श्री रत्नाकर मतकरींबरोबर मायबोलीबद्दल थोड्या गप्पा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

शिकागोच्या बृ. म. मं. च्या अधिवेशनात मायबोलीचा विश्वसेतू हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे श्री रत्नाकर मतकरी यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारण्याचा योग आला. त्यांना मायबोली आणि मायबोलीकरांबद्दल अगोदरच माहिती होती. ती त्यांच्याच शब्दात.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीची ओळख साहित्य वर्तुळात होतेय हे खासच. या लेखकांनी स्वतः इथे काहितरी (साहित्यच हवे असे नाही, अगदी प्रतिक्रिया सुद्धा) लिहावे असे मनोमन वाटते. अशी थोर माणसे मायबोलीवर आली तर अभिमानास्पद गोष्ट होईल.

वाहवा.... मायबोलीची दखल सगळ्या दिग्गजांना घ्यावीच लागेल. Happy

माझ्या आवडत्या लेखकाच्या तोंडून मी माझीच प्रशंसा ऐकतोय असे वाटले... Happy

मायबोली हे व्यासपीठ आणि सरावाचं मैदान आहे ही मतकरींची निरीक्षणे एकदम समर्पक आहेत. मायबोलीकरांनी कशाचा अभिमान बाळगावा हेही सुस्पष्ट करून सांगितलं आहे.

इथला सदस्य असल्यामुळे मला उगीचंच छाती फुगवून चालावंसं वाटतंय! Wink

-गा.पै.

पुलंची कौतुकमिश्रीत दाद मिळाल्यावर "वस्त्रहरण" ने रंगभुमीबरचे अनेक विक्रम मोडले. श्री. रत्नाकर मतकरींसारख्या सिद्धहस्त लेखकाची हि शाबासकिची थाप मायबोलीचा वारु चौखूर उधळण्यास कारणीभूत ठरो...

त्यांना मायबोलीची ओळ्ख आहे ही अभिमानाची गोष्ट. अन मायबोलीने अनेकांना व्यासपीठ दिलं हेही खरंय. पण सध्या मायबोली सरावाची जागा कदाचित असेल.तरी भविष्यात मायबोली ( अन कदाचित इतर ऑनलाईन स्थळे ) सत्यकथा, मौज, अन इतर प्रकाशनांच्या तोडीची होईल. आताच ब्लॉग विश्वात थोडी बहुत प्रसिद्धी असलेले अनेक लोक मायबोली माहित होताच तिथलं साहित्य इथे पण लिहित आहेत. हा ओघ वाढता रहावा, रहाणार.
मायबोली म्हणजे २१शतकातली सत्यकथा असं न म्हणता सत्यकथा म्हणजे विसाव्या शतकातली मायबोली होती अशी तुलना व्हायला लागेल यात शंका नाही .

मेधा यांच्याशी व सर्वांशीच सहमत! मला दुर्दैवाने प्रतिसादांवरून सारे कळले. दुर्दैवाने लॅपटॉप जुना आहे व त्यास साउंड नाही.

पण हे ब्येस झाले. Happy

अजयराव, तुमचेही अभिनंदन! Happy

-'बेफिकीर'!