Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अश्विनीमामी एक रेसिपी खूप
अश्विनीमामी एक रेसिपी खूप जूनी ई टिव्ही वरची कोणी दाखवली आटवत नाही.panchratna kheer nachani satva 1 tblsp,hirave moog 4 tblsp,gahu 1 tblsp,pandharpuri dale 1 tblsp,lahi peeth 2tblsp,pithee sakhar 1/2 vati,milk powder 4 tblsp,velachi pood 2 teasp.hyatil moog,gahu,dale koradech khamang vas yei paryant bhajane,lahi peeth bhajane,shevati 1 teasp.sajuk tupavar mishr peeth bhajane.gar zaleki pithee sakhar va milk powder ghalun airtight dabyat thevane vayaskar mandali va lahan mulana khanyasathi panyat,dudhat dene pravasat panyat kalvun pan khata yete.bagha aaila aavadate ka.
धन्यवाद कट पेस्ट करून ठेवली
धन्यवाद कट पेस्ट करून ठेवली आहे. सामान आणून करून ठेवते नक्की.
पालक उकळत्या पाण्यात शिजवून प्युरी करून घेणे. पास्ता शिजवून घेणे. मग आपण व्हाइट सॉस करतो तो करून बारीक गॅस वर असताना पालक प्युरी अॅड करावी. बेकिन्ग च्या भांड्यात पहिले पास्ता,
मग हा ग्रीन व्हाइट सॉस घालावा. व्हाइट सॉस मध्ये थोडे जायफळ नक्की किसून घालावे, व मीठ मिरेपूड,
इटालिअन सिझनिन्ग. वरून ब्रेड क्रंब्स, किसलेले चीज व बटरचे छोटे तुकडे घालून. प्रीहीटेड अव्हन मध्ये २४० डीग्रीज ८ मिनिटे. कन्वेक्षन सेटिन्गवर ठेवावे. ब्रेड ऑलिव ऑइल वर भाजून तुकडे करून त्या बरोबर सर्व करावे. स्पॅगेटीपास्ता सूट करते.
काल मी व्हाइट सॉस ऐवजी चक्क नॉर चिकन डिलाइट सूप बनविले व स्पागेती वर ओतले. बरोबर
कांदा कॅप्सीकम व चिकन परतून घेतलेले होतेच. लै मस्त. आज आराम मोड म्हणून म्यागी व डोसा.
धन्यवाद अश्विनीमामी. मी करुन
धन्यवाद अश्विनीमामी. मी करुन बघेन नक्की. जायफळ कशासाठी टाकायचे असते.
व्हाईट सॉस तसा बेचव लागतो. पण
व्हाईट सॉस तसा बेचव लागतो. पण त्यात तिखट वगैरे घालूनही चालत नाही.
मिरपूड आणि जायफळ यांचा स्वाद छान लागतो.
थोड्याशा जायफळाने पालकाचा
थोड्याशा जायफळाने पालकाचा स्वाद पण खुलतो. पालकाच्या नेहेमीच्या भाजीत पण थोडं जायफळ घालून पहा.खूप छान स्वाद येतो.
खरे सांगू का कधी कधी ते
खरे सांगू का कधी कधी ते व्हाइट सॉस, मिरेपूड मीठ व चीज एव्ढ्याचाच एक मस्त सुवास येतो. अगदी कंफर्ट फूड टाइप. प्रचंड मसाले दार जेवण खाऊन वैताग आला कि घरी एखादे दिवस मॅक व चीज बनवायचे. मस्त वाट्ते. बरोबर दोन ब्रुशेटा पीसेस.
काल केला होता मी पालक पास्ता.
काल केला होता मी पालक पास्ता. पण खरं सांगु का मला नाही आवडला फारसा. ़काय चुकले असेल तर माहीत नाही. ़की त्याची चवच अशी असते. ़नेहमी टोमॅटो चा करते. आज नवरा नव्हता म्हणुन काहीतरी वेगळे करण्याचे धाडस केले होते पण प्रयोग फसला. ते जायफळाचे मी नन्तर वाचले. बहुतेक ते घातले नाही म्हणुन चव नीट नसेल का आली. उग्र लागत होते. ़कोणी केला असेल असा पास्ता तर मला डीटेल कृती द्या प्लिज. मी अश्विनीमामी नी सांगितले तसे आता करुन बघिन जायफळ घालुन. पण लगेच प्रयोग करायचे धाडस होत नाही. ़कालचा मी जबरदस्तीने खाला आणि थोडा उरला तो टाकुन दिला. खुप छान लागतो पालक पास्ता असे म्हणणारे कोणी आहे का? असेल तर प्लिज कॄती सांगा. माझ्या मुलीला पास्ता हा प्रकार खुप आवड्तो. म्हणुन वेगवेगळे प्रकार करुन बघायचे आहेत.
