अ‍ॅन्ड्रॉईड

Submitted by आदित्य चंद्रशेखर on 14 September, 2011 - 05:13

android_icon.png
      अ‍ॅन्ड्रॉईड ही मोबाईल्ससाठी असलेली चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) आहे. ती खास करुन स्मार्टफोन्स आणि टॅब्लेट पीसींसाठी बनवलेली आहे. तिचा विकास ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ने गुगलच्या नेतृत्वाखाली केला. अ‍ॅन्ड्रॉईड नावाची मूळ कंपनी गुगलने ५ नोव्हेंबर २००७ ला खरेदी केली आणि नंतर वाढवली. अ‍ॅन्ड्रॉईड ही ’ओपन सोर्स सिस्टीम’ आहे. ओपन सोर्स म्हणजे तिचा सोर्स कोड सर्वांना उपलब्ध आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. मायक्रोसॉफ्टची विंडोज जशी आपल्याला विकत घ्यावी लागते आणि आपल्याला तिचा फक्त सेट अप मिळतो तशी अ‍ॅन्ड्रॉईड नाही. त्यामुळे अ‍ॅन्ड्रॉईड वाढवण्यासाठी कुणीही त्यात भर घालू शकतं.अ‍ॅन्ड्रॉईड ही लिनक्स कर्नेल वर चालते. कर्नेल म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरचं हार्डवेअर आणि तुम्ही स्थापित (इंन्स्टॉल) केलेले प्रोग्राम्स यातील दुवा.
आज बाजारात अनेक प्रकारचे अ‍ॅन्ड्रॉईड फोन्स उपलब्ध आहेत. ते सर्व मुख्यत: बिझनेस फोन्स किंवा टॅब्लेट पीसी आहेत. त्यावर आपण स्वत: बनवलेले अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन्स टाकू शकतो.
      अ‍ॅन्ड्रॉईडची वैशिष्ट्ये:
      १) हॅन्डसेट लेआऊट्स:
      अ‍ॅन्ड्रॉईड फोन्सची स्क्रीन साईज ब-यापैकी मोठी असते. त्यावर आपण टू डी, थ्री डी अ‍ॅप्लिकेशन्स आरामात वापरु शकतो. (जसे थ्री डी गेम्स.)
      २) स्टोरेज:
      अ‍ॅन्ड्रॉईडमधे स्वत:चा डेटाबेस आहे. त्याला एस्क्युलाईट म्हणतात.
      ३) कनेक्टिव्हीटी:
      अ‍ॅन्ड्रॉईड विविध पद्धतींनी कनेक्ट होऊ शकतो जसं GSM/EDGE, IDEN, CDMA, EV-DO, UMTS, Bluetooth, Wi-Fi, LTE, NFC आणि WiMAX
      ४) भाषा सहाय्य:
      अ‍ॅन्ड्रॉईड वेगवेगळ्या मानवी भाषांमधे काम करु शकतो.
      ५) वेब ब्राऊजर:
      अ‍ॅन्ड्रॉईडकडे चांगला वेब ब्राऊजर आहे.
      ६) जास्तीचा (अ‍ॅडिशनल) हार्डवेअर सपोर्ट
     अ‍ॅन्ड्रॉईड व्हिडिओ/स्टील कॅमेरा वापरु शकतो तसेच टचस्क्रीन, जीपीएस, अ‍ॅक्सिलरोमीटर, गायरोस्कोप,मॅग्नेटोमीटर, डेडिकेटेट गेमिंग कन्सोल, प्रेशर सेन्सर तसेच थर्मोमीटर अशी वैशिष्ट्ये त्यात आहेत.
           याव्यतिरिक्त जावा सपोर्ट, सर्व प्रकारचा मिडिया सपोर्ट (एमपीथ्री/फोर फाईल्स आणि इतर), स्ट्रिमिंग मिडिया सपोर्ट, मल्टिटच, ब्ल्युटूथ, व्हिडिओ कॉलिंग, मल्टिटास्किंग, व्हॉईस इनपुट, टिथरिंग,स्क्रीन कॅप्चर अशी अनेक वैशिष्ट्ये अ‍ॅन्ड्रॉईडची आहेत.
अ‍ॅन्ड्रॉईडवर बाजारात कायकाय उपकरणे उपलब्ध आहेत बघा जरा:
      वापर:
      अ‍ॅन्ड्रॉईडचा वापर प्रामुख्याने स्मार्टफोन्स, नेटबुक, टॅब्लेट कॉम्प्युटर्स, गुगल टीव्ही इत्यादीत होतो. गुगल टीव्ही प्रामुख्याने अ‍ॅन्ड्रॉईडची एक्स८६ ही आवृती वापरते.
अ‍ॅन्ड्रॉईड आवृतींचा इतिहास:
ऑक्टोबर २००३: अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या पाउलो अल्टो येथे अ‍ॅन्डी रबिन, रिक मायनर, निक सिअर्स आणि ख्रिस व्हाईट यांनी अ‍ॅन्ड्रॉईडची मुहुर्तमेढ रोवली.

