देवाने मुलींना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर जडायच
सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?
कोणाचे डोळे, तर कोणाचे केस
प्रत्येकीत काहीतरी वेगळाच गुण
नजर एकीवरच टिकत नाही
पाहताच वाजु लागते प्रेमाची धुन
कोणी हासुन आपलस करत
कोणी लाजुन मनामध्ये शिरत
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपल काळीज कुठे आपल्याजवळ उरत
कोणी नजरेतूनच गार करत
कोणी बोलण्यातूनच वार करत
किती अदा लुभवण्याच्या असतात
मन हे वेडे प्रत्येक नखर्यात फसत
कपड्यातही मुली कमाल दिसतात
तोकडे कपडे घालुन घायाळ करतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच मनाला घेरतात
नटण्यातही त्यांच्या बात असते
मेणबत्तीला जशी वात असते
मन आमच उजळुन टाकतात
प्रत्येक दिवसामागे जशी रात असते
अशात एकीतच कस मन लागेल
शहण्या बाळासारख कस वागेल
प्रत्येक तर्हा खुणावत असताना
एकीवरच आमच कस भागेल
खरच! देवाने मुलींना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर जडायच
सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?
मला आवडली
मला आवडली कविता. चांगली आहे. 'काहीच्या काही' मध्ये टाका. त्या 'कपडे' आणि 'नटणे' वाल्या ४-४ ओळी नसत्या तरी चाललं असतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळीकडे
सगळीकडे संदर्भ आले म्हणून वाचलीच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तरी कुठेही स्त्रीजातीचा सामाजीक अपमान वैगरे वाटली नाही. वाचक 'तो' दृष्टिकोन कपड्यांबाबत लावत आहेत, यात चावट (की हिरवट) अर्थ कसा निघतो? हे कळेल का? आणी निघाला तरी काय फरक पडतो. प्रत्येक कविता परीपुर्ण हवीच का?
कपडे, नटने गोष्ट, आणि मेनबत्तीची उपमा सोडली तर काहीही वावगं वाटले नाही. तसे पाहायला गेले तर मेनबत्तीची वात जशी हालते, तसे चालने असे लिहीले असते तर अजुन योग्य ठरले असते.
साहित्यीक मुल्य बिल्य मला कळत नाही पण स्त्रीच्या एकुनच सौदर्यंया बाबतीत ही कविता आहे असे वाटते. आणि मुलं स्त्रीयांबाबती कुठ्ल्या वर्षी काय बोलतात हे 'शाळा' वाचनार्यांच्या धान्यात येईल. त्यामुळे कवितेत स्त्री जातीवर हल्ला झाला हे पटत नाही. आणि ते साहित्यिक मूल्य तुम्ही जर गुलमोहरांचा प्रत्येक कवीतेत पाहात असाल तर तुम्हाला शुभेच्छा.
इथे लिहीनार्या अनेक 'मॅरीड' स्त्रियांना दुसार्याबाफ वर जानराव बद्दल हळहळताना (की विव्हळताना बरोबर आहे?) वाचले आहे मग एखाद्या पुरुषाला तसे वाटले तर काय गैर. खरे तर तसे वाटने ही स्त्रीला पुरूषांबद्दल आणि पुरुषांना स्त्री बद्दल ही एक 'सहज' प्रक्रिया आहे असे वाटते.
काहीच्या काही मध्ये काहीही हरकत नाही.
:) LOL LOL मला
आवडली नाही कविता ,प्रतिक्रिया लिहु नका.
The smartest thing you can do is NOT to show people your insecurities or the things that annoy you.
????? मला
?????
मला वाटतं इथे विरोध त्या कवितेमागच्या विचारसरणीला आहे- आणि या लेखकाच्या पहिल्या लेखातून मुलींबद्द्ल एक चीप विचारसरणी दिसते, तीच या कवितेत पुढे नेली आहे.
<<<<इथे लिहीनार्या अनेक 'मॅरीड' स्त्रियांना दुसार्याबाफ वर जानराव बद्दल हळहळताना (की विव्हळताना बरोबर आहे?) वाचले आहे मग एखाद्या पुरुषाला तसे वाटले तर काय गैर. >>>
अरे केदार, बायकांनी जानराव बद्द्ल विव्हळणे किंवा पुरुषांनी कॅटरीना कैफ/दुसर्या नायिकांबद्द्ल अगदीच वेगळी गोष्ट झाली. तू या लेखकाचा पहिला लेख वाचला आहेस का?
