Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद दिनेश, सुका मेवा
धन्यवाद दिनेश, सुका मेवा आणते. राजगिरा लाह्या आणते.
अमा ती थ्रेपटिन ची बिस्किटं
अमा ती थ्रेपटिन ची बिस्किटं मिळतात. ती पण बलवर्धक ठरतील्.मिळतात का अजून ती बिस्किटं?
अमा, सातूचे पीठ (त्याचे लाडू
अमा, सातूचे पीठ (त्याचे लाडू किंवा दुधात घालून), साळीच्या लाह्या दूध/ ताकात घालून, भिजवलेला खजूर - मनुका - सुकं अंजीर इत्यादी पदार्थ देता येतील. पण सर्वात आधी त्यांची पचनशक्ती आहे का तेवढे सर्व पचवायची तेही पाहावयास लागेल. थोड्या थोड्या वेळाने खायला द्यायचे. क्षुधावर्धक / पाचक पेये, जसे ताक, लिंबू पाणी, सूप, आमसुलाचे सार इत्यादी यांचाही फायदा होईल. भाताची पेज, वरणाची पेज देखील आहेच. शिवाय भाज्या घालून केलेली, मिश्र डाळींची सरसरीत सौम्य खिचडी आहे. दलिया पचायला त्रास होत नसेल तर दलियाही चालेल.
धन्यवाद, तिच्या कडे रामदेव
धन्यवाद, तिच्या कडे रामदेव बाबाची बिस्किटे आहेत. थ्रेप्टिन बघते आज.
रवा घरीपण काढतात? >> हो.
रवा घरीपण काढतात? >> हो. भारतात असले की माझ्याकडे घरचाच रवा असतो. इथे आहे घरी रवा कसा काढावा ते.
खुप खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद दिनेशदा....
अश्विनीमामी एन्शुअर पावडर मिळते ती दुधातुन देता येइल का बघा . ती खुप शक्तीवर्धक अस्ते आणि १ कप दुधात २ चमचे पावडर घातली की पोट १दम व्यवस्थित भरते. ट्राय करुन बघा.
अमा, आपण लहान मुलाना भरडी
अमा, आपण लहान मुलाना भरडी करून देतो ना, तशी करून ठेव आणि त्याची खिमटी करून काकूना दे. त्याची पचनशक्ती लक्षात घेऊन त्यामधे काजू-बदाम वगैरे घाल. अधेमधे एखादी भाजी त्यात अॅड करून वेगवेगळ्या चवीचं बनवता येतं.
साखर/गूळ चालणार असेल बेसनाचे/डिंकाचे लाडू पण देता येतील. दुधात कुस्करून चपाती किंवा फोडणीची पोळी ताकात घालून असे देता येइल. दूध नको असेल तर मिल्क शेक पण चालेल का? त्यामधे पण वेगवेगळ्या सुका मेवा वापरून देता येइल्च (केशर्/बदाम्/पिस्ता इत्यादि)
सूपमधे त्याना लेंटिल सूप/व्हेज सूप्/मलिगटानी सूप असे पोटभरीचे पदार्थ देता येतील. त्याना कडधान्ये खाणे शक्य होत नसेल तर कळण करून दे.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/117967.html?1112361222
इथे ७ कप स्वीट दिले आहे ना, त्यात डेसिकेटेड कोकोनट वापरता येईल का? जर ओलं खोबरं जरूरी असेल तर डेसिकेटेड कोकोनट दुधात भिजवून वापरता येईल का?
अमा ती थ्रेपटिन ची बिस्किटं
अमा ती थ्रेपटिन ची बिस्किटं मिळतात. ती पण बलवर्धक ठरतील्.मिळतात का अजून ती बिस्किटं?>>
हो मिळतात अजुन, माझ्या लेकींना तर फारच आवडतात पण प्रमाण विचारुन द्या.
घरि बनवता येइल अशि फ्रन्कि चि
घरि बनवता येइल अशि फ्रन्कि चि रेसिपि पाहिजे आहे मुलान करता.
