पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवनी, रावण पिठल्यासाठी या पानाच्या वर उजव्या बाजूला 'आहारशास्त्र आणि पाककृती'वर क्लिक करून विषयवार यादी >> आमटी, कढी, पिठले >> रावण पिठले या मार्गाने जा.

आता श्रावण सुरु होईल. श्रवणी शुक्रवारी करतात त्या आरत्यान्ची रेसिपी देउ शकेल क कोणि (सिकेपी स्टाईलच्या)... लेकीसाठी करय्च्या आहेत!

गोड्गोजिरी,

मी अशा करते आरत्या -

पाण्यात मीठ आणी गूळ घालून उकळवते. गार झाल्यावर त्यात मावेल एवधी कणी़क घलुन भिजवणे. थोडा वेळाने मोटि चपाती लाटून छोट्या वाटीने आरत्या पाडते आणी तळ्ते.

आरत्या:

आम्ही दुधात, गूळ आणि कणीक घालून घावनासाठी भिजवतो तसे पीठ भिजवून छोटे छोटे घावन करतो पिठाची कंसिस्ट्न्सी घावनाच्या पीठापेक्षा जरा जास्त दाट असते. हव तर वेलची केशर घालायच.

थॅन्क्स चेतु, लालू आणि आर्च!
लालू, ती लिन्क ओपेन नहि होत! पुन्हा देउ शकाल का?

घरी होणार्‍या आरत्या लालूने दिलेल्या लिंकमधल्याप्रमाणे असतात. एकच लहानसा बदल म्हणजे गूळ, केळं घालून भिजवण्याआधी कणीक देखिल चमचाभर साजुकतुपावर परतून घेतल्या जाते.

ते सीकेपी आरत्या प्रकरण सह्हीये... असा प्रकार कधी खाल्लाच नाहीए! आमच्याकडे कणीक, गूळ, किंचित मीठ व पाणी अशा मिश्रणाचे दिवे उकडायचे आणि गरम गरम दिवे साजूक तुपाबरोबर खायचे असाच प्रकार पाहिलेला व खाल्लेला. केळं, वेलची वगैरे म्हणजे ऐश की!! Happy

अरु, आमच्याकडे पण तसेच कणकेचे दीवे करतात. गरम गरम आणि बरोबर साजुक तूप... आहाहा ... स्वर्ग Happy

कधी कधी आई वेळ नसेल तर केळ्याचे नुसते काप करुन त्यावर तूपात भिजलेल्या वाती ठेऊन आरती करायची. किंवा मग एखाद्या शुक्रवारी पुरणाचे दीवे Happy

दिनेशदा तुम्ही जुन्या मायबोलीवर दिलेल्या नाचणीच्या लाडूबद्द्ल विचारायचे आहे...
यात नाचणी, सोयाबीन, गहू ई. एकत्रच दळून आणले आणि मग भाजले तर चालेल का ?
मागे मी केलेले तेव्हा कडू झालेले, दळताना मेथीपण टाकलेली , यावेळी वेगळी पूड करून टाकली किंवा न भाजता टाकली तर चालेल का?
राजगिर्‍याच्या लाह्या नाही मिळाल्या तर पिठ चालेल ?
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/139020.html?1214794624

जुयी, ती पिठे भाजायला वेगवेगळा वेळ लागतो. तरच ती नीट भाजली जातात. एकत्र भाजायची तर तूपात भाजावी लागतील.
मेथी मात्र तूपात बदामी तळून मग त्याची घरीच पुड करायची.
राजगिर्‍याचे पिठ जरा कचकचीत लागते. रागगिरे मिळाले तर त्याच्या घरीच लाह्या करता येतात. पटकन होतात.

ठिक आहे दिनेशदा...
मेथीची पूड घरी करायची असल्यास जास्त घ्यावी लागेल, मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडीशी होणार नाही ना... मग उरलेली पूड चांगली राहिल का ? आधी थोड्याच प्रमाणात लाडू करणार आहे, चांगलेच जमले तर पुन्हा नक्की करणार आहे, पण काही दिवस तरी लागतील. तोपर्यंत राहिल का? Happy

एका पाकृच्या पुस्तकात पाहुन आज दुधीची दुध घालुन भाजी केली खालील प्रमाणे :
२५० ग्रॅम दुधी ,१ कप दुध, २ लवंगा , ५ काळी मिरी , १ दालचीनीचा तुकडा , २ लाल सुक्या मिरच्या , फोडनीसाठी तुप, मीठ- साखर चवीनुसार.
फोडणीत अख्खा मसाला घालुन दुधीच्या फोडी परतुन घेतल्या. दुध घालुन हे प्रकरण शिजवले. शेवटी मीठ्-साखर घालुन उतरवले.

चव ठीक वाटली. पण काहीतरी कमी जाणवते ( मसाला Uhoh ). कुणाला ही भाजी माहीत असेल तर सांगा ना Happy

वर्षा, दुधीची दुध घालुन भाजी अशीच सौम्य बीना मसाल्याची करतात.
त्यात थोडे ओले खोबरे पण चांगले लागते.

मसाला थोडा जाडसर कुटून वापरता येईल. >> मी हा विचार केला होता पुढच्या वेळिसाठी Happy
ओले खोबरे पण टाकुन पहाते Happy
मंजु तुमची पाकृ पण छान वाटतेय Happy

मला मुगाचा शीरा्/हलवा कसा करायचा ते हवं होतं. विषयवार यादीत शोधायचा प्रयत्न केला पण नाही सापडली कृती.

मला मुलाला अंड चालू करायचे आहे. ज्यात अंड दृश्य स्वरूपात दिसणार नाही अश्या रेसिपी सुचवा ना. (दिसले तर तो खाणार नाही म्हणून) Happy

Pages