पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा मदत हवी आहे... या वेळेस बासुंदीचा प्लॅन आहे. इथलं लो-फॅट दूध कसं मस्त आटवता येइल? मी भारतातपण मिल्क्मेड घालते पण इथले कन्डेन्सड मिल्क खूप्च पातळ वाटतात.
टिप्स प्लीज लेडीज....

गोगो - फॅट फ्री कन्डेन्सड/ मिल्क ईव्हापोरअटेड मिल्क किंवा हेवी व्हीप्पिंग क्रीम आणी लो-फॅट /फॅट फ्री मिल्क पाऊडर एकत्र करून (सम प्रमाण) एक उकळी करुन मग बासुंदी कर - मस्त दाट होते, सांगली स्टाईल....

जळगाव भागात बरेचदा लग्नात वांग्यची घोटुन केलेली एक भाजी असते..जुन्या / नविन माबो वर शोधले पण नाही मिळाली. कोणाकडे ही रेसिपी असल्यास प्लीज सांगणार का ईथे..

swarth, इकडे ३०% वालं whipped cream मिळतं, ते चालेल नं? आणि condensed milk पण milkmaid सरख नस्तं नं.. मग?
-खूप बाळबोध विचार्तेय का मि?

कोणी मला भोपळ्याच्या घारग्यांची मापांसकट कृती देईल का?
मी आतापर्यंत ज्या रेसिपी वाचल्या त्यात 'मावेल तेव्हढं' पीठ घाला वगैरे आहे. जुन्या माबोवरच्या धाग्यातही तसंच आहे.
ते करुन पाहिलं पण मनाजोगते जमले नाहीत घारगे (चव ठीक होती तरीही).बहुतेक प्रमाण (कणीक, रवा, तांदूळ पीठ) चुकत असणार.

वर्षा, २ वाट्या लाल भोपळ्याचा कीस, १ वाटि तांदूळ पीठ, १ वाटी रवा, थोडी कणीक, २ वाट्या गूळ.
हे रुचिरामधे आहे. कणी़क थोडी म्हणजे घारगे थापायला सोपे जावेत म्हणून आहे. पूर्ण तांदूळ पीठाने घारगे मोडतात. मिश्रणात २ चमचे तेलाचे मोहन घालायला सांगितलं आहे. "रवा घरी काढलेला" म्हटलंय, पण विकतच्या रवाही चालत असणारच आता Happy

भोपळ्याच्या घारग्यांची स्वातीची कृती माझ्या विपूत (शोधा म्हणजे) सापडेल Happy

घारग्यांची (स्वातीच्या) आईची रेसिपी :
भोपळ्याचा कीस (अगदी थोड्या) तुपावर परतून घेतल्यावर त्यात चवीनुसार गूळ (नंतर त्यात कणीक मिसळणार आहोत, तेव्हा आत्ता मिश्रण अंमळ जास्त गोड व्हायला हवं. साधारण किसाच्या निम्मा गूळ लागतो.) आणि आवडत असेल तर मिठाची कणी घालायची. थोडा (उदा. १ वाटी किसाला १ टीस्पून) रवा घालायचा. मिश्रण गार करत ठेवायचं. भोपळ्याच्या अंगच्या पाण्यात रवा भिजतो आणि गूळ विरघळतो. आता यात (१ वाटी किसाला १ टीस्पून) पिठी आणि मावेल तितकी(च) कणीक घालायची आणि तुपाच्या हाताने पीठ मळायचं. (वरून पाणी अजिबात घालायचं नाही!) दहाएक मिनिटांनी घारगे थापायला घ्यायचे.

तूप जास्त घालायचं नाही नाहीतर घारगे 'हसतात'!
***********
छे !!! ह्यात पण मावेल तितकी कणीक आहे Uhoh

>>छे !!! ह्यात पण मावेल तितकी कणीक आहे
Happy सिंड्रेला, असू दे. पण म्हणजे कणीक सर्वात जास्त आणि रवा व पीठी एकेक चमचाच घालायचं हे कळलं. माझी रवा-पीठीच्या प्रमाणात गडबड झाली असणार बहुतेक कारण घारगे थोडे कडकपणकडे झुकले होते Proud
हो आणि उलटताना मोडत होते हेही आत्ता आठवलं.
प्रज्ञा९ , धन्यवाद. ह्या प्रमाणानेही करुन बघीन.
रवा घरीपण काढतात? (अचंबा वाटलेली बाहुली) Happy