भाग्या, हो
भाग्या, हो वाचला आहे. त्या लेखातली विचारसरणी चुकच आहे. आणि वरच्या पोस्टने त्याला मी जस्टीफायही करत नाही. पण मी ह्या कवितेला त्या लेखाशी जोडत नाहीये इतकेच.
दुसर्या बाफचा उल्लेख करुन परिचित स्त्रीयांना दुषने देण्याच्या उद्देश तर बिलकुल नाही , मला फक्त इतकेच म्हणायचे होते की दुसर्या सेक्स कडे पाहने अगदी नॅचरल आहे. (काही लोकांचा सुर किती हव्यात? असा आहे म्हणून ते उदा दिले) मग लेखकाने पाहिले तर गहजब का? (एक लेख दुसर्याला न जोडता पाहिले तर फार काही वाईट वाटले नाही म्हणून पोस्ट टाकले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदार, ते
केदार, ते जानराव बद्दलचं जे तू म्हणतो आहेस ते सगळ्यांचे आपापले जानराव होते(निदान पार्ल्यात तरी). दुसरीकडंच कुठचं डिस्कशन असेल तर लिंक दे बरं.
>>> पण मी
>>> पण मी ह्या कवितेला त्या लेखाशी जोडत नाहीये इतकेच.
केदार, हे पटले. तुझे आणि लालूचे पोस्ट पाहून मी आता विचार करत होतो... या कवितेतले काही शब्द मला खटकले (कपडे, एकीवर कसं भागेल, इ.) पण मला ते खटकण्यामागे तो लेख बर्याच अंशी जबाबदार आहे. तसा संबंध जोडण्याची गरज नाही असं वाटतं. जर मी तो लेख लक्षात न घेता ही कविता वाचली तर मीसुद्धा 'एक गंमत' म्हणून बघू शकतो हे आता कळते. पण तो लेख लक्षात न घेणे अवघड आहे हेही कबूल करतो.
***
Entropy : It isn't what it used to be.
सॉरी, पण
सॉरी, पण "त्या" लेखाचा कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवताही या कवितेतील काही वाक्ये व एकन्दरीत आशय्/मतितार्थ एक "मानव" म्हणून पटला नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मात्र केवळ पशुवत "नर व अनेक माद्या" यातील शारिरीक सम्बन्धाच्या आकर्षणाच्या वर्तनाचे किन्वा त्या पद्धतीच्या "एका नराच्या" भावनान्च्या प्रगटीकरणाचे समर्थनच करावयाचे ठरल्यास, वरील कवितेत मग काहीच वावगे नाही !
केदार, मला वाटते की तू पुन्हा विचार करुन पहावास!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
लिंबू,
लिंबू, त्या भावनांचे/वर्तनाचे वर्णन करणे यात मला गैर वाटत नाही. ना. धो. महानोरांच्या कविता अफाट शृंगारिक आहेत, त्यात भावनांचे/वर्तनाचे वर्णन आहे (पुन्हा मी पाहिले तिला अंगभर... तिच्या काचोळीला चांदण्याचा जर... मिठीत थरके भरातील ज्वार... इ.). कविता अप्रतीम आहेत. म्हणजे इथे प्रश्न आहे तो त्या भावना कशा व्यक्त होत आहेत याचा, बरोबर ? (नाहीतर निखिलरावसुद्धा महानोर झाले असते). अशा प्रकारच्या कविता मला मेल्समधून आल्या आहेत, तेव्हाही फारसे काही वाटले नव्हते. अशा प्रकारे त्या भावना मांडणे अनेकांना खटकू शकते हे मान्य. ते खटकणे किंवा न खटकणे ही वैयक्तिक बाब आहे (उदा. मला नाही वाटत, तुला वाटते).
***
Entropy : It isn't what it used to be.
