हिंदुत्ववाल्याना असा प्राचीन (! :फिदी:) श्लोक मात्र किती सहजपणे मिळतो नै!! कोण बिंदुसागर म्हणतो , कोण हिंदुसागर म्हणतो!
आजच्या पुस्तकात मात्र या देशाचे नाव भारतच आहे. आमच्या सगळ्या कागदावरही तसेच आहे. आम्हाला ते पुरेसे आहे!
ब्रिटिशानी हिंदु मुस्लिम वाद
ब्रिटिशानी हिंदु मुस्लिम वाद नेमका कसा जन्माला घातला?>>>>>>>>> जामोप्या तुमच्या नविन धाग्यासाठी विषय......
अक्षय जोग आणि इतर आपले म्हणणे एकाच प्रतिसादात नाही देउ शकत का? ४-५ प्रतिसाद द्यावे लागतात एकाच मुद्द्याला मांडायला??????
मुळातच जेव्हा सावरकरांनी आपले विचार मांडले तेव्हाची परिस्थिती वेगळी होती..ते विचार आता जसे त्या तसे कसे आचरणात आणणार?????? त्यांनी हिंदु धर्मा बद्दल जे काही लिहिले ते त्या काळाच्या परिस्थितीनुरुप लिहिले होते.. काळ बदलला..स्वातंत्र्य मिळाले जग पुढे गेले तर विचार सुध्दा पुढे जायला हवे ना? हिंदु आजचा आणि पुर्वीचा हे दोन वेगवेगळे आहेत.! भारताला स्वतंत्र्य फक्त हिंदुंमुळे मुळीच मिळाले नाही आहे नाही कोणत्या विशिष्ट धर्मामुळे..!! नाही एकट्या सावरकरांमुळे..अंदमानात त्यांच्याबरोबर अजुन लोक होतीच..त्यांचे कार्य थोर असले तरी एकट्याच्या प्रयत्ना मुळे नाही मिळाले स्वातंत्र्य..
कुणाच्या लेखनाला विचारांना त्यांच्यातल्या काळाला किती महत्व द्यावे याला सुध्दा काही तारतर्म्य असते.
आज हिंदु हा नपुंसक झालेला आहे..कॉग्रेस नी अर्धमेला केला आणि भाजपाने उरलेले ते रथयात्रेला मतांसाठी जोडले.!!
जे कॉग्रेस आणि भाजपाच्या च्या नावाने उदोउदो करत आहे त्यांनी हिंदुंसाठी काय केले हे आधी स्पष्ट करावे. नुसत्या मतांवर डोळा ठेउन नव्हे तर हिंदुंच्या उध्दारासाठी काय केले.? काश्मीर मधले हे पंडीत होते त्यांच्यासाठी काय केले.? हिंदुधर्माच्या शिकवणीसाठी काय केले.? हिंदु हा खराच धर्म आहे की एक समाज आहे? पुराणात जे लिहिले आहे त्याचा अर्थ ब्राम्हणांनी क्षत्रियांनी इतरांनी आपापल्या सोयी नुसार लावुन घेतला..
कोणी पण येते भावना भडकवुन जाते..अडवाणी तोगडीया इत्यादी काय साधु संत आहेत..ज्याना देवाने खास हिंदुच्या रक्षण करण्यासाठीच पृथ्वीवर पाठवले.?
हिंदुं धर्माचा प्रसार करा..त्यात काय काय चांगले आहे ते इतरांना पटवुन द्या. पुराणातील चांगल्या गोष्टी आत्मसात करा. आचरण आपले सुधारा..ब्राम्हण आधी शाकाहारी होते आता झाले मांसाहारी..का? काळ जसा जसा पुढे जातो तसे तसे बदल होतच जातात..पण यामुळे आपण संकुचीत न होता नविन बदल अंगीकारुन धर्म वाढवण्यास पर्यत्न करण्याचे सोडुन त्यावर वादविवादच जास्त करण्यात आनंद मानतो..
इथे जितके ही हिंदु आहेत त्यांनी वादविवाद सोडुन खरोखरच हिंदु धर्म जाणुन घेतला आहे का..तो आचरणात आणुन इतरांना शांतपणे समजावुन सांगीतला का..? सांगु शकतात का>?
