झुळूक

Submitted by webmaster on 7 January, 2008 - 01:31

हि जागा चारोळी लेखनासाठी. कृपया आपल्या चारोळ्या इथेच प्रतिसादामध्ये लिहा.

गुलमोहर: 

आसवे ही सुकलेली
पण, कंठ पुन्हा दाटला
पापणीस त्या कळेना
हा नवा उमाळा कुठला

छान आहे चारोळी.

दू:ख झाले डोळ्यास जेव्हा
पापणीस अश्रू झेलवेना
हळूच तोही उतरला अन्
दू:ख घेउनी वाहीला.........

चारोळी बघितली आणि नाव न बघताच ओळखलं Happy

मस्त आहे, और आने दो रे.

असा जीव लावू नको
माझा जीव जाईल
तुझ्या लोभाला सोसायची
माझी ताकत नाही...
................... दिन

दु:खाचा डो'गर
गालावरुन ओ घ ळ ला
खारवून ओठा'ना
जीभेवर विरला.
--------दिन

नयनावरील पापणीचा;
तू पडदा सा र ला,
लोचनात तुझ्या सखे;
मला 'मी'च दिसला.
. . . . दिन

आतुरल्या मनाचा
बा॑ध तुझा फु ट ला
विसावल्या चेहर्‍याने
खा॑दा माझा भिजला.
.....दिन

वा!!! क्या बात है.
सुन्दर.

डोळे थिजले, काया थ क ली;
मी वाट किती बघू?
निवा॑तपणे मरण्यासाठी;
मी आर्जवे किती करु?

रे॑गाळते तुझ्या वाटेवर;
उगीच माझी नजर,
पै॑जनाच्या आवाजाने;
मन अनुरक्त!

वाट तुझी पाहताना
पालवि हि अनेकदा मोहरलि
पडझड होताना तिची
अनेक आसवांनी होती रडलि

प्रिति

मागच्या पानांवरुन पुढे
चालूचं आहे जगणं
आणि वास्तवाकडे
स्वप्नाळु डोळ्यांनी बघणं

आणि वास्तवाकडे
स्वप्नाळु डोळ्यांनी बघणं >>> आवडेश

तुझ्या आवडण्याचा मला;
जाच व्हायला लागला,
कारण प्रत्येक क्षण माझा;
तुझ्या आठवणीत जायला लागला.

तू आकाशाकडे पाहताना
मी तुझ्या डोळ्यात पाहावे
तुला आकाशातील सूर्य दिसावा
मला दोन सूर्यांत आकाश दिसावे

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कुठून मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
हे तुम्हाला कसे कळणार

दोन सुर्य आणि प्रेमात....छान...साधं सरळ.
पण आम्ही प्रेमात पडलो नाही....उठलो :-))

झुळुक हे सदर 'लेखन करा' --कविता मध्ये दिसत नाही!

मित्रा....
...मित्रा मला माफ कर
मनातली धुळ साफ कर...
पुन्हा एकदा भेटु या..
झिम्मड पावसात भिजु या....

स्वप्नाळू दव भिजले
हळुवारला पहाटरव रानी
हिरवीकंच धरा बहरली
वारा खिदळे पानोपानी

चिनु खूपच सुरेख!

राजा छान लिहिलस.
बाकिच्या चारोळ्या हि छान आहेत.

धन्सं शुमा, प्रीती.

तू म्हणालास कोण ही अनोळखी?
आगांतूक पणे आज दिसली आहे
आणि ओळख नसताना देखील
उधाण येऊन हसली आहे?

पण अनोळखी शब्दातच
एक ओळख लपली आहे
तुझी संक्षिप्त आठवण मी
माझ्या मनांत जपली आहे

अनोळखी शब्दातली ओळख छानच शुमा.

शहरातला हर रस्ता
आज उदार आहे
चोरून फिरतेय नजर
ओळख उधार आहे!

चिन्नु

तुझ्या डोळ्यातली नशा
माझ्या ओठांत कैद करायचीय
माझ्या श्वासातली तडफ
तुझ्या नसानसात भरायचीय

Pages