व्हाईट सॉस कसा बनवतात???
व्हाईट सॉस कसा बनवतात???
अरेरे पालक पास्ता मध्ये कॉर्न
अरेरे पालक पास्ता मध्ये कॉर्न व कांदे परतून घातले की पण मस्त चव येते.
टोकुरिका व्हाईट सॉस = १ कप
टोकुरिका
व्हाईट सॉस = १ कप दूध + १ टेबलस्पून लोणी + १ टेबलस्पून मैदा. हे प्रमाण.
लोणी गरम करून (ते करपू न देता) त्यावर मैदा परतायचा. फार नव्हे. रंग पालटता कामा नये पण मैदा भाजला गेला पाहिजे. त्यात हलक्या हाताने दूध घालायचे. गुठळ्या होऊ न देणे. झाल्यास मोडून काढणे. तो लवकरच घट्ट होतो. उकळी आल्यावर गॅस बंद करणे. त्यात चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड घालतात. भाज्या, सलाद, पास्ता वगैरेंमध्ये वापरतात. त्यात चीज किसून घातले तर चीझी सॉस पण मस्त लागतो.
मी मैद्याऐवजी अनेकदा तांदळाचे पीठ वापरते. चवीत फरक पडत नाही.
अकु, यहाँपे क्यू लिखा? वेगळा
अकु, यहाँपे क्यू लिखा?
वेगळा धागा कर. चटण्यांचा आहे तसा. लोक्स इतर सॉसही लिहितील तिथे.
अगं फारच कॉमन आहे गं व्हाईट
अगं फारच कॉमन आहे गं व्हाईट सॉस... त्यासाठी वेगळा धागा कशाला म्हटलं.... अगोदर पण कुठेतरी, कोणीतरी लिवलाय.
असो. आता वेगळा धागा काढू म्हणतेस?
निर्मयी पालक मलाही आवडत नाही,
निर्मयी पालक मलाही आवडत नाही, (त्यातल्या ऑक्झॅलेट मूळे तसाही मला खायचा नसतोच) पण तो उकडून त्यात जायफळ, मिरपूड घातलेला व्हाईट सॉस टाकला तर जरा बरा लागतो.
भारतीय पद्धतीच्या भाज्या / आमट्या करताना पालकाबरोबर बरेचसे आले वापरता येते.
अधूनमधून हे प्रश्न येत असतात
अधूनमधून हे प्रश्न येत असतात ना, म्हणून म्हणाले. वेगळा धागा काढलास तर शोधायला सोपे जाईल, कारण तो खाली सर्चमध्येही येईल.
ठीकै... काढते वेगळा धागा.
ठीकै... काढते वेगळा धागा. भाज्या/ सलाद साठी वापरल्या जाणार्या वेगवेगळ्या सॉसेसचे एक संकलनच करता येईल. http://www.maayboli.com/node/29277 इथे नवा धागा काढलाय.
अकु, तु 'पाककृती' काढलायस
अकु,
तु 'पाककृती' काढलायस ... फक्त व्हाईट सॉस साठी
'भाज्या/ पास्ता/ सलाद साठी वेगवेगळे सॉस' असा धागा काढशील का? की मी काढु?
माझ्याकडे जिलेबीचा पाक उरला
माझ्याकडे जिलेबीचा पाक उरला आहे.. घट्ट पण झालाय फ्रिजमधे ठेवुन.. काय उपयोग करता येइल?
आमटी भाजीत एक एक चमचा साखरे
आमटी भाजीत एक एक चमचा साखरे ऐवजी घालता येइल. नाहीतर त्यात गुलाब जाम करून सोड्ता येइल.