कणीक किंचित(च) जास्त घातली तर थोडे मऊसर होतात घारगे. थोडे कडक झाले म्हणजे तांदूळ पीठ जास्त झालं. मोहनाचं तेल जास्त झालं तर तळणीत हसतात घारगे.
रवा काढतात गं घरी. हल्ली नाही काढत फार कोणी. Happy

गोगो - चालेल ३०% वालं क्रीम.

condensed milk किंवा milkmaid काहीही चालेल असं माला वाटत. इथे पाहा - http://www.nestle.in/MilkProduct.aspx?OB=1&id=44 (milkmade - is a Partly Skimmed Sweetened Condensed Milk.)

खूप बाळबोध विचार्तेय का मि?>>>> नाही ग्...पदार्थ चांगला व्हाय्ला हवा म्हण्जे झाल.....

चतुर्थीसाठी भिजवलेले साबुदाणे आहेत. पण काही कारणाने खाणारी माणसं कमी झालीत. आज सगळे वापरता येणार नाहित. जर तसे भिजवलेलेच फ्रिजमध्ये ठेवले तर पुन्हा वापरता येतील ना? की अजून काही उपाय आहे उद्या/परवासाठी वापरायला?

धारा अगदी आरामात टिकेल साबुदाणा. मी अगदी आठवडाभर फ्रीज मधे ठेऊन पण वापरलाय भिजवलेला साबुदाणा.

Thanks Prady. Happy
एक तर साबुदाणा तब्येतीला चांगला नसतो, म्हणून नेहेमी करत नाही. आणि करावा तर असं काही होऊन वाया गेला तर खूपच वाईट वाटतं.

एक तर साबुदाणा तब्येतीला चांगला नसतो,

अगदी अगदी
मी तर पहीले ५ महीने भरपुर उपास तापास केलेत .. त्यामुळे साबुदाणा खुप खाण्यात आलाय ....
आत्ता पश्च्चाताप होतोय Sad

[preg मध्ये खाउ नये हे उशिरा कळले म्हणुन जरा टेंशन आलय ]

मिसळ मसाला घरी नाहीये सध्या. तर घरी मिसळ करता येईल का ? असेल तर कशी ? म्हणजे मसाला असेल तर कशी करायची ते माहीत आहे, मसाला नाहीये तर कशी करायची असे विचारत आहे.

सिझलर्स घरि कसे बनवतात? त्यासाठी काही वेगळ्या प्रकारची भांडी लागतात का? आणि कोणकोणत्या प्रकारचे सिझलर्स बनवता येतात? कोणाला माहीत असल्यास सविस्तर सांगा.

निर्मयी, सिझलर्स साठी लंबगोल आकाराचा तवा आणि तो बसेल अशी लाकडी डिश लागते. पण खोलगट तवा चालू शकेल.

सध्या माझी स्ययंपाकी बाई झाली आहे, सकाळी पोळी भाजी, संध्याकाळी डाळ भात, खिचडी, कोकी, कडधान्य ची आमटी , टोमेटो सार...कंटाळा आला आहे, वेगळा काही तरी खायची इच्छा आहे,
पण office नन्तर जाऊन करणार सो पटकन झाला पाहिजे, काही सुचवणार का पदार्थ?

माझी मावशी असते कोल्हापूर ला, ती अशी बनवते मिसळ
३ कांदे, ८/९ लशणि, हिरवी मिरची चिरणे, भरपूर तेलात फोडणी करणे, जीरा, कढीपत्ता, हिंग,हळद घालणे त्यामध्ये वरील सामुग्री घालून चांगलं शिजवून घेणे, मग ते mixure मध्ये घालून चांगलं बारीक वाटून घेणे, त्यामध्ये एक तोमतो पण वाटताना घालणे,

परत फोडणी करणे त्यामध्ये लसून ठेचून घालणे थोडी हळद, कढीपत्ता हवा तर घालणे आणि भरपूर पाणी घालून उकळवणे

देताना, आधी farasan कांदा, चिवडा घालून वरून तो रस्सा द्यावा, मग कोथिंबीर, लिंबू आणि कांदा...