स्लार्टी,
स्लार्टी, एक छोटीशी गफलत होत्ये, महानोरान्च्या कविता कुणा एकीबरोबर एकनिष्ठ की कायसेसे म्हणतात ना? तशा आहेत, अन नसतील तर त्यान्ना देखिल विरोध करावा लागेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आत्ताच एक स्वगत यस्जीरोडवर टाकले ते इथे पुन्हा टाकतो, बघ काही उमजते का!
limbutimbu | 6 मार्च, 2009 - 09:59 नवीन
आजचे स्वगतः
मनेका गान्धीच्या कृपेने, हल्ली खेड्याशहरातून, गल्लोगल्ली, मोकाट कुत्री इतस्ततः भटकताना दिसतात
सहज निरीक्षण केले तर या कुत्र्यान्च्या सहजीवनाच्या अनेक बाबी/पैलू लक्षात येतात
दहा/बारा कुत्र्यान्मधे असलेला एखादाच ताकदवान नर, त्यापासून घाबरुन कायम मागिल दोन पायात शेपुट घालून असलेले इतर दोन्-चार मरतुकडे नर आणि बाकि साताठ माद्या, असल्यास पिल्ले!
खाद्य शोधण्याचा वा हद्दीबाह्य सन्कटान्शी मुकाबला करण्याचा त्यान्चा सामुहीक प्रयत्न हा एक अभ्यासाचा विषय असतो व बहुधा जन्गली कुत्रान्बाबत डिस्कव्हरी चॅनेल ते काम इमानेइतबारे पार पाडते
ग्यानबाची मेख इथेच सुरू होते
तर हा नर, त्याच्या कळपातील सर्व माद्यान्चा मालक्,पालक वगैरे वगैरे सर्वकाही अस्तो
वन्श विस्तारासाठी त्या एका बलिष्ठ नरास मिळालेले स्वातन्त्र्य निसर्गदत्त अस्ते
पण तशाच त्या "कुत्रा" या पशूस असलेल्या निसर्गदत्त स्वातन्त्र्याची "भुरळ" पडून, कोणी "मानव" आपल्या मनात ज्वालामुखी प्रमाणे उफाळून येणार्या कामुक भावभावना मानवी समुहाचे नैतिक नियम तोडून कोणत्याही माध्यमातून मान्डू लागला वा त्या "तशा" वर्तनाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करु पाहू लागला तर त्यास विरोध हा होणारच!
कदाचित हा विरोध हा "मध्यमवर्गियान्चा" विरोध म्हणून दुर्लक्षिला जाईल! त्याची हेटाळणी देखिल केली जाईल! मध्यमवर्गाच्या नितीनियमान्च्या "X||मणी" कल्पनान्ची सक्ती आम्हावर का असे गळे देखिल काढले जातिल
पण एकन्दरीत समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अशा वृत्तीन्ची वाढ ही घातकच ठरते!
आपण स्वतः कोण आहोत हे समजुन उमजुन घेतल्यास विरोध दर्शवायचा की नाही ते ठरवणे अवघड नाही!
जाता जाता, कुत्रे किमान भादव्याचा "सिझनल" निसर्गनियम तरी पाळतात, मानवाचे तसे नस्ते, आणि म्हणूनच मानव पशून्पेक्षा वेगळा अस्तो व त्याने स्वतःवर काही नितीनियम घालून वागणे अपेक्षित अस्ते! अन्यथा ज्यान्ना "तसलेच" आदर्शच बाळगायचे आहेत त्यान्च्यासाठी सुलतानान्च्या जनानखान्याचे आदर्श देखिल अपुरे पडावे, नाही का?
स्वगत समाप्तः
...;
आपला, लिम्बुटिम्बु
>>>> अशा
>>>> अशा प्रकारच्या कविता मला मेल्समधून आल्या आहेत, तेव्हाही फारसे काही वाटले नव्हते.
)
अरे बाबा स्लार्ट्या, तुझा मेल बॉक्स सार्वजनिक नाहीये, काहीही का येईना! (अन काहीही का वाचेनास! व्यक्तिस्वातन्त्र्य हे!
पण एकान्तात वाचावयाच्या वा करावयाच्या सगळ्याच गोष्टी "सार्वजनिक" रितीने करता येतात का? कराव्यात का? हा देखिल कळीचा मुद्दा होऊ शकत नाही का?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
lol मी नाही
lol![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी नाही एवढा विचार केला, करायची गरज नाही. एक हलकीफुलकी 'काहीच्या काही' कविता आहे असं वाटलं. निखिल रावनी पहिल्या पानावर लिहिलंय ते पटलं. खरं तर असं काही विचारात घ्यायचीही गरज नाही की कविता कोणी लिहिली आहे, त्यांनी आधी काय काय लिहिलंय, ती व्यक्ती कशी आहे, कसा विचार करते याचा काही संबंध नाही. एक कविता म्हणून टाकली आहे, कविता म्हणून वाचली.
