छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - श्रावणी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2011 - 14:55

नाव - श्रावणी
वय - ६ वर्षे.

सामान : पेपर, पेन्सिल, स्केचपेन, खडू (क्रेयॉन्स), गम, रेडीयम स्टार्स, जेम्स च्या गोळ्या.

चित्र तिने स्वतःच काढले आहे. फक्त डोंगराची ब्लॅक बॉर्डर आखुन देण्यास तिच्या वडीलांनी मदत केली. तिने घरावर रेडीयम स्टार चिकटवले आहेत. रात्री घराची लाईटींग दिसावी म्हणून Happy डोंगरावरुन घरापर्यंत नदी वाहते आहे. घरा भोवती दगड म्हणून तिने एक्पायरी डेट झालेल्या जेम्सच्या गोळ्या चिकटवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! शाब्बास! श्रावणी.

नदी, डोंगर, भरपूर झाडं, रंगीबेरंगी दगड, घराच्या आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट, फुलझाडं, गवत, अन खासमखास हसणारा सुर्य...
तुम्ही सगळे कुटूंबीय निर्सगवत्सल आहात हे कळते ह्यातून.

सिंडरेला, आशुतोष, फुलपाखरू, नुतनजे, वर्षू, नंदिनी, रेशिम धन्यवाद.

कविता Lol अग चुकुन एका पिशवीत तश्याच राहिल्या होत्या त्या. आणि चॉकलेट गोळ्या खाण्यापासुन ती स्वत:ला वंचित करुन घेणार नाही. तिचे रडण्याचे अस्त्र काढते लगेच खाऊ नको सांगितले की.

नलिनी अग मी लहान होते ना तेंव्हा मी पण हेच चित्र काढायचे. तिच आवड माझ्या मुलीत आलेली पाहुन मला आश्चर्य वाटत. फक्त मी त्या नदीत बदके काढायचे एवढाच फरक. धन्स.

वा मस्त चित्र श्रावणी. Happy वारं सुटलय ना? झाडं खूप छान आहेत, ढग, घर, फुले मस्त मस्त एकदम. शाबास!! अशीच सुंदर सुंदर चित्र काढत जा अन आईला मायबोलीवर टाकायला सांग. Happy

अभिनंदन श्रावणी. झाडे आणि फुले खुपच छान आली आहेत. नदी वाहत वाहत पानाच्या बाहेर गेली असती तर आणखी सुंदर वाटले असते.

शाब्बास श्रावणी! मस्तं काढलंय. तुझं रंगीबेरंगी घर, डोंगरामागचा हसरा सूर्य आणि घराच्या रंगाना मॅचिंग दगड फार फार आवडले.

मस्त काढलंय घर. Happy
(वडिलांनी 'आखून' दिलेले डोंगर बघून साजिर्‍याच्या लेखातला प्रसंग आठवला. Happy )

श्रावणी, छानच ! अर्थात, तूं चित्र छान नाही काढलंस तरच नवल ! कलेच्या माहेरघरातच बाप्पाच्या कृपेनं बहरणार आहेस तूं !!!

अखी, मृण्मयी, राखी, स्वाती, ज्ञाती, सशल, सावली, लालू, मयुरेश, प्रमोद देव, आयडू, श्यामली श्रावणी तर्फे धन्यवाद.

भाऊ तुमच्या आशीर्वादासाठी श्रावणी तर्फे पायलागू.

मस्तय घर. Happy चमकणार्‍या रेडियम स्टारचा पण फोटो टाक ना..

जागुडे तिला एक्स्पायरी डेट उलटेपर्यंत त्या गोळ्या खाण्यापासून वंचित ठेवलस? कुफेहेपा >>> Lol

Pages