ऑगस्ट २००५: गुगलने अ‍ॅन्ड्रॉईड कंपनी विकत घेतली.

५ नोव्हेंबर २००७: ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ची स्थापना झाली.

१२ नोव्हेंबर २००७: अ‍ॅन्ड्रॉईडची बीटा आवृती बाजारात आली.

२३ सप्टेंबर २००८: पहिला अ‍ॅन्ड्रॉईड फोन, एच.टी.सी. ड्रीम अ‍ॅन्ड्रॉईडच्या पहिल्या(१.०) आवृतीसह बाजारात आला.यात खालील वैशिष्ट्ये होती.
१) गुगलच्या विविध सेवांबरोबर आदानप्रदान
२) एचटीएमएल, एक्सएचटीएमएल, अनेक एचटीएमएल पेजेसला सहाय्य करणारा वेब ब्राऊजर.
३) अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट वरुन अ‍ॅप्लिकेशन्स उतरवून घेणे (डाऊनलोड करणे) आणि अद्ययावत (अपग्रेड) करणे.
४) मल्टीटास्किंग, इन्स्टंट मॅसेजिंग, वाय-फाय आणि ब्लुटूथ सहाय्य.

९ फेब्रुवारी २००९: फक्त टी-मोबाईल जी१ साठी अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.१ बाजारात आली.

३० एप्रिल २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.५ बाजारात आली, जी कपकेक या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अधिक वेगवान कॅमेरा, आणि वेगवान फोटो कॅप्चर
२) अधिक वेगवान जी.पी.एस. यंत्रणा
३) स्क्रीनवरचा की-बोर्ड
४) यातून व्हिडिओ सरळ तूनळी (यूट्यूब) आणि पिकासावर चढवता (अपलोड करता) येत होते.

१५ सप्टेंबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती १.६ बाजारात आली, जी डोनट या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) वेगवान शोध यंत्रणा, व्हॉईस सर्च
२) एका क्लिकवर व्हिडीओ आणि फोटो मोडमधे चेंज करता येऊ शकणारा कॅमेरा
३) बॅटरी वापर दर्शक
४) CDMA सपोर्ट
५) अनेक भाषांमधील टेक्स्ट टू स्पीच

२६ ऑक्टोबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.० बाजारात आली, जी इक्लेअर या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) अनेक ईमेल अकांऊंट्स
२) ईमेल अकांऊंट्ससाठी मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंजचं सहाय्य
३) ब्ल्युटूथ २.१ सहाय्य
४) नविन ब्राऊजर जो एच.टी.एम.एल. ५ ला सहाय्य करतो.
५) नविन कॅलेंडर

३ डिसेंबर २००९: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.०.१ बाजारात आली.

१२ जानेवारी २०१०: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.१ बाजारात आली.

२० मे २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.२ बाजारात आली, जी फ्रोयो या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) विजेट्स सहाय्य: विजेट्स म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम्स असतात जे होमस्क्रीनवर डकवता येतात. उदा: आजपासून ख्रिसमसला किती दिवस बाकी आहेत याचा प्रोग्राम, तापमान दर्शक, येण्या-या महिन्यात तुमच्या फोनबुकमधे असलेल्या कुणाचा वाढदिवस आहे हे सांगणारा छोटासा प्रोग्राम इत्यादी.
२) सुधारीत आदानाप्रदान सहाय्य.
३) हॉटस्पॉट सहाय्य.
४) अनेकविध भाषांमधील की-बोर्ड.
५) अ‍ॅडोब फ्लॅश आवृत्ती १०.१ सहाय्य.

६ डिसेंबर २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.३ बाजारात आली, जी जिंजरब्रेड या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) सुधारित युजर इंटरफेस.
२) जलदगतीने टाईप करता यावं म्हणून सुधारीत की-बोर्ड.
३) एका क्लिकवर सिलेक्ट करता येण्याजोगं टेक्स्ट आणि कॉपी/पेस्ट.
४) जवळील क्षेत्रातील आदानप्रदान (निअर फिल्ड कम्युनिकेशन).
५) इंटरनेट कॉलिंग.