>>> एक
>>> एक हलकीफुलकी 'काहीच्या काही' कविता आहे असं वाटलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तस वाटण हा दोष नसला तरी तृटी नक्कीच आहे. पुरुष या नात्याने, व वास्तवातील जगाचे अनेकविध कन्गोरे पाहिल्याने मन मुर्दाड दगडी बनते व त्यास कशाचेच काही वाटू लागत नाही!
पण हेच जर एका "हिन्दुस्थानातल्या" "स्त्री" च्या भुमिकेतून पाहिलेस, जाणवुन घेतलेस, तर तुला "अपमान" वा "धोकादायक" वाटल्याशिवाय रहाणार नाही!
अन एका कुटुम्बप्रमुखाच्या नजरेतून पाहू शकलीस तर?????? तुझा तूच विचार कर आता
...;
आपला, लिम्बुटिम्बु
LOL एका तरुण
LOL![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एका तरुण मुलाने (तारुण्यात पदार्पण वगैरे...) लिहिलेली कविता आहे असं वाटलं. आणि अपमान कसला? प्रत्येक मुलीत अगदी आवडण्यासारखी एक गोष्ट असते असं म्हणणं म्हणजे कॉम्प्लिमेंटच की!
आणि कुटुंबप्रमुखाच्या नजरेतून म्हणजे? हा लग्न केल्यानंतरही अनेक स्त्रियांवर प्रेम करणार आहे किंवा प्रत्येक स्त्री कडे सतत त्याच नजरेने पहाणार आहे असला टोकाचा विचार करुन तुम्हाला सगळे आक्षेपार्ह वाटणार असेल त्याला इलाज नाही. मी तसा विचार केला नाही, मला करण्याची गरज वाटत नाही.
>>पण एकान्तात वाचावयाच्या वा करावयाच्या सगळ्याच गोष्टी "सार्वजनिक" रितीने करता येतात का? कराव्यात का? हा देखिल कळीचा मुद्दा होऊ शकत नाही का?
म्हणजे ही कविता त्यांनी मेल केली असती तर चाललं असतं का?? मला काहीच कळत नाही आहे!
लालू, मी
लालू, मी पहिल्या पोस्ट पासून "सुर्यप्रकाशाइतक" स्पष्ट लिहिल आहे! न समजल्यास माझा तरणोपाय नाही!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>> म्हणजे ही कविता त्यांनी मेल केली असती तर चाललं असतं का??
बाईग, तो त्याचा प्रश्न आहे! पाठवावी की नाहि, आणि मिळाल्यास वाचावी की नाही!
मला "असल्या" मेल्स येत नाहीत, मी येऊ देत नाही, सबब हा प्रश्न माझा नाही!
स्लार्ट्याने "मेल मधे आलेल्या कवितान्चा" उल्लेख केला म्हणून केवळ "खाजगी वैयक्तिक क्षेत्र" आणि "सार्वजनिक ठिकाण" यातिल फरक स्लार्ट्याला सान्गण्याकरता ती पोस्ट लिहिली!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
पण
पण एकान्तात वाचावयाच्या वा करावयाच्या सगळ्याच गोष्टी "सार्वजनिक" रितीने करता येतात का? >> या कवितेत असे काय आहे?![uhoh.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u438/uhoh.gif)
मी पण
मी पण स्वच्छ लिहिलंय का आक्षेपार्ह वाटली नाही ते. बाकी अजून कसलाच विचार करायची गरज नाही. असा विचार करायचाच असं ठरवलं तर जवळ जवळ प्रत्येक गोष्टीत काही ना काही आक्षेपार्ह काढता येईल.
>>बाईग, तो त्याचा प्रश्न आहे! पाठवावी की नाहि
याचा काय संबंध? असले साहित्य इथे टाकले तर चालत नाही, पण मेलमध्ये आले तर चालते का तुला असं विचारते आहे मी.
>>पण एकान्तात वाचावयाच्या वा करावयाच्या सगळ्याच गोष्टी "सार्वजनिक" रितीने करता येतात का? कराव्यात का? हा देखिल कळीचा मुद्दा होऊ शकत नाही का>> या वाक्याचा अर्थ मला सांग!