निर्मयी,
सिझलर्स मधले जे पदार्थ असतात ते मसालेदार करायचे नसतात तर त्यावर वेगवेगळे सॉस टाकून चव आणायची असते.
शाकाहारी पदार्थात कोबी, फ्लॉवर, हिरवे वाटाणे, गाजर, बटाटा, बिट असे पदार्थ उकडून घ्यायचे (मीठाच्या पाण्यात.) सोबतीला एखादे कटलेट, शिजवलेल्या नूडल्स ध्यायच्या. तवा तापवून त्यावर थोडा बारिक कांदा टाकून वर हे पदार्थ रचायचे. सोया चंक्स पण घालता येतील.
मांसाहारी पदार्थात मोठे पिसेस (चिकन, मटण, फिश) आणि सोबत वरीलप्रमाणे भाज्या.
सॉस मधे, दोन तीन स्वादांची केचप्स, मस्टर्ड, चिली सॉस, सोया सॉस, बार्बेक्यू सॉस वगैरे घेता येईल.
हे शक्यतो घराबाहेर उघड्यावर खायला मजा येते (घरात धूर कोंडतो !)

तवा तापवून भक्कम आधारावर ठेवायचा आणि मग हे पदार्थ रचायचे.

आईचे वजन अगदी कमी आहे ३५ किलो व वय ७३. ती ब्रेकफास्ट करत नाही. व फार थकते पण जाणवू देत नाही. इथे आराम आहे म्हणून झोपते फक्त. पुण्यात बहिणींकडे तिला फार दगदग होते.
तिला दात नाहीत. कवळी लावून जेवत नाही. दहा वाजता पूजा करून होते तेव्हा मी तिला नैवेद्याच्या निमित्ताने काही तरी गोड , हाय एनर्जी देते आहे. पण वजन थोडे वाढावे व बलवर्धक असे अजून काय देता येइल. ती रामदेव बाबाचा बदाम पाक खाते एक चमचा. गोडाचा शिरा, केळ्याचे घावने असे काय काय देत आहे. दूध पीत नाही. स्वतःकडे फार दुर्लक्ष केले गेले आहे तिच्याकडून.

३५ किलो म्हणजे फारच कमी वजन आहे. आधी भूक लागण्यासाठी औषध द्यावे
लागेल. केळी, सुका मेवा (खजूर,अंजीर वगैरे) द्यायला हवे.
थोड्या थोड्या वेळाने खायला पाहिजे. अंगात शक्ती नसल्यानेच ग्लानी येत आहे.
वेगवेगळी सूप्स, पेज देता येईल. चपातीचे लाडू, नाचणीचे सत्व, आंबिल देता
येईल. रागगि-याच्या लाह्या दूधातून, किंवा त्याचे लाडू करुन देता येतील.
उकडलेले रताळे, केळे देता येईल. कवळी खुपतेय का कुठे? खरे तर कवळी
तोंडात व्यवस्थित बसायला पाहिजे. त्यासाठी एकदा डेंटिस्ट्ला दाखवले पाहिजे.
साखरेचा त्रास नसेल तर नारळाचे पाणी,ग्लुकोज घातलेले सरबत देत राहिले
पाहिजे.

दिनेशदा, सिझलर्सच्या पाककृतीबद्दल खूप खूप धन्यवाद. मध्ये मला सिझलर्सचे डोहाळे लागले होते. पण इथे मिळत नाहीत. मी घरी ट्राय केलं पण तितके जमले नाहीत. कारण शिजवलेले सगळे पदार्थ एकत्र सिझलर्ससारखे लागत नव्हते. वरसुद्धा ते सगळे एकत्र भाजायचे कसे ते नाही कळाले.
मला समजलेली कृती अशी, ती बरोबर आहे की नाही सांगा.
तवा तापवून घ्यायचा. त्यावर कांदा बारीक चिरून पसरायचा. त्यावर हे सगळे शिजवलेले पदार्थांची रास करायची. आणि वेगवेगळ्या सॉसेसने गार्निश करायचे. पण ते पुन्हा भाजायचे नाही का? किंवा किमान एकमेकांत चव मिसळण्यासाठी एखादी वाफ वगैरे नाही आणायची का?

Pages