२२ फेब्रुवारी २०११: लिनक्स कर्नेलवर आधारित अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती २.३.३ बाजारात आली, तसेच टॅब्लेट पीसींसाठीची अ‍ॅन्ड्रॉईडची आवृती ३.० बाजारात आली, जी हनिकोंब या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे:
१) ही आवृत्ती खासकरुन टॅब्लेट पीसींसाठी आणि मोठ्या स्क्रीनच्या फोन्ससाठी बनवली गेली.
२) सुधारीत मल्टीटास्किंग, बदलता येण्याजोगी होमस्क्रीन आणि विजेट्स.
३) ब्लुटूथ टिथरींग
४) चित्रे/व्हिडीओ पाठवण्याची अंतर्गत सोय.

१०-११ मे २०११: गुगलने अ‍ॅन्ड्रॉईडच्या ’आईस्क्रीम सॅंडविच’ आवृत्तीची घोषणा केली.

१८ जुलै २०११: अ‍ॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती ३.२ बाजारात आली.

असा अ‍ॅन्ड्रॉईडचा इथपर्यंत प्रवास झाला. आता आपण अ‍ॅन्ड्रॉईडचा बाजारपेठेतला हिस्सा पाहूया.

बाजारपेठेतला हिस्सा:
१२ नोव्हेंबर २००७: अर्धा टक्का.
३ डिसेंबर २००९: ३.९ टक्के.
२० मे २०१०: १७.७ टक्के.
१०-११ मे २०११: २२.२ टक्के.

ही अ‍ॅंन्ड्रॉईडची फक्त तोंडओळख आहे.

संदर्भ: http://www.xcubelabs.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहीती आहे..............मी स्वतः त्या ऑपरेटिंग चा फोन वापरत आहे......फारच उपयोगी आहे....

सिम्बियन हि nokia handset वर असते नि जवळ्जवळ discontinue झाली आहे किंवा १-२ वर्षांमधे होईल. नोकिया स्वतः meego बनवत होती. पण त्यांच्या fiscal situation मुळे नुकताच Microsoft शी partnership करून ह्यापुढे Windows ७ वापरणार.

फारच छान माहिती. अ‍ॅपल विरुद्ध अ‍ॅन्ड्रॉईड ही चर्चा गेले काही दिवस ऐकतोय पण त्यातल्या अ‍ॅन्ड्रॉईडबद्दल असं सविस्तर काही माहिती नव्हतं.

धन्यवाद आदित्य.

मी माझा स्मार्ट फोन फ़क्त ई मेल, गाणी ऐकणे व थोडेफ़ार सर्फ़िन्ग एवढ्या साठीच करते पण मला देखिल आन्ड्रोईड आय फोन पेक्शा जास्ती आवडतो. डाउन साईड ही की मला मरठी फ़ोन्ट आन्ड्रोईड ब्राउसर वर दिसत नाही. ओ.एस अपग्रेड केली तरीही. सध्या मी ऑपेरा हे ब्राउसर वापरुन काम चालवते आहे. कोणा कडे यावर काही उपाय असेल तर प्लिज इथे पोस्ट करावा.

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
@ केदार, नोकिया अ‍ॅन्ड्रॉईड वापरणार आहे असं मी तरी अजून ऐकलेलं नाहीये!

खुपच छान माहीती.
केतकी, मा़झ्या माहीतीनुसार अजून तरी ह्या मध्ये देवनागरी भाषेचा support दिलेला नाहिये. फोन rooting करून font update करता येतो असे काही जणांचे म्हणने आहे पण खात्रिलायक माहीती नाही.
प्रयोग करायचे असल्यास खालील लिंक बघा:

http://chetangole.com/blog/2011/08/enabling-installing-hindi-marathi-uni....

छान माहिती. आयओएस आणि अँड्रोईड मधले नक्की कुठले बेटर हे सांगणे अवघड आहे, पण दोन्ही कंपेरेबेल नक्कीच आहेत.

You know what guys ...
Android is great platform for vulnerability research.
At the same time its a great platform to get exploited by hackers.
For example .... Use facesniff application in your office environment. It would need rooting the device... But its great ! Happy

In simple words ... Android its the thing for recent future.. Ha Ha !

Saco,
लिन्क बद्दल Thanks! पण rooting केल्यास फोन ची warranty. जाते असे ऐकले. मला ते जरा risky वाटते. पुढ्च्या मे पर्यन्त या फोन वर दिवस काढायचे आहे. मात्र त्यानन्तर पुन्ह अन्ड्रॉईडच prefer करीन Happy

रुटींग केल्यावर वॉरंटी जातेच अस नाही. काही (बरेच?) रूटींग प्रोग्रॅम्स तुम्हाला 'अन-रुट' ही सुविधा पण देतात ज्यामुळे परत फोन पूर्वस्थितीला आणता येतो.
मराठी टंकासाठी दोन उपाय आहेत.
१) ऑपेरा ब्राउझर वापरुन सेटींग्ज्स मधून 'बिटमॅप' सहाय्य चालू करणे - ह्याला रुट लागत नाही.
२) रुट करुन फॉलबॅक टंक स्थापित करणे