लालू, या
लालू, या शेवटच्या दोन कडव्यान्नी त्याच्या आख्ख्या कवितेची वाट लागली आहे! असे माझे मत
>>> अशात एकीतच कस मन लागेल
>>> शहण्या बाळासारख कस वागेल
>>> प्रत्येक तर्हा खुणावत असताना
>>> एकीवरच आमच कस भागेल
>>> खरच! देवाने मुलींना अस का बनवल?
>>> की बघताच मन पत्येकीवर जडायच
>>> सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
>>> मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?
>>>> आणि कुटुंबप्रमुखाच्या नजरेतून म्हणजे? हा लग्न केल्यानंतरही अनेक स्त्रियांवर प्रेम करणार आहे >>>>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अग लन्ग बिग्न राहूदे बाजुला, कविता देखिल राहूदे बाजुला, वरील ठळक वाक्ये किन्वा त्यान्चा आशय उच्चारणार्या किन्वा तसा आशय कोणाच्या मनात आहे असा नुस्ता सन्शय जरी आला तर कोण त्या नरपुन्गवास कोणत्या मुलिचा बाप साध घरात घेऊन चहापाणी पाजेल??? विचार कर!
कुटुम्बप्रमुख या नात्याचा उल्लेख या सन्दर्भात आहे!
हां, आता परिस्थितीवश तुला गरज वाटत नसेल तर ते वेगळे!
पण तसे वाटून घ्यायची गरज पडते की नाही हा वादातीत मुद्दा हे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
>>उच्चारणार
>>उच्चारणार्या किन्वा तसा आशय कोणाच्या मनात आहे असा नुस्ता सन्शय जरी आला तर कोण त्या नरपुन्गवास कोणत्या मुलिचा बाप साध घरात घेऊन चहापाणी पाजेल???
विचार कर!
मला परत विचार करायला सांगू नको. ही कविता लिहिणार्याचा एक व्यक्ती म्हणून विचार करण्याची मला काहीएक गरज नाही. इथे असणार्या प्रत्येक 'साहित्या'च्या बाबतीत माझी हीच भूमिका आहे.
>>>> याचा काय
>>>> याचा काय संबंध? असले साहित्य इथे टाकले तर चालत नाही, पण मेलमध्ये आले तर चालते का तुला असं विचारते आहे मी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू माझी पोस्ट पुन्हा वाचाविस असे वाटते!
बायदिवे, मला मेल मधे असले काही आलेले चालत नाही! (पण येथे मला काय चालते वा नाही चालत हा प्रश्न कुठुन आला? ) मेल मधे आलेले व म्हणून ते समर्थनिय सार्वजनिक प्रचारास, असा अर्थ निघु नये म्हणून मी ती आधीची पोस्ट लिहिली!
>>पण एकान्तात वाचावयाच्या वा करावयाच्या सगळ्याच गोष्टी "सार्वजनिक" रितीने करता येतात का? कराव्यात का? हा देखिल कळीचा मुद्दा होऊ शकत नाही का>> या वाक्याचा अर्थ मला सांग!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
"एकिवरच आमच कस भागेल" हे वाक्य सरळ सरळ उपमर्द करणारे आहे! पुरुषी सैतानी कामुक वासनेच्या हैवानी आक्रमणाचे द्योतक आहे! येथिल "बरेचजण" अस आता म्हणू शकत नाही पण जे काही जण/जणी जो विरोध दर्शविताहेत तो या वृत्तीच्या प्रकटीकरणाला!
आधी तू या वाक्यावर किती विचार केलाहेस ते सान्ग, मी नुस्तच स्पून फिडीन्ग करणार नाही!
तरीही,
मनोराज्ये एकान्तातच होतात! मनोराज्यान्ना दुसर कोणी साक्षी नस्ते या अर्थी! प्रत्येक मनोराज्य प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करणे वा दुसर्यास सान्गणे शक्य अस्ते का? स्वतःशी प्रामाणिक राहुन याचे उत्तर शोध, वरील मनोराज्यात्मक कविता इथे पडली म्हणून येवढे लिहावे लागले!
नैतिक अनैतिक जाऊदे, टॉयलेटला बसतो ते एकान्तात हे तरी मान्य आहे? अगदी भारतातल्या खेडेगावात देखिल उघड्या माळावर कोणी बसले तर आडोसा धरुन बसतात हे सान्गायला लागू नये!