नाही, परत तवा गॅसवर ठेवायचा
नाही, परत तवा गॅसवर ठेवायचा नाही. तवा नुसताच ठेवून त्यावर मग कांद्यापासून सगळे रचत जायचे. (मुंबईत लाकडी साच्यासकट तवा मिळतो. ) शक्य तितक्या भरभर म्हणजे धूर येत असतानाच हा तवा टेबलावर गेला पाहिजे.
निलेश मी दर आठवड्यात बनविते
निलेश मी दर आठवड्यात बनविते फ्रॅन्की आता थोड्या वेळात लिहून टाकते. घरची जेवणे उरकून.
सर्वआंचे धन्यवाद. काल आईला रात्री कॉफी व उपमा करून दिला तर तिने हातच जोडले. फारच थकली होती. अगदी चरकते मला. आम्ही जन्मभर दूर राहिलो त्यामुळे नॉर्मल जवळीक नाही. व तिच्या लाइफ स्टाइलला फार मॉडिफाय केले व काही झाले तर बहिणी रागवतील असे मला वाटते. माझ्याक्डून प्रयत्न करत आहे.
अश्विनी, शक्य तितके
अश्विनी, शक्य तितके द्रवपदार्थ (सरबत, सूप ) घेतील तर चांगले. कुठलाही पदार्थ, अगदी फळेही न चावता खाल्ली तर त्याचा काही फायदा होत नाही. सूप मधे मात्र सर्व पोषकद्रव्ये त्या पाण्यात उतरलेली असतात.
टोफु हा नक्कि काय प्रकार
टोफु हा नक्कि काय प्रकार आहे... प्लिज कोणि सांगेल का? ईथे सुपर मार्केट मध्ये बरयाच वेळा पाहिलय .. पण कस वापरतात आणि कशात ते माहित नसल्या मुळे कधि घेण्याच धाडस झाल नाहि ..
'तोफू" tofu म्हणजे सोया पनीर,
'तोफू" tofu म्हणजे सोया पनीर, शार्प चव असते. पनीर ऐवजी बहुतेक सगळ्या पदार्थात वापरता येते. मी स्वतः अजून फार ट्राय केलेली नाही पण माझ्या सख्ख्या मैत्रिणीचा आवडता प्रकार आहे.
फ्रँकी पाककृती टाकली आहे.
फ्रँकी पाककृती टाकली आहे.
माझ्या मुलाला उद्या
माझ्या मुलाला उद्या फ्रेंचच्या तासाला अॅपल टार्ट करुन न्यायचाय. त्याच्या टिचरने रेसिपी देलेय. त्यात स्वीट पॅस्ट्री वापरायला सांगितलेय. माझी आणि माझ्या लेकाची धाव केक, मफिन्स, कुकिज इतपतच आहे. तेव्हा स्वीट पॅस्ट्री म्हणून पिल्सबरीचा विकतचा पाय क्रस्ट चालेल का? आम्ही बरेचदा हा विकतचा पाय क्रस्ट वापरुन चिकन पॉट पाय करतो पण फळांचे टार्ट्,पाय वगैरे कधीच केले नाहीयेत.
लिंबाच्या लोणच्यासाठी लागणारा
लिंबाच्या लोणच्यासाठी लागणारा मसाला कसा करायचा?
स्वाती, सुपरमार्केटात पाय
स्वाती, सुपरमार्केटात पाय क्रस्ट मिळ्ते ती वापर किंवा छोट्या साईजचे पाय क्रस्ट्स पण मिळतात ते फ्रुट मिन्स पाय, अॅपल पाय साठी वापरता येतिल. ते नाहीच मिळाले तर शॉर्ट क्रस्ट पेस्ट्री शीट्स आणुन मोल्ड्स मधे घालुन आधी ब्लाईंड बेक करुन घे. मग त्यात अॅपल पायचे मिश्रण घाल.
सिंहगडावर बारा महिने
सिंहगडावर बारा महिने उकडलेल्या शेंगा मिळातात. एकदा विचारले तर त्या बाईंनी सांगितले वाळलेल्या शेंगा रात्रभर पाण्यात भिजवुन सकाळी उकडतात. कुणी केले आहे का ट्राय
हो वर्षा, तसे करता येते. चवीत
हो वर्षा, तसे करता येते. चवीत फारसा फरक पडत नाही.