>>> सेक्युलर म्हणजे काय हे
>>> सेक्युलर म्हणजे काय हे घटनेत कुठेही स्पष्ट केलेले नाहीये.
सेक्युलर (खरं तर "सिक्युलर" किंवा निधर्मांध) म्हणजेच निधर्मी आणि समाजवाद हे शब्द १९५० साली अंमलात आणलेल्या राज्यघटनेत नव्हते. इंदिरा गांधींनी १९७५ साली घटनादुरुस्ती करून राज्यघटनेच्या प्रास्ताविकात हे दोन शब्द घुसडले.
हा देश हिंदुस्थान आहे म्हणे.
हा देश हिंदुस्थान आहे म्हणे. पुरावा काय तर बृहन्नारदी पुराण !! .. आणि साक्ष कुणाची तर पाकिस्तानच्या क्रिकेट समालोचकांची ! हिंदुत्वाचा विजय असो!
विश्ल्या तुझा लेख पुर्ण वाचला
विश्ल्या तुझा लेख पुर्ण वाचला नाहीय्.....पण पुढे तु जे काय लिहले असेल ते चांगलच असेल..
पण इथले काही लोकांचे प्रतिसाद वाचुन हा प्रतिसाद देत आहे......
'मानवता धर्म' हा जगात एकच श्रेष्टतम धर्म आहे!!
हिंदु धर्मा विषयी माझा अनुभव, विचार आणि अंदाज;
जगात तीन धर्म व्यापक आहेत्....ख्रिस्त, इस्लाम,.... हिंदु.
४० % जग ख्रिस्ति आहे.......४०% जग 'इस्लाम' मानतो...... २० % (याहुन कमीच आसावं) हिंदु., (फक्त हिंदुस्थानातच त्यातले १७-१८ % संपतात बाकी ३-४ ट्क्केच जगात पसरले असावेत.)
या २०% प्रमाणाचे कारण, हिंदुस्थानात सुध्दा ख्रिस्त आणि मुसलमानांचीच संख्या जास्त आहे....
मुसलमांनाचा समज आहे की 'बच्चे अल्लाह के घर से आते है'.....म्हणुन ते त्या घराचे 'दार बंद' करत नाही....!! ( अश्याने येत्या १०० वर्षांत ६०% जगावर 'इस्लाम' पसरेल)
जगात घरोघरी जाउन लोकांना मुसलमान धर्मांतरण करवणार्या आणि ख्रिस्त धर्मांतरण करवणार्या अनेक संस्था आहेत. तशा हिंदुंच्या नाहीत हे सर्वज्ञात आहे.
या संस्थानातील लोकं घरोघरी जाउन, किंवा वेगळी प्रर्थाना स्थळे उभारुन त्यात इतर धर्मियांना सहभागी करुन ख्रिस्ति प्रवचने देउन्.....(काही ठिकाणी पैसे ही दिले जाण्याची उदाहरणे आहेत) कालांतराने धर्मांतरण करवण्यास भाग पाडतात.
मी अनेक मुसलमान व्यक्तिंना हिंदुना 'इस्लाम' स्विकारण्या बाबत प्रयत्न करताना पाहीले आहे.
बांग्लादेशी आणि भारतीय मुसलमान यात आघाडीवर आहेत असा 'स्वानुभव' आहे.
हिंदु धर्माला या अशा कावे बाजीची गरज नाही....
जगात हिंदु धर्मच एकमेव असा धर्म आहे जो दुसर्याला धर्मांतरणाचे उपदेश करत नाही... 'सर्वधर्म समभाव' असा जो विचार आहे हा 'हिंदु' विचार आहे. आणी याचे मी आचरण सुध्दा करतो...दर्ग्याला सुध्दा जातो चर्चमधील प्रार्थनेतही सामील होतो....अशी आणखी अनेक हिंदु आहेत. दुसर्या धर्मातील लोकांच्या मनात असा विचार येणे कदाचीत कधीतरीच शक्य होईल. आणि त्या संस्था बंद होतील. त्या आधी महाप्रलय, कुराणातील 'कयामत' का काय तेच येईल..
क्रमशः
Pages