आता ही साधी एकान्तात करावयाची गोष्ट कोणी मुम्बैच्या भर नरिमनपॉईण्टवर वा पुण्याच्या बालगन्धर्व चौकात वा तू कोणत्या देशात्/शहरात आहे तिथे भररस्त्यावर बसुन करु लागला तर ते चालेल का? ते न चालण्याला जो नियम लागू होईल तोच नियम या कविच्या मनात उद्भवलेल्या भावभावनान्चे शाब्दिक सार्वजनिक प्रगटीकरणास का लागू होणार नाही?
मात्र, एक सोडून दहाजणीन्च्या मागे हुन्गत हिन्डणे हेच जर "समाजमान्य" असेल तर माझ्या वरील सर्व पोस्ट वायाच गेल्या म्हणायच्या!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
>>किती
>>किती विचार केलाहेस ते सान्ग
घे घे, वेळ घे.
विचार करुनच प्रश्न विचारला ना? तर त्या प्रश्नाचाच अर्थ तुला कळला नाही म्हणायचा. कर आता विचार!
का तूच विचार न करता लिहिलंयस ते वाक्य?
>>विरोध दर्शविताहेत तो या वृत्तीच्या प्रकटीकरणाला
ओके, ओके. म्हणजे वृती तशी असू शकते, फक्त प्रकट केली हे चुकले वाटतं.
असो. वर स्लार्तीने लिहिल्याप्रमाणे कोणाला आक्षेपार्ह वाटू शकते कोणाला नाही. मी मला का वाटली नाही ते सांगितले. तुला का आक्षेपार्ह वाटते तेही तू सांगितलेस. तुझे म्हणणे मला पटत नाही, माझे तुला पटणार नाही.
लाले बरी
लाले बरी आहेस ना?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
>>>>> ओके, ओके.
>>>>> ओके, ओके. म्हणजे वृती तशी असू शकते, फक्त प्रकट केली हे चुकले वाटतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असू शकते???? असतेच म्हणून तर सातच्या आत घरात हा नियम शक्य तिथे देशात तरी पाळला जातो, व पाळता येत नसेल तर पुरेशी काळजी घेतली जाते!
पुन्हा तेच, वृती तशी असणे वा नसणे आणि तिचे प्रकटीकरण हे वेगवेगळे विषय आहेत! प्रत्येक मानवात काही अन्शी अशा वृत्ती दडलेल्या अस्तातच! त्या दाबून ठेवणे वा त्यान्चे समूळ पारिपत्य करणे हे "मानवपणाचे" पशू वेगळे लक्षण "अजुनपर्यन्ततरी" मानले जाते! तेच अमान्य असेल तर प्रश्नच मिटला
असो
इति लेखनसीमा!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मीने, मी
मीने, मी बरी आहे. तू?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मीनू त्या बिचार्यांनी भावना छापल्यात ना? प्रामाणिकपणे? त्या आहेत हे मान्य करणे ही मोठी स्टेप, ती घेतली ना? कुणी स्वतःशीच मान्य करत असतील कोणी लेखनातून. हे मानवपणाचेच लक्षण. तुला काय वाटते?
एकिवरच आमच
एकिवरच आमच कस भागेल" हे वाक्य सरळ सरळ उपमर्द करणारे आहे! पुरुषी सैतानी कामुक वासनेच्या हैवानी आक्रमणाचे द्योतक आहे! येथिल "बरेचजण" अस आता म्हणू शकत नाही पण जे काही जण/जणी जो विरोध दर्शविताहेत तो या वृत्तीच्या प्रकटीकरणाला!
>>>>>> लिंबुटिंबु, माझे अनुमोदन... कवितेतल्या २ ३ आणि ४ कडव्याबद्दल माझे काहीच म्हणणे नही. पण
कपड्यातही मुली कमाल दिसतात
तोकडे कपडे घालुन घायाळ करतात
हे जरा विचित्र वाटत नाही का? कदाचित कवीला असे म्हणायचे असेल की कुणी साडीत छान दिसते तर कुणी मिनिस्कर्ट्मधे/ पण तो अर्थ या ओळीतून येत नाहिये.
