देवाने मुलींना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर जडायच
सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?
कोणाचे डोळे, तर कोणाचे केस
प्रत्येकीत काहीतरी वेगळाच गुण
नजर एकीवरच टिकत नाही
पाहताच वाजु लागते प्रेमाची धुन
कोणी हासुन आपलस करत
कोणी लाजुन मनामध्ये शिरत
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपल काळीज कुठे आपल्याजवळ उरत
कोणी नजरेतूनच गार करत
कोणी बोलण्यातूनच वार करत
किती अदा लुभवण्याच्या असतात
मन हे वेडे प्रत्येक नखर्यात फसत
कपड्यातही मुली कमाल दिसतात
तोकडे कपडे घालुन घायाळ करतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच मनाला घेरतात
नटण्यातही त्यांच्या बात असते
मेणबत्तीला जशी वात असते
मन आमच उजळुन टाकतात
प्रत्येक दिवसामागे जशी रात असते
अशात एकीतच कस मन लागेल
शहण्या बाळासारख कस वागेल
प्रत्येक तर्हा खुणावत असताना
एकीवरच आमच कस भागेल
खरच! देवाने मुलींना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर जडायच
सगळ्याच हव्याहव्याशा वाटायच्या
मग कोणा एकीच्याच प्रेमात का पडायच?
रश्मि, छान
रश्मि,
छान आहे, वाचुन छान मनोरंजन झालं. गुड टाईमपास.
लिम्बू,
लिम्बू, अरे ते मेलचे उदाहरण अशासाठी दिले होते की काहीही आगापिछा माहिती नसलेल्या मेल्स येतात. त्यात अशी एखादी कविता असती तर कदाचित मला एवढे वाटले नसते, टाईमपास म्हणून मी दुर्लक्ष केले असते. लेखावरून लेखकाच्या मानसिकतेचा अंदाज येतो हे ठिक. मग ही मानसिकता माहिती असणे याचा कविता न आवडण्याशी कितपत संबंध असेल असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला. मला वाटले की ते एक प्रमुख कारण आहे, म्हणून मी ते लक्षात न घेता वाचण्याचा प्रयत्न केला एवढेच. तेव्हा मला ती ओके वाटली. अर्थात, नन्दिनी म्हणते तसे 'एकीवर न भागणे' यासारख्या ओळी अनेकजणांना कशाही कुठेही आल्या तरी अत्यंत गैर वाटू शकतात आणि ते मी समजू शकतो. त्या ओळी मलाही 'स्त्री उपभोग्य वस्तू' सुचवणार्या वाटल्या. अनेकजणांना वाटणार नाहीत. हे थोडे व्यक्तीसापेक्ष असेल असे दिसते.
या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो - लेखक/कवीची पार्श्वभूमी विचारात घेतली जावी का ? आर्थर सी. क्लार्कचे साहित्य मला आवडते आणि मी त्याला त्याच्या साहित्यासाठी मानतो. पण तो पीडोफाईल होता असा एक आरोप आहे, जो बहुतेक खरा असण्याची बरीच शक्यता आहे. तेव्हा काही मित्रांचे म्हणणे की अशा माणसाचे साहित्य कितीही महान असले तरी त्यांना आवडणे शक्यच नाही. आता मला तसे वाटत नाही. यात चूक/बरोबर ठरवणे मला तरी अशक्य आहे. निर्मितीकडे बघताना निर्माता किती वेगळा काढावा ही गोष्ट आपल्या जाणीवांवर अवलंबून आहे असे वाटते, त्यामुळे ते माणूससापेक्ष असेल का ?
त.टी. क्लार्कच्या साहित्यात त्याच्या या मानसिकतेचे उघड प्रतिबिंब पडलेले मी तरी पाहिले नाहीये. अरे हो, महानोरांनीसुद्धा 'एकनिष्ठ' राहणार्या लोकांबाबतच ते लिहिले आहे असेही मला कधीच जाणवले नाही. दुसरे म्हणजे मी जात्याच संशयात्मा असल्याने माझ्या स्वतःच्या नीतीमूल्यांकडेही मी संशयाने बघतो. त्यामुळे 'काय चांगले काय वाईट' ही माझी मते साधारणतः अत्यंत ठाम नसतात.
***
Entropy : It isn't what it used to be.
स्लार्टी,
स्लार्टी, मी माझ्या कुठल्याही पोस्ट मधे लेखकाच्या "आधीच्या लिखाणाचा" सन्दर्भ घेतलेला नाही किन्वा लेखकाने ती वाक्ये लिहिली म्हणून "तोही तसल्याच वृत्तीचा असावा" असा आडूनही आरोप केलेला नाही (तशी वाक्ये वापरणार्याबद्दल लोकान्च्या काय भावना असू शकतील ते कुटुम्बप्रमुखाच्या उदाहरणातून केवळ दर्शविले आहे, लेखक तसा आहे असे कुठेही म्हणलेले नाही)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिहीण्याच्या भरात वा भावनेच्या भरात वा केवळ कुठेतरी चारचौघात ऐकल म्हणून, शहानिशा न करता काही एक शब्दसमुह वापरले जाऊ शकतात, मात्र सार्वजनिक ठिकाणी असे काही प्रसिद्ध करताना त्यातुन निर्माण होणार्या बर्यावाईट अर्थान्ची जबाबदारी लेखकाचीच असते! व माझ्या यच्चयावत पोस्टमधून मी त्या लिखाणातून निघणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अर्थच उलगडून दाखविले आहेत! याउप्पर, ते मानायचे वा नाही हा लेखकाचा प्रश्न आहे!
तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आता माझी निघायची वेळ झालेली आहे, शिवाय हाताशी सन्दर्भही नाहीत! तेव्हा सत्यजित व तू मान्डलेल्या प्रश्णान्ना पुढील आठवड्यात जमल्यास उत्तर देईन, तरीही एकच सान्गेन की सत्यजित ने दिलेली गाणी वा महानोरान्च्या कविता यात "एकिने कसे भागावे" अलबत "बर्याच हव्यात" अशा अर्थाचे एकतरी वाक्य दाखवलेत तर बरे होईल, तसे असेल तर एक नविन बीबी उघडून ही गाणी व महानोरान्च्या कवितान्वर घसरणे मला भाग पडेल!
हे जग सुन्दर आहे, सुन्दर तरुणीन्नी भरलेले आहे, [परवा लग्नाला गेलो होतो तिथे देखिल अनेकानेक सुन्दरी होत्या, काही भाच्या होत्या, काही पुतण्या तर काही वधूपक्षाच्या होत्या,] असे म्हणणे आणि "त्या अनेकानेक सुन्दरिन्चा हव्यास धरणे / तो हव्यास उघड उघड निरर्गलपणे शब्दात माण्डणे" यात तुम्हास काहीच फरक वाटत नाही का?
माझ्यामते तरी, त्या वाक्यान्मुळे लेखकाकडून "जाणता वा अजाणता" चूकच झालेली आहे! कविता कशी नसावी याचे उदाहरण तयार झाले आहे असे मला वाटते
...;
आपला, लिम्बुटिम्बु
प्रत्येक
प्रत्येक तर्हा खुणावत असताना
एकीवरच आमच कस भागेल >>> मला ही ओळ वेगवेगळ्या मोहक तर्हांशी निगडीत वाटते. येवढ्या तर्हा असताना एक तर्हेवर कसं भागेल?
हे तर दादा कोंडके सारख झालं... अंधेरी रात में दिया तेरे हाथ मैं... सेंसॉर हतबल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक नविन बीबी उघडून ही गाणी व महानोरान्च्या कवितान्वर घसरणे मला भाग पडेल! >> लिंब्या तू करच, खरच ती एक पर्वणी असेल...
माझ्यामते
माझ्यामते या कवितेतील दोन ओळी आक्षेपार्ह आहेत :
"कपड्यातही......"
"एकीवरच आमचं कसं भागेल...."
या ओळीसुद्धा तशा अश्लील ठरत नाहीत. कविच्या मनोवृत्तीवर कॉमेन्ट करायच्या असतील तर गोष्ट निराळी आहे.
टायपिंगच्या चुका असतील, शुद्धलेखनाच्या चुका असतील, अगदी मनोवृत्तीसुद्धा आपल्याला आवडणार्या पातळीची नसेल; तरीही एक विनोदी कविता म्हणून या कवितेकडे पाहिले पाहिजे असे मला वाटते.
मात्र ही कविता 'काहीच्या काही'मध्ये टाकायला हवी होती.
शरद
"नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
ह्रदयावरल्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!"
स्लार्टी,
स्लार्टी, बाप रे. म्हणजे तुझे ते मित्र कोणत्याही कलेचा आस्वाद घेण्यापूर्वी कलाकाराची पार्श्वभूमी माहित करुन घेतात की काय आवडेल की नाही ते ठरवायला? का ignorance is bliss?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
>>एकीवरच आमचं कसं भागेल
या ओळीत "आमचं" शब्द सगळ्या पुरुषजातीचे प्रतिनिधित्व करतो असं समजलं तर सगळे पुरुष स्त्रीकडे याच नजरेने पाहतात असा अर्थ निघतो, सगळ्यांना एकाच पारड्यात टाकल्याबद्दल पुरुषांना अपमानास्पद वाटले पाहिजे.
खरं तर इथल्या लिन्क वर जी कविता आहे ती कविता म्हणून ठीक आहे पण त्यात जे स्त्रीचं चित्रण आहे ते मला रुचलं नाही. त्यातली स्त्री खूप दुर्बल आहे.
http://www.maayboli.com/node/6149
पैशासाठी त्रास देणार्या नवर्याला ती या ओळी म्हणतेय-
तुम्ही जन्माचे साथी
मला आहे अभिमान!
tumha mulanna khare prem
tumha mulanna khare prem kalale aahe ka? muline shrungar karane he jase thik aahe tase tumhi pan tech karata tokadi pant, kanat dull he sarv tumhi hi karata te kashasathi ? phakt samorchalya impress karanyasathi na
nikhilrao tali eka hatane vajat nasate
Mannon devane mulanahi aase banavile
बाप रे.....
बाप रे.....
Pages