अरे पालक मंजे आयर्न. पॉपॉयचे फेवरिट. माझी नणंद अँजिओप्लास्टीनंतर हास्पिटलात होती तिथे तिला एक काही न घातलेले पालक सूप दिले होते. ते ही मला जाम आवडले होते. पालक पनीर, आलू पालक,
खिमा पालक हे काही बरे काँबो आहेत. शिवाय परतून बेसन लावून भाजी आहेच. मेथी पालक पराठा पण करते मी.
आज मिनोतीच्या या दोन लिन्क्स
आज मिनोतीच्या या दोन लिन्क्स वापरून ७ कप स्वीट बनवले.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/117967.html?1112361222
http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/07/blog-post_3551.html
हा फोटो
या दोन लिन्क्स पैकी कुठेतरी दही घालण्याविषयी लिहिले होते म्हणून दुधाऐवजी दही वापरले. साधा खोबर्याचा किस वापरण्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरला. या दोन गोष्टींमुळे मिश्रण लवकर घट्ट झाले.
लाजो, खर्रच की गं! तू काढ
लाजो, खर्रच की गं! तू काढ वेगळा धागा निरनिराळ्या सॉसेससाठी, आणि त्यात व्हाईट सॉसच्या पाकृची लिंक देखील दे!
जिलेबीचा पाक उरलाय >> तो
जिलेबीचा पाक उरलाय >> तो फ्रीजमधून बाहेर काढून नॉर्मल टेंपरेचरला आला की पोळी/ ब्रेड बरोबर मुरांब्यासारखा खाता येईल. त्यात आणखी वेगळा फ्लेवर आणायचा असेल तर लवंग, केशराची काडी, लिंबाचा रस घालून सुधारस सदृश पदार्थ तयार करता येईल. किंवा तो पाक कापलेल्या फळांवर घालून खाता येईल.
जिलबीच्या पाकात मैदा/कणीक
जिलबीच्या पाकात मैदा/कणीक घालून घट्ट मळून शंकरपाळ्या करता येतील.
नुसती कणीक, चवीपुरते मीठ घालून मळून 'मीठी रोटी'पण करता येईल.
परवा वाळलेल्या भुईमुगाच्या
परवा वाळलेल्या भुईमुगाच्या शेंगा भिजवुन उकडण्याचा प्रयोग सफल झाला. धन्स दिनेशदा, धारा
अमि, मस्त दिसताहेत वड्या. मी
अमि, मस्त दिसताहेत वड्या.
मी बर्याचदा करते या वड्या. दह्याचं वाचल्याचं आठवत नाहीये. आता दोन्ही लिंका परत बघते आणि दही घालून करून बघते.
धन्स मंजू. तिथे आंबट दही
धन्स मंजू.
तिथे आंबट दही घातल्याने वड्या आंबटगोड झाल्याचे लिहिले होते. पण मी वापरलेले दही गोड असल्याने दुधासारखीच चव आली.
जॉर्ज फोरमन ग्रिल वापरुन काय
जॉर्ज फोरमन ग्रिल वापरुन काय काय करता येईल? व्हेज रेसीपीज पाहीजेत.
झी, व्हेज बर्गर, सँडविचेस,
झी, व्हेज बर्गर, सँडविचेस, भाज्या काहीही ग्रिल करता येईल. नॉन्व्हेजसाठी छान उपयोग होतो. खिमा, ग्राऊंड टर्की, चिकनचे बर्गर्स, पॅटीज् पटकन होतात. इथे काही व्हेज रेसिपीज आहेत. उजवीकडे लिस्टमधून घटक निवडा-
http://www.georgeforemanrecipes.com/
राजगिर्याच्या किंवा साळीच्या
राजगिर्याच्या किंवा साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या घरी कशा बनवायच्या हे सचित्र कोणी लिहू शकेल का?
एका जाड बूडाच्या कढईत राजगिरा
एका जाड बूडाच्या कढईत राजगिरा किंवा ज्वारी (कढई तापवून) टाकून कपड्याने घोळल्या कि लगेच लाह्या फुटतात. ज्वारीच्या जरा उडतात, त्यामूळे त्यावर झाकण ठेवून कढईच हलवली तर चांगले.
साळीच्या मात्र माहित नाहीत.
तशी कृति सोपी आहे. इतर काहिही घटक नाहित.
थॅंक्स दिनेशदा, ज्वारी भिजवून
थॅंक्स दिनेशदा, ज्वारी भिजवून घ्यावी लागेल का ह्यासाठी ?
Pages