नटण्यातही त्यांच्या बात असते
मेणबत्तीला जशी वात असते
मन आमच उजळुन टाकतात
प्रत्येक दिवसामागे जशी रात असते
याचा खरेच काही अर्थ लागत नाहिये. मी काढलेला अर्थ असा, की मेणबत्तीची वात नसेल तर जसा त्या मेणबत्ती कामाची नाही , तसेच जी मुलगी नटत नाही ती काही कामाची नाही. कदाचित कवीला असे म्हणायचे नसेलही. पण मग तो त्याचे मुद्दे मांडताना कुठेतरी कमी पडला आहे.
अशात एकीतच कस मन लागेल
शहण्या बाळासारख कस वागेल
प्रत्येक तर्हा खुणावत असताना
एकीवरच आमच कस भागेल
खरच! देवाने मुलींना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर जडायच
सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?
>>> ही दोन कडवी नसती तर कविता इतकी वादग्रस्त ठरली नसती. एकीवरच मचे मन कसे भागेल???? हे सर्वात जास्त खटकलेले वाक्य आहे.
--------------------
मुळात इथे कवीचा आधीच्या लेखाचा विषय आला कारण त्यामधे देखील त्याने असेच काहीतरी लिहिले होते. मी काय देवी म्हणून स्त्रीची पूजा करा वगैरे हट्ट धरत नाहिये. किंवा संस्कृती रक्षण वगैरे गोष्टीसाट्।ई बोलत नाहिये. पण एक भोगवस्तू म्हणून जर स्त्रीला वापरणारे (भले ते साहित्यात असो, चित्रपटात असो किंवा जाहिरातीत) तर मला ते नक्की खटकते. आणी लेखकाच्या "त्या" लेखामधे आणि या कवितेमधे हीच मानसिकता दिसतीये. कदाचित ते तसे नसेलही, पण माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर मी जे वाचतेय तेच मी मानून चालतेय.
इथे कुठेही मला लेखकाला नामोहरम करायचा विचार नाहिये. मी मागच्या वेळेलाही सांगितले होते की, स्वतःला झेपतील तेच विषय सुरुवातीला निवडा. हळू हळू वेगळे विषय मांडता येतीलच.
--------------
नंदिनी
--------------
नंदिनी,
नंदिनी, पहिलं आणि शेवटचं कडवं सारखंच आहे. दुसर्या कडव्यात![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>नजर एकीवरच टिकत नाही
>>पाहताच वाजु लागते प्रेमाची धुन
असं आहे म्हणजे हे पण बहुतेक चालणार नाही. कारण त्याचा अर्थ
>>सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
>>मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?
या प्रमाणेच आहे.
'कपडे नटणे' वाली २ नसती तरी चाललं असतं असं मी म्हणते. मग राहिलं काय गं?
लालु, अगं
लालु, अगं म्हणून तर मी पहिले कडवे घेतलेच नाही.
रस्त्याच्या कडेने, कवीच्या इतर कविता वाचून झालेला साक्षात्कार.. हे कदाचित जब भी कोइ लडकी देखे ततसम गाण्यचे भाषांतर आहे. कुनीतरी आता मूळ गाणे शोधा...
--------------
नंदिनी
--------------
'जब भी कोई
'जब भी कोई लडकी देखूं..' खरंच की गं.
म्हणजे ते गाणे याच अर्थाचे आहे. (भाषांतर आहे असं मी म्हणत नाही)
ये चिकने चिकने चेहरे, ये गोरी गोरी बाहें
बेचैन मुझे करती है ये चंचल शोख अदाएं
कोणी लिहिलंय हे गाणं??
देवा रे
देवा रे देवा ! !
सगळ्या कवितांमिळ्णचे प्रतिसाद एकट्या रावसायबांनीच पटकावले की. इतक्या दिग्गज माशा अटीतटीने इथे लढतात आहेत म्हंटल्यावर दुसरे काय होणार म्हणा.
विक्रूती माझ्याही मनात आहे (च), पण त्याचे जाहिर प्रदर्शन भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकानी केले तर माझ्यात अन जनावरात काय फरक राहिला.
म्हनजे थोडक्यात अशा एख्गाद्या कवीत आनि जनावरात काय फरक राहिला.
आता विक्रुति म्हणजे काय विचाराल तर तुमचे चालु द्या. मला वेळ नाही. अजुन बर्याच कवितांचे रसग्रहन करायचे आहे.