दिनेशदा एक सांगा. रात्री
दिनेशदा एक सांगा. रात्री भिजवताना त्यात मीठ घालायचे का? आणी आपण ओल्याशेंगा उकडन्यापुर्वी जरा ठेचतो तसे काही करावे लागेल का?
वर्षा, शेंगा म्हणजे
वर्षा, शेंगा म्हणजे भुईमूगाच्या शेंगा म्हणत असशील तर त्या बाईंनी बरोबर सांगितलंय. सकाळी कूकरमध्ये उकडताना थोडीशी हळद आणि मीठ टाकायचे. हळदीने रंग आणि मीठाने चव येते. उकडून झाल्या की पुन्हा टोपलीत भरून उन्हात ठेवायच्या हव्या तर. त्या दिवसभरात मस्त वाळतात (पण त्याआधीच आमच्याकडे संपतात.) खूप मस्त लागतात, पण घरात कुणी साखरेच्या/बीपीच्या पथ्याचे किंवा डायेटींगवाले लोकं असतील तर त्यांना मात्र अजिबात चालणार नाहीत.
आम्ही सरसकट सुपात कोरड्या
आम्ही सरसकट सुपात कोरड्या शेंगा घेतो, त्यावरून खलबत्ता आडवा फिरवतो (जसं आपण दाण्याची सालं काढायला करू तसंच) मग एक एक करून फोडाव्या नाही लागत.
पण घरात कुणी
पण घरात कुणी साखरेच्या/बीपीच्या पथ्याचे किंवा डायेटींगवाले लोकं असतील तर त्यांना मात्र अजिबात चालणार नाहीत. >> असे का म्हणे. म्हणजे माझ्या घरातली पथ्याची लोक ओल्या शेंगा उकडल्यावर खातात. मग या का नाही चालणाअर?
धारा तुही रात्रभर भिजवतेस का? आणि भिजवताना मीठ घालतेस ?
ओल्या/कोरड्या शेंगांमध्ये फॅट
ओल्या/कोरड्या शेंगांमध्ये फॅट जास्त असते - जे हार्ट्/शुगर ट्रबलवाल्यांना बाधू शकते आणि मीठाने बीपी वाढते : डॉ.कडून कळालेली माहिती.
रात्रभर भिजवले की सकाळी लवकर शिजतात, बाकी त्याचा दुसरा फायदा हा की येता-जाता हातोहात संपत नाहीत.
शिजवताना मीठ टाकते मी. भिजवताना टाकले तरी चालले पाहिजे, कारण मग त्यांना बुरशी/अळ्या नाही लागणार.
पालक घालुन पास्ता करायचा असेल
पालक घालुन पास्ता करायचा असेल तर कसा करायचा?
माझ्याकडे पालक, पास्ता मोझेरेला चीझ आहे अजुन काय काय लागते.
आडवा बत्ता फिरवल्याने दाणे
आडवा बत्ता फिरवल्याने दाणे चांगले भिजतात.
निर्मयी इथे आहे पाककृति, पास्ता नावाने शोधल्यास मिळेल. या साहित्याशिवाय बटर किंवा तेल, मिरपूड व मीठ्च लागेल. बाकि भाज्याही वापरता येतील.
धन्स लाजो. इथे स्वीट किंवा
धन्स लाजो. इथे स्वीट किंवा शॉर्ट क्रस्ट पॅस्ट्री नव्हती दुकानात. आणि पाय क्रस्ट मिळाला पण तो बर्यापैकी फ्लेकी असतो म्हणून मग धीर करुन स्वीट पॅस्ट्री केली. व्यवस्थीत जमली.:)
अश्विनीमामी | 22 September,
अश्विनीमामी | 22 September, 2011 - 19:18
फ्रँकी पाककृती टाकली आहे.
धन्यवाद, पण कुथे शोधु? लिन्क देत का प्लिज.
Pages