मी स्वतः हे दोन्ही केलेले आहेत, पण ह्याबाबतीत नीट माहिती (अथवा कोणाची मदत) असेल तरच रुट करावे असा सल्ला मी देइन. पण रुट केल्यावर अमर्यादित पर्याय उपलब्ध होउ शकतात - म्हणजे दुसर्‍याच फोन्/टॅब्लेट ची ओएस वापरणे (ROM), जुनी काही अ‍ॅप्स काढून टाकणे, नविन अ‍ॅप्स घालणे वगैरे - जे अ‍ॅपल मधे शक्य नाही - म्हणजे जेलब्रेक केल्याशिवाय (आणि काही गोष्टी त्यानंतरही.)

आदित्य - फारच उपयुक्त माहिती.

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! रुटिंग-अनरुटिंग अजून तरी केलेलं नाहीये मी! ब-याच गोष्टी मलादेखील प्रतिसादांवरुनच समजल्या. नॉलेज शेअर केल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे.

केदार : नोकीयाने अँड्रोईड साठी गुगलशी करार करण्याचे ठरवले होते. पण गुगल म्हणाले की, 'जर तुम्ही अँड्रोईड वापरणार असाल तर गुगल मॅप्स, गुगल डॉक्स, अँड्रोईड मार्केट या सुविधासुद्धा मोबाईलमध्ये अंतर्भूत कराव्या लागतील.' पण नोकियाला OVI स्टोअर, OVI मॅप्स आणि इतर मोबाईलमध्ये टाकायचे होते आणि म्हणून नोकियाने अँड्रोईडसाठी गुगलशी करार केला नाही. त्यामुळे नोकियामध्ये अँड्रोईड हि O.S. येऊ शकत नाही.

तसे पाहीले तर नोकियाच्या ARM प्रोसेसर असणाऱ्या मोबाईल मध्ये Android टाकता येते.
ऑन सेफ साईड ... एखाद्या मेमरी कार्ड वर Android टाकून तिथून बूट करावे. डीवाइस मेमरीत फक्त बूट लोडर टाकावे.
एकाच वेळी तुमच्या कडे एकाहून जास्त OS असू शकतात. Maemo , Meego Android वैगेरे.
असे करून विंडोज XP सुद्धा चालू शकते. (Tested !) Happy

धन्यवाद प्रकाश काळेल,प्रणव, निळूभाऊ, वर्षू नील!
@प्रणव, निळूभाऊ तुम्ही पुरवलेली अतिरिक्त माहीती मलाही नवीन होती. मनःपूर्वक धन्यवाद!

मला पण नाही वाटत रुटींग केल्यावर वॉरंटी जाते. पण माहीती नसल्यास risky आहे.
वाटसरु, "ऑपेरा ब्राउझर वापरुन सेटींग्ज्स मधून 'बिटमॅप' सहाय्य चालू करणे - ह्याला रुट लागत नाही" बद्धल जरा सविस्तर माहिती द्याल का?
मी अँड्रोईड साठी काही aps लिहिले आहेत पण OS बद्धल फारशी माहीती नव्हती. माझ्या pc वर ३ OS आहेत पण फोन वर हे शक्य आहे हे माहीत नव्हत. आता थोडे कीडे करुन बघतो Happy
प्रणव, निळूभाऊ, आदित्य खरोखर उपयुक्त माहीती आहे.

निळूभाऊ,
फ़ारच उपयुक्त माहिती!

saco,
ऑपेरा चे बिटमॅप सेटिंग वापरण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे करावे. मी मराठी फ़ोंट साठी तसेच केले. अधिक माहिती साठी लिंक पण दिली आहे.

Inorder to read, we have to enable a special menu on the Opera Mini browser by typeing "about:config" in the address bar of Opera Mini and click "Go".
This will open a configuration menu. In ths menu there will be an entry called "Use bitmap fonts for complex scripts". By default this setting will be disabled. Now change the setting to Yes and click Save.
http://collectns.blogspot.com/2011/04/read-malayalamor-other-non-english...

कोणी रूट केलेय का ?
मी असे ऐकले की रूट केल्याने Battery life कमी होते.
पण ते लिथीयम आयॉन Battery वापरतात ना ? माझ्या माहितीनुसार त्याला मेमरी प्रोब्लेम नसतो.
कोणी प्रकाश टाकू शकेल का ?

मी स्वतः रुट केले आहे, मला तरी अशी काही अडचण जाणवली नाही. शिवाय असे व्ह्यायचे काही कारण असू शकेल असे वाटत नाही.

Pages