कविला डुप्लिकेट आयडि वर राग आहे म्हने. झाड बघू दुगान्या इथे. मि तयार.
(माझे शुध्द्लेखन थोडेतरि सुधारले की नाहि. जरा जुन्या नव्या हवशा गवशा कवि रवि लोकांनी सांगा बघू.)
(कविंवरुन आठव;ले-- ते उच्चवर्नीयवर्गिय कविता करनारे कुठे गेले. ज्या समजतच नाहित त्या कविता बर्या. कविता समजल्या कि त्याचा असा त्रास होतो बघा.)
अरे कवितेत
अरे कवितेत येवढ काही आक्षेपार्य नाही आहे.. मला तर हा पुर्वग्रह अनुरोधीत हल्ला वाटतो आहे...
अशा आशयाची अनेक गाणी आहेत...
लाखो है निगाहो मैं जिंदगी की राह में सनम हसिन जवाँ..
युं तो हमने लाख हसी देखे है...
हुस्न के लाखो रंग... आणि कित्येक...
'जब भी कोई लडकी देखूं..
इथे उगाचच काही कडव्यांचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो आहे
कपड्यातही मुली कमाल दिसतात
तोकडे कपडे घालुन घायाळ करतात >> का मुली तोकडे कपडे घालत नाहीत? त्या तोकड्या कपड्यात आणि काही अंगभर कपड्यात सुंदर दिसतात.. ह्यात काय वावग आहे?
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच मनाला घेरतात
नटण्यातही त्यांच्या बात असते
मेणबत्तीला जशी वात असते
मन आमच उजळुन टाकतात >> जशी मेणबत्तिची वात जशी हळुहळु मेणबत्तीला जाळते तस पोरीच रुप मन जाळत आहे.... (उदा. शमा और परवाना)
प्रत्येक दिवसामागे जशी रात असते
अशात एकीतच कस मन लागेल
शहण्या बाळासारख कस वागेल
प्रत्येक तर्हा खुणावत असताना
एकीवरच आमच कस भागेल >> इथे मनाची कविच्या चलबिचल स्पष्ट होते.. की किती मुली आहेत सुंदर आहे मला तर सगळ्याच आवडतात.. आत अॅरेंज मॅरेज करताना नाही एक मुलगी आवडली... पण नकार आला मग दुसरी आवडली... ५ मुलीचे फोटो बघितले.. सगळ्याच छान दिसतात कुणाचे डॉळे तर कुणाचे गाल तर कुणाचा रंग.. हेच मुलीच्या बाबतीत पण होत.. त्यात पुरषाची सैतानी वासना कुठे आली आणि व्रुत्ती आली कोठे...? माधुरी पण सुंदर आहे ,करिना दिपिका सगळ्यच सुंदर आहेत म्हणण कींवा सलमान, ह्रुतिक, शाहरुख सुंदर आहे म्हणण म्हणजे हे भिबत्स वासनेच द्योतक आहे म्हणण्या सारख आहे. आणि जर तस कोणाला वाटत असेल तर त्यांना मानसोपचाराची गरज आहे. आता सगळेच धुतल्या तांदळा सारखे आहेत अस माझ म्हणण नाही ते दाखवणार्या सुंदर कविता माबो वर वाचल्या आहे... उदा. मादीपणाचा शिक्का लागला... ही चारोळी.
पण वरील कविता आणि त्यावरच्या काही प्रतिक्रिया ह्या अकारण कुरापती काढुन वयक्तीक भडास काढणार्या आहेत..
प्रेमावरचे आणि वासनेवरचे वरील बरेच उतारे वाचले.. ह्या कविते पेक्षा बाकी कवितांवर कारण नसताना बर्याच अश्लिल प्रतिक्रियावाचल्या त्याच काय? उगाच स्त्रीवाचक विधान केली की आपण कसे उद्दात विचाराचे आहोत हे दाखवण्याचा हा दुबळा प्रयत्न आहे..उगाच घेळका करुन एकावर हल्ला करण्यात काय अर्थ आहे?
अस झालच तर सगळ्या कविता वाचुन भलते सलते अर्थ काढता येता. जरा डोळे उघडा आणि आजुबाजुला पहा, थोडे आरसे पण मिळतिल त्यात...
मला तर ही एक प्रामाणिक सरळ साध्या भाषेत लिहिलेली विनोदी कविता वाटते...
Pages